पडू आजारी मौज हीच वाटे भारी..
अशा काही ओळी असलेली एक जूनी कविता होती. आजचे फळ, मोसंबी यासंबंधात अनेकजणांच्या आजारपणाच्याच आठवणी असतील.
साधारणपणे हॉस्पिटलच्या बाहेर विकायला असणारे फळ (बाकिची केळी आणि शहाळी) अशीच याची ख्याती आहे. एकमेकांना इतर प्रसंगी भेट देण्यासाठी, पण सहसा ही फळे खरीदली जात नाहीत.
मोसंबीचा ताजा रस मिळणार्या गाड्या या मुंबईत साधारण २५ वर्षांपूर्वी दिसायला लागल्या. पण त्याचबरोबर या फळात थोडा बदलही झाला. पुर्वी हे फळ, पिवळेजर्द झाल्याशिवाय बाजारात येत नसे. पण या गाड्या आल्यानंतर मात्र, हिरव्या सालीची फळे बाजारात येऊ लागली. या गाड्यांवर ती सोलूनच ठेवलेली असतात. मग ग्राहक आला कि त्या हातयंत्रात दोन तीन फळे घालून रस काढला जातो. आता त्यात बर्फ़, पिठीसाखर, चाट मसाला वगैरे घालून बियर ग्लासातून पेश केले जाते. आता यात आरोग्याचा विचार किती केला जातो, त्याची कल्पना करा.
पण पुर्वी घरोघरी मोसंबीचा रस काढायचे एक हातयंत्र असायचे. साधारण वर आलेला एक कळस, त्याच्या आजूबाजूला तो रस गाळण्यासाठी सोय. आमच्याघरी हे प्रकरण काचेचे होते. पुढे ते प्लॅस्टीक, मग स्टील मधे पण निघाले. याचा वापर कितीसा होत असे हा एक प्रश्नच आहे, पण घरोघरी ते असे हे मात्र खरे.
पण संत्रे जितक्या सहजासहजी सोलता येते तितक्या सहजासहजी मोसंबे सोलता येत नाही. शिवाय सोलले तरी त्याच्या कापा, लवकर सूट्या होत नाहीत. पण त्याचा काढला तर रस मात्र भरपूर निघतो.
पण तो खाण्याची एक अनोखी पद्धत नायजेरियात बघितली. आणि मी त्या प्रकारच्या प्रेमातच पडलो. तिथे असताना सरासरी रोज दोन मोसंबी मी खात असे (तिथे त्यांना ऑरेंज म्हणतात आणि आपल्या संत्र्याला तिथे टॅंगरीन म्हणतात.)
तिथे त्याचे अमाप पिक येते. ट्र्क भरभरुन हि फळे तिथल्या बाजारात येतात. आणि ती खाण्याची खास पद्धत अशी.
मोसंबीची वरची पातळ साल अगदी नजाकतीने काढण्यात येते. त्यासाठी ते पीलर वगैरे वापरत नाहीत, तर साधा चाकू वापरून, फळ गोलाकारात फ़िरवून साल काढली जाते. त्या लोकांचे हे कौशल्य बघण्यासारखे असते. हाऊसमेडच्या कौशल्याचा तो एक मापदंड आहे तिथे.
अशी सोललेली मोसंबी, पाचाच्या गटात विकायला ठेवलेली असतात. हा गट पण खाली त्रिकोणात तीन व त्यावर दोन असाच रचलेला असतो, आणि विकत घेताना तो एक गटच विकत घ्यावा लागतो. मला त्यांचे हे कौशल्य बघायला इतके आवडायचे कि मी मुदाम न सोललेली मोसंबी निवडून, माझ्या डोळ्यादेखत सोलून घेत असे.
आता ते खाण्यासाठी, देठाकडची छोटीशी चकती कापायची. मग तिथून रस चोखायला सुरवात करायची. सोलल्यामूळे ते मोसंबे जरा मऊसर झालेले असते, तर हाताने जराजरा दाबून तो रस काढायचा, आणि प्यायचा. मूळातच तिथली मोसंबी रसाळ आणि गोड असतात. शिवाय बिया न कापल्या गेल्याने, त्यात कडवटपणा अजिबात नसतो. असे करत सगळा रस चोखून झाला, कि हवे तर त्याचा चोथा खायचा.
असे खाणे तिथल्या माझ्या अनेक भारतीय मित्रांना जमत नसे. मोसंबी दाबता दाबता जर नख लागले किंवा जास्त दाब दिला तर तिथे छिद्र पडून, तिथूनही रस बाहेर येत असे. त्यामूळे ते लोक कापून खाणेच पसंत करत असत.
तर हे असे साधेसे फळ. आहे लिंबू वर्गातलेच. तापात आणि कावीळीत उत्तम. यातला आंबट नसलेला रस, तहान भागवतो. आंबट नसल्याने आम्लपित्त,उलटीची भावना होत नाही.
याचा उगम भारतातच झाला असे मानतात आणि भारतभर अनेक जाती लागवडी खाली आहेत. याशिवाय मध्य अमेरिका, भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश, इतर आशियाई देशातही याची लागवड होते. याला इंग्लीशमधे जरी स्वीट लाईम म्हणत असले तरी आंबट लिंबाचाही काही वेळा तसाच उल्लेख केला जातो.
पिकलेल्या मोसंब्याला स्वत:चा असा एक स्वाद असतो. पण तो लिंबाइतका वा संत्र्याइतका तीव्र नसतो. त्यामूळे याचे स्वतंत्ररित्या सरबत, इसेन्स, जाम वगैरे करत नाहीत, संत्र्याच्या पाकवलेल्या सालीसोबत कधीकधी याचीही साल असते.
फ्रूट सलाद वगैरेमधे पुरक फळ म्हणून हे वापरतात खरे, पण ते सोलण्याचा तसा त्रासच असतो. पाककृतींमधे पण हे फळ, खास असे वापरलेले दिसत नाही.
यामधे शर्करा बर्या प्रमाणात असतात. फॉस्फोरस जास्त प्रमाणात असतो. मॅग्नेशियम, जस्त आणि कॅल्शियम थोड्याफ़ार प्रमाणात असतात. तसे पोषणाच्या दृष्टीने फ़ार महत्वाचे फळ नाही हे.
या फळाचा तसा अमेरिकेत फार प्रसार झालेला नाही. तयार ज्यूस पॅकेजेस मधे पण याचा रस दिसत नाही. याची एकसूरी चव कदाचित त्यांना आवडली नसावी.
असे एक साधेसे फळ. याचे शास्त्रीय नाव Citrus limettioides
आपल्याकडे मिळणारे फळ आणि भूमध्य समुद्राच्या परिसरात मिळणारे फळ, यात थोडासा फरक असतो.
या फळात देठाकडे आणखी एक छोटे फळ असते. वर कापलेल्या मोसंबीमधे ते दिसते आहे. (खरे तर लिंबूबर्गातील फळे अशी म्हणजे, उभी कापायची नसतात. अशी कापली तर त्यातून रस काढता येत नाही. पण केवळ छोटे फळ दिसावे, म्हणून मी तशी कापली आहे.)
जूळ्या भावंडात एखादा साधा असावा आणि एखादा दिखाऊपणा करणारा असावा, तसे मोसंबी आणि संत्र्याचे आहे. त्याचा विचार करु पुढच्या भागात.
भारतातील पिवळ्याजर्द मोसंबीचा, रसवाल्याचा वगैरे फोटो असेल तर अवश्य द्या.
मोसंबी खाण्याची पद्धत आवडली
मोसंबी खाण्याची पद्धत आवडली
बाकी लेख छान...
व्वा... रसाळ..!
व्वा... रसाळ..!
पडू आजारी मौज हीच वाटे
पडू आजारी मौज हीच वाटे भारी
भवती भावंडांचा मेळा
काम कुणी सांगेना मजला
मऊ मऊ गादी निजावयाला
चैनच सारी, मौज हीच वाटे भारी
खडीसाखर मनुका बेदाणा
संत्री साखर लिंबू आणा
साबुदाण्याची खीर कराना
गंमत सारी, मौज हीच वाटे भारी
कामे करतील सारे माझी
झटतील ठेवाया मज राजी
बसेल गोष्टी सांगत आजी
मज शेजारी, मौज हीच वाटे भारी
पडू आजारी मौज हीच वाटे भारी
अशी कविता आहे ती.
आभार मंजूडी, ओळ वापरतो ही
आभार मंजूडी, ओळ वापरतो ही लेखात.
नेहमीप्रमाणे छानच ! कुणीतरी
नेहमीप्रमाणे छानच !
कुणीतरी सांगितलेले चांगल्या मोसबीचे दोन निकष माझ्या मनात लहानपणापासून ठसले आहेत - देठाजवळ छोटी वर्तुळाकार खूण व सालीचा खरखरीतपणा; हे कितपत विश्वासार्ह निकष आहेत , हे मात्र माहित नाही.
छान लेख दिनेशदा मोसंबी
छान लेख दिनेशदा
मोसंबी खाण्याची पद्धत तर एकदम मस्त.
नेहमीप्रमाणे मस्तच. मजुंडी
नेहमीप्रमाणे मस्तच. मजुंडी कविता पण सुपरच
या फळाचा तसा अमेरिकेत फार
या फळाचा तसा अमेरिकेत फार प्रसार झालेला नाही. तयार ज्यूस पॅकेजेस मधे पण याचा रस दिसत नाही. याची एकसूरी चव कदाचित त्यांना आवडली नसावी. >>>> ह्याबद्दल मला जरा शंका आहे. इथे सुद्धा मोसंब्याला ऑरेंज म्हणतात आणि संत्र्याचे टँगरिन/क्लेमेंटाइन असे प्रकार आहेत. इथे ऑरेंज ज्यूस अतिचशयच मोठ्या प्रमाणार मिळतो. कॅल्शियम फोर्टिफाइड+विथ पल्प/नो पल्प असे प्रकार पण मिळतात.
माझ्या माहितीप्रमाणे मोसंबं हे मुख्यतः antioxidant, व्हिट सी, फायबर आणि फोलेट साठी आहारात असावे. बाकी मूल्य नगण्य आहेत.
सुंदर माहिती. मोसंबीच्या
सुंदर माहिती.
मोसंबीच्या सालीतुन सुगंधी तेल निघते. तिच्या सालीतुन अर्क (इसन्स) काढला जातो. तो अर्क साबण, दारु इतर पेया मध्ये वापरला जातो.
तापात मोसंबीचा रस देतात पण जर कफ असेल तर देत नाहीत.
छान माहिती. मोसंबं असंही खाता
छान माहिती. मोसंबं असंही खाता येतं हे माहितच नव्हतं. आणि ते फळातलं छोटं फळ पण मस्तच.
या फळाचा तसा अमेरिकेत फार
या फळाचा तसा अमेरिकेत फार प्रसार झालेला नाही. तयार ज्यूस पॅकेजेस मधे पण याचा रस दिसत नाही. याची एकसूरी चव कदाचित त्यांना आवडली नसावी. >>>> ह्याबद्दल मला जरा शंका आहे>> मलाही. इथे सहज मिळते. बहुधा venetian orange अशा नावाने सापडते.
फळाची मालिका मस्त चालु आहे.
फळाची मालिका मस्त चालु आहे. उपयोगी माहिती, आणी, तुमची शैली इतकी छान आहे, कि लगेच ते फळ खावेसे वाट्ते.
माझ्याकडे ते मोसंबी ज्युसच
माझ्याकडे ते मोसंबी ज्युसच काचेच यंत्र आहे म्हणुन हा लगेच ताजा ताजा फोटो काढला.
या फळाचा तसा अमेरिकेत फार
या फळाचा तसा अमेरिकेत फार प्रसार झालेला नाही. तयार ज्यूस पॅकेजेस मधे पण याचा रस दिसत नाही. याची एकसूरी चव कदाचित त्यांना आवडली नसावी. >>>> आँ? !!ही ऐकीव माहिती का प्रत्यक्ष अनुभव?
या फळाचा तसा अमेरिकेत फार
या फळाचा तसा अमेरिकेत फार प्रसार झालेला नाही. तयार ज्यूस पॅकेजेस मधे पण याचा रस दिसत नाही. याची एकसूरी चव कदाचित त्यांना आवडली नसावी.>>>>
दिनेश , हे वाक्य एडीट करता येईल का? इथे मोठ्या प्रमाणावर ऑरेंज ज्युस अव्हाइलेबल आहे. किंबहुना ऑरेंज ज्युस हे अमेरिकन ब्रेकफास्ट स्टेपल आहे अस म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
मोसंबी म्हणजे इथली , 'Valencias Oranges".
इथे अधिक माहिती आहे.
http://www.sunkist.com/products/oranges.aspx
जास्त लोकांना आपल्याकडच्या ऑरेंजेस सारखा म्हणजे इथल्या Navel Oranges चा स्वाद आवडत असेल. (कदाचीत) कारण तो जास्त मिळतो.
मालिका चांगली आहे.
या फळाचा तसा अमेरिकेत फार
या फळाचा तसा अमेरिकेत फार प्रसार झालेला नाही. तयार ज्यूस पॅकेजेस मधे पण याचा रस दिसत नाही. याची एकसूरी चव कदाचित त्यांना आवडली नसावी.>>>> हे वाक्य फक्त तपासावे, बाकी लेख व माहिती नेहमी प्रमाणे उत्तम.
अमेरिकेत, सर्वात जास्त प्रमाणात मोसंबी जुस विकला जातो. त्यात पण खुप प्रकार पहायला मिळतात.उदा: ऑरगॅनिक, पल्प, पल्प फ्री, फ्रुट पंच ई.
ईथे बोरा एवढी मोसंबी सारखी फळे मिळतात, जी आख्खी साली सहित खाता येतात.
संत्र म्हणजे कुठलंही "ऑरेंज"
संत्र म्हणजे कुठलंही "ऑरेंज" ना? मोसंबी म्हणजे "स्वीट लाईम" ना?
मग वॅलेन्सिया किंवा कुठलीही ऑरेंजेस म्हणजे मोसंबी कशी काय?
मी ही इथे अमेरिकेत ज्या स्टेट्स मध्ये राहिलो आहे तिथे मोसंबी विकायला ठेवलेली पाहिलेली नाहीये किंवा कुठल्याही ज्युस मध्ये स्वीट लाईम ज्युस असलेलं बघण्यात आलेलं नाही.
ईथे बोरा एवढी मोसंबी मिळते, जी आख्खी साली सहित खाता येते.>>>> साईज बोरा येवढी केली की सालं पण खाता येतात का? आय होप सालं पातळ असतील नाहीतर "दुसर्या दिवशी कसं वाटतं" असं विचारणार होतो.
(No subject)
अमेरीकेत जे खाल्लं प्यायलं
अमेरीकेत जे खाल्लं प्यायलं जातं ते ऑरेंज (संत्र) किंवा टँजरीन (नारींग). अमेरीकेत मी तरी कधी स्वीट लाईम (मोसंबं) पाहिलेलं नाही. But walking-talking I fell a tourist. त्यामुळे अमेरीकेतील मूळ रहिवाश्यांचं मत आजमवायला हवं.
But walking-talking I fell a
But walking-talking I fell a tourist.>>>>>
सिंड्रेला, बरोबर आहे. टिल्लूभौ, करेक्शन बघा. लगेच कसं वाटतं ते सांगा.
अमेरिकेत खाल्ल जात ते ऑरेंज,
अमेरिकेत खाल्ल जात ते ऑरेंज, मराठीत जरी संत्र असलं तरी, त्यास संत्र्याची चव बिल्कूल नसते.
ते बर्याच अंशी मोसंबी सारखे लागते. त्यामूळे नावं काहीही असली तरी, मला तरी ते मोसंबीच आहे.
आय होप सालं पातळ असतील >> हो ती सालं खुप पातळ असतात. व चव मोसंबीच्या साली सारखी तिव्र नसते त्यात थोडा मधुरपणा असतो. पण भारी लागतो.
ईथे बोरा एवढी मोसंबी मिळते,
ईथे बोरा एवढी मोसंबी मिळते, जी आख्खी साली सहित खाता येते
>> ह्याचं नाव विसरले पण हा तोच प्रकार बहुतेक ज्याच्यात साल गोड असत पण आतला गर आंबट .. इथे (अमेरिकेत) एक दोन मैत्रीणींकडे आहे तसल्या संत्र्/मोसंब्याचं झाड ..
संत्र म्हणजे कुठलंही "ऑरेंज"
संत्र म्हणजे कुठलंही "ऑरेंज" ना? मोसंबी म्हणजे "स्वीट लाईम" ना?>>बुवा नाव नका बघू, चव बघा, कसे दिसतेय ते बघा.
असामी >> सहमत.
असामी >> सहमत.
असामी, कुठे इथे दिसेल तर खाऊन
असामी, कुठे इथे दिसेल तर खाऊन बघेन ना? म्हणूनच तर हा पोस्टप्रपंच. असो. दिनेशदा, मुद्दा निघालाच आहे तर थोडा रिसर्च करुन माहिती डकवाच कृपया. सगळ्यांनाच माहिती मिळेल. उगाच इथे मोसंबी खात असताना त्याला "ऑरेंज" म्हणायची माझी आजिबात इच्छा नाहीये.
गुगल केल्यावर सध्या मिळालेल्या माहितीनुसार भारतात मिळत असलेली मोसंबी:
Citrus limettioides Tan.
ईथे थोडी आणखिन माहिती दिली आहे . http://www.hort.purdue.edu/newcrop/morton/sweet_lime.html
वॅलेन्सिया ऑरेंजेस ही संत्र्याची एक वेगळी जात आहे. मोसंबी पण संत्र्याचीच एक आणखिन वेगळी जात आहे पण वॅलेन्सिया ऑरेंज आणि मोसंबी हे एकच नाही असं दिसतय.
बुवाला अनुमोदन , मला पण
बुवाला अनुमोदन , मला पण मोसंबीची चव ( संत्र / ऑरेंज) मध्ये कधी जाणवली नाही , त्यामुळे मला पण त्याला मोसंबी म्हणण्याचा धीर होत नाही.
दिनेश चांगला लेख.
बर तुम्ही त्याला फणस म्हणून
बर तुम्ही त्याला फणस म्हणून खा हवे तर, माझे काय जातय
Asami, ugaach kaahi pan
Asami, ugaach kaahi pan asambaddha bolla ki shenda budhka naslela mudda khara hoto kaa?
Jaau de, tu santre mosambi samjun kha. Kaay pharak padato?
फणस >>> पण तो पिळुन खाता
फणस >>> पण तो पिळुन खाता येतो का ?
श्री, त्याला आधी विचार तो
श्री, त्याला आधी विचार तो फणसाला काय म्हणतो ते. तो खातो तो फणस पिळून, चोखून, सालासकट वगैरे खाता येत असेल.
Pages