Submitted by आनंदयात्री on 16 May, 2011 - 01:34
विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही
मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही
तुझीही वेगळी आहे कहाणी
हवे जे तुज, तुझ्या नशिबात नाही
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
तुझा मजकूर तर केव्हाच
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही
- शेर खूप आवडले. दोन्ही शेरांचा मूडही मस्तच आणि समान! अभिनंदन!
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
- हासिले गझल! (पण माझ्यात नाही - अप्रतिम)
तसेच, तरही मिसर्यावर गझल
तसेच, तरही मिसर्यावर गझल बांधण्याच्या सहभागासाही अनेक आभार आपले! लोभ असू द्यावात
नको ती ओढ स्वप्नांची
नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही >> व्वाह! नचिकेत हा शेर खुपच भावला.
क्या बात है... मुजरा सरकार !
क्या बात है... मुजरा सरकार !
मस्तच गझल! सगळेच शेर खास!
मस्तच गझल! सगळेच शेर खास!
मस्तच गझल! सगळेच शेर खास!
मस्तच गझल! सगळेच शेर खास!
सुरेख.. आवडली!!!!!!!!!!
सुरेख..
आवडली!!!!!!!!!!;)
मस्तच गझल
मस्तच गझल
'विलगणेही तुझ्या हातात
'विलगणेही तुझ्या हातात नाही'
असे एक आपले वाचून पाहिले!
मस्त शेर!
तुम्ही जो पाहता तो मोकळा
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
क्या बात है नचिकेतजी वाह...
नचिकेत, अप्रतिम गझल.. सगळे
नचिकेत,
सगळे शेर एकसे एक आहेत.... खूप आवडली..
अप्रतिम गझल..
माझ्या आवडत्या १०त
ओहोहो... क्या बात.. सहज
ओहोहो... क्या बात.. सहज सुंदर... जियो !
तुम्ही जो पाहता तो मोकळा
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
व्वा.. क्या बात है..!
बढीया !
बढीया !
आहा नचिकेत जबरदस्त.. क्या बात
आहा नचिकेत जबरदस्त.. क्या बात है.
गुरुवर्य अप्रतिम १०
गुरुवर्य अप्रतिम १० पद्कांच्या पलीकडील.
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही...............फट्टे जमलय.
>> तुम्ही जो पाहता तो मोकळा
>> तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
>> खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
ये ब्बात!
वाह. सुंदर गझल.. !!
वाह. सुंदर गझल.. !!
बेफिकीर, चातक, विशाल, कविता,
बेफिकीर, चातक, विशाल, कविता, मुक्ता, शाम, समीर, दगडा, शिष्योत्तमा बाजीरावा, चेतना, स्वातीताई, गिरीश, विद्यानंद, दक्षिणा - मनःपूर्वक धन्यवाद!
बेफिकीर, विलगणे अन् हेच आवडलं!
क्रांतिताई - दोनदा आभार!
छान आहे गझल
छान आहे गझल
तुम्ही जो पाहता तो मोकळा
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही
क्या कहु जबाब नही
ग्रेट .
ग्रेट .
सगळेच शेर आवडले , पण मजकूर
सगळेच शेर आवडले , पण मजकूर आणि कैद ... भिडले...!!
विसरणेही तुझ्या लक्षात
विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
क्या बात... क्या बात ...क्या बात...
हर्षल, सुधीर, छाया, भ्रमरा,
हर्षल, सुधीर, छाया, भ्रमरा, मयुरेश - thanks!!
तुझा मजकूर तर केव्हाच
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही >>> मस्त
पण शेवट्चा फारच सुरेख...
मस्त प्रवाही गझल
तुझा मजकूर तर केव्हाच
तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही
मस्तच...
मिल्या, उमेश - thanks
मिल्या, उमेश - thanks
सुंदर !दुसरा,तिसरा शेर
सुंदर !दुसरा,तिसरा शेर जबरदस्त .
गजल आवडली.
तुम्ही जो पाहता तो मोकळा
तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही..... केवळ अप्रतिम!
Pages