एट बिलो - एक सुंदर अनुभव

Submitted by सांजसंध्या on 11 May, 2011 - 11:29

गद्यातलं हे माझं पहिलं (आणि एकमेव ) लिखाण आहे

आज नॅशनल वर मदर इंडिया बघायचा होता. पण सतत फोन, घरातली कामं यात तो सलग पाहता आलाच नाही. बाहेरून येईपर्यंत सिनेमा संपला होता. असंच सर्फिंग करतांना झी स्टुडिओ या चॅनेलवर एट बिलो हा सिनेमा चालू होता. मी पुढे जाणार इतक्यात बाबांनी मला थांबायची खूण करत हा सगळं काम सोडून हा सिनेमा पहा अशी आज्ञा केली...

सुरूवात चुकली होती. ती बाबांकडून कळाली. अंटार्क्टिकामधे मोहीमेसाठी एक अमेरिकन पथक गेलेलं असतं. स्टेशनपासून लांब बर्फात फिरतांना नायक बर्फाच्या घळईत अडकतो. वर बर्फ जमा होऊन त्याची तिथंच हिमसमाधी बांधली जाण्याचा धोका निर्माण होतो.

पथकातल्या एकाला एक कल्पना सुचते. मोहीमेसाठी कुत्र्यांची गाडी आणलेली असते. मोहीमेत वापरली जाणारी ही कुत्री हुषार असतात. कुत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येतं आणि त्यांच्या सहाय्याने नायकाला घळईतून बाहेर काढण्यात यश येतं. तो बराच जखमी असतो आणि पाय जायबंदी झालेला असतो. लवकर मेडिकल हेल्प मिळाली नाही तर गॅंगरीन होऊन पाय कापावा लागण्याचा धोका असतोच.

युद्धपातळीवर एका हेलिकॊप्टरचा बंदोबस्त करून पेशंटला न्यायचं ठरतं. कुत्र्यांचा नायकावर आणि मिहीमेतल्या सदस्यांवर खूप जीव असतो. ते ही मागे लागतात. मोजक्याच जागेमुळं ते कुत्र्यांना बांधून ठेवतात आणि आम्ही लगेच येतो असं त्या कुत्र्यांना सांगून अमेरिकेकडे उड्डाण करतात.

नायकाचा पाय बरा होतो. तीन दिवस झालेले असतात. त्याला तिकडं कुत्र्यांच काय झालं असेल या कल्पनेनं अस्वस्थ वाटायला लागतं. त्याच्या भावनेची तीव्रता कुणाकडेच नसल्याने खास कुत्र्यांसाठी पुन्हा जावं असं कुणालाच वाटत नसतं. एकतर मोहीम आटोपलेली असल्याने आता पुन्हा जाणं म्हणजे सगळी जमवाजमव करणे,पैशांचा बंदोबस्त करणे हे सगळं आलंच.. हे सोपं नसतं

इकडं हवामान खराब होत चाललेलं असतं. कुत्र्यांना बांधून ठेवलेलं. हिमवादळं सुरू झालेली असतात......

पुढं काय होतं हे सांगत नाही. हा सिनेमा प्रत्येकाने पहावा इतका सुंदर आहे...!

त्या कुत्र्यांच काय होतं हाच सिनेमाचा विषय आहे. माणूस आणि कुत्रा यांच्या नात्यावर केलेली एखादी सुंदर कविताच असावी असा हा सिनेमा आहे..

कुत्र्यांनी दाखवलेली माणुसकी आणि माणसाची बेपर्वाई, संकटात त्यांच एकमेकांवरचं प्रेम... !!! कसलेल्या अभिनेत्यांना मागं टाकतील असा त्या कुत्र्यांचा अभिनय... सगळंच अद्भुत !!

http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NXkoGlxVbLY

http://www.youtube.com/watch?v=OSwlozB-zyE&feature=player_embedded

http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NXkoGlxVbLY

पुढे काय हे टीव्हीवर पहा. माझाही अधून मधून काही भाग राहीला बघायचा..... झी स्टुडिओ वर नेहमी असतो.. किंवा मग सीडी !!

टीप :
http://www.youtube.com/watch?v=Z3eBOcWmZw4&feature=related
या वरच्या लिंकमधे पहिला भाग दिलेला आहे. या यूट्यूबच्या बाजूलाच एक ते बारा असे भाग दिलेले आहेत. संपूर्ण सिनेमा इथेच पाहता येईल..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनीमामी, जपानमध्ये 'शिबुया' स्टेशनबाहेर हाचीको चा पुतळा आहे. तो चित्रपट ट्रू स्टोरीवर आधारितच आहे.

काल काही भाग पाहिले ह्या चित्रपटाचे पण जेह्वा कधी चित्रपट पाहीन तेह्वा भरपूर रडू येणार इतकं निश्चित. चित्रपट पाहणार कारण पाहिलेले भाग खूप आवडले.

आडो तो हाची तोच हाचिको सिनेमातला आहे का? कारण ते स्टेशन वेगळे आहे. साधे गावातले वाट्ते. akita.jpgcy husky.jpg

पहिला अकिता दुसरा हस्की. मला घेउन द्याना प्लीज. Happy

अमा, वाटत नाही. मी पिक्चर बघितलेला नाही त्यामुळे कल्पना नाही. पण त्याबद्दल 'हाचिको' खूप ऐकलंय.

जपानमध्ये असताना एकदा एका मैत्रिणीला भेटायचं ठरवलं तेव्हा तिने मला या 'हाचिको' एक्झिट्ला ये असं सांगितलं, त्यानंतरच हाचिकोबद्दल कळलं.

एका कडे डीव्हीडी मिळाली. त्यात बिथोव्हिन, १०१ डाल्मेशिअन्स आणि एट बिलो होता..

कुत्रा आणि माणूस यांच्यात कुठली भाषा असणार म्हणा !! त्यामुळंच सिनेमा इंग्लिशमधे असूनही समजला पण आणि आवडला देखील. क्षण न क्षण खिळवून ठेवणारा..

अश्विनीमामी,
हाचिको बघितला मी तुम्ही म्ह्णाल्या प्रमाणे मला एक साडी नाही पण एक नॅपकीन जरुर लागला आणि वरुन दोन दिवस त्याचा चेहरा डोळ्या समोरुन जात नव्हता Sad

एक हाचिको म्हणून आहे तो ही बघा फार मस्त स्टोरी आहे त्यात अकिता आहे व रिचर्ड गीअर हाचीचा मालक अस्तो हाची रोज त्याला सोडायला स्टेशन वर जातो. मालक मरतो कॉलेजात. हाची त्याची वाट बघत बसतो व म्हातारा होउन मरतो. >>>

अश्विनीमामी, अकिताचि स्टोरी खरी आहे. जॅपनीज ब्रीड आहे ते.

हे सगळे पिक्चर आवडते आहेत. कोणाकडे कॉपी असेल तर जरुर सांगा, कलेक्शन करणारच.

>>
बाबु, नुकताच हा सिनेमा पेन ड्राईव्ह मध्ये मिळालाय. तुला अजूनही मिळाला नसेल तर सांग. मी देइन Happy

Pages