थंडी संपून वसंत ऋतू आणि उन्हाळा आल्यावर बर्याच जणांनी शनिवारी-रविवारी शहराच्या आसपास भटकंती सुरु केली आहे. अटलांटा आणि नॉर्थ जॉर्जिया परिसरात एक किंवा दोन दिवसांत जाऊन येण्यासारखी काही छान ठिकाणं आहेत. ह्यांपैकी काही बघितली असल्याने माहिती संकलनाच्या दृष्टीने ’जॉर्जिया’ ग्रूपमध्ये जसं जमेल तसं ह्या ठिकाणांबद्दल लिहिण्याचा विचार आहे. बाकीच्यांनीही आपले अनुभव, आवडलेल्या / न आवडलेल्या गोष्टी लिहा. तसंच कोणाला इतर कुठल्या ठिकाणांबद्दल लिहायचं असेल तर वेगळा धागा काढून लिहू शकता. अटलांटा बाफवर तसं नमूद करा.
-----------------------------------------------------------------------------------
स्प्रिंग किंवा फॉलमधल्या एखाद्या शनिवारी जेव्हा मस्त हवा असेल, म्हणजे फार ऊन नाही, थंडी नाही, पाऊस नाही, कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, मध्येच ढगांची सावली, तेव्हा हेलन बाईंची भेट घ्यायला जरूर जावं. हेलन, जॉर्जिया, हे अटलांटाच्या उत्तरेला साधारण ८० मैलांवर वसलेलं टुमदार गाव आहे. ब्लू रिज पर्वतरांगांनी वेढलेल्या ह्या गावाच्या मध्यातून चॅटॅहुची नदी वाहते. आसपास चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टची दाट झाडी आहे.
हायवे ४०० सोडून आत वळलं की साधारण वीस-पंचवीस मिनिटांनी आपण हेलनमध्ये शिरतो आणि शिरल्याशिरल्या जर्मन धाटणीची उतरत्या छपरांची घरं दिसायला लागतात. हे गाव जर्मन किंवा बव्हेरीयन पद्धतीने वसवलेलं आहे. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असल्याने आता तशा पध्दतीची घर बांधणं बंधनकारक आहे.
गावात शिरल्यानंतर मुख्य रस्ता वळून चॅटॅहुचीवर बांधलेल्या पुलावरून जातो. हेच ह्या गावाचं डाऊनटाऊन. नदीच्या दोन्ही बाजूला खाण्याच्या तसेच पिण्याच्या मुबलक जागा आहेत. नदीचे दोन्ही काठ व्यवस्थित बांधून त्यावर ही उपहारगृहे तसेच पब्स वसवले आहेत. हाच रस्ता पुढे वळून चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टच्या दिशेने जातो.
जरूर पहाव्या/कराव्या अशा गोष्टी :
१. ह्या परिसरात चॅटॅहुची नदीचा प्रवाह खूप संथ आणि उथळ आहे. त्यामुळे इथे वॉटर ट्यूबिंग करता येतं. वॉटर ट्यूबिंगमध्ये आपल्याला रबराच्या मोठ्या टायरसारख्या ट्यूबमध्ये बसवून नदीच्या प्रवाहात सोडून देतात.
प्रवाहाबरोबर तरंगत तरंगत आपण खाली येतो. एका ट्यूबमध्ये आपण एकटे किंवा आणखी एका कोणाबरोबर बसू शकतो. उपलब्ध वेळेनुसार एक किंवा दोन तासांच्या टूर्स घेता येतात. मध्येमध्ये दगडांवर पाणी जरा खळाळतं असतं, त्यामुळे ह्या ट्यूबमध्ये बसून तरंगायला मजा येते. पाण्याच्या खळाळाचा अंदाज न आल्यास मध्येच छान डुबकीही मारली जाते. उन्हाळ्यात हवा गरम असते आणि नदीचं छान पाणी थंडगार असतं त्यामुळे हे वॉटर ट्यूबिंग करताकरता नदीत मस्त डुंबता येतं. फॉल किंवा स्प्रिंगमध्ये पाणी फारच थंड असतं त्यामुळे एकदा मी थंडी वाजून जोरदार कुडकुडलो होतो !
पाणी खोल नसल्याने पोहता येत नसेल तरी चालू शकतं आणि लहान मुलांनाही बरोबर घेऊन जाता येऊ शकतं.
एकंदरीत नक्की करावा असा प्रकार आहे.
२. अॅनारूबी धबधबा : चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टमध्ये हा धबधबा आहे. मुख्य रस्त्यापासून व्यवस्थित दिशादर्शक पाट्या आहेत. पार्किंगपासून साधारण अर्धा मैल वर चढून जावे लागते. बाकी कुठले मोठे धबधबे पाहिले असतील तर हा फार काही भारी वाटत नाही. पण ्ग्रूप बरोबर असेल तर चढून जायला मजा येते.
३. ऑक्टोबरफेस्ट (Oktoberfest) : जर्मनीमधल्या म्युनिखच्या धर्तीवर इथे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर माहिन्यांमध्ये Oktoberfest असतो. बियर फॅन्सनी ह्यावेळी नक्की जावे. इथल्या पब्समध्ये ह्या दरम्यान एकदम उत्साही वातावरण असतं.
४. फॉल कलर्स : इथे आणि आसपास बरच जंगल असल्याने फॉल कलर्स छान दिसतात. इथूनच पुढे ब्लूरिज पार्क वेवर जाता येतं.
५. डाऊनटाऊनमध्ये भटकंती : मुख्य रस्त्यावर नदीच्या आसपास डाऊनटाऊन आहे. डाऊनटाऊन म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येतं तसं हे डाऊनटाऊन अजिबात नाहिये. हा भाग निवांतपणे वेळ घालवायला छान आहे. नदीवरच्या पुलाच्या थोडं पुढून खाली नदीपर्यंत उतरण्यासाठी पायर्या आहेत. ट्यूबिंग करणार नसाल तर इथे उतरून नदीला नुसतं ’पायलागू’ करू शकता. टिपीकल अमेरिकन खेड्यांमध्ये असतात तशी आर्ट अँड क्राफ्ट, काचेच्या / क्रीस्टलच्या वस्तू मिळणारी दुकानं, टॅटू काढून देणारे, टीशर्ट, मॅगनेट, शॉट ग्लास, पोस्टकार्ड मिळणारी दुकानं, लोकल कॉफी शॉप्स, आईस्क्रीम पार्लर्स ह्या परिसरात खूप आहेत. मधल्या एका चौकात एक छोटसं पण छान कारंजं आहे. तिथे कधीकधी लोकल बॅंड गाणी म्हणत, गिटार वाजवत असतात. कधीकधी एक जण पक्ष्यांचे खेळ दाखवत असतो. तिथे बसायला बाकसुद्धा आहेत. ज्यांना खरेदी करायची हौस आहे त्यांना दुकानांमध्ये पाठवून आपण (आईस्क्रीम खात किंवा कॉफी घेत) निवांत बाकावर बसून राहावं !
खानपान सेवा :
१. डाऊनटाऊनमध्ये नदीच्या आसपास खूप खाण्याच्या जागा आणि पब्स आहेत. गावाच्या थोडं बाहेर नेहेमीच्या चेनसुद्धा आहेत. पण इथल्या लोकल रेस्टॉरंट्समध्ये नक्की जाऊन बघावं. आम्हांला इथलं इंटरनॅशनल कॅफे नावाचं रेस्टॉरंट खूप आवडतं. नदीच्या काठी बसून निवांत जेवता येतं. मात्र ह्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी लोकांचे जरा हाल होतात. हेच ते इंटरनॅशनल कॅफे.
२. फॉलमध्ये अॅनारूबी फॉल्सच्या रस्त्यावर छोट्याछोट्या ठेल्यांवर उकडलेल्या शेंगा, कणसं, लेमनेड वगैरे मिळतं. जरा थंड हवा असेल तर गरमगरम दाणे मस्त वाटतात ! त्यात केजन फ्लेवरचे म्हणजे जरासे तिखट मिळतात, ते भारी लागतात. पण मात्र लेमनेड खूप आंबट असतं !
३. डाऊनटाऊनमध्ये एक चॉकोलेट फज शॉप आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची फज मिळतात. ती तयारही तिथेच केली जातात. ते पाहायला मिळालं तर मजा वाटते. तिथे कॅरॅमल तसेच चॉकोलेटमध्ये घोळवलेली सफरचंदंसुद्धा मिळतात. मला आधी पाहून खाविशी वाटली नाहीत पण जरासं आंबट सफरचंद आणि वरचं कॅरॅमल किंवा चॉकोलेट ह्यांची एकत्र चव मस्त लागते. फज तिथेच खावं, घरी आणायच्या भानगडीत पडू नये. ते एकतर पडून राहतं आणि थोडे दिवसांनी कडक होतं.
४. फनेल केक : ही हेलनची खासियत. साधारण आपल्या जिलबीसारखा प्रकार. पीठ फनेलमधून (म्हणून फनेल केक) गरम तेलात सोडतात. तळून झालं की वर पिठीसाखर पेरतात. गरम गरम खायला छान लागतो !
ह्यात फ्लेवर्सपण असतात, पण आम्हांला साधाच आवडला.
सकाळी आरामात ९.३० - १० ला निघालं तरी वरच्या सगळ्या गोष्टी करून संध्याकाळी ७-८पर्यंत घरी परतता येतं. दिवस हेलनबाईंबरोबर मजेत जातो.
त.टी. कृपया फोटोंना झब्बू द्या. ते बर्यापैकी बोर आहेत.
मु.शो.मदत : चिनूक्स.
छान झालाय लेख. फोटो पण
छान झालाय लेख. फोटो पण चांगलेच आहेत. जमलं तर झब्बू देते.
छान माहिती. मी अटलांटाला आले
छान माहिती. मी अटलांटाला आले तर कंपूने इथेच भेटण्याचे ठरवावे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो आणि वर्णन पराग.
मस्त फोटो आणि वर्णन पराग. चॅटाहूचीत तरंगायला यायला हवं.
'हेलन, जॉर्जिया' असं रुक्ष नाव का?
जॉर्जियातलाच आणखी एक गप्पांचा बाफ असावा म्हणून दुर्लक्ष केलं पहिले ५ तास. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो मृ ला अनुमोदन .. आपल्याला
हो मृ ला अनुमोदन .. आपल्याला माहित असलेली हेलन जशी sensuous होती तसं काहितरी नाव दे पाहू .. मला sensuous ला योग्य असा मराठी प्रतिशब्द माहित नाही ..
पराग, छान माहिती पण फोटो ची क्वालिटी चांगली नाही ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान माहीती , अजुन फोटो हवे
छान माहीती , अजुन फोटो हवे होते .![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
sensuous ला योग्य असा मराठी प्रतिशब्द >>> कामुक (?) , नको ! तो हेलनच शब्द बराय
धन्यवाद सगळ्यांना.. मृ, सशल,
धन्यवाद सगळ्यांना..
मृ, सशल, श्री, नाव अपडेट केलं आहे.. मला एव्हडच रसिक नाव सुचू शकलं..
प्रॅडी फोटो टाक नक्की.. जितला पण सांगितल आहे...
वा हेलनकाकू मस्त दिसतायत.
वा हेलनकाकू मस्त दिसतायत. रंजक माहिती आणि फोटो.
छान माहिती!! आमच्याकडचे
छान माहिती!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आमच्याकडचे सोल्वँग असेच आहे... मी एक ब्लॉगपोस्ट लिहीली होती त्यावर.. (रिक्षा रिक्षा!!)
मस्तय. शिवाय फोटोंना स्वतःच
मस्तय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाय फोटोंना स्वतःच बोर म्हणले म्हणून बक्षीस.
पण फोटो हवेच होते, त्या शिवाय मजा आली नसती.
मला वाटल खरच हेलनच्या मोहक
मला वाटल खरच हेलनच्या मोहक अदांचे फोटो दिले की कॉय ?
पण असौ द्या ही पण हेलन काय वाईट नाही.
लव्हली पिक्स!!! फज
लव्हली पिक्स!!! फज ..यम्म..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॅरेमलाज्ड अॅपल्स पण खूप मस्त लागतात..
जिलबी चं रूप घेऊन आलेली फनेल केक पण मस्त दिस्तीये..
नाव बदलल्याचा उपयोग होतोय
नाव बदलल्याचा उपयोग होतोय बरं!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त माहिती. फोटोही. धन्यवाद.
माझा तर त्या नदितून पाय
माझा तर त्या नदितून पाय निघणार नाही. मस्त प्रचि.
३ वर्ष जॉर्जियात राहून हे
३ वर्ष जॉर्जियात राहून हे काही बघितलं नाही.. श्या तेव्हा कार असती तर... असो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेक्स्ट अथेन्स ट्रिपमधे हे नक्की...
आशू.. अगदी अगदी.. ! सिंडी,
आशू..
अगदी अगदी.. !
सिंडी, नी या इकडे.. आपण सगळा कंपू मिळून जाऊ
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त ठिकाण आहे हे एकदम.
मस्त ठिकाण आहे हे एकदम. माझ्याकडे थोडे फोटो आहेत. पण इतके खास नाहीत. आणि बर्याच फोटोत मी हिंदमातासारखी उभी आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रुबी फॉल्सला वर जाताना ब्रेल लिपीतले बोर्ड आहेत. तेव्हा अमेरिकेत नविन आलेले मी. बघुन एकदम आश्चर्य वाटलेल.
मस्तच दिसतंय की जॉर्जिया!
मस्तच दिसतंय की जॉर्जिया! आवडल्या या अदा!
चालेल. जाऊ माझी ट्रिप होईल
चालेल. जाऊ माझी ट्रिप होईल तेव्हा. आणि अथेन्सला पण जाऊ. माझं स्कूल आणि परिसर पण फिरू..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अथेन्सला तुझी जाऊ असते ? तिला
अथेन्सला तुझी जाऊ असते ? तिला पण घे आपल्या कंपूत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हाणा या सिंडीला!!
हाणा या सिंडीला!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सहीच पराग!! नाव बदलल्यापासून
सहीच पराग!! नाव बदलल्यापासून खरंच टिआरपी वाढलाय( काही लोक चुकून येत आहेत)![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
सरप्राईजिंगली जॉर्जियात येऊन ४ वर्षं झाली पण हेलनबाईंकडे जायचा योग आला नाही.छान ठिकाण दिसतंय..ह्यावर्षी नक्की प्लॅन करणार.रच्याकने अॅनारुबी आणि अमिकालोला फॉल्स वेगवेगळे आहेत ना? कारण अमिकालोला फोल्ससुद्धा साधारण असेच आहेत.
पूर्वा.. हो अमिकालोला आणि
पूर्वा.. हो अमिकालोला आणि अजून एक लुला फॉल्स आहे. ते वगळे आहेत अॅनारूबी पेक्षा..
हेलन खरच खूप छान आहे. पराग
हेलन खरच खूप छान आहे. पराग वीकांताला टाकतो फोटो !!
मस्त!
मस्त!
मी गेलो होतो तिकडे.. न सांगता
मी गेलो होतो तिकडे.. न सांगता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुणाला न सांगता ? माझ्या
कुणाला न सांगता ? माझ्या आठवणीत तुम्ही सांगून गेला होतात. अटलांटाकरांचं गटगचं आमंत्रण नाकारलेलत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्तच पराग.
मस्तच पराग.
आपली आयटम गर्ल हेलन नॉर्थ
आपली आयटम गर्ल हेलन नॉर्थ जॉर्जियाची नाही हे नक्की माहित होतं म्हणून तुमची कोणती हेलन हे बघायला डोकावले. बदललेल्या नावाने नक्कीच जास्त लोकं येत असावेत![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मस्त दिसतेय जागा. झब्बू द्या लोकांनो.
शिंडे यू आर म्हणिंग राईट..
शिंडे यू आर म्हणिंग राईट..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच पराग. फोटो बोर नाहीयेत
मस्तच पराग. फोटो बोर नाहीयेत
नाव ओके आहे ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)