आज नैरोबी पासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या मसाई ऑयीस्ट्रीच फार्मवर गेलो होतो. नैरोबीहून मोंबासाला जायला जो रस्ता आहे, (त्याला मोंबासा रोड असेच म्हणतात) त्यावर अथी नावाची एक नदी आहे. त्या परिसरात हे फार्म आहे. रस्ता अधूनमधून खराब आहे त्यामूळे ४ व्हील ड्राईव्ह नसेल, तर पाऊसपाणी बघून जावे लागते. आज सुदैवाने पाऊस नव्हता.
इथल्या बहुतेक फार्मवर असतो तसा ब्रिटिशकालीन अँबियन्स जपलेला असतो. खूप विस्तीर्ण आवार आहे याचे. इथे शहामृगांची पैदास केली जाते. साधारण ५ महिन्याचे पक्षी खाण्यासाठी वापरतात. त्याचे मांस २५०० रुपये किलो या दराने विकले जाते.
शहामृगाला उडता येत नाही, पण तो जोरात पळू शकतो, हे आपल्याला माहीत आहेच. पण तो उडीही मारू शकत नाती. साधे लाकडाचे ४ फूट उंचीचे कुंपण तो उडी मारुन ओलांडू शकत नाही कि त्याला त्याखालून वाकून जाता येत नाही.
पण त्याला (म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्याला ) नैसर्गिक शत्रू फारसे नाहीत. एकटा चित्ता देखील त्याची शिकार करु शकत नाही. त्याच्या लाथेचा तडाखा, चित्त्याला नामोहरम करु शकतो. पण त्याची अंडी आणि पिल्ले मात्र, अनेकांच्या भक्ष्यस्थानी पडतात.
त्याला तशी कुणाची भिती वाटत नाही. आपण जवळ गेल्यास तो जवळ येतो. बोट दिले तर तोंडात पकडतो, पण त्याला दातच नसल्याने, काही इजा होत नाही.
तर हे तिथले फोटो. बाकिचे पक्षी आणि अर्थातच फूले पण ...
५)
६)
७)
८) या एकाच फूलात तीन तीन किटक आहेत.
९) हि फूले तर जेमतेम २ मीमी ची होती.
१० ) ही झाडे नैरोबीत पण खूप आहेत. याला पिवळी फळे लागतात आणि ती (आम्हा) बाळगोपाळांचा आवडता खाऊ असतात.
११) इतना बडा अंडा !!!
१२) हे आहेत ५ महिन्याचे पक्षी. हे मांसासाठी कापले जातात.
१३ )
१४) ही २ आठवड्यांची
१५) तिथले विस्तीर्ण आवार
१६ ) हे "बाबा"
१७ ) खास लोकाग्रहास्तव्,आई बाबांचा एकत्र फोटो..
१८ )
१९) आणि पिल्ले फार आवडली ना, म्हणून हे आणखी एक. पण आता आमाला शाळेत जायचय, टाटा !!
तिथे रहायची, खायची प्यायची उत्तम सोय आहे. सर्व फार्मभरची गाईडेड टुअर आहे (तिच आम्ही घेतली होती) पण खाद्यपदार्थात, शहामृगाच्या मांसाचाच जास्त भरणा आल्याने, आम्ही तिथे काही खाल्ले नाही.
दिनेशदा, सगळे फोटो मस्तच. ती
दिनेशदा,
सगळे फोटो मस्तच. ती शहामृगाची पिल्लं काय क्युट दिसतात. असं वाटतं त्यांना उचलुन एक घरी घेऊन यावं.
त्यांच्यापैकी एकाच्या गळ्यात कसलातरी पट्टा आहे ना?
मस्त फोटोज , ती पिल्ल तर
मस्त फोटोज , ती पिल्ल तर मस्तच.
अरे वा! सुरेख माहिती.
अरे वा! सुरेख माहिती. आवडली.
त्याला तशी कुणाची भिती वाटत नाही. आपण जवळ गेल्यास तो जवळ येतो. बोट दिले तर तोंडात पकडतो, पण त्याला दातच नसल्याने, काही इजा होत नाही.>>>
मग तो खातो तरी काय? आणि कसे?
जंगलात तो गवताच्या बिया,
जंगलात तो गवताच्या बिया, काड्या, छोटे किटक असे काहिही गिळतो पण त्याचबरोबत छोटे दगड देखील गिळतो, त्यामूळे पोटात हे सगळे द्ळले जते. इथे त्याला राजगिरा, गवत आणि सुके मासे यांचे मॅश देतात.
दिनेशदा,शेवटचा फोटो
दिनेशदा,शेवटचा फोटो स्मिथियाचा किंवा त्याच प्रकारातला आहे का?सर्व पक्ष्यांचे फोटो मस्त.ती पिल्लं कित्ती गोsssssssssssssssssssड आहेत.रचुला २००% अनुमोदन.खरंच ती पटकन उचलून घ्याविशी वाटताएत.
'बाबा' जोरदार आहेत अगदी
'बाबा' जोरदार आहेत अगदी !!
विस्तीर्ण आवाराचा फोटो खूप आवडला. एकदम मोकळं-ढाकळं वाटलं फोटो पाहून
छोटुले खूपच छान .
छोटुले खूपच छान .
क्या बात है सगळेच फोटो सुंदर
क्या बात है
सगळेच फोटो सुंदर आलेत. १२ नंबरचा तर मस्तच.. ( लाईट कमी होता का ?)
इथं बसून चीन, नैरोबी पहायला मिळतंय.. दिनेशदा , अजून टाका फोटो
मस्त माहीती...छान प्रचि या
मस्त माहीती...छान प्रचि
या पक्ष्याला दोनच बोटे..आहेत..?
सुरेख !
सुरेख !
मस्त फोटो आणि माहिती त्या
मस्त फोटो आणि माहिती
त्या पिल्लांचा फोटो मस्तच!!!!
मस्त फोटो...
मस्त फोटो...
सुंदर माहीती आणि
सुंदर माहीती आणि फोटोज..
पक्ष्यांचे तर भन्नाटंच आलेत...
पिल्लांचा आणी प्रचि २ चाबूक एकदम..
सगळेच फोटो आणि माहिती भन्नाट
सगळेच फोटो आणि माहिती भन्नाट
मस्त फोटो.. आधीचे पक्षी ,
मस्त फोटो.. आधीचे पक्षी , फुले आणि शहाम्रुगाची पिल्लेही खुप आवडली./
कित्ती छान दिस्ताहेत
कित्ती छान दिस्ताहेत पिल्लं..ती छोटी वाली..
छान आलेत फोटो.. भरभरून,मोकळा श्वास घेता येईल असे विस्तीर्ण आवार आहे कह्रच..
आणी पक्षी,फुलं ही मस्त आहेत,फ्रेश!!
मस्त आहेत फोटो अंड बघणार्या
मस्त आहेत फोटो
अंड बघणार्या मुलांच्या तोंडावरचे भावही मस्त आलेत.
'बाबा' रुबाबदार आहेत. 'आई' वेगळी दिसते का यांच्यात?
मस्त फोटो. ती पिल्ले असतानाच
मस्त फोटो. ती पिल्ले असतानाच छान दिसतात
व्वा! मस्त फोटो आणि माहिती.
व्वा! मस्त फोटो आणि माहिती.
इतके जिवंत फोटो क्वचितच
इतके जिवंत फोटो क्वचितच बघायला मिळतात.वर्णन व फोटो क्लासच.
वॉव.. काय मस्त फोटो आहेत सगळे
वॉव.. काय मस्त फोटो आहेत सगळे !
व्वा... 'बाबा' फारच आवडले!
व्वा... 'बाबा' फारच आवडले!
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
वॉव. मस्त. बाबांची ऐट ती
वॉव. मस्त. बाबांची ऐट ती किती!
ओ हो, तर हे आहेत आमच्या
ओ हो, तर हे आहेत आमच्या इमूंचे भाऊ
भारी ऐटदार आहे. पिल्ल जवळपास तशीच दिसतात, पण पाय जास्त मजबूत आहेत यांचे.
गळ्यातला पट्टा मार्कींगचा असणार. बॅच, इन्शुरन्स वगैरे माहितीची नोंद ठेवण्याकरता.
शांकली, आपल्याकडे रानमूग,
शांकली, आपल्याकडे रानमूग, रानचवळी असते त्यातला हा प्रकार.
यांच्याबद्दल आणखी खास म्हणजे ४२ दिवसांनी अंडी फोडून पिल्ले बाहेर येतात पण ५ महिन्यापर्यंत नर मादी वेगळे ओळखता येत नाहीत. मग नराचा रंग काळा पांढरा होतो आणि मादी पिंगट रंगाची राहते.
इथे त्यांचे गट जन्मतारखेप्रमाणे केले जातात. त्यामूळे एकाच्या गळ्यात ती टॅग असते.
शहामृगाचे पाय खरेच मजबूत असतात. त्यावर लहान मूलेच काय मोठा माणूसही बसू शकतो. तशी सोय आहे तिथे. पण त्याच्यावर मांड ठोकून बसणे, हेच कठीण असते.
आणि तो मोकळा परिसर म्हणजे रिफ्ट व्हॅली ची खासियत आहे. शिवाय इथली जंगले म्हणजे आपल्यासारखी घनदाट झाडी नाहीत. हि आहेत गवताळ प्रदेशाची जंगले. डोंगर असतात, पण त्यांच्या रांगा वगैरे नाहीत. ते सूटे सूटेच असतात. कुठल्याही दिशेला गेलो, कि रस्त्याच्या दोन्ही बाजूला हि विस्तीर्ण व्हॅली दिसत राहते.
पण या व्हॅलीत कधीही वादळी पाऊस पडू शकतो. ढगांचा खेळ दिवसभर चालू असतो. या व्हॅलीच्या विस्तारामूळे, जर एखाद्या ठिकाणीच पाऊस पडत असेल, तर तो लांबून दिसतो. म्हणजे एकाच ठिकाणी एक मोठा काळा ढग आणि त्यातून सरळ रेषेत पडणारा पाऊस असे दिसते. बाकि सर्व व्हॅलीभर चांगले ऊन असते.
दिनेशदा, नैरोबीत सुद्धा
दिनेशदा, नैरोबीत सुद्धा सीतेची आसवं ( प्र.चि. १७) बघायला मिळतात?
बागुल बोवा म्हणतोय ते खरंय, इमू यांचाच सख्खा चुलतभाऊ शोभेल (आबाळ झालेला, अस्ताव्यस्त). आपल्याकडे हल्ली ते एक फ्याडच आलंय. इमू पाळा, इमू फार्म वगैरे वगैरे. आमच्याकडे वसईच्या जवळ वाघोली नावाचं गाव आहे तिथे आहे एक इमू फार्म.
प्र.चि तीन बेहद्द आवडलं. मला पक्ष्यांमधलं फारसं कळत नाही. काय नाव असावं त्या पक्ष्याचं?
'बाबा' स्प्लेंडीड.
शांकली, प्र.चि १ ला 'मोठी सोनकी' म्हणतात.
मणिकर्णिका, आपल्याकडची गुलाबी
मणिकर्णिका, आपल्याकडची गुलाबी असतात ना ? हि निळी होती.
मला वाटतं एमूच्या मांसाला आपल्याकडे अजून मार्केट नाही.
मी शाकाहारी आहे पण मला चांगल्या तंदूरी चिकन, लँब रोस्ट चा वास कळतो. पण तिथे जे शहामृग ग्रील करत होते तो वास भारतीय नाकाला आवडेल असे वाटत नाही.
तो ३ वाला पक्षी आहे तो शहरात टिपणे फार अवघड आहे, पण शहराबाहेर जरा मोकळ्या जागेवर गेलो, कि अक्षरशः फोटो काढण्यासाठी पुढे पुढे करतो. अगदी छाती वगैरे फूगवून दाखवतो. त्याच्या पाठीचा रंग मस्त चमकदार निळा असतो. नाव मलाही नाही महैत.
दिनेशदा, फारच छान फोटोज्...
दिनेशदा,
फारच छान फोटोज्... पिल्लं तर सुंदरच आहेत..
दिनेशदा, छान फोटो आलेत
दिनेशदा,
छान फोटो आलेत !
त्यात पारवाळ, चिमणी हे पक्षी तर अगदी इकडच्या सारखेच दिसले.
Pages