..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन हप्त्याच्या आतच धागा "नाबाद ५००" झाला, त्याबद्दल धागाकर्ती मामी यांचे अभिनंदन करावेसे वाटते. ५०० होऊनही धाग्याची 'ताजगी' अगदी निरमा वाली राहिली आहे, हे विशेष.
>>> अरे माझे कसले अभिनंदन. आपला सगळ्यांचाच आहे हा धागा. मी केवळ निमित्तमात्र.
:वरून विनय दाखवणारी पण मनातून जाम खुश झालेली बाहुली: Proud

श्या ... लग्गेच ओळखतात. Happy

बने, चाहे दुश्मन; (पण) जमाना हमारा...
सलामत रहे दोस्ताना हमारा!!!!!

मुलींच्या शाळेत एक नव्या शिक्षिका बाई येतात. वर्गशिक्षिका म्हणून त्यांना सहावी फ चा वर्ग मिळतो. बाकीच्या शिक्षिकांकडून त्या वर्गात मधू नावाची एक अत्यंत व्रात्य मुलगी असल्याचे कळते. शिक्षिकाबाई ' हो का? बगह्तेच मग तिच्याकडे' असे म्हणत वर्गात जातात. तिथे ओळख करून देता-घेताना त्या कोणते गाणे म्हणतील?

"मी केवळ निमित्तमात्र."...>>>

~ असे असले तरी या धाग्याने आमच्यासारख्या हिंदी चित्रपट संगीतप्रेमी मंडळीना जो निखळ आनंद दिला आहे तो केवळ अवर्णनीय असाच आहे. 'नॉस्टल्जीया' म्हणजे काय असे कुणी नवख्याने विचारलेच तर त्याला थेट या धाग्याकडेच घेऊन यावे इतके प्रसन्नचित्त इथले वातावरण बनले आहे....याचे सारे श्रेय तुमच्याच कल्पनाशक्तीला जाते, हे निर्विवाद !

'नॉस्टल्जीया' म्हणजे काय असे कुणी नवख्याने विचारलेच तर त्याला थेट या धाग्याकडेच घेऊन यावे इतके प्रसन्नचित्त इथले वातावरण बनले आहे....याचे सारे श्रेय तुमच्याच कल्पनाशक्तीला जाते, हे निर्विवाद !>>>>>प्रतीकला १००० मोदक Happy

मागील दारी गाठून त्याने तिचे नाव विचारल
ती म्हणाली जिथे मी चाललेय तेच माझ नाव
मादक जरी मी असले भारी
तरी तुझ्या हाती लागेन बरी

सोप्प आहे द्या उत्तर

भरत आणि गुगु, दोन्हीची उत्तरे सुचत नाहीत.

ते इंटरव्ह्यू चेच लॉजिक मला पुढे चालवायचे होते.पण उत्तरासकट लिहूनच टाकतो.

त्या इंटरव्यू चे त्याला खुप टेंशन आले होते. त्याचा पहिलाच होता. सिलेक्शन होईल कि नाही, याची काळजी वाटत होती.
त्याप्रसंगी तो गाईल.

आज उनसे पहली मुलाकात होगी
फिर आमनेसामने बात होगी,
फिर होगा क्या, क्या पता, क्या खबर...

पण मुलाखत घेणारा तर त्याच्या बाबांच्या ओळखीचा निघाला. त्याने काही जुजबी प्रश्न विचारुन त्याची निवड करुन टाकली. पण त्याने तसे बाहेर कुणाला सांगू नये, असे त्याला वाटत होते.

ये दुनियावाले पूछेंगे,
मुलाकात हुई, क्या बात हुई
ये बात किसीसे ना कहना..

दोन्ही गाण्याचे शब्द अगदी साधे पण किशोरचा आवाज आणि सुरीली चाल, यामूळे गाणी मस्त वाटतात.

"मुलं लाजवतात तेव्हा !" या धाग्यावरच्या सर्व आया (आईचं अनेक वचन Wink ) आपल्या मुलासाठी कोणतं गाणं म्हणतील.

मुलींच्या शाळेत एक नव्या शिक्षिका बाई येतात. वर्गशिक्षिका म्हणून त्यांना सहावी फ चा वर्ग मिळतो. बाकीच्या शिक्षिकांकडून त्या वर्गात मधू नावाची एक अत्यंत व्रात्य मुलगी असल्याचे कळते. शिक्षिकाबाई ' हो का? बघच मग तिच्याकडे' असे म्हणत वर्गात जातात. तिथे ओळख करून देता-घेताना त्या कोणते गाणे म्हणतील?

दिनेशदांशिवाय कोणी प्रयत्न केला नाही का?
क्लु : व्रात्य मुलीचं नाव गाण्यात आहे. गाण्यात मुलींची इतरही नावं आहेत.

भरत.. मला वाटते....मेरा नाम है शब्बो .. प्यार से लोग मुझे शबनम कहते है... हे गाणे आहे का???

मागील दारी गाठून त्याने तिचे नाव विचारल
ती म्हणाली जिथे मी चाललेय तेच माझ नाव
मादक जरी मी असले भारी
तरी तुझ्या हाती लागेन बरी>>>

माय नेम इज शीला

ओ येस. मधू वरुन मला आठवायला हवे होते.
तेरा नाम क्या है
लिना, मीना, अंजू, मंजू या मधू... त्या मधू वर आशाने काय आवाज लावलाय !

एक संस्थानीक मृत्युशय्येवर पडलेला असतो.. सगळे नातेवाईक त्याच्या भोवती गोळा येतात.. त्याची राणी त्याला त्याच्या खजिन्याविषयी विचारत असते.. तर ती कोणते गाणे म्हणेल?? Happy

बरोब्बर मेरा ना है शबनम .
आणखी एक : एका खुशालचेंडु नवर्‍याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन त्यातुन तो बराही झालेला. पण हवी ती काळजी घ्यायला मात्र विसरायचा. त्याची बायको त्याला सतत त्याच्या हृदयविकाराची आठवण करुन द्यायची, की बाबा काळजी घे.
अशा वेळी तो बायकोला उद्देशुन कोणतं गाणं म्हणेल आणि बायकोही त्याला गाण्यातुन कसे उत्तर देईल?

इथे भरताच्या भेटीला राम आलेला दिसतोय. Happy

भरत ... शीशा है दिल इतना ना उछालो.(?) नाही, खुशाल्'चेंडू' म्हणलय म्हणून 'उछालो' वालं गाणं आठवलं. Proud

@ राम ~
"मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है |" हे असू शकेल ?

@ मामी ~
भरत यांच्या यादीतील "बाबा" गाणे म्हणणार असल्याने तो आपल्या बायकोला 'शीशा है दिल...' म्हणेल हे संभवत नाही. शिवाय बायकोही त्याला उत्तर देत आहे, असेही म्हटले आहे. त्यामुळे एखादे द्वंद्वगीत असणार.

एक संस्थानीक मृत्युशय्येवर पडलेला असतो.. सगळे नातेवाईक त्याच्या भोवती गोळा येतात.. त्याची राणी त्याला त्याच्या खजिन्याविषयी विचारत असते.. तर ती कोणते गाणे म्हणेल??

सजन रे झूठ मत बोलो
खुदा के पास जाना है..

छानशा 'दिल' नावाच्या बंगल्यात एक माणूस रहात असतो. एके दिवशी त्याच्या शेजारच्या बंगल्यात राहणारा ब्रुस ली स्वत:च्या बागेत झाडांकरता बरेच खड्डे करतो आणि सगळी माती याच्या आवारात टाकून देतो. तर बंगल्याचा मालक त्याला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?

Pages