Submitted by नीधप on 3 May, 2011 - 02:41
जुनीच
-----------------------
कसल्या या खुणा
कोण येउन गेलं इथे
कुणाच्या ह्या वेणा
रूतल्यात जिथे तिथे
गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले
वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी
झाडे काळवंडलेली
हवाही काळीशार
थिजलेला गारवा
रूततोय आरपार
कुणी मंतरून ठेवले
की शाप हा भोवला
उभ्या राजस संध्येचा
सूर असाच गोठला
- नी
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर!!!!
सुंदर!!!!
ही पण छान
ही पण छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुणी मंतरून ठेवले की शाप हा
कुणी मंतरून ठेवले
की शाप हा भोवला
उभ्या राजस संध्येचा
सूर असाच गोठला>>> छान आहे कविता
छानच..!
छानच..!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख आणि लयबद्ध कविता. पैंजण
सुरेख आणि लयबद्ध कविता. पैंजण घुंगरू आणि वाळलेल्या पानावरचं पाणी ह्या कल्पना अगदी अगदी भावल्या मनाला.
नी मस्त कविता ग
नी मस्त कविता ग
सुंदर.
सुंदर.
(No subject)
सुन्दर!
सुन्दर!
आहाहा ! नी मोहक शब्दांच्या
आहाहा ! नी मोहक शब्दांच्या प्रत्येक कडव्यातून काळजाला भिडली हि कविता.
मस्त!! आवडली
मस्त!!
आवडली कविता...
वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी>> हे खूप आवडलं.
शुभेच्छा!
<<गेली असतिल इथून काही आतूर
<<गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले<<
व्वा, किती तरल भाव !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान, अलगद.
छान, अलगद.
माझ्या गझलेचं विडंबन छान
माझ्या गझलेचं विडंबन छान जमलय. पु ले शु.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिंडे सगळे धन्स!!
सिंडे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळे धन्स!!
फारच सुंदर!
फारच सुंदर! नादमाधुरी!
सिंडरेलाची गझल पोट दुखेपर्यंत हसवणारी!