स्कार्लेट
हा लेख खूप जुना असला तरी स्कार्लेट मला आजही तितकीच प्रिय आहे.
हे चित्रपटाचे समीक्षण वा परिक्षणही नाही.
-------------------------------------------------------------
मार्गारेट मिशेल च्या 'गॉन विथ द विंड' या कादंबरीची नायिका स्कार्लेट ओ हेरा. काल्पनिक असली तरी कुठल्याही खर्या माणसाइतकीच किंबहुना जास्तच माणूस वाटणारी हे स्कार्लेट.
मला मात्र ही सुरुवातीला भेटली लिंडा गुडमनच्या 'सन साइन्स' मधून. हसू नका प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेय नक्कीच आपापल्या टिनेज इयर्स मधे. तर ह्या पुस्तकात लिंडा बाई म्हणतात ”Scarlett O’Hara is the very epitome of the Mars-ruled Aries female.” आणि हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे देतात. सन साइन्स प्रमाणे मी ही एरिस असल्याने कोण ही स्कार्लेट असे कुतुहल निर्माण झाले. 'गॉन विथ द विंड' ठरवून पाह्यला न कंटाळता. तरीही स्कार्लेट तितकिशी समजली नाही पण ’I will never be hungry again!’ हे स्वतःच स्वतःला दिलेले वचन मात्र लक्षात राह्यले. मग एक चाळाच लागला अयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी स्कार्लेट शी ताडून बघायचा जो आजतागायत चालू आहे. साम्य किती नी कुठे हा मुद्दा दुय्यम पण यातून झाले मात्र एक की स्कार्लेट उलगडत गेली. मैत्रिण बनली.
ही स्कार्लेट मुळात अमेरीकेच्या जुन्या गर्भश्रीमंत अश्या दक्षिणेतली मुलगी, 'सदर्न बेल'. अतिशय मनस्वी आणि हट्टी मुलगी. वयाच्या १६व्या वर्षापर्यंत 'लेडी लाइक' वागण्यासाठी असलेली बंधने हे एकमेव दु:ख असलेली, एका मुलाच्या प्रेमातही पडलेली, त्याला मिळवण्यासाठी काहीही करू शकणारी, अगदी आपला नावलौकिकही त्याच्यापुढे महत्वाचे न समजणारी. पण काय करता त्याने, म्हणजे अॅशली ने तर मेलनीशी लग्न ठरवलेले असते.
निराश स्कार्लेट रागाच्या भरात एका वेगळ्याच तरूणाला लग्नाला होकार देते. लग्न होतं. हा काळ अमेरीकेतील उत्तर व दक्षिणेत झालेल्या सिव्हिल वॉर चा आहे. सगळेच तरूण कॉनफेडरेट आर्मीमध्ये गेले आहेत. त्यात तिचा नवराही. तो युद्धावर कामी येतो. त्याच्या शोकाचे काळे कपडे घालताना तिला एवढेच वाटत असते 'आय अॅम टू यंग टू बी अ विडो!' ('विधवा होण्यासाठी मी खूप लहान आहे') लवकरच तिला ज्याच्यावर कधीच प्रेम केले नाही अश्या नवर्याच्या मृत्युप्रित्यर्थ कराव्या लागणार्या शोकाचा किंवा त्या देखाव्याचा कंटाळा येतो. चॅरिटी बॉलच्या वेळेस काळा स्कर्ट आणि सफ़ेद क्रिनोलाइन नि त्याच्या खाली नुसतेच नाचणारे पाय हे दृश्य अनेकांना आठवतच असेल.
ती काळे कपडे टाकून देते. र्हेट बटलर तिला समजावतो की तिने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. या इथून तिचा कणखर आणि मनस्वी स्वभाव जास्त ठळकपणे जाणवायला लागतो
युद्धाची तीव्रता वाढत जाते. जुन्या साउथचा सगळा डोलारा कोलमडून पडायची वेळ येते. स्कार्लेट या ठिकाणी युद्धातील जखमींची शुश्रुषा करणार्या नर्सच्या रूपात दिसते. केवळ अॅशली ला दिलेले वचन पाळण्यासाठी ती मेलनीचे बाळंतपणही करते अगदी एकटीने. युद्धात कॉन्फेडरेट आर्मीचा पराजय होतो. स्वतःच्या नि उरलेल्या सगळ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्कार्लेट आपल्या शिरावर घेते एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमाणे. ह्याच वेळी ती स्वत:ला ते सुप्रसिद्ध वचन देते
”As God is my witness, as God is my witness, they're not going to lick me! I'm going to live through this, and when it's all over, I'll never be hungry again - no, nor any of my folks! If I have to lie, steal, cheat, or kill! As God is my witness, I'll never be hungry again.”
(देवाला साक्षी मानून मी स्वतःलाच वचन देते की मी यातून तावून सुलाखून बाहेर पडेन आणि मग सगळा गोंधळ संपल्यावर मात्र मी कधीच उपाशी रहाणार नाही, मी नाही आणि माझी माणसंही कधी उपाशी रहाणार नाहीत. मला मग त्यासाठी खोटं बोलावं लागलं, फसवावं लागलं, कुणाला मारावं लागलं तरी चालेल पण देवाशपथ मी कधीही उपाशी रहाणार नाही!)
जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशा याचे याहून मोठे उदाहरण कुठले? मला खात्री आहे की प्रत्येक खडतर आयुष्य जगणार्या बाई मधे हेच म्हणणारी स्कार्लेट असते. खरेतर प्रत्येकातच ही अशी स्कार्लेट दडलेली असते का?
ह्यानंतर आपली जमीन वाचवण्यासाठी फ्रँक केनेडीशी स्कार्लेट लग्न करते. जो खरंतर तिच्या धाकट्या बहिणीचा प्रियकर असतो. हे स्कार्लेटला माहित असतेच पण हेही माहित असते की जर सगळ्यांचेच देशोधडीला लागणे टाळायचे असेल तर हे करणे जरूरीचे आहे. हळूहळू त्यांना बरे दिवस येऊ लागतात. पण युद्धामुळे ढवळून निघालेला समाज अजून स्थिर नाहीये. अराजकाची स्थिती, लूटमार चालू आहे. अश्यातच स्कार्लेटवर हल्ला होतो. स्कार्लेट वर झालेल्या हल्ल्याचा सूड घ्यायला म्हणून अॅशली आणि फ्रँक जातात आणि त्या धामधुमीत फ्रँक मारला जातो. ती परत एकदा विधवा होते. याच वेळेला तिला तिच्या आईची तीव्रतेने आठवण येते आणि ती हेही कबूल करते की तिला तिच्या आइसारखेच व्हायचे होते. मृदु आणि मायाळू. आणि ती हेही कबूल करते की ती जे काही आहे ती मृदु नि मायाळू यापासून शेकडो योजने दूर आहे.
र्हेट तिच्यावरच्या आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार करतो. पूर्णपणे प्रेमासाठी असे नाही पण तरी पैशासाठी ती त्याच्याशी लग्न करते. एव्हाना तिला अॅशली आपला होणे नाही हे मात्र पटलेले असते. र्हेट आणि स्कार्लेटला एक मुलगी होते पण तीही त्या दोघांना जवळ आणण्यात अयशस्वी होते. र्हेटचा संयम संपत जातो. अश्यातच बॉनीचा त्यांच्या मुलिचा अपघाती मृत्यू होतो आणि र्हेटच्या दृष्टीने तुकडा पडतो.
मेलनीचाही मृत्यू होतो आणि त्यावेळेला अॅशली चा विलाप पाहून स्कार्लेटला हे वास्तव लक्षात येते की ह्याचे आपल्यावर कधीही प्रेम नव्हते आणि तिला हेही जाणवते की ते तसे नव्हते याचे आपल्याला काहीच वाटत नाहीये.
तिला र्हेटची आठवण येते. त्याच्याबद्दल प्रचंड ओढ दाटून येते आणि याच वेळेला तो तिला सोडून निघालेला असतो. त्याचे मन तिच्या प्रेमाची वाट बघायला विटलेले असते त्यामुळे तिच्या कुठल्याच विनवणीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ”Frankly, my dear! I dont give a damn!”(खरं सांगायचं तर मला काहीही फरक पडत नाही!) असा घाव घालून तो निघून जातो.
पण स्कार्लेट ला हरणे मान्य नाहीये. तिने ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम केले ते खोटे ठरलेले आहे, ज्याच्यावर तिचे खरे प्रेम आहे असा तिचा नवरा तिला सोडून गेलेला आहे, तिची मुलगी ही गेलेली आहे. अश्या अवस्थेलाही ती पराजय मानत नाही. ती आपल्या पहिल्या घरी जाण्याचे ठरवते.
”...Tara!...Home. I'll go home, and I'll think of some way to get him back! After all, tomorrow is another day!” (टेरा.. माझं घर.. मी घरी जाइन आणि त्याला [र्हेटला] परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीन. शेवटी उद्याचा दिवस वेगळाच असणारे ना!)
स्कार्लेट स्वार्थी, मानी पण कुठल्याही गोष्टीच्या डोळ्याला डोळा भिडवून जे आहे ते आहे, नाही ते नाही असं सांगू शकणारी अशी, एक खरिखुरी माणूस. प्रत्येक चांगल्या वाइट गोष्टींसकट. प्रत्येक संकटाला, दुर्दैवाला 'Tomorrow is another day!’ म्हणून ठेंगा दाखवणारी प्रचंड आशावादी. तापट आणि कणखर पण त्याच वेळेला एखाद्या निरागस बाळाप्रमणे वाटणारी . प्रेमासाठी सगळे ओवाळून टाकले तरी प्रेमापेक्षाही इतर अनेक महत्वाच्या गोष्टी जगात असतात यावर विश्वास ठेवणारी. र्हेटशी लग्न करून आपण आपल्याहून वरचढ माणसाला स्थैर्यासाठी विकले, बांधले गेलो आहोत कि काय अशी भिती बाळगणारी एक मुक्त आणि स्वच्छंदी जीव, Free spirit.
आजही ही स्कार्लेट माझ्या मनात प्रत्येक वेळी Tomorrow is another day म्हणत रहते. सतत भेटत राहते. नि आजही तिच्याशी मला ताडून बघण्याचा माझा चाळा सुटलेला नाही.
-नी
मी पैली. मी पैली. काम बाजूला
मी पैली. मी पैली.
काम बाजूला ठेऊन वाचला. आता र्हेटवर पण लिही. मला अॅशलीच जास्त बोरिन्ग वाट्तो. सिनेमात तर फारच. तिच्या आयुष्यातील सर्वात वाइट दिवस युद्धात जातो व मग ती थकून घरी येते तर आई गेलेली असते हे मला अगदी दुर्दैवी वाट्ते. मार्गारेट मिचेल चा कॅनव्हास किती मोठा आहे.
लिंडा गुडमन बद्दल अगदी अगदी
स्कार्लेट तशी तूकड्या
स्कार्लेट तशी तूकड्या तूकड्यात आवडली होती, पण हा चित्रपट मला खुप प्रदीर्घ वाटला होता. आता नेटाने बघितला तर आवडेल कदाचित.
अमा, र्हेटवर काय लिहू...
अमा, र्हेटवर काय लिहू... बहोत बडी दिलकी लगी है वो क्लार्क गेवल!
अमा, र्हेटवर काय लिहू...
अमा, र्हेटवर काय लिहू... बहोत बडी दिलकी लगी है वो क्लार्क गेवल!>>हाय त्या मिश्या ते डोळे. ती बॉनी गेल्याचं तर मला काय दु:ख झालेलं. स्कार्लेट्चे ते कॅव्हीट एम्प्टोरिअम नावाचे दुकान, प्रत्येक ठिकाणी स्वतःच्याच जोरावर जाण्याची वृत्ती. ते हिरवे पाचू सारखे डोळे, ती केमिस्ट्री. अॅशली ला मेलनीच बरोबर आहे हे जेव्हा कळते तोच मुक्तीचा क्षण.
आपण मराठी मातीला तो चित्रपट बनवूत कि गं ! नाव "वार्यावरती गेले आयुष्य माझे सारे ..."
आता ते प्रताधिकार मुक्त असेल. मी स्क्रिप्ट लिहीते. तू बनव. मला एकदातरी तसले गाउन घालायचेच आहेत. मॅमीचा रोल दे. अॅश्विनीमॅमी LOL
हाहा!! अमाचे प्रतिसाद वाचून
हाहा!! अमाचे प्रतिसाद वाचून भारी वाटले!!
स्कार्लेट सहीच आहे.
मीही फार नेटाने पाहिला हा मुव्ही! फारच मोठा आहे. पण आता परत पाहावासा वाटतोय!
अश्विनीमॅमी... >>>हाय त्या
अश्विनीमॅमी...
>>>हाय त्या मिश्या ते डोळे. ती बॉनी गेल्याचं तर मला काय दु:ख झालेलं.<<<
हो आणि तो जातो ना निघून 'Frankly dear, I don't give a damn!' म्हणून... मला मीच कोसळतेय आता असं वाटलं होतं. उफ्फ क्ल्रार्क गेवल!!
अय्यो तो गाउन.. त्या कॉर्सेटस नको नको... अमा माझा लेख वाचलाय ना!
नी.. माझ्या मते तिचे नाव
नी.. माझ्या मते तिचे नाव स्कार्लेट ओ हारा असे असते.. आणी अॅशली चे अॅशले.. चुभुदेघे..
बाकी या सगळ्यात लक्षात रहातो तो र्हेट बटलर... हा चित्रपट माझ्या आवडत्या दहात आहे.. आम्ही सगळे मित्र मैत्रिणी अगदी भरभरुन बोलायचो असे चित्रपट म्हणजे.. गॉन विथ दी विंड.. गुड अर्थ, आणी शोले..
राम, ओ हारा/ ओ हेरा दोन्ही
राम, ओ हारा/ ओ हेरा दोन्ही उच्चारांबद्दल गोंधळ आहे. म्हणजे सिनेमात प्रत्यक्षात असं पूर्ण नाव क्वचितच उच्चारलं गेलंय. ओ हारा हा ब्रिटीश उच्चार तर ओ हेरा (व्यवस्थित पूर्ण एकार नाही. सदर्न ड्रॉल) हा अमेरिकन असं नेटवर मिळालंय. लेख लिहून कैक वर्ष झाली. फिल्म पाहूनही तेवढीच. आठवणं जरा मुश्कीलच आहे.
अॅशली/ अॅशले चं ही तेच. ली हा स्वच्छ ईकार नाहीच. ले आणि ली च्या मधलाच जिऑर्जियन (:) )सदर्न ड्रॉल. अॅशलेय/ अॅशलेई असा काहीतरी उच्चार ऐकल्याचं आठवतंय.
मी ही कादंबरी वाचलीय्,चित्रपट
मी ही कादंबरी वाचलीय्,चित्रपट नाही पाहिला.
स्कार्लेट खूप आवडते मला.
कणखर आणि धीट.
ती वेड्यासारखी त्या अॅशलेच्या प्रेमात का पडते काही कळत नाही. बहुधा अपोझिट अॅट्रॅक्शन असणार.
र्हेटचं आणि तिचं आत्तातरी जुळावं असं कादंबरी संपेपर्यंत सारखं वाटत रहातं.
कादंबरीतले दोन प्रसंग खूप आठवतात, एक युद्धाच्या धामधूमीत र्हेट स्कारलेटला तिच्या डोळ्यांच्या रंगाचे हिरवेगार कापड आणुन देतो आनि दुसरा अमेरिकी यांकी सैनिक येतात तेव्हा ती वॅलेट मेलॅनिच्या मुलाच्या लंगोटात लपवते तो.
हे प्रसंग सिनेमात दाखवलेत की नाही कोण जाणे.
पुस्तकात भावणारे खूप सीन्स
पुस्तकात भावणारे खूप सीन्स सिनेमात पटकन दाखवून टाकलेत, आणि सिनेमात प्रचंड इफेक्टीव झालेले काही सीन्स जसे Burning of Atlanta, Panorama of the Confederate Casualties पुस्तकात तितका impact करत नाहीत. पण ती तुरुंगात र्हेटला भेटायला जाताना चांगले कपडे हवेत म्हणून मॅमीच्या विरोधाला न जुमानता पडद्यांचा ड्रेस शिवते तो प्रसंग दोन्हीत लक्षात राहतो. असे कितीतरी प्रसंग आठवून आठवून लिहीता येतील. स्कार्लेट म्हणजे मूर्तीमंत इच्छाशक्ती आणि जिद्द! पुस्तक वाचताना मनात जी स्कार्लेट रंगवली होती, ती पडद्यावर विवियन ली ला पाहून जीवंत झाली. पहिल्या सीन मध्ये ती टेराच्या बाहेर उभी राहून त्या जुळ्या भावांशी बोलत असते तिथेच लगेच क्लिक होते. काय सुंदर केलीये विवियन ली ने. क्लार्क गेबल बद्दल डिट्टो. अॅशली, मेलनी, मॅमी सगळ्यांचं कास्टींग उत्तम !
BTW, साऊथमध्ये O'Hara = ओ हेरा, Tara = टेरा असंच म्हणतात.
आणि एक ट्रिविया म्हण्जे मॅमीचं काम केलेली हॅटी मॅकडॅनियल ही ऑस्कर मिळवणारी पहिली अमेरिकन कृष्ण्वर्णिय होती. तिला अॅटलांटा मध्ये झालेल्या सिनेमाच्या प्रिमीयरला जाता आले नाही कारण त्या काळी अजूनही जॉर्जिया मध्ये segregationist laws असल्याने तिला इतर गोर्या कलाकारांबरोबर बसू दिले नसते.
हो हे ट्रिविया वाचलं होतं
हो हे ट्रिविया वाचलं होतं मी.
येस्स सखीप्रिया... टेरा... हे व्यवस्थित लक्षात होतं.
ही बहुधा एकच कथा असेल ज्यात
ही बहुधा एकच कथा असेल ज्यात नायक नायिकेला 'आपण एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहोत कारण आपण दोघेही सारखेच नालायक आहोत!' असं सांगतो.
माझी अत्यंत अत्यंत आवडती कॅरेक्टर्स.
या सिनेमात ते 'आय डोन्ट गिव अ डॅम' वाक्य घालावं की नाही यावर बराच उहापोह झाला होता म्हणे! (सुदैवाने) ते तसंच ठेवायचं ठरलं. हा नुसता उद्गार नाही, हे त्या दोघांचंही ब्रीदवाक्य आहे!
मेलनी गेल्यावर स्कार्लेटला प्रथमच पोटापासून जाणीव होते की अॅशलीचं आपल्यावर प्रेम नाही - कधीच नव्हतं. म्हणजे हा काही गौप्यस्फोट नसतो! आपल्याला ते सुरुवातीपासून ढळढळीत दिसत असतं. तिने ते 'बघायचं' नाकारलेलं असतं इतकंच! पण त्यानंतर ती जे 'आणि मला त्याचं वाईटही वाटत नाही!' म्हणते, ते फार फार इन्टरेस्टिंग आहे!
अशी वेडंच जगण्याला इंधन पुरवतात. ती गोष्ट मुळात अस्तित्वात आहे का, असली तर प्राप्य आहे का - या सगळ्या चाकोर्या ठळक करत मरेपर्यंत तगणार्यांच्या काळज्या.
स्वाती, कानामात्रांसकट
स्वाती, कानामात्रांसकट अनुमोदन!
या चित्रपताची माझ्याकडे
या चित्रपताची माझ्याकडे डीव्हीडी आहे. तो पहाताना त्याच्या स्पीडचा काहीतरी घोळ आहे असे मला वाटत राहते. म्हणजे जरा फास्ट वाटते जुन्या स्पूलवरून डिस्कवर घेताना काही फ्रेम रेटमध्ये घोळ असेल का? स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधी नेहरूंच्या फिल्म्स्चे तुकडे कुठे कुठे दाखवतात त्यातील लोक हास्यास्पद पद्धतीने पळत असल्यासारखे दिसतात तसेच पण थोड्या प्रमाणात मला जाणवते . तुमचा काय अनुभव?
संपूर्ण चित्रपट की काही भाग?
संपूर्ण चित्रपट की काही भाग? आणि नक्की कुठल्या भागात? सांगू शकलात तर वेळ होईल तसा तो तो भाग माझ्याकडच्या डिव्हिडीवरून बघेन. जेव्हा पाह्यला होता तेव्हा मला तरी हा प्रॉब्लेम जाणवला नव्हता.
पण टेकिंगची पद्धत, शॉट डिव्हिजनची पद्धत यातल्या तेव्हाच्या आणि आताच्या फरकामुळेही क्वचित असा भास निर्माण होऊ शकतो.
पूर्वीच्या फिल्म्सचे तुकडे बघताना विचित्र स्पीड जाणवतो कारण तेव्हाच्या फिल्मचा (शूटींग करतानाचा) स्पीड सेकंदाला २४ फ्रेम्स पेक्षा कमी होता. किती ते एक्झॅक्ट लक्षात नाही.
माझी सर्वात आवडती
माझी सर्वात आवडती नायिका.पहिलेंदा पाहीला तेंव्हापासून हा चित्रपट अतिशय आवडतो.i think i have seen the movie 15 times.....:).in the beginning i thought scarlet was pretty and haughty that's all...never paid much attention to her, my heart use to pound only for gable then.all my teenage years have been spent dreaming about Rhett butler and his "passionate kiss" scene...ha ha.but slowly scarlet entered in to my world....i think it happened when i was full of tears over some stupid teenage blunder...which we all commit :).i truly realised why she was head over heels for Ashley and the consequence she suffered.i started admiring her strength.
i think she is a true example of feminist heroine....not b'coz she is stubborn, marries thrice..uses her looks to manipulate but b'coz she made choices of her own and suffered the aftermath without loosing hope...she has amazing fighting spirit when everything around her was falling apart.
when women were (nothing has changed till this day) expected to be docile and all "shush" writing and portraying about someone who is wicked, manipulative and fiery was a gr8 challenge.
thanks for writing "scarlet"
प्रत्येक वाक्याला अनुमोदन..
प्रत्येक वाक्याला अनुमोदन.. फार आवडते मला पण स्कार्लेट.. ती जिवंत वाटते मला. completely human!!!
नी, अत्यंत सुरेख आणि नेमकं
नी, अत्यंत सुरेख आणि नेमकं लिहिलं आहेस.
पहिल्यांदा बघितला (२० वर्ष झालीत) तेव्हा स्कार्लेट इतकी आवडली नव्हती आणि र्हेटची दया आली होती.
या अश्या पैलूंवर पहिल्यांदा विचार केला.
मी बन्गलोरच्या लिडो मध्ये
मी बन्गलोरच्या लिडो मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे १९६८ साली पहिल्यांदा पाहिला अन मग पहातच गेलो.स्कार्लेट अन र्हेट शिवाय इतर अनेक पात्रे मनावर अमिट ठसा उमटवून गेलीत्.तिची नॅनी,मेलानी च्या प्रसूतीच्या(छ्छ्या प्रसूती हा शब्द या पिक्चर बद्दल लिहिताना कै च्या कैच वाटतो) रेंगाळणारी ती ब्लॅक मुलगी,स्कार्लेट चे वडिल्---यादी खूप लांब आहे.पुस्तकाचेही पारायण आम्ही दोघांनी अन मग पुढच्या पिढीने केले.मग सर्वांनी एकत्र पाहिला.
नीधप -मस्त लिहिलय अन एकदम पट्या.
एक मोठा अध्याय उजळून निघाला यामुळे.
अमा-आम्ही तुमच्या पंथाचे या बाबतीत.
सिद्धा-र्हेटची दया?अरे किती पोरी मरायच्या माझ्या त्या दिवसात त्याच्यावर्--स्वतःवर दया यायची आम्हाला!!
नविना,नेतेरी,स्वाती,बाळू,सखी प्रिया,साती,राम्,बस्के,
आपण सर्व एका थेटरात बसलोय!!
she has amazing fighting
she has amazing fighting spirit when everything around her was falling apart.<<<
येस्स नेतिरी... 'आय विल नेव्हर बी हंग्री अगेन!'
when women were (nothing has changed till this day) expected to be docile and all "shush" writing and portraying about someone who is wicked, manipulative and fiery was a gr8 challenge.<<<<
क्रेडिट गोज टू मार्गारेट मिशेल!
thanks for writing "scarlet"<<
मार्गारेट मिशेलचे, व्हिक्टर फ्लेमिंगचे, विवियन ली चे सगळ्यांचेच आभार मानले पाहिजेत आपण..
अरे किती पोरी मरायच्या माझ्या त्या दिवसात त्याच्यावर्<<< मरायच्या???
इथे आम्ही अजून मरतो!!
क्लार्क गेबल बद्दल काय
क्लार्क गेबल बद्दल काय बोलणार... आमचा सर्व गृप त्याचा पंखा होता.. त्याचे ते रुबाबदार रुपडे आणी ती भेदक नजर आणी ती संवाद फेक.. फक्त आहा आणी आहाहा ....आणी गृपमधील आम्हा काही मुलांचा 'सवत्या' सुद्धा होता..
नी धन्स. बघायचाय हा पिक्चर,
नी धन्स.
बघायचाय हा पिक्चर, (अर्थात लिस्टीत आहे) बघेनच लवकर!
साहित्यातील अनेक नीतांतसुंदर
साहित्यातील अनेक नीतांतसुंदर व्यक्तिचित्रापैकी एक "स्कार्लेट ओ'हारा" चा तितक्याच सुंदर भाषेत परिचय करून दिल्याबद्दल नीधप निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मी चित्रपट अनेकवेळा पाहिला आहे तशीच कादंबरी (एकदाच का होईना, पण) वाचली आहे. व्हिक्टर फ्लेमिंगचे कौतुक अशासाठी की इतकी महाकाय कादंबरी त्याने अशी काही चित्रबद्ध केली आहे की, मूळ कादंबरी न वाचताही या चित्रपटाचा आणि त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडल्यावाचून रसिक राहूच शकत नाही.
गालिबच्या परिस स्पर्शाची एक ओळ स्कार्लेटच्या संदर्भात आठवते :
"दर्द का हद से गुजरना है दवा हो जाना - "
स्कार्लेटच्या आयुष्यातील चढउतार असोत वा तिची प्रेमाची भूक असो, ती नेहमीच 'दर्द' दिशेनेच प्रवास करीत असल्याचे जाणवते. तिच्या सौंदर्याला हा एक प्रकारे शापच असावा अशी शंका नेहमीच येत राहते. अॅशली मिळत नाही, र्हेट मिळतो पण ती एक शुद्ध तडजोड आहे. सुखाच्या ओंजळीतही तिच्या आयुष्याच्या रेषा वेदनेने भिजलेल्याच आहेत आणि नियतीचा हा क्रूर खेळ ती वेळोवेळी तडजोडीने सहनही करते. स्कार्लेट सर्वगुणसंपन्न नसावी, नाहीच; तरीही ती कारुण्यमूर्ती मेलनीपेक्षाही आपल्याला का भावते हे न उलगडणारे कोडेच जणू ! सुख असो वा दु:ख, स्कार्लेट ते नीडरपणे झेलते आणि पुढे तर र्हेटच्या त्या जगप्रसिद्ध तडाख्या (Frankly my dear....) नंतरही तेच दर्द दवा मानून सहजपणे उदगारते Tomorrow is another day ! स्कार्लेटमुळेच प्रत्येक युवतीला वाटावे की आपल्याकडेही असे एक 'Tara' ठिकाण असावे ज्याच्यावर जगातील सर्व सुख उधळून टाकावे आणि नैराश्येचे कितीही क्षण आले तरी उगवत्या सूर्याकडे पाहून उत्स्फुर्तपणे म्हणावे Bygones are bygones !
नीधप, तुम्ही किती भावूक झाला होता हा लेख लिहितीना हे लेखातील भाषा सांगतेच. पण त्याहीपेक्षा तुमच्या या लेखामुळे मी (आणि अनेक) ज्या रितीने Down Memory Lane गेलो आहे ते विलोभनीयच आहे. स्कार्लेटच्या निमित्ताने मला साहित्यातील अॅना करेनीना आठवली, तसेच एलिझाबेथ बेनेट, एम्मा बोवरी आणि अर्थातच जेन आयर याही अजरामर नायिका आठवल्या. यादेखील स्कार्लेटच्याच या ना त्या कारणाने भगिनीच.
शक्य झाल्यास कधीतरी डॉ.झिव्हॅगोच्या 'लारा' बद्दलही तुम्ही असेच लिहावे अशी अपेक्षा.
किती सही प्रतिसाद प्रतीक
किती सही प्रतिसाद प्रतीक देसाई!!
फार अप्रतिम प्रतिसाद. या
फार अप्रतिम प्रतिसाद.
या बाकीच्यांच्याबद्दल लिहिण्याचं मात्र प्रॉमिस नाही करत.
हा पण सॅली बोल्स बद्दल लिहेन कधीतरी.
@ श्री.बस्के ~ धन्यवाद. खरंतर
@ श्री.बस्के ~ धन्यवाद. खरंतर निधप यांचा मूळ लेखच इतका अप्रतिम आहे की, त्याविषयी काहीही प्रतिसाद दिला तरी तो तोकडाच वाटेल.
@ नीधप ~ जरूर लिहा. मी सॅली बोल्स विषयी वाचलेही आहे तसेच लिझा मिनालीला त्या भूमिकेबद्दल ऑस्कर मिळवून देणारा 'कॅबरे' ही पाहिला आहे [होणार्या मुलाचा बाप कोण? याविषयीचा तिचा गोंधळ झकासच !].
तुम्ही सुंदरच लिहाल सॅलीविषयी.
हा माझ्या निवडक १० त.. अशक्य
हा माझ्या निवडक १० त.. अशक्य सुंदर. माझी खूप आवडीची व्यक्तीरेखा आहे ही. She was actually gone with the wind but still not exactly..
तिचं स्पिरीट अनुभवण्यासारखं आहे आणि तुम्ही लिहिलय तसा तिला स्वतःसोबत पडताळून पहाण्याचा चाळाही कधी न सुटणारा..
तुमचं त्रिवार अभिनंदन या लेखाबद्दल. अशक्य सुंदर. अफाट.. इतक्या आत्मियतेने लिहिलय की ते स्कार्लेट इतकचं खरं वाटतय.
घरी पहिल्यांदा ब्रोडबँड घेतलं तेव्हा डाऊनलोड करुन पाहिलेला हा पहिला चित्रपट. तोवर फक्त ऐकुनच होते त्याविषयी..
प्रतीक देसाई, सुरेख पोस्ट..
अशक्य सुंदर नी....
अशक्य सुंदर नी....
स्कार्लेटचं ते सुप्रसिद्ध "I will never be hungry again!!" घोकते मी अक्षरशः!!! त्या आठवणीत नेल्याबद्दल धन्स!! आता आजच घरी गेल्या गेल्या चित्रपट बघणे क्रमप्राप्त आहे
मूळ कादम्बरी पूर्ण
मूळ कादम्बरी पूर्ण वाचल्याशिवाय चित्रपट बघणार नाही हे याही बाबतीत ठरवून ठेवले आहे.
विश्वास पाटील यांचाही सुन्दर लेख आहे चित्रपट आणि कादम्बरीबद्दल.
आवडले.
आवडले.