मायबोलीवर वापराच्या/वावराच्या नियमात बदल
भारत सरकारच्या Information technology Act (2001) च्या अंतर्गत काही नवीन नियम लवकरच भारतातल्या सगळ्या वेबसाईट/ब्लॉग्सला लागू पडतील. त्या अनुषंगाने मायबोलीवर वापराच्या/वावराच्या नियमात (Terms of use) बदल केले आहे. विशेषतः खालील नियम नव्याने दाखल केले आहेत.
You agree that you will not use Maayboli's services and resources to use,display, upload, modify, publish, transmit, update, share or store any information that :
(a) belongs to another person;
(b) is harmful, threatening, abusive, harassing, blasphemous,objectionable, defamatory, vulgar, obscene, pornographic, pedophilic, libellous, invasive of another's privacy, hateful, or racially, ethnically or otherwise objectionable, disparaging, relating or encouraging money laundering or gambling, or otherwise unlawful inany manner whatever;
(c) harm minors in any way;
(d) infringes any patent, trademark, copyright or other proprietary rights;
(e) violates any law for the time being in force;
(f) discloses sensitive personal information of other person or to which the user does not have any right to;
(g) causes annoyance or inconvenience or deceives or misleads the addressee about the origin of such messages or communicates any information which is grossly offensive or menacing in nature;
(h) impersonate another person;
(i) contains software viruses or any other computer code, files or programs designed to interrupt, destroy or limit the functionality of any computer resource;
(j) threatens the unity, integrity, defense, security or sovereignty of India,friendly relations with foreign states, or or public order or causes incitement to the commission of any cognizable offense or prevents investigation of any offense or is insulting any other nation.
संपूर्ण नियम प्रत्येक पानावर सगळ्यात खाली असलेला दुव्यावर टीचकी मारून किंवा या पानावर जाऊन पाहता येतील.
दिनेशदांना अनुमोदन.
दिनेशदांना अनुमोदन. प्रत्येकाच्या पुढल्या login वेळी हे नियम Accept केल्याशिवाय काही करू देउ नये.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बरेच नियम obvious आहेत. जसं 'अंतरजालावरून साभार' म्हणुन फोटो देण बेकायदेशीर आहे (ते फोटो वापरायची परवानगी नसेल तर). पण,
>> harmful, abusive, blasphemous, objectionable, hateful
म्हणजे फक्त हवापाण्याच्या चर्चा उरतात..
डुआया, हे नियम लागू झाले
डुआया,
हे नियम लागू झाले आहेत.
११ एप्रिलला GSR 316 (E) या क्रमांकाचं नोटिफिकेशन होतं. १३ एप्रिलला भारताच्या गॅझेटात ते समाविष्ट केलं गेलं. या नोंदणीचा क्रमांक होता २०३.
सॅम << म्हणजे फक्त
सॅम << म्हणजे फक्त हवापाण्याच्या चर्चा उरतात >> असहमत.
इथे स्वनिर्मित व हलक्या फुलक्या (व कोणालाही न दुखावणार्या) साहित्याच्या लिखाणावर बंधने नाहीत. ज्या प्रमाणे रोजच्या सार्वजनिक जीवनात आपण नियम, कायदे, शिष्टाचार पाळून वर्तन करणे अभिप्रेत आहे तेच आता संस्थळांवर वावरतानाही अभिप्रेत व बंधनकारक आहे.
harmful, abusive,
harmful, abusive, blasphemous, objectionable, hateful हे असल्याशिवाय मतं, मुद्दे मांडता येतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(a) belongs to another
(a) belongs to another person;
(d) infringes any patent, trademark, copyright or other proprietary rights;
वरील दोन नियमांच्या अनुशंगाने एखाद्या लेखात, पोस्ट मध्ये वगैरे, आधी दुसरीकडे प्रकाशित, वापरले गेलेले मटेरीयल वापरायचे असेल (लिंक देणे वेगळे), किंवा त्यातला काही भाग द्यायचा असेल तर आणि ते मटेरीयल लिहीणार्याने विकत घेतले असेल (वृत्तपत्र, सिडी, व्हिडीयो, वगैरे) तर त्याबद्दल संदर्भ देताना नमेका काय संकेत्/फॉरर्मॅट वापरला जावा याबद्दल कृ. मार्गदर्शन करावे.
योग, मला वाटतेय की (a)
योग, मला वाटतेय की (a) belongs to another person;
(d) infringes any patent, trademark, copyright or other proprietary rights;
ह्या दोन्ही बाबतीत प्रस्तुत लेखक, प्रकाशक किंवा मालकांची ते लिखाण वापरण्यासंबंधाने लेखी परवानगी घेणे कायदेसंमत व योग्य ठरेल.
माहितीबद्दल धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद. दिनेशदांना अनुमोदन.
areeeeeeeee...MAAYBOLI
areeeeeeeee...MAAYBOLI marathi aahe ki english....ekala suddha niyam MARATHI madhe type karta aale nahi kaaaa....
mi mobile asalyane karu shakalo nahii.....pan kiman bakichhyanni tari karave....
english cha evdha attahas kaaa....?
मायबोलीवरुन किंवा मायबोली
मायबोलीवरुन किंवा मायबोली संदर्भात युजर्सनी threatening, abusive इमेल्स पाठवल्याबद्दल मायबोलीला sue करता येईल का?
कायदा कसाही वाकवून, त्याचं
कायदा कसाही वाकवून, त्याचं कसंही interpretation करून मायबोलीला sue करता येईलच .. पण threatening, abusive इमेल्स पाठवणार्याला, पाठवणारीला आधी sue करायला हवं ..
पण threatening, abusive
पण threatening, abusive इमेल्स पाठवणार्याला, पाठवणारीला आधी sue करायला हवं ..![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>>
तो/ती आर्क्टिक वृत्तावर किंवा अन्टार्टिकावर असेल तर ?
लालू, खाजगी संपर्काची सुविधा
लालू, खाजगी संपर्काची सुविधा धोकादायक ठरू शकेल असे वाटतेय. त्यापेक्षा खुला कारभार असणारी, विपु चांगली.
शिवाय एखाद्या वाहत्या बीबी वरची कॉमेंट असेल तर ?
बाकिच्या संकेतस्थळापेक्षा मायबोलीवरची सभ्यतेची पातळी बरीच उच्च आहे. पण काही महाभाग असतातच ना ?
मायबोली प्रशासनाने <या
मायबोली प्रशासनाने <या कायद्याच्या नावाखाली स्थानिक अधिकारी हवा तो अर्थ काढून गैरफायदा घेऊ लागल्याच्या बातम्या येत आहेत.> असं वर लिहिलं आहे. हे विधान मला दिशाभूल करणारं वाटतं म्हणून हा खुलासा -
कोणतेही संकेतस्थळ बंद करण्याचा अधिकार स्थानिक पोलिसांना अथवा अधिकार्यांना कधीच नसतो. सायबर सेलचे अधिकारी तपास झाल्यावर आपला रिपोर्ट कोर्टाकडे सादर करतं. हे सायबर अपेलेट या रिपोर्टावर विचार करून ती साइट बंद करायची की नाही, हे ठरवतं. साइट रोखण्याचे अधिकार एका समितीकडे आहेत. या समितीत केंद्र व राज्य शासनातील सचिवस्तरावरील अधिकारी व पोलिसदलातील उपायुक्त व आयुक्तस्तरावरील अधिकारी असतात. त्यांना जर कोर्टाचा निर्णय मान्य नसेल तर ते परत अपील करू शकतात. तंत्रज्ञांच्या मदतीने ते पुढील कार्यवाही करतात. कोणाच्या मनात आलं म्हणून कुठलीच साइट बंद केली जाऊ शकत नाहीत. भारत सरकारच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कायद्यात सांगितलेल्या पद्धतीनेच तपास व कार्यवाही या गोष्टी घडतात.
संवेदनशील परिस्थितीत Indian computer emergency response team निर्णय घेत असते. २६/११सारख्या प्रसंगात, किंवा सायबरयुद्ध झाल्यास या समितीकडे अधिकार असतात. केंद्र शासनाने नियुक्त केलेली ही समिती असते. ही समिती अशा संवेदनशील प्रसंगांत राज्यातील सायबेर सेलकडे काही विशेष अधिकार देते. यात एखादी साइट भारतात दिसण्यापासून रोखण्याचे अधिकारही असतात. मात्र सायबर सेलचे अधिकारीही ICERTच्या परवानगीशिवाय हा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना आपले आक्षेप या समितीकडे द्यावे लागतात, आणि मगच ही समिती निर्णय घेते.
हे झालं साइट बंद करण्याबद्दल किंवा साइट दिसण्यापासून रोखण्याबद्दल. जर एखाद्या वापरकर्त्याविरुद्ध कार्यवाही करायची असेल, व ती व्यक्ती परदेशात असेल, तरीही विशिष्ट पद्धत अवलंबली जाते. त्या व्यक्तीचा आयपी पत्ता शोधून, व इतर पुरावे गोळा करून सायबर सेल तो रिपोर्ट राज्य शासनाकडे देतं. राज्य शासन मग कोर्टाची परवानगी घेऊन सीआयडीमार्फत इंटरपोलशी संपर्क साधतं. त्या देशातले पोलिस मग पुढचा तपास करतात. त्या देशाशी असलेल्या प्रत्यर्पण करारानुसार कार्यवाही केली जाते.
प्रकाशनाचे सारे नियम आंतरजालाला लागू होतात. आपण ज्याप्रमाणे बाहेर समाजात लिहिताबोलताना काळजी घेणं अभिप्रेत असतं, तीच काळजी आंतरजालावरही घ्यावी लागते. जातीय / धार्मिक भावना दुखावणे, अवमानकारक / द्वेषमूलक विधानं करणे, प्रताधिकाराचा भंग करणे, यांसाठी पूर्वापार कायदे आहेत, आणि या कायदेभंगांसाठी शिक्षाही होतात. अगदी संसदेतही असभ्य भाषा वापरली गेल्यास, कोणाच्या चारित्र्याबद्दल अवमानकारक विधानं केल्यास तो मजकूर संसदेच्या कामकाजातून वगळण्यात येतो. असांसदीय भाषा वापरायला तिथेही बंदी आहे. प्रक्षोभक भाषणं अथवा लेखन केल्यामुळेही खटले दाखल झाले आहेत. हेच आंतरजालाच्या बाबतीतही होऊ शकतं. इथे आपण लिहिलेला प्रत्येक शब्द (अगदी विपूसुद्धा) 'प्रकाशन' म्हणून समजला जातो. आणि म्हणून इंडियन पीनल कोडात असलेले प्रकाशनासाठीचे सगळे कायदे आंतरजालालाही पूर्वीपासूनच लागू आहेत.
मायबोलीवरच्या वापराच्या नियमांत बदल झाले, म्हणून खरं तर वापरकर्त्यांनी बिचकून जायचं कारण नाही. कारण गेली ११ वर्षं हे नियम वापरकर्त्यांना लागू आहेत. २००८ साली आलेल्या नियमांमध्ये संस्थळांनी वापरकर्त्यांना कायद्याची माहिती द्यावी, सर्व नियम वापरकर्त्यांना सांगावेत, असं सांगितलं होतं. असं न केल्यास संस्थळांवर कार्यवाही होऊ शकत होती. आता ते कायद्यानेच बंधनकारक झाले आहे.
शक्यतो नेहमीच्या वावरात जसे
शक्यतो नेहमीच्या वावरात जसे आपण समोरच्याची काळजी घेतो तसाच वावर इथेही ठेवला तर कायद्याचा त्रास होऊ नये असं ढोबळपणे म्हणावंसं वाटतंय..
...
...
छान झाले.
छान झाले.
Pages