प्रिय मित्रा!

Submitted by नीधप on 13 April, 2011 - 22:08

ही कविताही जुनीच आहे. क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही

या पहिल्या दोन ओळींच्यावरून सुचलेली..

-----------------------------------------
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
मी मोहरले नक्कीच

हे तात्कालिकच आहे
अशी समजूत घातली स्वतःची
तगमग शांतवण्यासाठी
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखावून जाण्यासाठी..

या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे
मी कधीच पाह्यलं नाही.
गरज वाटली नाही
भीतीही वाटली.

प्रिय मित्रा,
मला सांग रे
तात्कालिकची मर्यादा किती?
किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?

सांगच!
बोलून टाकूया एकदा सगळं..
हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!

-नी

गुलमोहर: 

किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती?
की मिठी, चुंबन, देहापुरती?>> ह्या ओळीत खूप काही आलं नीरजा.

हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!>> दुहेरी गोफ कशाला म्हणालीस कळले नाही.

छान आहे कविता... Happy
बर्‍याच जोड्यांमध्ये असे प्रश्न असतात..
बोलून मोकळं झालेलं बरंच कधीही.. उगिच ओढाताण करून घेण्यापेक्षा.. Happy

चांगल्या भावना नीधप!

आवडली कविता!

'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखावून जाण्यासाठी.

हे अधिक आवडले.

अभिनंदन!

-'बेफिकीर' !

वा!

Pages