६ मध्यम आकाराच्या घट्ट कैर्या (लोणच्याच्या कैर्या), अर्धी वाटी तिळाचं कुट, अर्धी वाटी लोनचे मसाला, अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ, मीठ,फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहर्या, हिंग
कैर्यांची सालं काढून पातळ काचर्या कराव्यात. सोलाण्याने काचर्या केल्या तरी चालेल. तीळ भाजून त्याचे अर्धी वाटी कुट घ्यावे. कुटाइअतकाच कैरी लोणचे मसाला (बेडेकर, प्रविण किंवा इतर आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ किसून घ्यावा. गुळाचं प्रमाण अंदाजेचं चवीप्रमाणे ठरवा. कैर्यांच्या काचर्या, तिळाचं कुट, लोणचे मसाला, मीठ आणि गुळ एकत्र करावं. त्यात हिंग- मोहरीची फोडणी थंड करून घालावी.
या दिवसात केला तर सखुबत्ता जास्त नाही टिकणार पण लोणच्याचा सिझनमध्ये (मे-जुनमध्ये) केलेला सखुबत्ता ६-७ महिने टिकू शकतो. कदाचित त्यापेक्षा जास्त पण टिकेल पण तेवढा उरतच नाही. जास्त टिकण्याच्या दृष्टीने करायचा असल्यास तिळाच्या कुटाचं प्रमाण जरा कमी करावं लागेल.
स्लर्प. स्लर्प. अल्पना फोटो
स्लर्प. स्लर्प.
अल्पना फोटो टाक प्लीज. काचर्याच्या शेप साठी तरी.
२ कैर्या आहेत घरी. दुपारी
२ कैर्या आहेत घरी. दुपारी करेन आणि मग टाकते फोटो. काल पार्ल्यात नाव वाचलं म्हणून मग लिहिली रेसेपी.
नाव तर भारीच गोड.
नाव तर भारीच गोड.
यम यम! करुन बघण्यात येइल
यम यम! करुन बघण्यात येइल बेगम.
नुसते वाचुनच तोंपासु..
नुसते वाचुनच तोंपासु.. सगळ्यात आधी कोण्या सखुने केले होते का हे लोणचे बत्यात तिळ कुटून????
करुन पाहते. सोपं आणि मस्त
करुन पाहते. सोपं आणि मस्त दिसत आहे!
पुढच्या कैरी सिझनला नक्की
पुढच्या कैरी सिझनला नक्की करुन बघणार! मस्तच वाटतोय हा प्रकार!
हे सही आहे. आणि माझ्या स्किल
हे सही आहे. आणि माझ्या स्किल लेवलला जमेल असं वाटतंय. करून बघणार.
नाव पण हिट्ट आहे. नाव कसं पडलं काय ते जरा आईला विचारून सांग ना अल्पना!
मला वाटलं बत्ताशाची रेसिपी
मला वाटलं बत्ताशाची रेसिपी आहे कोणतीतरी
आजच करते लगेच. काचर्या म्हणजे पातळ काप असे सुचवायचे आहे ना? नेहेमीच्या लोणच्याला आपण जाडू, बुटक्या फोडी करतो तशा नाहीत असे वाटतेय.
हो बटाट्याच्या भाजीसाठी करतो
हो बटाट्याच्या भाजीसाठी करतो ना काचर्या तश्या. मी आत्ता करणार आहे, तिळ भाजायला घेतेय. टाकते फोटो.
म्हणजेच कायरस ना ?
म्हणजेच कायरस ना ?
नाही, कायरसामध्ये कैरीच्या
नाही, कायरसामध्ये कैरीच्या शिजवलेल्या/वाफावलेल्या फोडी असतात आणि कायरस एखाद्-दुसरा दिवसंच टिकतो. हा लोणच्याचा प्रकार आहे.
सह्हीये!!
सह्हीये!!
विदर्भी प्रकार असाच असतो
विदर्भी प्रकार असाच असतो त्याला लुंजी म्हणतात.
तोंपासु. एका कैरीचं करुन
तोंपासु. एका कैरीचं करुन पहाणार.
नागपूरकडे एक थोडासा असाच
नागपूरकडे एक थोडासा असाच प्रकार केला जातो.
कैरीच्या काचर्या करायच्या. हिरव्यागार ताज्या मिरच्यांचे मधोमध चीर देऊन फक्त दोन लांबट तुकडे करायचे. आवडत असल्यास अगदी थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालायची.
मग तेलात जिर्याची फोडणी करायची. मोहरी नको. हळद अगदी कमी. चिमूटभरच हवी कारण कैरीचे काप थोडे पांढरटच दिसायला हवेत. हिंग हवाच. मग मिरच्या नि कैरीचे काप तेलात टाकून परतायचे. कैरी पूर्ण गिच्च शिजायला नको. मऊ होऊ द्यायची पण तुकडे मोडायला नकोत. मीठ घालून उतरवायची. गूळ वगैरे नाही घालत यात.
खरंतर अगदी कमी जिन्नस आहेत यात पण खूप छान लागतं हे लोणचं.
अल्पना, तुझ्या मेथडने या वीकांताला करेन नक्की.
अल्पना आणि मधुरिमा, दोन्ही
अल्पना आणि मधुरिमा, दोन्ही प्रकार करुन बघणार.
ताज्या कैरीचं लोणचं असंच करते
ताज्या कैरीचं लोणचं असंच करते मी, फक्त त्यात काचर्या नसतात, अगदी बारीक छोट्या फोडी असतात. आणि तीळकूटाचं प्रमाण कमी असतं. याच सीझनमध्ये खूपदा झालंय. आमच्याकडे कैरी खूपच हिट्ट आहे त्यामुळे रोजच कैरीची दाण्याचा कूट वाली चटणी / कैरी-कांदा चटणी / कैरी-कोथींबीर चटणी / मेथांबा यातले काही ना काही असतेच. शिवाय इथे कैर्या खूप लवकरच यायला लागतात.
फोडींऐवजी काचर्या करण्याचं काही विशेष कारण आहे का ?
सहीये कृती. नक्की करणार.
सहीये कृती. नक्की करणार. सुमॉची पण मस्तय. ती पण करणार
धन्यवाद, अल्पना! मस्त
धन्यवाद, अल्पना!
मस्त रेसिपी. नक्की करून बघणार.
(केदार, अल्पनाचे आभार मान. :P)
अरे आली का ही रेसिपी मस्तच
अरे आली का ही रेसिपी मस्तच आहे!
अल्पना, सखुबत्ता/सखुबद्दा
अल्पना, सखुबत्ता/सखुबद्दा छान. माझा फेवरेट आहे.
आम्ही सखुबद्दा म्हणतो :).
दर उन्हाळ्यात हमखास सखुबद्दा बनतो घरी, सोबत तक्कु किंवा साखरआंबा असला की झालं आनखी काही लागत नसे.
भारी रेसिपी. मराठवाड्यातली
भारी रेसिपी. मराठवाड्यातली कृती असून पण मला सखुबत्ता खाल्ल्याचे आठवत का नाहीये.
इथे फार गोडसर कैर्या मिळतात त्यामुळे गुळाचे प्रमाण कमी करून करावी लागेल.
मवा, मला नक्की कारण माहित
मवा, मला नक्की कारण माहित नाही पण माझ्या अंदाजाप्रमाणे लोणच्याच्या फोडी कडक होवू नयेत हे कारण असावं. हे टिकाऊ लोणचं आहे, तात्पुरतं नाही. नेहेमीप्रमाणे फोडी केल्या तर गुळामूळे त्या फोडी कडक होवून जातिल. साल काढून काचर्या केल्यावर त्या कडक रहात नाहीत, मऊसर रहातात हे कारण असेल बहूतेक फोडी ऐवजी काचर्या ठेवायचे.
रुनी, आईच्या माहेरी मुंबई/पुणे/सोलापुर भागात हे लोणचं करत नाहीत. बाबांच्या घरी आमच्या गावाकडे तर कधीच कश्यातही गुळ घालत नाहीत. मराठवाड्यातले असूनही माझ्या काकु-आज्जी वैगरेंना हा प्रकार माहित नाहीये. आई बहूतेक हे लोणचं अंबाजोगाईला दवाखान्याच्या क्वार्टर्समधल्या शेजार्यांकडून शिकलिये. विचारावं लागेल तिला नक्की कोणाकडून शिकली होती ते.
फोटो काढलाय. पण लॅपटॉपचा ब्ल्युटुथ बंद पडलाय आणि मोबाइलची डाटा केबल सापडत नाहीये. बघते काय करता येतंय ते.
मस्त फोटो नक्की करुन बघणार. १
मस्त फोटो नक्की करुन बघणार.
१ कैरीचे करायचे असेल तर तिळाचे कुट किती घेऊ?
अल्पना, मधुरिमा मस्तच!! अगदी
अल्पना, मधुरिमा मस्तच!! अगदी तोंपासु
मस्त फोटो. थॅंक्स अल्पना.
मस्त फोटो. थॅंक्स अल्पना. करुन पाहते.
भन्नाट रेश्पी बायो...कैरी
भन्नाट रेश्पी बायो...कैरी आणावी लागेल. नाव लय भारी
हरे राम... मला वाटलं
हरे राम... मला वाटलं खलबत्त्यासारखं काही उपकरण असेल. तर हे लैच तोंपासु निघालं.
मी केलं काल दोन कैर्यांचं.
मी केलं काल दोन कैर्यांचं. मस्त झालंय. मला तो तीळकूट प्रकार लईच आवडलाय. लोणचं मसाला आणि तीळकूटाचा काय घमघमाट येतो! वावा. हा फोटो.
Pages