कातडीचाच चाललाय खेळ सारा,
अदिपासून अंतापर्यंत.
देवापासून दानवापर्यंत
आणि क्षुद्र मानवापर्यंत.
काळी, गोरी,
सावळी, गव्हाळी,
देखणी, लुसलुशीत
गुबगुबीत, रसरशीत,
बिलबिलीत, फिदफिदित
तलम, मऊसूत
तजेलदार,
सुरकुतलेली, जर्जरलेली,
जाळीदार.
विविधरंगी, विविधढंगी..
कातडीच्या मायाजाळातच गुरफटायचा
भोगाचा कपट इशारा.
विश्वामित्रालाही मेनकेच्या
कातडीचा नजारा.
ह्या कातडीचा माजच लई न्यारा,
म्हणून
वेश्यानो -
कातडीवर लिपापोती करा,
फाये लावा,
साज चढवा, नखशिखांत नटवा,
तिच्यावर तोकडे कपडे लटकवा,
जे झाकायचं तेच दाखवा
उरलेलं मात्र झाकून ठेवा.
बळीचा बकरा बनवा.
मग तिलाच बाजारात विका,
तिच्या जोरावर सर्वांना नाचवा,
खेळवा.
दमले की सापासारखी कात बदला,
पुन्हा नवा खेळ उभारा.
भडव्यांनो -
बघताय काय नुसती?
उठा, कुस्करा,
मुरगळा तिला.
गरम करा, लुटा,
जाळा, फटके द्या.
लक्तरे लोंबवा,
चिरफाड करा, फाडून टाका,
रक्तबंबाळ करा,
आपली वाचवा, दुसऱ्याची मारा.
नाहीतर स्वत:चीच सोलून वेशीला टांगा.
मनाविरुद्ध झालं तर डोळ्यावर ओढा,
आणि कमी पडली तर गेंड्याची चढवा.
सोलून काढून पायताण बनवा.
आणि फारच गळ्याशी आलं की,
सरड्यासारखी बदलत राहा.
खरंच ह्या कातडीचा माज लई न्यारा,
म्हणूनच -
तिलाच एकदाची नागवी करा,
सगळी सोलवटून काढा.
आत पाहिलं तर,
रक्तामासाचा चिखल नुसता.
तिचा आणि त्याचा,
सगळ्यांचाच सारखा..
थू साला..
एवढं कळत असलं तरी,
हवाहवासा वाटणारा,
हा विषाचा प्याला
कधीही न संपणारा.
शेवटी आयुष्य म्हणजे काय सालं?
कातडीचाच भोग सगळा..
छान..अत्यंत अश्लिल आणि जहाल
छान..अत्यंत अश्लिल आणि जहाल रचना.
अहो चातक.. लांबी जरी जास्त
अहो चातक..
लांबी जरी जास्त असली, तरी रूंदी कमी आहे.. पळताय काय..
धन्यवाद.. अश्लील आहे की नाही
धन्यवाद..
अश्लील आहे की नाही हे सापेक्ष.. असो..
जहालच लिहायची होती.. पोचली म्हणजे..
चांगली आहे अर्थातच..!
चांगली आहे अर्थातच..!
जहालच लिहायची होती.. पोचली
जहालच लिहायची होती.. पोचली म्हणजे..>> हो का..? मग ठिकेय्य.
आवडली.
आवडली.
थू साला.. एवढं कळत असलं
थू साला..
एवढं कळत असलं तरी,
हवाहवासा वाटणारा,
हा विषाचा प्याला
कधीही न संपणारा.
शेवटी आयुष्य म्हणजे काय सालं?
कातडीचाच भोग सगळा..
>> येवढा भाग पटला भावला आवडला
बाकी बराचसा भीभत्स उग्र वाटला ...थोड्या सौम्य शब्दातही व्यक्त करता येईल असे वाटले !
पुलेशु !!
अश्लिल नाही वाटली, वास्तविक
अश्लिल नाही वाटली, वास्तविक आहे.
चातक शी सहमत, जहाल रचना आहे...
निवडुंग - पुलेशु!!
कातडीचाच भोग सगळा.. कविता छान
कातडीचाच भोग सगळा..
कविता छान आहे,
कातडीपेक्षा आतडी कशी आहे ते पहाण महत्वाच आहे .
सर्वप्रथम मुक्ता, चातक, हंसा,
सर्वप्रथम
मुक्ता, चातक, हंसा, आपजिगा१११, दक्षिणा, किकु,
सर्वांचे मनःपूर्वक आभार..
काहींना ही कविता(?) अश्लिल, बीभत्स, उग्र वाटली तर थोडी पार्श्वभूमी लिहितो या रचनेमागची.
ही रचना म्हणजे त्या सर्व व्यक्तींवरचा रोष होता - त्यात काही प्रवॄत्तीचे महिला आणि पुरुष यांचा समावेश.
ज्या स्त्रिया आपल्या सौंदर्याच्या (कातडी?) जोरावर पुरुषांचे मानसिक, आर्थिक आणि इतर प्रकारचे शोषण करतात.. (यात फक्त बाजारूच स्त्रिया नाही हे कृपया समजावून घ्यावं. उलट तिथे सर्व आधीच माहित असतं..) आणि वेळ आली की टांग मारून दुसरं सावज शोधतात, त्या.
जे पुरुष बायको आपली मालमत्ता आहे असं समजून तिला पायताणाची ही किंम्मत देत नाहीत, रोज अत्याचार करतात, मारहाण, जाळणे, वेळ आली तर खून करण्यासही कमी पडत नाहीत. निर्ढावलेले, लाज सोडून दिलेले (यात मग नेतेमंडळी सारखी ही लोकं.. )
ह्या सर्वांबद्दल जो काही राग येतो, तो कुठे तरी बाहेर काढायचा होता, म्हणून अशी लिहिली गेलीये ही रचना..
जहाल तर ती आहेच, कारण तेवढाच राग खदखदत होता मनात..
अश्लील वाटत असेल, तर असेल ही कदाचित..
सर्वांचे पुन्हा एकदा खूप आभार..
सडेतोड..! कैच्याकै मधून
सडेतोड..!
कैच्याकै मधून हलवा.
तुझ्या नकली नावासारखी (आय मीन
तुझ्या नकली नावासारखी (आय मीन निवडुंग) काटेरी....
अश्लील नाही वाट्ली पण तुझा प्रक्षोभ पोहोचला....
अमित, खूप धन्यवाद ! मला
अमित,
खूप धन्यवाद ! मला वाटतंय राहू द्यावी इथेच..
बागेश्री,
कवितेतील भावना नकली नाहीयेत पण ! आभार !