
६ मध्यम आकाराच्या घट्ट कैर्या (लोणच्याच्या कैर्या), अर्धी वाटी तिळाचं कुट, अर्धी वाटी लोनचे मसाला, अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ, मीठ,फोडणीसाठी २ चमचे तेल, मोहर्या, हिंग
कैर्यांची सालं काढून पातळ काचर्या कराव्यात. सोलाण्याने काचर्या केल्या तरी चालेल. तीळ भाजून त्याचे अर्धी वाटी कुट घ्यावे. कुटाइअतकाच कैरी लोणचे मसाला (बेडेकर, प्रविण किंवा इतर आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ किसून घ्यावा. गुळाचं प्रमाण अंदाजेचं चवीप्रमाणे ठरवा. कैर्यांच्या काचर्या, तिळाचं कुट, लोणचे मसाला, मीठ आणि गुळ एकत्र करावं. त्यात हिंग- मोहरीची फोडणी थंड करून घालावी.
या दिवसात केला तर सखुबत्ता जास्त नाही टिकणार पण लोणच्याचा सिझनमध्ये (मे-जुनमध्ये) केलेला सखुबत्ता ६-७ महिने टिकू शकतो. कदाचित त्यापेक्षा जास्त पण टिकेल पण तेवढा उरतच नाही. जास्त टिकण्याच्या दृष्टीने करायचा असल्यास तिळाच्या कुटाचं प्रमाण जरा कमी करावं लागेल.
स्स्स्स्स मंजूडी.... कीबोर्ड
स्स्स्स्स मंजूडी.... कीबोर्ड भिजला!!
ही आमची सखुची दुसरी बॅच.
ही आमची सखुची दुसरी बॅच.

जेव्हा घरी कैर्या घरीच
जेव्हा घरी कैर्या घरीच चिरल्या जातात( खूप घरात आजही घरात चिरतात) पण तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात या कैर्या चिरल्या जायच्या तेव्हा कोयीचा जो तास निघायचा त्या तासाचं...म्हणजे कोय अगदी तासून तासून गर काढायचा.......त्याचं तात्पुरतं लोणचं. हे लोणचं अगदी मऊ लुसलुशीत होतं. त्यात फक्त मीठ, हिंग मोहोरीची फोडणी आणि भरपूर गूळ. व थोड्या पाण्यात मोहोरी भरपूर फेसून (नाकाला झिणझिण्या येईपर्यंत) घालायची. तोच तिखटपणा. वेगळे तिखट नाही. व फार तर फोडणीतच थोडा मेथीचा रवा खमंग परतायचा. हे लोणचं खाऊनच संपायचं .पण तसंही १५/२० दिवस टिकायचं.
बाकी सर्वांनी हिरीरीने केलेली लोण्ची अगदी तोंपासू आहेत बरं!
सही दिसतेय सखु. रैना तुझा
सही दिसतेय सखु.
रैना तुझा फोटो बघुन आई/नेहा कैरीचे झटपट लोणचे करते मेथ्या घालुन त्याची आठवण आली.
सर्व प्रकाशचित्रवाल्यांनी सोबत एक लाळेर्याचा फोटो पण ठेवा.
कायरस काकडीचा असतो ना?
my mom made sadhubatta. it
my mom made sadhubatta. it is very delicious. i liked it a lot. it is so tasty that i eat it all time. ( breakfast ., lunch , dinner)
PS मराठी टाईप करायला त्रास होतो. हे आईने लिहीलेय. पण मी शिकणार आहे.
हा माझ्याकडचा फोटू यम्मी
हा माझ्याकडचा फोटू
यम्मी लागतय, धन्स तोंपासु रेसिपीसाठी 
मी इथले प्रतिसाद वाचुन आईला
मी इथले प्रतिसाद वाचुन आईला रेसिपि सांगितली, तिने करुन पाहिलं, बहिणिच्या सासरी पण ही हिट झलिये, तिच्याकडे येणारे नातेवाईक आवर्जुन रेसिपी विचारतात. मला मात्र देशात जाइस्तोवर जुन पर्यन्त थाम्बावे लागेल , चव पाह्ण्यासाठी.
खुप खुप धन्यवाद अल्पना, इतक्या टेम्पटिंग रेसिपीसाठी.
शेवटी मुहुर्त लागला, अन घरी
शेवटी मुहुर्त लागला, अन घरी सखुबत्ता घडला!
तीळकूट्चा वास अन चव काय मस्त वाटत्येय! आणि खारही प्रचंड सुटलाय लोणच्याला
अल्पना, एका भन्नाट लोणच्याबद्दल धन्यवाद!
दोनदोन माबो सासवांच्या
दोनदोन माबो सासवांच्या टोमण्यांना वैतागून काल केला मी हा सखुबत्ता एकदाचा.


किंचित गूळ जास्त झाला वाटतं. की जरा गोडूस लागतोच?
तिळामुळे चव छान येते खरं.
फारच भन्नाट प्रकार आहे हा,
फारच भन्नाट प्रकार आहे हा, अगदी जान न्योछावर गटात!! तिळाची चव खमंग आणि अफाट मस्त! धन्यवाद अल्पना!
(दोन बॅचेसमधे तीळ कुटायला घेतले, आणि दुसर्या बॅचचे कुटायचं लक्षात न राहिल्यामुळे तसेच टाकले. :P)
मस्त फोटो मॄण्मयी. अल्पना, मी
मस्त फोटो मॄण्मयी.
अल्पना, मी पण बनवला सखुबत्ता. माझा थोडा कडवट झाला. काय चुकले असेल? गुळ तर कमी घातलाच होता. पण कडवट का झाला असेल?
स्वाती, काहीच अंदाज नाही.
स्वाती, काहीच अंदाज नाही. आंबट्-गोड्-तिखट अशी मिश्र चव असते. कडवट का झाला यासाठी तू माकाचु मध्ये सुगरणींनाच विचार बरं.
अल्पना, मी कालच केला
अल्पना, मी कालच केला सखुबत्ता. टेस्टी-टेस्टी!
स्वाती, लोणच्याचा मसाला खूप दिवसांचा झाला होता का?
किंवा लोणच्याचा मसाला जास्त पडला तरी कडवट पणा येऊ शकतो लोणच्याला.
वॉव! मस्तच सोप्पी
वॉव! मस्तच सोप्पी कृती.
तोंपासु सुद्धा.
अल्पना जास्ती प्रमाणात झालेला सखुबत्ता अगदि केल्यापासून फ्रिजात ठेवला तर? टिकेल ना गं?
टिकेल दक्षिणा. आई वर्षभराचा
टिकेल दक्षिणा.
आई वर्षभराचा पण करते. गेल्या सिझनमध्ये आईने केलेला सखुबत्ता आत्ता काल-परवा संपवला आम्ही. (दर १-२ महिन्यांनी आल्यागेल्याबरोबर लोणची, सखुबत्ता यांच्या बरण्या येतात आईकडून.
)
आता पार्टितला खास item
आता पार्टितला खास item सखुबत्ता.
uju, धन्यवाद. मी मस्त तीखट
uju, धन्यवाद. मी मस्त तीखट व्हावे म्हणून लोणच्याचा मसाला थोडा जास्त घातला होता.
स्वाती लोणचं मसाला हा एक
स्वाती
लोणचं मसाला हा एक मुद्दा असू शकतो कडवटपणा साठी.
दसरं म्हणजे तीळ. तीळही जुने असल्यास कधीकधी कडू लागतात.
तसंही तीळ भाजतानाही जास्त भाजले गेल्यास ते कडू होऊ शकतात.
आज दही भाकरी वरुन ही रेसिपी
आज दही भाकरी वरुन ही रेसिपी मिळाली. इंटरेस्टिंग वाटली.
लगेच संध्याकाळी करुन पाहिली. भन्नाट टेस्ट. तिळकूट, थोडासा गूळ आणि कैरी . ह्यात तिळकूटाची चव वेगळी आणि मस्त.
मस्तच झालयं.
धन्यवाद अल्पना.
धन्यवाद मायबोली.
नाव खरच खुप गोड आहे... आणि
नाव खरच खुप गोड आहे... आणि चविष्ठ वाटतोय... लोणच्याची तशीच मी फान आहे... त्यामुळे आजच करेन..
आताच मीही हे बनवले. रंग तर
आताच मीही हे बनवले. रंग तर खरंच सुंदर आला आहे .पण मला विचारायच आहे की हे बाहेर ठेवले तरी टिकेल ना. खराब तर नाही होणार ना?
अल्पना, मस्तच झाला.. काल केला
अल्पना, मस्तच झाला.. काल केला होता... लेकीला खुप आवडला... धन्यवाद...
आज परत केला. लोणच्याचा मसाला
आज परत केला. लोणच्याचा मसाला नसल्याने मोहोरी क्रश करून तिखट, हळद, मेथीपूड अशाने रिप्लेस केले. यम्मी झाले आहे प्रकरण!!
मस्तच.
मस्तच.
बी >>> अगदी हेच लिहिणार होती
बी >>> अगदी हेच लिहिणार होती मी . आम्ही पण लुन्जि करत असतो .. माझा आवडता प्रकार ..
मस्तच होतो हा प्रकार!
मस्तच होतो हा प्रकार! आमच्याकडे एकदम हिट झाला.
सोप्या पण हमखास रेसिपीसाठी धन्यवाद!
ह्या वर्षी इच्छुकांसाठी धागा
ह्या वर्षी इच्छुकांसाठी धागा वर आणला
काल कैर्या आणल्या, तीळ भाजले, पुढची कृती बघायला माबो वर गेले तर काय, गोडॅडी बाबा दिसू लागले.......
गोडॅडी बाबा दिसू
गोडॅडी बाबा दिसू लागले.......>>
अल्पना.. तोंपासु! या रविवारीच
अल्पना.. तोंपासु!
या रविवारीच करणार.
थोडी जास्तीची माहिती-
साबा. न्शी चर्चा केली की अशी अशी पाकृ आहे...तर संवाद खालील प्रमाणे-
अहो आई- हो माहीत आहे (मी फ़क्त नाव सांगितले होते) यात तीळ घालतात नां?
मी- तुम्हाला कसे माहीत?
अहो आई- अग अनु (माझी चुलत जावु) बनवायची हे लोणचे. तिच्या माहेरी (हैद्राबाद) हे बनवतात.
तर ही पाकृ आन्ध्र ची असावी..कारण थोडे गुगलिंग केल्यावर मिळाले..
लिंक देत आहे...
http://www.chefandherkitchen.com/2012/06/nuvvu-avakaya-til-avakay-andhra...
पण नावाचे गुपित नाही कळले...जावेलाच विचरेन म्हणते
मी आज बनवलेला .. लुंजी
मी आज बनवलेला
..
लुंजी बद्दल आधी बोललेली मी.. रेसीपी टाकू का ?
Pages