Submitted by पुरंदरे शशांक on 16 March, 2011 - 03:13
अजून त्याची नाही चाहूल
रेखून बसले मेंदी हातावर
नजर सततचि ती मार्गावर
मनातले जळ डुचमळ डुचमळ
अजून त्याची नाही चाहूल
नको नको त्या कोकिलताना
काग आज तरी सांगे शकूना
सूकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल
दर्पणी बघता तूचि तिथे रे
मिटता नयनी तू दिसशी रे
कशी ही वंचना होते व्याकूळ
अजून त्याची नाही चाहूल
समोर जेव्हा येशील सखया
विरघळेन मी मिठीत तुझिया
स्वप्न मनी ना राहो केवळ
अजून त्याची नाही चाहूल...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शशांक दा, मस्तच.. कुठे गायब
शशांक दा, मस्तच..
कुठे गायब होतात तुम्ही?
शशांक दा, मस्तच.. कुठे गायब
शशांक दा, मस्तच..
कुठे गायब होतात तुम्ही?
सुंदर!
सुंदर!
निनाव, क्रांतिजी.....मनापासून
निनाव, क्रांतिजी.....मनापासून धन्यवाद..
मस्त .
मस्त .
खुप छान! आवडली
खुप छान! आवडली
ये बात! असा मस्त व्यक्त होत
ये बात! असा मस्त व्यक्त होत रहा यार.
नको नको त्या कोकिलताना काग आज
नको नको त्या कोकिलताना
काग आज तरी सांगे शकूना
सूकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल >> हे कडवे खास आवड्ले.
छाया, अंजली, उमेश,
छाया, अंजली, उमेश, चातक.......
सर्वांना मनापासून धन्यवाद......
"समोर जेव्हा येशील
"समोर जेव्हा येशील सखया
विरघळेन मी मिठीत तुझिया
स्वप्न मनी ना राहो केवळ
अजून त्याची नाही चाहूल......"
.... छान
मस्तच....
मस्तच....
भिडेकाका,
भिडेकाका, स्नेहांकुर......मनापासून धन्यवाद.
Please check this Poetry
Please check this Poetry contest held by BMMNorthAmerica
, I am sure you would be interested in this
For more details join group CHAUFULA - 2011 on facebook
http://www.wix.com/ankulkarni/chauphula
Regards
Chaufula Team
नको नको त्या कोकिलताना काग आज
नको नको त्या कोकिलताना
काग आज तरी सांगे शकूना
सूकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल>>>>
मस्तच,
खुप आवडली.