Submitted by नीधप on 13 April, 2011 - 22:08
ही कविताही जुनीच आहे. क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
या पहिल्या दोन ओळींच्यावरून सुचलेली..
-----------------------------------------
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
मी मोहरले नक्कीच
हे तात्कालिकच आहे
अशी समजूत घातली स्वतःची
तगमग शांतवण्यासाठी
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखावून जाण्यासाठी..
या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे
मी कधीच पाह्यलं नाही.
गरज वाटली नाही
भीतीही वाटली.
प्रिय मित्रा,
मला सांग रे
तात्कालिकची मर्यादा किती?
किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?
सांगच!
बोलून टाकूया एकदा सगळं..
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!
-नी
गुलमोहर:
शेअर करा
वा.. सुरेख आहे कविता. आवडली.
वा.. सुरेख आहे कविता. आवडली.
मस्त कविता नी, आवडली
मस्त कविता नी, आवडली
मस्त कविता! आवडली.
मस्त कविता!
आवडली.
छान आहे गं, नीरजा. एकदम
छान आहे गं, नीरजा. एकदम प्रामाणिक. किती जुनी आहे?
सुरेख.
सुरेख.
अनु, दोन अडीच वर्ष झाली
अनु, दोन अडीच वर्ष झाली गं.
बाकीचे धन्स!
सुंदर....!!!
सुंदर....!!!
किती दिवस, आठवडे,
किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?>> ह्या ओळीत खूप काही आलं नीरजा.
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!>> दुहेरी गोफ कशाला म्हणालीस कळले नाही.
आवडली .
आवडली .
मस्त.. आवडली..
मस्त.. आवडली..
'का होईना! ओढ तर आहे' >> हेच
'का होईना! ओढ तर आहे' >> हेच ते, हेच!!
मस्त गं. (पुन्हा एकदा समेची लाऽपि.)
छान आहे कविता... बर्याच
छान आहे कविता...

बर्याच जोड्यांमध्ये असे प्रश्न असतात..
बोलून मोकळं झालेलं बरंच कधीही.. उगिच ओढाताण करून घेण्यापेक्षा..
आवडेश !
आवडेश !
आवडली
आवडली
वाह! आवडली. रच्याकने, नी,
वाह! आवडली.
रच्याकने, नी, जुन्याचं खोदकाम जोरात दिसतंय!
चांगल्या भावना नीधप! आवडली
चांगल्या भावना नीधप!
आवडली कविता!
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखावून जाण्यासाठी.
हे अधिक आवडले.
अभिनंदन!
-'बेफिकीर' !
ट्या, सध्या नवीन काही नाही ना
ट्या, सध्या नवीन काही नाही ना तर मग शि क उ!
चालूदे, पण खरंच आवडतोय हा
चालूदे, पण खरंच आवडतोय हा शिळ्या कढीचा उत!
वाह.. लिखाणाची खाण होते आणि
वाह.. लिखाणाची खाण होते आणि उत्खननात बरेच काही सापडत जातं.
ही नव्हती वाचली.. गुड वन!!!
आवडली
आवडली
छान आहे कविता. आता नविनपण
छान आहे कविता. आता नविनपण टाक ना कविता.
आवडली
आवडली
वा!
वा!
छान आहे , आवडली.
छान आहे , आवडली.
आवडली. आणा सगळं जुनं इथे
आवडली.
आणा सगळं जुनं इथे पण...चांगलं काही मिळत असेल तर शि क ऊ चालेलच.
ही नव्हती वाचली. आवडली.
ही नव्हती वाचली.
आवडली.
छान.....
छान.....
नी... कवीता छानच पण यात तुझा
नी... कवीता छानच पण यात तुझा नेहमीचा टच जाणवला नाही.. चुभुदेघे..:)
चुभु कसली त्यात...
चुभु कसली त्यात...
खुप आवडली!
खुप आवडली!
Pages