दु:ख आता फार झाले (तरही)

Submitted by आनंदयात्री on 30 January, 2011 - 23:09

दु:ख आता फार झाले
पापण्यांना भार झाले

वाहिल्या जखमा मुक्याने
आठवांचे वार झाले

भेटली मज माणसे पण
शब्द माझे यार झाले

संकटांशी झुंजताना
संकटच आधार झाले

हरवले घर पाखराचे
हाल दारोदार झाले

पेटणे हातात नाही
कोळसे लाचार झाले

काय झाले आठवेना
भासही हळुवार झाले

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भेटली मज माणसे पण
शब्द माझे यार झाले

हरवले घर पाखराचे
हाल दारोदार झाले

काय झाले आठवेना
भासही हळुवार झाले

जबरदस्त आवडले हे शेर Happy

व्वा.... क्या बात है....

भेटली मज माणसे पण
शब्द माझे यार झाले

पेटणे हातात नाही
कोळसे लाचार झाले

काय झाले आठवेना
भासही हळुवार झाले.. हे शेर फार आवडले. Happy

सुंदर मतला. क्रम बदलून ज्यास्त छान वाटेल का?

पेटणे हातात नाही
कोळसे लाचार झाले

काय झाले आठवेना
भासही हळुवार झाले

अप्रतिम शेर!

विजय, बेफिकीर, डॉ. कैलास, क्रांति, नंद्या, मुक्ता, भुंगा, हबा, झाडा, thanks!! Happy

झाडा, क्रमावर विचार करतो..

>> पेटणे हातात नाही
कोळसे लाचार झाले

मस्त! Happy

>> भेटली मज माणसे पण
शब्द माझे यार झाले

हा ही आवडला.

सहज, सुंदर.
भेटली मज माणसे पण
शब्द माझे यार झाले

यातील ' पण' मुळे कोणता विरोधाभास
साधला ते समजले नाही.

वाहिल्या जखमा मुक्याने
आठवांचे वार झाले>>>>> क्या बात है..... !

म्हणजे मला असे म्हणायचे आहे कि,
संपूर्ण गझल विरोधाभासावर आधारित असता,
'पण' जरुर नव्ह्ता, त्या ऐवजी 'अन' हा शब्द
आशययुक्त होता.

म्हणजे मला असे म्हणायचे आहे कि, संपूर्ण गझल विरोधाभासावर आधारित असता, 'पण' जरुर नव्ह्ता, त्या ऐवजी 'अन' हा शब्द आशययुक्त होता. >>
"'पण' जरुर नव्ह्ता" ऐवजी "'पण' जरुरी नव्ह्ता" असं म्हणायचंय बहुधा...

क्षमस्व अलकाताई, पण आपणच विपूत लिहिल्याप्रमाणे आपण तसंही सीरीअसली अभ्यास करत नाही आहात, त्यामुळे, अन् किंवा पण मधल्या अर्थछटेतला बदल आपला आपणच समजून घ्यावात ही विनंती...
पण माझ्या मते तिथे अन् पेक्षा पण अधिक योग्य आहे.

संपूर्ण गझल विरोधाभासावर आधारित असता
शेवटच्या तीन शेरात मला तरी विरोधाभास दिसला नाही...

म्हणजे मला असे म्हणायचे आहे कि,
संपूर्ण गझल विरोधाभासावर आधारित असता,
'पण' जरुर नव्ह्ता, त्या ऐवजी 'अन' हा शब्द
आशययुक्त होता>>>

या विधानातील शेवटच्या भागाशी सहमत आहे. 'अन' हा शब्द अधिक आशययुक्त झाला असता असे मलाही वाटते.

याव्यतिरिक्तः

१. मला या गझलेतील शेर विरोधाभासावर असल्याप्रमाणे वाटले नाही.

२. शब्द माझे यार झाले हा शेर मला संदिग्ध वाटला.

धन्यवाद!

>> वाहिल्या जखमा मुक्याने
आठवांचे वार झाले >>मस्त...
तरहि म्हणजे मला कुणी तरी कृपया समजावुन सांगा ना

Back to top