![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2021/01/27/IMG_00861.jpg)
१ कप किन्वा (मी कॉस्को मधून 2 lb च पाकिट आणल)
१ १/२ कप उकळत पाणी
३/४ टे-स्पून खमंग जीरा पावडर (आवश्यक)
३/४ टे-स्पून अख्खे जीरे (फोडणीसाठी)
३ हिरव्या मिरच्या आणी ३/४ कप शेंगदाणे (भरड कूट करून)
२ टे-स्पून शेंगदाण्याच तेल
१ टे-स्पून साजुक तूप
१ टे-स्पून सा़खर
१ १/२ स्पून लिंबाचा रस
१/२ कप ओल खोबर
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती किन्वा फुलवण्याची
१ १/२ कप पाणी उकळवत ठेवा आणि त्यात १ कप किन्वा टाका. मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर, झाकण ठेउन शिजत ठेवा. साधारण १० मिनिटात किन्वा शिजतो आणि फुलायला लागतो. त्यानंतर गॅस बंद करून, झाकण ठेउन किन्वाला सावकाश फुलू द्यात. ज्वारी सारख टणक texture असलेला किन्वा मऊ होतो. २० मिनिटानी झाकण काढा आणि गार होउ द्यात. मधे मधे काट्याने मोकळा करून घ्या. १ कप कच्चा किन्वा शिजून आणि फुलून २ कप होतो. मोकळा होण्याकरता फक्त दिडपट पाणी लागत.
कृती खिचडीची:
गार झालेल्या अणि फुललेल्या किन्वा मधे मीठ, साखर, जीरा पावडर, दाण्या-मिर्चीच कूट टाकून मिक्स करून घ्या.
किन्वाला, तिळासारखा एक मंद वास असतो जो खंमग भाजून केलेल्या जिरेपूडामुळे mask होतो. मी regular साबुदाण्याच्या खिचडीत सुद्धा जिरेपूड घालते.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल्-तुपात जिरे घालून फोडणी करा
जिर्यांचा रंग बदलला की वर तयार केलेल किन्वाच मिश्रण घालून परतून घ्या.
झाकण ठेउन दणदणीत वाफ येउ द्यात.
लिंबाचा रस घाला, परतून घ्या. अजून एक वाफ येउ द्यात.
खोबर-कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
किन्वा अमेरिकेच्या बाहेर कुठे मिळतो हे माहिती नाही पण हा pseudo grain अमेरिकेत खूप पॉप्युलर होतो आहे. भरपूर प्रोटिन्स असलेला किन्वा खूप भारतीय पदार्थात पर्याय म्हणून वापरू शकतो. उदा. उपमा, सांजा, पुलाव. मायबिलीवरच्या सुगरणी तर अजून टिप्स देतील. हि खिचडी इतकी साबुदाण्याच्या खिचडी सारखी लागते कि.....माझ ऐकू नका..करूनच बघा. फोटो आहेत पण jpeg images कश्या टाकायच्या हे महिती नाहित.
@अनु ३, साधारण ज्वारीच्या
@अनु ३,
साधारण ज्वारीच्या साइज चा असतो. चांगला धुऊन घे बर का.
हो का? मी आणलेला अगदी तिळा
हो का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मी आणलेला अगदी तिळा एवढा आहे. होईल ना गं निट?
ह्या weekend ला करुन पाहीली.
ह्या weekend ला करुन पाहीली. मस्त झाली. thanks
अनु ३, आत्ता नीट बघितला कच्चा
अनु ३,
आत्ता नीट बघितला कच्चा किन्वा. तिळाचीच साइज आहे. फुलल्यावर दुप्पट होतो. करून बघ आणि कळव. शुभेच्छा!
आत्ताच करुन बघितली. छान लागते
आत्ताच करुन बघितली. छान लागते (मलाही थोडी वर्याच्या तांदुळा सारखी चव वाटली.)
![IMG_4729_1.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23899/IMG_4729_1.JPG)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी खिचडी करताना फोडणीत काकडी घालते तशी ह्यात पण घातली मस्त चव लागते
म्हणुन बाजुला काकडीच्या फोडी ठेऊन सजावट केली आहे.
छान पाकृ. बद्दल आभार.
मस्त आहेत सगळ्यांचे फोटो. मी
मस्त आहेत सगळ्यांचे फोटो. मी पण आज केली होती. एक छोटीशी अॅडिशन मी केली ती म्हन्जे नेहमीच्या खिचडी ला मिरची + आलं वाटून लावते. तसचं ह्याला पण केलं. खूपच छान प्रकार आहे. धन्यवाद कल्पु रेसिपी शेअर केल्याबद्दल.
किन्वा पुलाव पण चांगला होतो. मिनोती ने छान पाकृ दिलीये तिच्या ब्लॉग वर.
मस्त झालीये खिचडी! थोडी
मस्त झालीये खिचडी! थोडी भगरीसारखी वाटतेय मला! माकाचु?
वत्सला, तुकानाचु मला पण तशीच
वत्सला, तुकानाचु
मला पण तशीच चव वाटली.
मी पण करुन बघितली
मी पण करुन बघितली रविवारी..मस्त झाली होती.मला देखिल थोडी वर्याच्या तांदूळासारखी वाटली.बहुतेक फुललेला किन्वाचा साईज वर्याच्या तांदूळासारखा असल्यामुळे वाटत असेल.मस्त हेल्दी ऑप्शन आहे साबुदाणा खिचडीला....थँक्यू कल्पु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कल्पु, मी केली होती. आवडली.
कल्पु, मी केली होती. आवडली. धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही रेसिपी सार्वजनिक नाही आहे. धागा संपादित करुन 'ग्रूप' लिन्क क्लिक केल्यावर एक चेकबॉक्स दिसेल तो सिलेक्ट करुन रेसिपी सार्वजनिक करता येईल. सध्या फक्त ग्रूपच्या सदस्यांनाच दिसते.
@ लालू, करते सार्वजनिक आता!
@ लालू,
करते सार्वजनिक आता! Thank you for sharing how to do it.
उपवासाला चालतो का किन्वा ?
उपवासाला चालतो का किन्वा ?
उपासाला चालतो का नाही मला
उपासाला चालतो का नाही मला माहित नाही. पासओव्हरला चालेल का नाही यावरुन किती गोंधळ माजलाय ते इथे वाचा
http://www.nytimes.com/2011/04/18/nyregion/for-passover-eating-quinoa-is...
शेवटी आज मुहूर्त लागला किन्वा
शेवटी आज मुहूर्त लागला किन्वा खिचडीला. एकदम आवडली. परत परत केली जाणार ही खिचडी.
![](https://lh4.googleusercontent.com/_0vLxMndfRIE/Ta4z4WJULnI/AAAAAAAAADw/3mTv6mrP_Ew/s640/QuinoaKhichadi.JPG)
बाजारातून किन्वा आणल्यावर कळले की मी मागे एकदा एक किन्वाचे पाकीट आणले होते अंबाडीच्या भाजीत ज्वारीच्या कण्या म्हणून घालायला (किन्वा ज्वारीसारखे दिसते म्हणून) तेव्हापासून ते तसेच पडून होते. आता लगेच संपेल.
शूम्पी, sprouts मध्ये मिळते
शूम्पी,
sprouts मध्ये मिळते किन्वा. तुला हवे तेवढे घेता येते.
होय अंजू, मिळालं आणि त्यानंतर
होय अंजू, मिळालं आणि त्यानंतर खिचडी आणि पुलाव असं दोन्ही करून झालं. पण धन्स तुला.
ही पाककृती 'आहारशास्त्र आणि
ही पाककृती 'आहारशास्त्र आणि पाककृती' मधे नाहीये. योग्य त्या गृपमधे हलवता येईल का?
मी आज केलेली.. खिचडी,
मी आज केलेली.. खिचडी, दाण्याची दही घालून चटणी आणि काकडी - मज्जा आली!
तुमची रेसिपी आणि इकडे
तुमची रेसिपी आणि इकडे बाकीच्यांनी टाकलेले फोटो पाहुन घरच्य क्विनोआला धीर आला असणारे...
एक दोन दिवसात करणार आहे.....मस्त आहे रेसिपी...:)
अनायसे खिचडी वर आली म्हणून
अनायसे खिचडी वर आली म्हणून किन्वुदाणाखिचडीबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद! आठवड्यात एकदातरी होतेच! आता इतर नातेवाइकांना याची लिंक पाठवलीय. त्यांच्याकडेपण लई पापिलर!
मी पण केली किन्वा खिचडी. अगदी
मी पण केली किन्वा खिचडी. अगदी साखि ची चव लागते. खाताना स्वतालाच आठवण करून द्यायला लागत होती कि ही साखि नाहीय म्हणून. खूप आवडली. रेसिपी बद्दल धन्यवाद.
मी आणलेले किन्वा प्रिवॉशड आहे असं त्या पाकिटावर लिहलय.
किन्वा च्या अजून काही रेसिपीस आसतील तर प्लीज लिहा.
धन्यवाद कल्पु!
धन्यवाद कल्पु!
अरे वा..टेस्टी दिसतीये
अरे वा..टेस्टी दिसतीये रेसिपी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कल्पु मॅम्..कुठे आहात???
आहाहा.. सर्वांचे फोटो ही मस्त
आहाहा.. सर्वांचे फोटो ही मस्त आलेत... वॉव.. लग्गेच करुन पाहिली आणी फोटो ही शेअर केले इकडे..
धन्यु..
कुसकुस वापरून पण अशी साखि
कुसकुस वापरून पण अशी साखि करता येइल का? कोणी प्रयोग केला आहे का?
आत्ता केली हि खिचडी. मला
आत्ता केली हि खिचडी. मला साबुदाणा खिचडी सारखी वाटली नाही चव पण ओवरऑल आवडली चव. हेंल्थ च्या दृष्टीने चांगली म्हणून करेन आता नेहमी. कल्पू थान्क्स तुला
हा फोटो.
मी ट्रेडर जो'स मधुन पाकीट
मी ट्रेडर जो'स मधुन पाकीट आणलंय पण ते किन्वं ज्वारीसारखं टणक वगैरे नाही. चवीत फरक पडेल का? कोणी ट्रेडर जोच्या कीन्वंची खिचडी केलीये का?
सापडली रेसीपी. करको देखतुं
सापडली रेसीपी. करको देखतुं धन्यवाद कल्पू.
फार सुंदर झाली ही खिचडी. तरी
फार सुंदर झाली ही खिचडी. तरी तुप जरा चिक्कुपणानेच घातले होते. वरुन ओलेखो. , को. काही नाही पण सुंदर चव.
आता नेहमी करणार. साबु. खि. खुप आवडते पण साबुदाण्याच्या गुणधर्मामुळे कधी करत नाही. आता काळजी नाही. सर्व फोटो झकास आलेत. वरती लिहिलेले बदल करुन पण पहाण्यात येतील.
मी एक दोन वेळा केली ही खिचडी
मी एक दोन वेळा केली ही खिचडी पण साबुदाण्यापेक्षा भगरीची खिचडी करतात उपवासाची तशी लागली. राजगिर्याचं टेक्श्चर आहे किन्वाला. मी लोकल ग्रॉसरीतून आणला होता.
Pages