आज नैरोबी पासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या मसाई ऑयीस्ट्रीच फार्मवर गेलो होतो. नैरोबीहून मोंबासाला जायला जो रस्ता आहे, (त्याला मोंबासा रोड असेच म्हणतात) त्यावर अथी नावाची एक नदी आहे. त्या परिसरात हे फार्म आहे. रस्ता अधूनमधून खराब आहे त्यामूळे ४ व्हील ड्राईव्ह नसेल, तर पाऊसपाणी बघून जावे लागते. आज सुदैवाने पाऊस नव्हता.
इथल्या बहुतेक फार्मवर असतो तसा ब्रिटिशकालीन अँबियन्स जपलेला असतो. खूप विस्तीर्ण आवार आहे याचे. इथे शहामृगांची पैदास केली जाते. साधारण ५ महिन्याचे पक्षी खाण्यासाठी वापरतात. त्याचे मांस २५०० रुपये किलो या दराने विकले जाते.
शहामृगाला उडता येत नाही, पण तो जोरात पळू शकतो, हे आपल्याला माहीत आहेच. पण तो उडीही मारू शकत नाती. साधे लाकडाचे ४ फूट उंचीचे कुंपण तो उडी मारुन ओलांडू शकत नाही कि त्याला त्याखालून वाकून जाता येत नाही.
पण त्याला (म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्याला ) नैसर्गिक शत्रू फारसे नाहीत. एकटा चित्ता देखील त्याची शिकार करु शकत नाही. त्याच्या लाथेचा तडाखा, चित्त्याला नामोहरम करु शकतो. पण त्याची अंडी आणि पिल्ले मात्र, अनेकांच्या भक्ष्यस्थानी पडतात.
त्याला तशी कुणाची भिती वाटत नाही. आपण जवळ गेल्यास तो जवळ येतो. बोट दिले तर तोंडात पकडतो, पण त्याला दातच नसल्याने, काही इजा होत नाही.
तर हे तिथले फोटो. बाकिचे पक्षी आणि अर्थातच फूले पण ...
५)
६)
७)
८) या एकाच फूलात तीन तीन किटक आहेत.
९) हि फूले तर जेमतेम २ मीमी ची होती.
१० ) ही झाडे नैरोबीत पण खूप आहेत. याला पिवळी फळे लागतात आणि ती (आम्हा) बाळगोपाळांचा आवडता खाऊ असतात.
११) इतना बडा अंडा !!!
१२) हे आहेत ५ महिन्याचे पक्षी. हे मांसासाठी कापले जातात.
१३ )
१४) ही २ आठवड्यांची
१५) तिथले विस्तीर्ण आवार
१६ ) हे "बाबा"
१७ ) खास लोकाग्रहास्तव्,आई बाबांचा एकत्र फोटो..
१८ )
१९) आणि पिल्ले फार आवडली ना, म्हणून हे आणखी एक. पण आता आमाला शाळेत जायचय, टाटा !!
तिथे रहायची, खायची प्यायची उत्तम सोय आहे. सर्व फार्मभरची गाईडेड टुअर आहे (तिच आम्ही घेतली होती) पण खाद्यपदार्थात, शहामृगाच्या मांसाचाच जास्त भरणा आल्याने, आम्ही तिथे काही खाल्ले नाही.
सर्व पक्षी इथून तिथून सारखेच
सर्व पक्षी इथून तिथून सारखेच कि. आणि कोकिळा, बुलबुल सारखे पक्षी तर जगभर प्रवास करत असतात.
छोटी पिल्ले आणि बाबा एकदम
छोटी पिल्ले आणि बाबा एकदम छान! पण आई नाही दिसली ती? रुसून दूर गेलेय कि लाजून फोटोपासुन लांब गेलेय की मेक्-अप करायला गेलेय?
आईसाहेबांची फारच विचारपूस
आईसाहेबांची फारच विचारपूस झाली, म्हणून आईबाबांचा एकत्र फोटो.
शिवाय शाळेत निघालेल्या पिल्लांचा पण एक फोटो अॅड केलाय.
तूम्ही एक बघितले का ? कुठल्याच फोटोत पक्ष्यांची सावली नाही. यात अमानवीय काही नाही, इथले हवामानच तसे असत.
हं,आम्ही त्याला रान पावटा
हं,आम्ही त्याला रान पावटा म्हणतो(रान मूगला),आणि मला वाटलेच होते की यांच्या सावल्या कशा काय दिसत नाहीत? पण त्यावरचे तुमचे लेखन वाचले आणि उलगडा झाला. शाळेत जाणार्या पिल्लांचा फोटो फारच आवडला.फारच गोडु गोडु आहेत.
२ रा व बाबांचा फोटो मस्त.
२ रा व बाबांचा फोटो मस्त. बाबा छान पोझ देऊन उभे आहेत.
मागच्या फळ्या नसताना काढला असतास तर भारी दिसला असता.
सगळे फोटो गोड आलेत.
सगळे फोटो गोड आलेत. शिर्षकावरून अपेक्षा होती की पहिल्यापासून शहामृगाचे फोटो दिसतील. पण मग लक्षात आलं तुम्ही तिथली फुलं पानं कॅमेर्यात बंदिस्त केल्याशिवाय सोडणार नाही ते..
शहामृगं फार गोड आहेत..
दिनेशदा सगळ्या पक्षांचे फोटो
दिनेशदा सगळ्या पक्षांचे फोटो सुंदर आले आहेत
शहाम्रूग कुटुंबाची छान भेट
शहाम्रूग कुटुंबाची छान भेट झाली
, प्रची सुंदर, दा मला सुतार आवडला 
केपी, त्या फळ्यांशिवाय नसताच
केपी, त्या फळ्यांशिवाय नसताच काढता आला. पण एवढ्या मोठ्या पक्षाला रोखायला एवढेसे कुंपण पुरेसे आहे.
सावली, दादाश्री,
इथे बहुतेक पक्ष्यांच्या बाबतीत शहरी आणि ग्रामीण असे भेदभाव आहेत. हेच पक्षी शहरातही दिसतात, पण फार सावध असतात. पण बाहेर गेलो कि, ये ये, फोटो काढायचाय ये, अशा अविर्भावात असतात.
दक्षिणा, पक्षी गोड आहेत असे म्हणू नकोस, इथे त्याचा भलताच अर्थ घेतील. (रच्याकने नायजेरियात स्वीट हा शब्द स्वादिष्ट अशा अर्थाने वापरतात. तिखटजाळ सूप त्यांच्या मते स्वीट असू शकते. )
Pages