नवीन सुविधा: प्रश्न, उत्तर, सर्वोत्तम उत्तर
मायबोली अनेकांसाठी फक्त साहित्य वाचनाचे संकेतस्थळ नसून रोजच्या वापरातली एक उपयुक्त सुविधा(Utility) झाली आहे.
बरेच जण विविध धाग्यांवर वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्न विचारतात. बरेच मायबोलीकर त्यांना योग्य उत्तरेही प्रतिसादामधे देतात. पण त्या एकंदर धाग्यामध्ये योग्य ते उत्तर सर्व प्रतिसादांमध्ये सापडणं कठीण होतं. जेंव्हा एकाच प्रश्नाला अनेक उत्तरे असू शकतात तेंव्हा त्यातले कुठले जास्त चपखल असेल हे ठरवणेही कठीण असते.
सध्या असलेली अजून एक अडचण म्हणजे कुठल्याही विषयावर, ठिकाणाबद्दल असलेले प्रश्न माहिती हवी आहे या एकाच ग्रूपमधे विचारले जातात. "पुण्यात घरकामाला मदत कुठे मिळेल" हे पुण्याबद्दलच्या ग्रूपमधे विचारण्यापेक्षा किंवा "कुठे गुंतवणूक करावी" हे गुंतवणूकीच्या ग्रूपवर विचारण्यापेक्षा, माहिती हवी आहे या ग्रूपमधे विचारले जाते आणि तिथे त्याला योग्य प्रतिसाद मिळतोच असे नाही.
त्यासाठी आजपासून "प्रश्न" हा एक वेगळा लेखन प्रकार प्रत्येक ग्रूपमध्ये दिला आहे. तुमचे प्रश्न तुम्ही हा प्रकार वापरून लिहू शकता. तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही प्रश्न विचारून मिळवू शकता.
जे प्रतिसाद उत्तरादाखल येतील त्यांना मतदान करण्याची सोय आहे. म्हणजे तुम्हाला तेच उत्तर द्यायचे असेल तर पुन्हा तेच प्रतिसादात लिहण्यापेक्षा, तुम्ही आलेल्या प्रतिसादाला + मत देऊ शकता. एखादा प्रतिसाद चुकिचा वाटला तर - मत देऊ शकता.
ज्या सदस्याने प्रश्न विचारला आहे त्या सदस्याला आलेल्या उत्तरांमधले (स्वतःचे सोडून) सर्वोत्तम उत्तर (प्रतिसाद) निवडता येईल. तसे केल्याबरोबर त्या प्रतिसादाच्या बाजूला एक तारा (star) दिसेल आणि तो प्रतिसाद सर्वात वर दिसू लागेल. प्रश्नकर्ता/कर्ती कुठलाही प्रतिसाद सर्वोत्तम उत्तर म्हणून नोंदवू शकतो. ज्या प्रतिसादाला सगळ्यात जास्त मते मिळाली असतील तोच सर्वोत्तम असेल असे नाही. वाचकांना प्रश्नकर्ता/कर्ती च्या मते सर्वोत्तम उत्तर आणि कुठल्या प्रतिसादाला जास्त मते मिळाली हे दोन्ही दिसत राहील.
सर्वोत्तम उत्तर म्हणून नोंद केल्यावर ते कधिही दिले असले तरी सगळ्यात वर पहिल्या प्रतिसादाच्या जागी दिसू लागेल. प्रश्नकर्ता/कर्ती कुठले उत्तर सर्वोत्तम हे बदलू शकेल.
ही सुविधा प्रत्येक ग्रूपमधे असल्याने, लवकरच "माहिती हवी आहे" हा ग्रूप बंद करून तिथले धागे त्या त्या ग्रूपमधे स्थलांतरीत केले जातील.
मायबोलीवरच्या माहितीची उपयुक्तता या सुविधेने वाढेल असा आमचा प्रयत्न आहे.
फारच छान आणि अभिनव सुविधा.
फारच छान आणि अभिनव सुविधा. Admin-team चं अभिनंदन आणि धन्यवाद.
उत्तम सुविधा!!
उत्तम सुविधा!!
धन्स अॅडमीन
धन्स अॅडमीन
उत्तम आयडिया! धन्यवाद अॅडमिन
उत्तम आयडिया!
धन्यवाद अॅडमिन
मस्त आयडिया धन्स अॅडमिन.
मस्त आयडिया
धन्स अॅडमिन.
मस्तच. धन्यवाद अॅडमीन.
मस्तच. धन्यवाद अॅडमीन.
गुड आयड्या अॅडमीन !
गुड आयड्या अॅडमीन !
अप्रतिम सोय !! छान सगळे
अप्रतिम सोय !!
छान सगळे सेग्रिगेट होईल आता..
गुड वन!
गुड वन!
सही आयडीया..
सही आयडीया..
वा. उत्तम सुविधा. मायबोलीवर
वा. उत्तम सुविधा. मायबोलीवर अनेक तज्ञ मंडळी आहेत आणि वेळात वेळ काढून ते उत्तम मार्गदर्शनही करत असतात. या सुविधेने त्यांच्या ज्ञानाचा आम्हा सर्वांना उत्तम उपयोग होऊ शकेल.
अभिनव आणि उपयुक्त कल्पना आहे.
अभिनव आणि उपयुक्त कल्पना आहे.
मस्त कल्पना आणि उत्तम
मस्त कल्पना आणि उत्तम इम्प्लिमेन्टेशन.
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.
मस्त कल्पना.
धन्यवाद!
धन्यवाद!
चांगली आहे कल्पना.
चांगली आहे कल्पना.
धन्यु admin-team
धन्यु admin-team
धन्स अॅडमिन टीम
धन्स अॅडमिन टीम
उत्तम सुविधा!!
उत्तम सुविधा!!
छान सुविधा. धन्यवाद अॅड्मिन
छान सुविधा. धन्यवाद अॅड्मिन
अभिनव आणि उपयुक्त कल्पना !
अभिनव आणि उपयुक्त कल्पना !
वा !! ही सुविधा आवडली
वा !! ही सुविधा आवडली
झकास आयडीया. सगळ्या टीमला
झकास आयडीया. सगळ्या टीमला धन्यवाद.
खूप छान! धन्यवाद.
खूप छान! धन्यवाद.
हे मस्तय! धन्यवाद!
हे मस्तय! धन्यवाद!
व्हाट अॅन आयडिया सरजी !!
व्हाट अॅन आयडिया सरजी !! धन्यवाद
प्रश्नकर्त्याव्यतिरिक्त,
प्रश्नकर्त्याव्यतिरिक्त, वाचकान्ना देखिल प्रतिसादावर + वा - चिन्ह दाबुन मत नोन्दविता येते आहे असे दिसते. तसे अपेक्षित असेल, तर मात्र यात एक तृटी जाणवते की, एकदा का प्लस वा मायनस चिन्ह दाबले की नन्तर केवळ त्याच्या उलट मत देता येते, पण मत पूर्णतः काढून घेता (न्युट्रल करता) येत नाही.
)
(मला बोवा उद्घाटनाच्या पहिल्याच पोस्टला मायनस मते मिळाली
ही सुविधा केवळ "प्रश्नान्च्या" उत्तरान्पुरती मर्यादित न ठेवता, वहाते धागे सोडून अन्य सर्व ठिकाणी ठेवावी असे मला वाटते.
छान कल्पना! >> ही सुविधा केवळ
छान कल्पना!
म्हणजे उगाचच 'अमक्याला अनुमोदन' असले प्रतिसाद द्यायची गरज राहाणार नाही. (थोडक्यात facebook च्या like सारखं)
>> ही सुविधा केवळ "प्रश्नान्च्या" उत्तरान्पुरती मर्यादित न ठेवता, वहाते धागे सोडून अन्य सर्व ठिकाणी ठेवावी असे मला वाटते.
मी पण हेच सांगायला आलो
बरोब्बर स्याम, पण तिथे like
बरोब्बर स्याम, पण तिथे like कुणीकुणी केलय ते देखिल कळत, इथे कळणारे का?
अरे पण तो रेकीच्या प्रश्नाचा धागा कुठे गेला?
Pages