मायबोलीवर वापराच्या/वावराच्या नियमात बदल
भारत सरकारच्या Information technology Act (2001) च्या अंतर्गत काही नवीन नियम लवकरच भारतातल्या सगळ्या वेबसाईट/ब्लॉग्सला लागू पडतील. त्या अनुषंगाने मायबोलीवर वापराच्या/वावराच्या नियमात (Terms of use) बदल केले आहे. विशेषतः खालील नियम नव्याने दाखल केले आहेत.
You agree that you will not use Maayboli's services and resources to use,display, upload, modify, publish, transmit, update, share or store any information that :
(a) belongs to another person;
(b) is harmful, threatening, abusive, harassing, blasphemous,objectionable, defamatory, vulgar, obscene, pornographic, pedophilic, libellous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable, disparaging, relating or encouraging money laundering or gambling, or otherwise unlawful inany manner whatever;
(c) harm minors in any way;
(d) infringes any patent, trademark, copyright or other proprietary rights;
(e) violates any law for the time being in force;
(f) discloses sensitive personal information of other person or to which the user does not have any right to;
(g) causes annoyance or inconvenience or deceives or misleads the addressee about the origin of such messages or communicates any information which is grossly offensive or menacing in nature;
(h) impersonate another person;
(i) contains software viruses or any other computer code, files or programs designed to interrupt, destroy or limit the functionality of any computer resource;
(j) threatens the unity, integrity, defense, security or sovereignty of India,friendly relations with foreign states, or or public order or causes incitement to the commission of any cognizable offense or prevents investigation of any offense or is insulting any other nation.
संपूर्ण नियम प्रत्येक पानावर सगळ्यात खाली असलेला दुव्यावर टीचकी मारून किंवा या पानावर जाऊन पाहता येतील.
धन्यवाद प्रशासक
धन्यवाद प्रशासक
ओह, येवढच्च आहे होय! मला काय
ओह, येवढच्च आहे होय! मला काय वाटल की कै "मतस्वातन्त्र्यावर" वगैरे असेल. असो
पण मला एक शन्का आहे.
माझे जे काही ज्या कशाबद्दल मत असेल, व मी ते मायबोली वा तत्सम साईट वर "सार्वजनिक" मान्डले तर त्यास कायद्याचा काय आक्षेप येऊ शकतो?
(b) is harmful, threatening,
(b) is harmful, threatening, abusive, harassing, blasphemous,objectionable, defamatory, vulgar, obscene, pornographic, pedophilic, libellous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable, disparaging, relating or encouraging money laundering or gambling, or otherwise unlawful inany manner whatever;
हे महत्वाचं आहे.
शुक्रिया अॅडमिन. आभार.
धन्यवाद अॅडमिन-टीम.
धन्यवाद अॅडमिन-टीम.
धन्यवाद अॅडमिन टीम
धन्यवाद अॅडमिन टीम
धन्यवाद. त्यापेक्षा नक्की काय
धन्यवाद. त्यापेक्षा नक्की काय लिहायचे हेच सोप्प्या शब्दात मांडल असतं तर बरं झालं असतं.
या नियमांच्या अनुषंगाने
या नियमांच्या अनुषंगाने माबोची पॉलिसी थोडी सोप्या भाषेत आणि उदाहरणे देऊन अशी विकसित करता येईल का?
वरच्या अनेक शब्दांच्या अर्थाबद्दल किंवा ते शब्द कुठे लागू होतील याबद्दल मतेमतांतरे असू शकतात. तर या सगळ्याचा माबो प्रशासनाला अपेक्षित असलेला अर्थ कुठल्याही संदिग्धतेशिवाय जर सगळ्यांसाठी गाइडलाइन म्हणून प्रकाशित केला गेला तर जास्त उपयोग होईल.
धन्यवाद. Hazy आहे तेच बरंय.
धन्यवाद.
Hazy आहे तेच बरंय. सगळेच लिहावे लागले, तर लोकं एकमेकांवर सतत तुटुन पडतील. काही स्वयंघोषीत पोलिस काही प्रेषित बनतील.
हे सोप्या शब्दात सांगणे शक्य
हे सोप्या शब्दात सांगणे शक्य नाही.
जरी सांगणे शक्य असते तरी मायबोलीच्या (किंवा कुठल्याही वेबसाईटच्या)भविष्यासाठी ते योग्य ठरणार नाही. कारण कायद्याचा कुठला अर्थ इथे लागू शकतो याबद्दल वेबसाईटच्या प्रशासनाचे काहीही मत असले तरी शेवटी न्यायालयात ते ग्राह्य धरले जाणार नाही. आणि एकदा तसा अर्थ मांडला की केलेल्या कृतीचे उत्तरदायित्व "तुम्ही हे नीट स्पष्ट केले नाही म्हणून आम्ही असे केले" असे वेबसाईटच्या प्रशासनावर येऊ शकते. त्यामुळे तो जशाच्या तसा सांगणेच योग्य आहे.
या कायद्याच्या नावाखाली स्थानिक अधिकारी हवा तो अर्थ काढून गैरफायदा घेऊ लागल्याच्या बातम्या येत आहेत.
हा कायदा योग्य वाटत नसल्यास त्याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे.
इथे पहा
एकदा तसा अर्थ मांडला की
एकदा तसा अर्थ मांडला की केलेल्या कृतीचे उत्तरदायित्व "तुम्ही हे नीट स्पष्ट केले नाही म्हणून आम्ही असे केले" असे वेबसाईटच्या प्रशासनावर येऊ शकते. >>>
अनुमोदन अॅडमिन टीम. योग्य आणि धोरणी निर्णय.
ह्म्म्म. मी तक्रार करत नव्हते
ह्म्म्म.
मी तक्रार करत नव्हते अॅडमिन.. भविष्यातले नको नको ते वाद टाळण्यासाठी म्हणत होते. पण ही दुसरी बाजूही बरोबर आहे.
अॅडमिन टीम, नवीन नियम
अॅडमिन टीम,
नवीन नियम संस्थळांना आत्ता लागू झाले असले तरी योग्य वापराचे / वावराचे नियम संस्थळांनी वापरकर्त्यांना देणं, हे पूर्वीपासूनच अपेक्षित आहे. तशी माहिती जर वापरकर्त्याला नसली तर संस्थळावर कार्यवाही होऊ शकते.
वर असलेले नियम वापरकर्त्याला आधीच लागू आहेत. आता त्यात संस्थळाचाही समावेश केला गेला आहे.
आपल्या वरच्या पोस्टीमुळे हे 'जाचक' नियम नव्याने आले आहेत, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. आता संस्थळांना शिक्षा होऊ शकते, इतकाच काय तो फरक आहे.
ऑर्कुट, फेसबूक इथलं लिखाण काढून टाकण्याच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत. हे लिखाण जर काढलं नाही तर होणारी कार्यवाही, हा नवीन कायद्यातला बदल आहे.
नीरजा,
सोप्या भाषेसाठी http://www.blogger.com/terms.g
http://www.blogger.com/content.g हे बघ. वरचेच नियम आहेत.
आपण फेसबुकावर किंवा ब्लॉगस्पॉट अथवा वर्डप्रेसवर लिहितो, तेव्हा वरचे नियम मान्य करूनच लिहीत असतो. मायबोलीवर लिहितानाही वरील नियम लागू होतात.
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद अॅडमिन टीम.
धन्यवाद अॅडमिन टीम.
http://www.mit.gov.in/sites/u
http://www.mit.gov.in/sites/upload_files/dit/files/GSR314E_10511%281%29.pdf इथे मूळ कायद्याचा मसुदा वाचता येईल. हे नियम संस्थळांसाठीचे आहेत.
वापरकर्त्यांनाही साधारण असेच नियम लागू होतात. फेसबूक, ऑर्कुट, ब्लॉगस्पॉट, वर्डप्रेस यांचं सभासदत्व घेताना आपण हे नियम मान्य करत असतो. मायबोलीवरही वापरकर्त्यांचे नियम फार पूर्वीपासून असणं आवश्यक होतं.
वापरकर्त्यांनाच फक्त शिक्षा होऊ शकत होती तोपर्यंत गुगलसारख्या संस्थळांचा या नियमांना आक्षेप नव्हता.
वा हे चांगले झाले...
वा हे चांगले झाले...
एखाद्या
एखाद्या डोक्युमेंटरीचा/गाण्याचा दुवा देणे हे मायबोलीला/मायबोलीकरांना अडचणीचे ठरू शकते का? त्या दुव्यावरचे कंटेंट नियमांना धरून आहे किंवा नाही याची खात्री नसताना. उदा. तू नळीचे दुवे इ.
>>> invasive of another's
>>> invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionabl>>><<
ह्यावर एक प्रश्ण,
इथे इतर देश(नाव लिहिण्याची गरज नाही) व तसेच धर्म व धर्माच्या अनुषंगाने कितीतरी चर्चा होतात, त्या योग्य आहेत का? ( हा खरा प्रश्ण आहे)
भारत सरकारच्या Information
भारत सरकारच्या Information technology Act (2001) च्या अंतर्गत काही नवीन नियम लवकरच भारतातल्या सगळ्या वेबसाईट/ब्लॉग्सला लागू पडतील
>>>
माझा 'बेसिक' प्रश्न आहे मायबोली ही 'भारतीय' साईट आहे का?नसेल तर हा कायदा मायबोलीला कसा लागू पडेल? या अॅक्टचे टेरिटोरियल जुरिस्डिक्शन काय आहे?
बाजो, प्रत्येक संस्थळाला ते
बाजो,
प्रत्येक संस्थळाला ते संस्थळ ज्या देशात लोक वापरतात, तिथले कायदे लागू होतात.
प्रत्येक संस्थळाला स्थानिक
प्रत्येक संस्थळाला स्थानिक कायदे लागू होतात. <<<
संस्थळाचे स्थान कोणते हे कसे ठरवायचे?
भारतातून वापरणार्यांसाठी
भारतातून वापरणार्यांसाठी भारतीय कायदे आहेत.
अच्छा....
अच्छा....
अॅडमिन, प्रत्येक सभासदाकडून
अॅडमिन,
प्रत्येक सभासदाकडून ते मान्य असल्याची, एखादी इमेल मागवा. आपल्या संग्रही असू देत ती. यापुढे कुठलेही पोस्ट करायच्या आधी किंवा नवीन स्भासद नोंदवताना हे केले पाहिजे.
नीधप, 'अ' देशात राहणार्या
नीधप,
'अ' देशात राहणार्या एखाद्याने एखाद्या संस्थळावरून 'ब' देशात गुन्हा समजली जाणारी एखादी कृती केली आणि अशी कृती 'अ'च्या कायद्यानुसार गुन्हा ठरत नसेल तर त्या 'अ' देशातील व्यक्तिवर काही कारवाही होऊ शकत नाही का?
माझ्या मते नाही होउ शकत...
माझ्या मते नाही होउ शकत...
दिनेशदा एकदम बरोबर.... हे केले पहिजे.
हे नियम वापरकर्त्यांवर
हे नियम वापरकर्त्यांवर आधीपासूनच बंधनकारक होते, फक्त त्या नियमांची कडक अंमलबजावणी होत नव्हती आणि कदाचित त्यामुळेच त्यांबद्दल कोणी गंभीर दखल घेतली नव्हती. परंतु आता संस्थळांवरच थेट उत्तरदायित्व येत असल्यामुळे हे नियम अधिक काटेकोरपणे पाळले जातील अशी आशा आहे. आता दखल घ्यावीच लागेल.
या नियमांच्या अनुषंगाने मायबोली संस्थळावर लिहिलेले गेलेले लिखाण कॉपी पेस्ट करता येणार नाही अशी सोय इथेच करून देता आली तर खूप बरे होईल. माऊसची राईट क्लिक इनइफेक्टिव्ह करावी.
@गजानन, इतर संस्थळांचे दुवे आपल्या पोस्टमध्ये देणे म्हणजे प्रताधिकार भंग होत नाही. त्या संस्थळावर जर नियमबाह्य कंटेंट असले तर ती त्या संस्थळाची जबाबदारी असते.
Terms of use मधील << (a) belongs to another person;
(b) is harmful, threatening, abusive, harassing, blasphemous,objectionable, defamatory, vulgar, obscene, pornographic, pedophilic, libellous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable, disparaging, relating or encouraging money laundering or gambling, or otherwise unlawful inany manner whatever;
(c) harm minors in any way;
(d) infringes any patent, trademark, copyright or other proprietary rights;
(e) violates any law for the time being in force;
(f) discloses sensitive personal information of other person or to which the user does not have any right to;
(g) causes annoyance or inconvenience or deceives or misleads the addressee about the origin of such messages or communicates any information which is grossly offensive or menacing in nature;
(h) impersonate another person;
(i) contains software viruses or any other computer code, files or programs designed to interrupt, destroy or limit the functionality of any computer resource;
(j) threatens the unity, integrity, defense, security or sovereignty of India,friendly relations with foreign states, or or public order or causes incitement to the commission of any cognizable offense or prevents investigation of any offense or is insulting any other nation. >>
हा सर्वच भाग मला महत्त्वाचा वाटतो.
ह्यातील प्रत्येक कलमाचा स्कोप काय आहे हे बघणे इंटरेस्टिंग ठरेल. पुढच्या काळात ह्यातील व्याख्या, शब्द व संदर्भ यांचेबाबतीत वाटा - पळवाटा शोधल्या जातील.
तसेच मायबोली संस्थळालाही वरील नियम भंग करणार्या आय डी व त्यांच्या पोस्ट्स बाबत योग्य ती कारवाई करणे बंधनकारक झाल्यास नवल वाटणार नाही.
अरुंधती, <मायबोली संस्थळालाही
अरुंधती,
<मायबोली संस्थळालाही वरील नियम भंग करणार्या आय डी व त्यांच्या पोस्ट्स बाबत योग्य ती कारवाई करणे बंधनकारक झाल्यास नवल वाटणार नाही.>
नवीन मसुद्यात संस्थळांवर तसं बंधन आहे.
गजानन, मला नक्की माहित नाही
गजानन, मला नक्की माहित नाही याबद्दल पण प भ चे उत्तर लॉजिकल वाटतेय.
Dear Ajay, Admin Team,
Dear Ajay, Admin Team, maaybolikars,
FYI&R -
This is a draft rule made public for suggestions and is not yet made effective.
many industry groups are lobbying against this and it is unlikely that this will be passed without suitable changes.
Till then, please feel free to exercise your freedom of expression and right to free speech.
Pages