वावर
असे पुरुष,
पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा
बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून
असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त
तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ
असे पुरुष,
शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून
पाहिलेले असते त्यांनी,
काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे
आणलेले हात वापरताना...
साला ते चुकत नाहीत
शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा
घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर
असे पुरुष,
निवडतात हात परंपरेने घडवलेले
लॉस्ट अत्मभान मेथड; परफेक्टेड ओव्हर सेंचुरीज
चकाचक घर, रुचकर स्वैपाक, मैथुनी शृंगार
साला सगळे चोख
रगड रगड रगडतात आणलेले हात
आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर
उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात
केरसुणीसारखे.
असे पुरुष,
कोरतात कोपर्या पर्यंतचे हात
मेल्यानंतर सतीच्या दगडावर
कधी एक, कधी दोन, कधी अधिक
जेव्हढे जास्त हात तेव्हढे जास्त कर्तबगार
काल विंचरताना आत्म्यातील अडगळ
जाणवला अशा पुरुषाचा वावर...
माझ्या व्यक्त होण्यात दिसतात अचानक कधी
त्याच्या अभद्र सावल्या...
मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...
अप्रतिम!! तुझ्या कवितांचं
अप्रतिम!! तुझ्या कवितांचं कौतुक मी बापडी काय करणार! शब्द नाहीत माझ्याकडे!
हुह! शेवटची दोन कडवी अंगावर
हुह! शेवटची दोन कडवी अंगावर आली..
जबरी कविता.
एकदम जबरदस्त....
एकदम जबरदस्त....
श्यामलीला अनुमोदन.
श्यामलीला अनुमोदन.
तुझी पहिलीच थोडीफार समजलेली
तुझी पहिलीच थोडीफार समजलेली कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात प्रत्येकाला प्रत्येक कवितेचा अर्थ वेगळा लागतो.
मला आवडली..
कळल्यासारखी वाटतेय .... पण
कळल्यासारखी वाटतेय .... पण अशी चर्र्र करून गेली ...
ज़बरदस्त रे! कवितेची जादू
ज़बरदस्त रे! कवितेची जादू असते शेवटी.. खूप आतून येतात कविता!
आवडली.
आवडली.
तुझी नेहमीची सहजता नाहि जाणवत
तुझी नेहमीची सहजता नाहि जाणवत रे जया.
बोलक वास्तव .
बोलक वास्तव .
आवडलीच पण तरी जया हरवलाय
आवडलीच पण तरी जया हरवलाय यातनं.
बात है... आवडली !!!
बात है... आवडली !!!
अर्रे... एक नंबर! खूप मस्त,
अर्रे... एक नंबर!
खूप मस्त, विचार करायला लावणारी कविता!
अतिशय आवडली !
आवडली.
आवडली.
बापरे!!!! स्पष्ट भाषेत
बापरे!!!! स्पष्ट भाषेत लिहिलेली...सुन्न करणारी कविता....
मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू
मी कँसर रोखण्याचे उपाय वाचू लागतो...
काही उपाय सापडला की समस्त मानवजातीला नक्की कळवने...म्हणजे cancer आटोक्यात येईल आणि कमी बायांचा बळी जाईल.
बापरे कसे लिहु शकतात लोक असे
बापरे कसे लिहु शकतात लोक असे काहीतरी अंगावर येणारे आणि शब्दनशब्द खराखुरा वाटणारे....
आवडली
आवडली
आवडली!! मुख्य म्हणजे कळली
आवडली!!
मुख्य म्हणजे कळली (असावी!).
(No subject)
पेशवे, एक वेगळा विषय अतिशय
पेशवे, एक वेगळा विषय अतिशय छान हाताळला आहेस.
आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर
उभे करतात दारामागच्या कोपऱ्यात
केरसुणीसारखे.>>> ह्या ओळी खूप काही सांगून जातात.
अजून येऊ देत.
जबरी आहे!
जबरी आहे!
आवडली. सुन्न करणारी कविता !
आवडली. सुन्न करणारी कविता !
आवडली.
आवडली.
भारी!
भारी!
आवडली.
आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
______________/\_____________
______________/\______________
मामी, कोपरापासून केलेला
मामी, कोपरापासून केलेला दिसतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंच सुंदर आहे रे!
सुरेख.
सुरेख.
पेशव्या ला मी काही सुचवायचे
पेशव्या ला मी काही सुचवायचे म्हणजे ..... पण तरी , "असे पुरुष" हा उल्लेख टाळून फक्त 'ते' 'त्यांनी' असे लिहिले असते, आणि दुसरे कडवेच पूर्ण वगळले असते तर ही कविता जास्त परिणाम करून गेली असती असे वाटले.
Pages