किन्वाची साबुदाणा खिचडी

Submitted by कल्पु on 20 March, 2011 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप किन्वा (मी कॉस्को मधून 2 lb च पाकिट आणल)
१ १/२ कप उकळत पाणी
३/४ टे-स्पून खमंग जीरा पावडर (आवश्यक)
३/४ टे-स्पून अख्खे जीरे (फोडणीसाठी)
३ हिरव्या मिरच्या आणी ३/४ कप शेंगदाणे (भरड कूट करून)
२ टे-स्पून शेंगदाण्याच तेल
१ टे-स्पून साजुक तूप
१ टे-स्पून सा़खर
१ १/२ स्पून लिंबाचा रस
१/२ कप ओल खोबर
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

कृती किन्वा फुलवण्याची
१ १/२ कप पाणी उकळवत ठेवा आणि त्यात १ कप किन्वा टाका. मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर, झाकण ठेउन शिजत ठेवा. साधारण १० मिनिटात किन्वा शिजतो आणि फुलायला लागतो. त्यानंतर गॅस बंद करून, झाकण ठेउन किन्वाला सावकाश फुलू द्यात. ज्वारी सारख टणक texture असलेला किन्वा मऊ होतो. २० मिनिटानी झाकण काढा आणि गार होउ द्यात. मधे मधे काट्याने मोकळा करून घ्या. १ कप कच्चा किन्वा शिजून आणि फुलून २ कप होतो. मोकळा होण्याकरता फक्त दिडपट पाणी लागत.

कृती खिचडीची:
गार झालेल्या अणि फुललेल्या किन्वा मधे मीठ, साखर, जीरा पावडर, दाण्या-मिर्चीच कूट टाकून मिक्स करून घ्या.
किन्वाला, तिळासारखा एक मंद वास असतो जो खंमग भाजून केलेल्या जिरेपूडामुळे mask होतो. मी regular साबुदाण्याच्या खिचडीत सुद्धा जिरेपूड घालते.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल्-तुपात जिरे घालून फोडणी करा
जिर्‍यांचा रंग बदलला की वर तयार केलेल किन्वाच मिश्रण घालून परतून घ्या.
झाकण ठेउन दणदणीत वाफ येउ द्यात.
लिंबाचा रस घाला, परतून घ्या. अजून एक वाफ येउ द्यात.
खोबर-कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
४-५ पाच माणसांना पुरते.
अधिक टिपा: 

किन्वा अमेरिकेच्या बाहेर कुठे मिळतो हे माहिती नाही पण हा pseudo grain अमेरिकेत खूप पॉप्युलर होतो आहे. भरपूर प्रोटिन्स असलेला किन्वा खूप भारतीय पदार्थात पर्याय म्हणून वापरू शकतो. उदा. उपमा, सांजा, पुलाव. मायबिलीवरच्या सुगरणी तर अजून टिप्स देतील. हि खिचडी इतकी साबुदाण्याच्या खिचडी सारखी लागते कि.....माझ ऐकू नका..करूनच बघा. फोटो आहेत पण jpeg images कश्या टाकायच्या हे महिती नाहित.

माहितीचा स्रोत: 
राधिका चेंबूरकर्-मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळी पाककृती,
हे करुन बघण्यासाठी किन्वा घेऊन येईन. Happy
फोटो टाकण्याचा प्रयत्न करता आला तर बघ.

भारी...किन्वा हा अमेरिकेत कॉस्टको सोडुन दुसरीकडे कुठे मिळेल काही कल्पना आहे का कुणाला? कॉस्ट्कोमध्ये सर्वात स्वस्त मिळतो, पण ऑनलाईन बराच महाग आहे

रेग्युलर ग्रोसरी स्टोअरमध्ये जेथे ऑर्गॅनीक किंवा हेल्थ सिरिअल्स/प्रॉडक्ट्स मिळतात त्या सेक्शनमध्ये असतो.

कल्पु, छन रेसिपी आहे. नक्की करून बघणार.

़किन्वाची साबुदाण्याची खिचडी वाचून एकदम उत्सुकता चाळवली म्हणून बघायला आले तर एकदम वेगळाच प्रकार वाट्तोय.
कल्पु, फोटो टाकणं शक्य आहे का? तसंच साबुदाणा फॅटी असतो त्यामानाने किन्वा बरा का तब्येतीला?

सायो,

किन्वाच्या एका कपात २२० calories आणि ८ ग्रॅम प्रोटीन, ५ ग्रॅम फायबर असत. साबुदाणा हा pure starch असल्याने खूप हेल्दी नाही. डायबिटीस असलेल्या लोकांना ही खिचडी एक छान पर्याय आहे.

सगळ्या काकवांनी अंगारकीचा मुहूर्त साधून या मंगळवारीच करून बघा खिचडी.

कल्पू, अमेरिकेच्या बाहेर (कॉस्को) मिळत असेल कां किन्वा? मिळत असेल तर इथल्या कॉस्कोत बघता येईल म्हणून विचारलं.

लाजो, इथे मिळालं तर कॉस्कोमध्येच मिळण्याची शक्यता ग, बाकी कुठे मिळत असेल याची गॅरंटी नाही. असलं तरी नाव कदाचित वेगळं असू शकेल.

हम्म सायो, एका मैत्रिणीच्या घराजवळ आहे कॉस्को. तिलाच सांगेन बघायला.

कल्पू, फोटो टाकलास तर रेसिपीला चार चाँद लागतील. इथे लोड नसेल करता येत तर पिकासावर लोड करून त्याची लिंक देता येईल.

कल्पू, माबोवर अपलोड करायची असतील तर १५३ केबीचं लिमिटेशन आहे. तुझ्या फोटोंचा साईझ त्यापेक्षा मोठा असेल तर तो कमी करावा लागेल (पेन्टब्रशमध्ये होऊ शकेल). ते काम अंमळ कटकटीचं आहे, त्यापेक्षा पिकासाची लिंक देणं केव्हा ही सोईस्कर.

कल्पू, छान आहे आयडिया. Happy
अशी एक डिश 'मॅकॅरोनी ग्रिल' मध्ये खाल्ली होती. तो गोल इटालियन पास्ता होता की quinoa ते लक्षात नाही.

छान पाकृ !!
लाजोने सांगितल्याप्रमाणे ईथे सुमा मध्ये शोधते!

अवांतर : किन्वा असा काही पदार्थ असतो हे मला माहित नव्हते. त्यामुळे 'किन्वाची सा खि' हे वाचुन मला वाटले कोणीतरी 'किन्वा' नावाचा आयडी आहे आणि तिने/त्याने बनवलेली साखि कल्पुला आवडली असेल म्हणुन तिने ईथे पाकृ टाकली आहे! Biggrin

कोण ते फोटो फोटो करत कावकाव करतंय? त्यांच्याकरता.

quinoa khichadi.jpg

आजच केली. चवीला आवडली. वासावरुन वरीचे तांदूळ आणि दाण्याच्या आमटीची आठवण झाली (साखिपेक्षा)
सोप्प्या रेसिपीबद्दल थॅन्क्स.

whole foods मध्ये २०० ग्रॅमचे पॅक्स आहेत, मी कालच आणले. आज खिचडी Happy

Pages