क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< त्यामुळे तो भारता विरुद्ध असा खेळला असता तर असे विचार करण्यास वाव नक्कीच आहे.. >> मलिंगा हा हुकमी "स्विंगींग यॉर्कर" टाकण्यात जगातला आजचा सर्वोत्तम गोलंदाज असावा. एकाच षटकात तो सहाही चेंडू अचूक यॉर्कर टा़कू शकतो व अटीतटीच्या लढतीत ५०वं षटक टाकायला त्याच्यासारखा खतरनाक गोलंदाज नाही. म्हणूनच त्याची गोलंदाजी खेळताना काय स्ट्रॅटीजी ठेवायची ह्याचा प्रत्येक फलंदाजांकडून भारतीय नेटसवर कसून सरावही करून घेण्यात आला असावा !

त्यादिवशी मुंबईत त्याला स्विंग मिळत नव्हता, त्यामुळे त्याचे सरळ येणारे काही यॉर्कर खेळून काढल्यावर पुढे तो एवढा भेदक राहिला नसावा.

षटकार मारताना आणि विकेट घेताना समोरच्या गोलंदाज/फलंदाजाचेही कसब लक्षात घ्यायला लागते. जगासाठी Unplayable मेंडीसला भारताविरूध्द श्रीलंकेच्या संघातही घेत नाहीत हे त्यातले एक उदाहरण आहे. पहिल्यांदा (आशिया कपमधे) भारताविरूध्द तो मस्त खेळला पण नंतर प्रत्येकवेळी तो ढोनी/गंभीर समोर निष्प्रभ ठरला. मुरलीचेही भारताविरूध्द रेकॉर्ड बरेचसे असेच आहे. वॉटसन उत्कॄष्ठ खेळला याबद्दल शंकाच नाही, आणि मलिंगाचे यॉर्कर पण तुफान असतात. पण यावेळी विष्वचशक स्पर्धेत समोरचे खेळाडू वेगळे होते.
(मलिंगाने मागच्या विष्वचशक स्पर्धेत साऊथ आफ्रिकेचे गडी असेच टिपले होते..)

तसं पाहिलं तर मलिंगाच्या गोलंदाजीत फारसं वैविध्य नाही. जबरदस्त यॉर्करवर त्रिफळाबाद होणारे फलंदाज व त्याच्या विचित्र अ‍ॅक्शनमुळे आत येणार्‍या चेंडूचा अंदाज न आल्यामुळे पायचित होणारे फलंदाज हे त्याचे मुख्य बळी. या व्यतिरिक्त त्याच्याकडे इतर चेंडू फारसे नाहीत. त्याचे आखूड टप्प्याचे चेंडू चोपले जातात. आउटस्विंग, लेगकटर इ. चेंडू तो क्वचितच टाकतो. त्याला खेळताना थोडं पुढे उभं राहिलं तर त्याचे यॉर्कर सुध्दा फारसे प्रभावी ठरणार नाहीत असं वाटतंय.

खरंय. केवळ वैशिष्ठ्यपूर्ण गोलंदाजीच्या शैलीमुळे नाविन्य असेपर्यंतच मेंडीस, मलिंगासारखे गोलंदाज भेदक ठरतात. प्रत्येक फलंदाजाचा व खेळपट्टीचा अभ्यास करून आपल्या भात्यातील अस्त्रं हुषारीने वापरणारे कुंबळे, वॉर्न, मुरली इ. म्हणूनच दीर्घ कारकिर्दीतही भेदक ठरतात.

>> त्याला खेळताना थोडं पुढे उभं राहिलं तर त्याचे यॉर्कर सुध्दा फारसे प्रभावी ठरणार नाहीत असं वाटतंय.

वेल डन मास्तर! मी तोच विचार करत होतो की हे अजून कुणाच्याच कसं लक्षात आलं नाही ते! Wink

>> त्याला खेळताना थोडं पुढे उभं राहिलं तर त्याचे यॉर्कर सुध्दा फारसे प्रभावी ठरणार नाहीत असं वाटतंय.>> बॅट्समन थोडा पुढे उभा राहिला तर मलिंगा मशीन असल्यासारखा आधीच्या लेंग्थ्वर बॉलिंग करेल हे ग्रुहितक किती योग्य वाटते ? तो बदलतो त्याची लेंग्थ दरवेळी. प्रश्न असा आहे कि batsman बॉल पिच व्यायच्या आधी subtle adjustment करून बॉल फुल लेंग्थ बनवू शकतो का ?

चिमण,

Well come back! तुम्ही आपली भा़किते चुकल्यापासून एकदम अज्ञातवासातच गेलात. बरं झालं आता परत आलात ते. आयपीएल बद्दल तुमचे काय अंदाज आहेत?

मास्तर,
बरं झालं परत तू मला हे विचारलंस ते! एकतर तू माझ्या पोष्टी वाचत नाहीस किंवा अर्धवट वाचतोस किंवा वाचल्यावर विसरून जातोस. द. आफ्रिका हरल्यावर मी नवीन भाकित केलं होतं फायनलला लंका येणार आणि भारत जिंकणार म्हणून! तू ते वाचलेलं दिसत नाहीस. असो. तुझ्यासाठी परत एकदा मी शोधण्याचे कष्ट घेतले आहेत. या पुढे मात्र शोधणार नाही. Proud खालील पानावरच्या माझ्या पोष्टी बघ. http://www.maayboli.com/node/24494?page=19
http://www.maayboli.com/node/24494?page=49

>> आयपीएल बद्दल तुमचे काय अंदाज आहेत?
आयपीएल मला बोअर होतात. शिवाय नक्की कुठल्या टीममधे कुठले खेळाडू आहेत हे जाम काही लक्षात रहात नाही. थोडे फार लक्षात रहायला लागले होते ते परत यावर्षी बदललेत. त्यामुळे अंदाज करणं मला शक्य नाही!

मलिंगा हा प्रिडिक्टेबल बॉलर आहे. आयपील मधील कामगिरी व वनडे, टेस्ट मधील कामगिरी ह्यात फरक असतो. आयपील मध्ये गल्लीतले लोकही खेळत असतात. हॅविंग सेड दॅट - तरीपण मलिंगा हा चांगला बॉलर आहे हे आहेच. पण प्रत्येक ओव्हर मध्ये एक किंवा दोन यॉर्कर तो टाकत असतो. तो नवीन असताना भारताचे फलंदाज त्याला बाद झाले पण आता तेवढा फरक पडत नाही. अर्थात त्याने सेहवागला काढलेला बॉल अप्रतिम होता कारण स्पिड.

त्याच्यात व श्री मध्ये फरक नसावा. (फक्त श्री डोक्यावर पडलेला आहे) जर श्री ने डोक्यावर उपचार केले तर तो भेदक बॉलर होऊ शकतो कारण त्याच्या कडे स्पीड आणि वैविध्य दोन्ही आहे.

>> त्याने सेहवागला काढलेला बॉल अप्रतिम होता कारण स्पिड.
सेहवाग अ‍ॅक्रॉस द लाईन खेळला (तेही इतक्या सुरुवातीला) त्यामुळे तो आउट झाला. बॉल मधे वेगाशिवाय फार काही नव्हते. तोच बॉल सेहवागने सरळ आणि मिड ऑनच्या मधे मारायचा प्रयत्न केला असता तर तो वाचला असता. नवीन बॅट्समनने जम बसेपर्यंत V मधे खेळावं असं सांगतात ते त्यासाठीच! तसं खेळल्यानं बॅट चेंडूला लागायची शक्यता जास्त असते. तसंच जम बसेपर्यंत शॉट अंगाच्या शक्य तितक्या जवळ खेळावा असं सांगतात त्याचंही कारण तेच आहे. (म्हणजेच टेक्निकल भाषेत बॅट आणि बॉलचा स्कॅटरिंग क्रॉस सेक्शन वाढतो)

बरोबर आहे म्हणूनच बॉलची स्पीड हे कारण नमुद केले. ऑन एनी गिव्हन डे त्यावर सेहवागने चौका मारला असता, आणि नेमके तेच करायला तो गेला पण स्पीडने चकवले

सेहवाग अ‍ॅक्रॉस द लाईन खेळला (तेही इतक्या सुरुवातीला) त्यामुळे तो आउट झाला. बॉल मधे वेगाशिवाय फार काही नव्हते. तोच बॉल सेहवागने सरळ आणि मिड ऑनच्या मधे मारायचा प्रयत्न केला असता तर तो वाचला असता>>सेहवाग त्याला हवे तसेच खेळतो. किंवा त्याने तसेच खेळावे असे मी म्हणेन. V मधे खेळणे हि फार ढोबळ संकल्पना आहे. पाँटिंग सुरूवातीला V मधे खेळतो नि तरीही गंडतो. शेवति ज्या त्या बॅटस्मनच्या comfort zone मधे त्याने खेळणे जास्त मह्त्वाचे आहे. "नेमके तेच करायला तो गेला पण स्पीडने चकवले" मला हे जास्त बरोबर वाटते.

>> ऑन एनी गिव्हन डे त्यावर सेहवागने चौका मारला असता
अरे तो पाकीस्तान विरुद्ध जवळपास तसाच आउट झाला! म्हणून मला म्हणायचंय की बॉल मधे काही दम नव्हता. त्या बॉलचा स्पीड कमी असता आणि सेहवागची बॅट जोरात फिरली असती तरी चुकामूक होऊन तो एलबी झाला असता.. किंवा बॅट जरा हळू फिरली असती तर आउटर एज घेऊन कुठेही कॅच उडाला असता (सचिन इंग्लंडविरुद्ध आउट झाला तसा, तोही १२० वर चांगला जम बसलेला असताना).

पण बोध घेईल तो सेहवाग कसला? वरती निष्कारण एक रिव्ह्यू वाया घालवला (दोन्ही मॅचेस मधे). सेहवाग आउट झाल्यावर गांगुली पण कॉमेंट्रीमधे शिव्या घालत होता. अशा माणसाने तोंड वर करून 'मी ५० ओव्हर्स खेळायचा प्रयत्न करणार आहे' असं सुरुवातीला का म्हणावं? १/४ फायनल मधे ९व्या, १/२ फायनल मधे ६व्या आणि फायनल मधे पहिल्या ओव्हरीत गेलाय तो!

चिमण ते पूर्ण वर्ल्ड कप चे सामने मिळून एकूण ५० ओव्हर्स असावे. त्यामुळे बांग्लाविरूद्धच त्यातील ४५-४६ ओव्हर्स खेळून झाल्याने तो उरलेल्या गेम्समधे टोटल ५० च्या पुढे जाणार नाहीत याची काळजी घेत होता Happy

<< चिमण आजच्या IPL match मधला मलिंगाचा पहिला बॉल बघितलास का ? It was "away" yorker >> Yes. And a dream ball for any bowler !

अमोल Lol
सेहवाग सेहवाग है भाई! माझ्यामते तो आनंद घेतो खेळाचा, आउट झाल्यावरही हो झालो, आता परत बघू असे भाव असतात.

चिमण हो ते लक्षात आहे, आणि सचिनही दोनदा तश्याच बॉलवर आउट झाला हे पण. (रामपॉलने टाकलेल्या बॉल सारखा) पण सेहवागच्या बाबतीत ते ठरवून करायचे हे १० पैकी २ वेळेस होते, त्याला पहिला व ५० व्या ओव्हर मधील शेवटचा बॉल सारखाच वाटतो. आणि हिच त्याची स्ट्रेन्थ आहे. साऊथ अफ्रिकेने त्याला थर्ड मॅनला आउट घ्यायचे ठरवले तर ह्या माणसाने तिथे ठरवून छकडी टाकली. आणि दुसर्‍या मॅच मध्ये तसाच आउटही झाला.

केदार, माझा आक्षेप फक्त 'तो चेंडू अप्रतिम होता' यालाच आहे. सेहवाग आउट होत नाही तो पर्यंत मी आनंदात असतो.. दुर्दैवाने, बर्‍याच वेळा तो क्षणभंगुर ठरतो. Proud

not just a tick-mark.. a big star along with great play.. त्यानी improvise करुन मारलेले शॉट जबरीच होते.. धोनीनी शोधलेला शॉट त्यानी अत्यंत सहजतेनी मारला आणि एक सिक्स आणि एक फोर मारली... कदाचित पुढच्या मॅच मधे दिलस्कुप पण बघायला मिळेल..

आध्यात्मिक गुरुंची प्रकृती चिंताजनक असल्याने सचिनने वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले हे समजु शकतो पण त्याचे काम म्हणजे क्रिकेटचा सामना न खेळणे हे काही समजु शकलो नाही.
या संबंधीचे वृत्त : तेंडुलकरचे 'नो' बर्थ डे सेलिब्रेशन

माझ्यामते तो हा सामना खेळेल. ही बहुतेक वर्तमान पत्रांनी सोडलेली पुडी असणार. हो, पण जर तो मानसिक रित्या जास्तच व्यथित असेल आणि सामन्यावर लक्ष केन्द्रीत करू शकत नसेल तर मात्र कदाचित खेळणारही नाही.

>>> माझ्यामते तो हा सामना खेळेल. ही बहुतेक वर्तमान पत्रांनी सोडलेली पुडी असणार.

ही पुडीच सोडलेली होती. आज तो खेळला आणि २४ चेंडूत २८ धावा पण केल्या. आजचा सामना मुम्बईने जिंकून गुणफलकातला आपला पहिला क्रमांक कायम ठेवला (६ सामन्यात ५ विजय, एकूण गुण १०). १९९९ साली इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरू असताना सचिनच्या वडीलांचे मुम्बईत निधन झाले होते. तेव्हा तो वडीलांच्या अंत्यदर्शनासाठी मुम्बईत परत येऊन केवळ ५- ६ दिवसात इंग्लंडला परत जाऊन स्पर्धेतले उरलेले सामने खेळला होता. त्यामुळे आज तो खेळणार नाही ही पुडीच सोडलेली होती.

डंकन फ्लेचर भारतीय क्रिकेट संघाचे नवे कोच.
यापूर्वी (२००७ पर्यंत)ते अ‍ॅशेस जिंकणार्‍या इंग्लिश क्रिकेट संघाचे कोच होते.

टाइम मॅगेझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत महेंद्रसिंग धोनी. यापूर्वी या यादीत सचिनचे नाव झळकले होते.
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2066367_20663...

Pages

Back to top