गद्यातलं हे माझं पहिलं (आणि एकमेव ) लिखाण आहे
आज नॅशनल वर मदर इंडिया बघायचा होता. पण सतत फोन, घरातली कामं यात तो सलग पाहता आलाच नाही. बाहेरून येईपर्यंत सिनेमा संपला होता. असंच सर्फिंग करतांना झी स्टुडिओ या चॅनेलवर एट बिलो हा सिनेमा चालू होता. मी पुढे जाणार इतक्यात बाबांनी मला थांबायची खूण करत हा सगळं काम सोडून हा सिनेमा पहा अशी आज्ञा केली...
सुरूवात चुकली होती. ती बाबांकडून कळाली. अंटार्क्टिकामधे मोहीमेसाठी एक अमेरिकन पथक गेलेलं असतं. स्टेशनपासून लांब बर्फात फिरतांना नायक बर्फाच्या घळईत अडकतो. वर बर्फ जमा होऊन त्याची तिथंच हिमसमाधी बांधली जाण्याचा धोका निर्माण होतो.
पथकातल्या एकाला एक कल्पना सुचते. मोहीमेसाठी कुत्र्यांची गाडी आणलेली असते. मोहीमेत वापरली जाणारी ही कुत्री हुषार असतात. कुत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येतं आणि त्यांच्या सहाय्याने नायकाला घळईतून बाहेर काढण्यात यश येतं. तो बराच जखमी असतो आणि पाय जायबंदी झालेला असतो. लवकर मेडिकल हेल्प मिळाली नाही तर गॅंगरीन होऊन पाय कापावा लागण्याचा धोका असतोच.
युद्धपातळीवर एका हेलिकॊप्टरचा बंदोबस्त करून पेशंटला न्यायचं ठरतं. कुत्र्यांचा नायकावर आणि मिहीमेतल्या सदस्यांवर खूप जीव असतो. ते ही मागे लागतात. मोजक्याच जागेमुळं ते कुत्र्यांना बांधून ठेवतात आणि आम्ही लगेच येतो असं त्या कुत्र्यांना सांगून अमेरिकेकडे उड्डाण करतात.
नायकाचा पाय बरा होतो. तीन दिवस झालेले असतात. त्याला तिकडं कुत्र्यांच काय झालं असेल या कल्पनेनं अस्वस्थ वाटायला लागतं. त्याच्या भावनेची तीव्रता कुणाकडेच नसल्याने खास कुत्र्यांसाठी पुन्हा जावं असं कुणालाच वाटत नसतं. एकतर मोहीम आटोपलेली असल्याने आता पुन्हा जाणं म्हणजे सगळी जमवाजमव करणे,पैशांचा बंदोबस्त करणे हे सगळं आलंच.. हे सोपं नसतं
इकडं हवामान खराब होत चाललेलं असतं. कुत्र्यांना बांधून ठेवलेलं. हिमवादळं सुरू झालेली असतात......
पुढं काय होतं हे सांगत नाही. हा सिनेमा प्रत्येकाने पहावा इतका सुंदर आहे...!
त्या कुत्र्यांच काय होतं हाच सिनेमाचा विषय आहे. माणूस आणि कुत्रा यांच्या नात्यावर केलेली एखादी सुंदर कविताच असावी असा हा सिनेमा आहे..
कुत्र्यांनी दाखवलेली माणुसकी आणि माणसाची बेपर्वाई, संकटात त्यांच एकमेकांवरचं प्रेम... !!! कसलेल्या अभिनेत्यांना मागं टाकतील असा त्या कुत्र्यांचा अभिनय... सगळंच अद्भुत !!
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NXkoGlxVbLY
http://www.youtube.com/watch?v=OSwlozB-zyE&feature=player_embedded
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NXkoGlxVbLY
पुढे काय हे टीव्हीवर पहा. माझाही अधून मधून काही भाग राहीला बघायचा..... झी स्टुडिओ वर नेहमी असतो.. किंवा मग सीडी !!
टीप :
http://www.youtube.com/watch?v=Z3eBOcWmZw4&feature=related
या वरच्या लिंकमधे पहिला भाग दिलेला आहे. या यूट्यूबच्या बाजूलाच एक ते बारा असे भाग दिलेले आहेत. संपूर्ण सिनेमा इथेच पाहता येईल..
>>कसलेल्या अभिनेत्यांना मागं
>>कसलेल्या अभिनेत्यांना मागं टाकतील असा त्या कुत्र्यांचा अभिनय... सगळंच अद्भुत !!>> अगदी अगदी!! मी पण पाहिला. अतिशय सुंदर चित्रपट.
ईथे पूर्ण पाहू शकाल. http://stagevu.com/video/wygszeslzhik
नीलू आधी डाऊनलोड करावा लागेल
नीलू
आधी डाऊनलोड करावा लागेल का ? कारण क्लिप तर ओपन होत नाही तिथे
धन्यवाद! नाव ऐकलेले आहे पण
धन्यवाद! नाव ऐकलेले आहे पण कथा माहीत नव्हती. आता नक्की बघणार.
धन्स,छान माहिती चांगला
धन्स,छान माहिती चांगला वाटतोय, नक्की बघणार.
अतिशय सुंदर सिनेमा आहे हा.
अतिशय सुंदर सिनेमा आहे हा. माझा खुप आवडता आहे.
माझा प्रचंड आवडता पिक्चर आहे
माझा प्रचंड आवडता पिक्चर आहे हा. प्रत्येक वेळेस बघताना रडते मी.
माझाही आवडता सिनेमा आहे हा.
माझाही आवडता सिनेमा आहे हा.
लेकीबरोबर अनेकवेळा आनंद
लेकीबरोबर अनेकवेळा आनंद घेतलाय या सिनेमाचा. अप्रतिम आहे.
अप्रतिम सिनेमा आहे हा
अप्रतिम सिनेमा आहे हा !
झी-स्टुडियोवर अनेकदा लागतो. आमचा बर्याचदा हुकला होता. एकदा सुदैवाने तो सुरू होताहोताच झी-स्टुडियो लावलं. रात्री १०:०० वाजता. दुर्दैवाने तेव्हा मुलाची परिक्षा चालू होती. पण तो तसाही त्याच्या खोलीत अभ्यास न करता चित्र काढतच बसला होता. मग त्यालाही हाक मारली. परिक्षा सुरू असताना आई आपणहून सिनेमा बघ म्हणतीये हे पाहून तो गार! बसून आम्ही तिघांनीही आख्खा सिनेमा बघितला. असाही सिनेमा बनतो या विचाराने शेवटी तिघंही अवाक झालो होतो. माझा नवरा आणि मुलगा दोघंही फुल्ल श्वानप्रेमी वगैरे आहेत. त्यांना तर गहिवरून यायचंच बाकी राहिलं होतं.
मी पण हा सिनेमा २ वेळा पाहिला
मी पण हा सिनेमा २ वेळा पाहिला आहे. दोन्ही वेळा रडले होते सिनेमा पाहून. काही प्रसंग तर अतिशय स्पर्शून जातात यातले. नायकाचं कुत्र्यांवरचं प्रेम, त्यांना तिथे सोडून आल्यामुळे आलेला अपराधीपणा आणि त्यांना काहीही करून सोडवून आणण्याची त्याची धडपड, अप्रतिम चित्रण. हे सर्व कुत्रे अंटार्टिकावर बांधलेल्या अवस्थेत सोडून आल्याने, त्यांची स्वत:ची सुटका करून घेण्याचे प्रयत्न ही पाहण्याजोगे आहेत. एक कुत्रा/कुत्री जेव्हा स्वत:ची सोडवणूक करू शकत नाही तेव्हा त्याच्या खाण्याची व्यवस्था, इतर प्राण्यापासून आपल्या साथीदारांचं संरक्षण....
तरिही एका कुत्र्याचा तिथे अंत होतो, तो सर्वात करूण प्रसंग आहे.
शेवटी हिरो जेव्हा सर्व कुत्र्यांना सोडवतो तो क्षण तर कोणत्याही चित्रपटाच्या गोड शेवटाला मागे टाकेल असा आहे.
माझा पण फेवरिट. बरेच दिवस
माझा पण फेवरिट. बरेच दिवस पूर्ण बघू शकले नाही. मग माझ्या कुत्र्यांना जवळ घेउन रड्त रड्त पाहिला.
कुत्रा व माणूस यांतील बाँड हा स्पष्ट करून सांगता येत नाही तो अनुभवावाच लागतो. कुंउ. ( हे माझ्या डॉगीज कडून ) मला ते सायबेरिअन हस्की ब्रीड फार आवड्ते फार राजबिंडे दिसतात. हा सिनेमा आव्ड्णार्यांनी
स्नो डॉगज पण बघावा. मॉस्त हसरा सेन्सिटिव सिनेमा आहे.
बघायला पाहीजे. सीडी मिळतेय
बघायला पाहीजे. सीडी मिळतेय का बघायला पाहीजे..
जंतू अहो सारखा येतो टीवीवर.
जंतू अहो सारखा येतो टीवीवर.
ओके. अश्विनीमामी थँक्स..
ओके. अश्विनीमामी थँक्स..
हा चित्रपट बहुतेक पाहिलाय
हा चित्रपट बहुतेक पाहिलाय मी... कुठल्याशा गावामध्ये कुत्र्यांची शर्यत असते, तोच आहे का हा?
(हे माझं असं होतं बर्याचदा... इंग्रजी चित्रपट पाहूनही आठवत नाही..)
आनंदयात्री अहो तोच स्नोडॉग्ज.
आनंदयात्री अहो तोच स्नोडॉग्ज. क्युबा गुडिन्ग ज्यु. हा मयामीत डेंटिस्ट असतो. त्याला आईतर्फे कुत्रे मिळतात. तो कुत्र्यांच्या शर्यतीत भाग घेतो. त्यातही हेच हस्की कुत्रे आहेत. अगदी सुरेख ब्रीड. निळे डोळे.
करडे केस. तेच हिरो.
मैत्रेयी, नाही ऑनलाईन बघता
मैत्रेयी, नाही ऑनलाईन बघता येतो पण कनेक्शन स्लो असेल तर बफरिंगला वेळ लागतो. त्याआधी DivX Plus Web Player for Windows ईस्न्स्टॉल करायला लागेल. त्याची लिंक क्लिप्च्या खाली आहे.
स्नो डॉग्ज... हम्म.. बघायला हवा
माझा आणि माझ्या लेकीचा
माझा आणि माझ्या लेकीचा फेवरेट!
स्नो डॉग्ज पण मस्त आहे.. पण
स्नो डॉग्ज पण मस्त आहे.. पण एट बिलोसारखा टच त्याचा नाही.. पण भुभू असल्याने आम्हाला आवडतो!
स्नो डॉग्ज मस्तच! एट बिलो
स्नो डॉग्ज मस्तच! एट बिलो बघेन आता रडत रडत!
मस्त आहे सिनेमा. मलाही आवडला
मस्त आहे सिनेमा. मलाही आवडला होता.
जुन्या क्लासिक सिनेमांमध्ये "ओल्ड येलर" म्हणून एक सिनेमा आहे. मिळाला तर नक्की बघा. जरा टियरजर्कर आहे पण.
ओक्के मामी!! thanks!
ओक्के मामी!! thanks!
एक हाचिको म्हणून आहे तो ही
एक हाचिको म्हणून आहे तो ही बघा फार मस्त स्टोरी आहे त्यात अकिता आहे व रिचर्ड गीअर हाचीचा मालक अस्तो हाची रोज त्याला सोडायला स्टेशन वर जातो. मालक मरतो कॉलेजात. हाची त्याची वाट बघत बसतो व म्हातारा होउन मरतो. डोळे पुसायला एक साडी लागेल.
मार्ली व मी पण मस्त आहे. कुत्रा मेल्याचे शेवट असलेले भाग आम्ही बघत नाही. नाहीतर शेवट विकीपीडियावर वाचून मग एक मेकींना सांगून बघतो.
टोकिओ स्टेशन समोर एक वाट बघणार्या कुत्र्याची मूर्ती आहे त्याची पण अशीच काहीतरी कथा आहे.
दोन दा पोस्टले चुकुन. कुं उ
दोन दा पोस्टले चुकुन. कुं उ कुं उ
एट बिलो आणि स्नो डॉग्ज दोन्ही
एट बिलो आणि स्नो डॉग्ज दोन्ही बघावे लागणार.
एट बिलो बघितला काल, खुप
एट बिलो बघितला काल, खुप आवडला.
अश्विनीमामी, अकिताचि स्टोरी
अश्विनीमामी, अकिताचि स्टोरी खरी आहे. जॅपनीज ब्रीड आहे ते.
हे सगळे पिक्चर आवडते आहेत. कोणाकडे कॉपी असेल तर जरुर सांगा, कलेक्शन करणारच.
शिवाय के ९, डॉबरमन गॅन्ग हेही लिस्टमध्ये आहेत.
http://westminsterkc.tripod.com/video.htm
बाबु पूर्ण आहे का मूवी ?
बाबु
पूर्ण आहे का मूवी ?
भीत भीतच पोस्ट केलं होतं हे
भीत भीतच पोस्ट केलं होतं हे गद्य लिखाण (तसं प्रयत्न या प्रकारातलंच आहे :खोखो:). त्यात हा सिनेमा कुणाला कसा वाटेल ही पण धाकधुक होतीच.. पण जवळजवळ सर्वांच्याच आवडीचा हा सिनेमा असल्याचं कळाल्यानं हायसं वाटलं.. थँक्स.
मार्ली अँड मी - हा पण मस्त
मार्ली अँड मी - हा पण मस्त आहे
या सिनेमाची पार्श्वभूमी वापरून एका माबोकरणीने स्वतःच्या पाळीव कुत्र्याबद्दल पूर्वी एक लेख लिहिला होता - http://www.maayboli.com/node/5678
हा लेख पण मस्त आहे. नंतर तो लोकसत्तातही प्रकाशित झाला होता.
Pages