मी रेसिपी टाकतेय म्हणजे धक्का बसला का? कारण खरतर टाकायची या विचारानेच मला धडधडत होतं हे काही माझं क्षेत्र नव्हे. पण काही दिवसापूर्वी जपान बीबी वर मी 'परवर' म्हणाले तर सायो, आडो आणि मंजिरीला बहुतेक ते पडवळ वाटले. म्हणून मग ही रेसिपी नवऱ्याला करायला लावून साग्रसंगीत लिहून घेतली इथे टाकण्यासाठी. मध्ये मध्ये फोटो सुद्धा काढले.
लेक विचारत होती कि तू फोटो कशाला काढतेस, इंटरनेट वर टाकणार का?
तर ही आळूपोटळं तरकारी
आळू - बटाटा
पोटळं - परवर (फोटो खाली बघा)
लागणारा वेळ:
माहीत नाही. (विचारुन सांगू का?)
लागणारे जिन्नस:
१. अर्धा किलो परवर (खाली फोटो बघा.)
२. तीन लांबट बटाटे
३. एक मोठा / दोन छोटे कांदे
५. एक टोमॅटो कापून
६. २ टे.स्पू. आलं, लसूण, जिरे, लालमिरची, धणे यांची पेस्ट
७. तेल
८. हळद, तिखट, मीठ चवी पुरते
क्रमवार पाककृती:
१. परवरची टोकं काढून त्यांचे अर्धे भाग करावे.
२. बटाटे पण अर्धे करावे. फार मोठे असतील तर साधारण अर्ध्या परवरच्या आकाराचे होतील असे कापावे.
३. कांदे बारीक (खूप बारीक नव्हे) कापावे.
४. नॉन स्टिक फ्रायपॅन मध्ये १ टे.स्पू तेल टाकून मंद आचेवर परवर आणि बटाटे परतावे.(लवकर शिजणारे बटाटे असतील तर परवर व बटाटे वेगवेगळे परतावे)
५. थोडे सोनेरी झाले कि (पूर्ण शिजवू नयेत ) काढून ठेवावे.
६. कढई मध्ये २टेस्पू तेल टाकावे आणि गरम करावे.
७. गॅस जरा मंद करून त्यात एक टीस्पू साखर टाकावी. ही साखर रंगासाठी आहे.
८ साखर गडद कॅरेमल रंगाची झाली (म्हणजे जराशी जळली ) कि लग्गेच कांदा टाकून परतावे. यामुळे कांदा छान लालसर दिसेल. जास्त जळू देऊ नका नाहीतर कोळसा मधे मधे दातात येईल
९. कांदा शिजत आला कि (६) मधली पेस्ट टाकावी आणि परतावी.
१०. सगळे तेल सुटे पर्यंत आणि सोनेरी होईपर्यंत चांगले परतावे.
११. हळद आणि तिखट टाकुन पुन्हा एकदा परतावे.
१२. आता टोमॅटो टाकावा आणि त्यावर थोडं मीठ भुरभुरावे.म्हणजे टोमॅटो मऊ होतो आणि त्याचा लगदा लगेच होतो.
१३. या सगळ्यात आधी परतलेले परवर आणि बटाटे टाकावे.
१४. एकदा परतून हवे तसे (साधारण दोन / तीन कप ) पाणी टाकून मीठ टाकावे.
१५. बटाटे आणि परवर शिजे पर्यंत झाकण टाकून शिजवावे. (परवर अगदी मऊ शिजत नाही. त्याचे साल कडकच राहत)
१६. गरम भाताबरोबर खावे.
वाढणी/प्रमाण:
तीन माणसांसाठी.
अधिक टिपा:
१. परवर अगदी मऊ शिजत नाही. त्याचे साल कडकच राहते.
२. ओरिसा मध्ये रस्सा भाजी केली तरीही जेवताना फोडणी घातलेले वरण, अजून किमान एक पाले भाजी आणि एक परतलेली भाजी असतेच. हे सगळे फक्त भाताबरोबर खायचे असते.
३. खूप प्रश्न विचारू नयेत कारण यात माझे काही एक्स्पर्टिज नाहीत.
माहितीचा आणि करणारा स्रोत:
नवरा
कापलेले परवर, टोकं काढून टाका. बिया तशाच ठेवा.
परतलेले परवर
नुकतेच कढईमध्ये टाकलेले
तयार तरकारी
परवर शब्द बरोबर. मस्त आहे
परवर शब्द बरोबर. मस्त आहे रेसिपी.
या भाजीला थंड झाल्यावर
या भाजीला थंड झाल्यावर परवर-दी-गार म्हणतात काय?
फोटू लावा की
मामी धन्यवाद. नंद्या अधिक
मामी धन्यवाद.

नंद्या अधिक टिपा ३ वाचावे
फोटो टाकतेय रात्री .
नंद्या परवर म्हणजे नक्की काय
नंद्या
परवर म्हणजे नक्की काय ते सांग (फोटो टाक)
तेच माहीत नसल्याने भाजी कशी दिसेल तर कळाल नाही.
नंद्या आठवलं मला पण परवर
नंद्या
मागे एकदा बहिणीकडे खाल्ली होती भाजी. पुढच्या वेळेला आणीन भारतातुन येताना.
आठवलं मला पण परवर
या भाजीला थंड झाल्यावर
या भाजीला थंड झाल्यावर परवर-दी-गार म्हणतात काय? >>>
सावली, तू पॉईंट नं.३
सावली, तू पॉईंट नं.३ टाकल्यामुळे मला काहीच करता येत नाहीये.
नंद्या फुल-टू-षटकार.
सावली, आपल्याइथे परवरच म्हणतात.
बंदा परवर (फोटोसाठी) थाम लो
बंदा परवर

(फोटोसाठी) थाम लो जिगर
आडो म्हणुनच तर तो ३ नंबरचा
आडो म्हणुनच तर तो ३ नंबरचा मुद्दा आहे.

मंजूडी
सगळ्यांच्या परवर कोट्यांना अगदी उधाण आलय!
मराठीतही परवर हाच शब्द
मराठीतही परवर हाच शब्द वापरतात.
आम्हाला ओरिसात "परवर भाज्या" हा पदार्थ खायला मिळाला होता आणि आमच्या सगळ्यांचा तो अगदी आवडताही झाला होता! त्याचे फोटो खालील दुव्यावर पाहता येतील.
http://nvgole.blogspot.com/2008/11/blog-post_18.html#links
त्याची काही रेसिपी असेल तर अवश्य सांगा!
कलकत्त्यालाही परवरं जागोजागी
कलकत्त्यालाही परवरं जागोजागी विकायला होती. दारावरही परवरांचा ढीग घेऊन गाडी यायची. ही परवरं म्हणजे आपली तोंडली दुप्पट तिप्पट फुगवली तर जशी दिसतील ना, तशी दिसतात.
ही भाजी छान होते पण नाव माहित नव्हते या भाजीचे.
छान!!! करुन बघायला हवी!!!
छान!!! करुन बघायला हवी!!!
परवर-दी-गार >>>
परवर-दी-गार >>>
परवर तशी माहितीतली भाजी आहे.
परवर तशी माहितीतली भाजी आहे. पूण्यात मिळते हो, मुंबईत नाही मिळत.. अय्या.
आमची बाई जी जबलपूरची होती मूळची ती करायची भाजी ही. टिंडा, परवर, तोंडली ह्या सर्व भाज्यांना एकच पद्धतीने ती बनवायची.
ओरीसा जग्गनाथ्(पुरि) मंदिरातील खीर व खिचडी एकदम भन्नाट चवीचा पदार्थ असतो.
मी करते.. एकदम पातळ काप करुन
मी करते.. एकदम पातळ काप करुन जिरे-मोहरीच्या फोडणिवर कडक होईपर्यंत परताय्चे ( बारीक गॅसवर साधारण २५-३० मिनीटे लागतात अर्धा किलो भाजीला ) आणी मीठ-तिखट टाकुन थोडे परतले की बहजी तयार.. यम्मी लागते
आता तुमच्या पध्दतीची करुन पाहिल
नरेंद्र गोळे, पुढची रेसिपी
नरेंद्र गोळे, पुढची रेसिपी भज्याची टाकणार आहे
ठाण्यातही मिळते ही भरपुर.
अश्विनी के>> हो हो बरोबर
रोचीन नक्की कर
मीरा१०, ठाण्याततरी मिळते म्हणजे मुंबईत इतरत्रही मिळत असणार. बरेच जणं आणत नाहीत कारण भाजी बद्दल माहित नसते.
अरे वा, या क्षेत्रात स्वागत
अरे वा, या क्षेत्रात स्वागत आहे. परवरच म्हणतात त्याला. साले काढली तर मउ शिजतात.
आणि छान आहे रेसिपी.
आज दारावर भाजीवाला परवर घ्या
आज दारावर भाजीवाला परवर घ्या म्हणून मागे लागला होता. टिंडा, लौकी, तोहरी, परवर या सगळ्या एकाच वर्गातल्या भाज्या होत्या त्याच्याकडे.
प्रयोग करुन बघते.
दिनेशदा, पण सालासकट खाण्यात
दिनेशदा, पण सालासकट खाण्यात मजा येते
मला ही भाजी चिरायलाही मजा येते 
छान रेसिपी! परवर - दी-गार!!!
छान रेसिपी!
परवर - दी-गार!!!
टिंडा, लौकी, तोहरी, परवर या
टिंडा, लौकी, तोहरी, परवर या सगळ्या एकाच वर्गातल्या भाज्या होत्या त्याच्याकडे.>>> आता उन्हाळाभर ह्याच भाज्या खायच्या अल्पना...
परवर - दी-गार>>>
परवर (परवल)
परवर (परवल)
मुंबईत मिळतात की परवर.. मी
मुंबईत मिळतात की परवर..
मी कधी आणले नाहीत पण माझा एक युपीवाला कलिग परवरची भाजी नेहमी आणायचा. त्याच्या त्या भाजीत काळ्या वाटाण्याएवढ्या परवरच्या कडक बिया नेहमी असायच्या, ज्या तो खाताना काढुन टाकायचा. मी त्याला एकदा विचारले की भाजी चिरतानाच का नाही काढुन टाकत तर म्हणाला, तेव्हा नाही काढता येत. असली खाताना दाताखाली कडक बिया येणारी भाजी माझ्या घरी कोणीही खाणार नाही म्हणुन मी कधी आणली नाही. वरची रेसिपी वाचुन तरी चांगली वाटतेय. आता एकदा पाव किलो आणुन बघते.
वरच्या फोटोतले परवर खुपच लहान दिसताहेत. मुंबईत अगदी बोटभर मोठे आणि खुप फुगलेले परवर मिळतात. बहुतेक ते जुन झालेले असणार. वरच्या फोटोतले परवर कोवळे दिसताहेत.
त्याच्या त्या भाजीत काळ्या
त्याच्या त्या भाजीत काळ्या वाटाण्याएवढ्या परवरच्या कडक बिया नेहमी असायच्या, ज्या तो खाताना काढुन टाकायचा.>>> मी कधी अश्या बिया नाही बघितल्या परवलमध्ये
परवर - दी-गार>>> ही तोंडली
परवर - दी-गार>>>
ही तोंडली हैत का ?
प्राची, कधी कधी असतात बिया
प्राची, कधी कधी असतात बिया यात. कोवळ्या असल्या तर पांढुरक्या दिसतात पिठूळ गरात मिसळलेल्या. जून असेल तर काळ्या होतात.
कोवळ्या असल्या तर पांढुरक्या
कोवळ्या असल्या तर पांढुरक्या दिसतात पिठूळ गरात मिसळलेल्या>>> हो
नंद्या, मंजूडी - सावली, तुझे
नंद्या, मंजूडी -
सावली, तुझे फोटो कुठायत? वरच्या फोटोत तोंडलीसारखेच दिसायत पण पटकन शिजत नाहीत परवर.
मिरा१०, आमच्याकडे बारात मिळतात. तुमच्या शिट्टीत मिळत नाहीत? अय्या...
हे परवर मोठेच असतात जरा.
हे परवर मोठेच असतात जरा. कोवळे असले तर हिरवे दिसतात पिकल्यावर पिवळट दिसतात. कोवळे असलेल्याच्या बिया चांगल्या लागतात मधे मधे कुडुम कुडूम
वा वा, काय सही दिस्तेय
वा वा, काय सही दिस्तेय परवरांची भाजी. मस्तंच!!
बंगाली लोक पाचफोडनवाली पटोलभाज्या करतात ती पण झकास लागते.
Pages