![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2021/01/27/IMG_00861.jpg)
१ कप किन्वा (मी कॉस्को मधून 2 lb च पाकिट आणल)
१ १/२ कप उकळत पाणी
३/४ टे-स्पून खमंग जीरा पावडर (आवश्यक)
३/४ टे-स्पून अख्खे जीरे (फोडणीसाठी)
३ हिरव्या मिरच्या आणी ३/४ कप शेंगदाणे (भरड कूट करून)
२ टे-स्पून शेंगदाण्याच तेल
१ टे-स्पून साजुक तूप
१ टे-स्पून सा़खर
१ १/२ स्पून लिंबाचा रस
१/२ कप ओल खोबर
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती किन्वा फुलवण्याची
१ १/२ कप पाणी उकळवत ठेवा आणि त्यात १ कप किन्वा टाका. मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर, झाकण ठेउन शिजत ठेवा. साधारण १० मिनिटात किन्वा शिजतो आणि फुलायला लागतो. त्यानंतर गॅस बंद करून, झाकण ठेउन किन्वाला सावकाश फुलू द्यात. ज्वारी सारख टणक texture असलेला किन्वा मऊ होतो. २० मिनिटानी झाकण काढा आणि गार होउ द्यात. मधे मधे काट्याने मोकळा करून घ्या. १ कप कच्चा किन्वा शिजून आणि फुलून २ कप होतो. मोकळा होण्याकरता फक्त दिडपट पाणी लागत.
कृती खिचडीची:
गार झालेल्या अणि फुललेल्या किन्वा मधे मीठ, साखर, जीरा पावडर, दाण्या-मिर्चीच कूट टाकून मिक्स करून घ्या.
किन्वाला, तिळासारखा एक मंद वास असतो जो खंमग भाजून केलेल्या जिरेपूडामुळे mask होतो. मी regular साबुदाण्याच्या खिचडीत सुद्धा जिरेपूड घालते.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल्-तुपात जिरे घालून फोडणी करा
जिर्यांचा रंग बदलला की वर तयार केलेल किन्वाच मिश्रण घालून परतून घ्या.
झाकण ठेउन दणदणीत वाफ येउ द्यात.
लिंबाचा रस घाला, परतून घ्या. अजून एक वाफ येउ द्यात.
खोबर-कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
किन्वा अमेरिकेच्या बाहेर कुठे मिळतो हे माहिती नाही पण हा pseudo grain अमेरिकेत खूप पॉप्युलर होतो आहे. भरपूर प्रोटिन्स असलेला किन्वा खूप भारतीय पदार्थात पर्याय म्हणून वापरू शकतो. उदा. उपमा, सांजा, पुलाव. मायबिलीवरच्या सुगरणी तर अजून टिप्स देतील. हि खिचडी इतकी साबुदाण्याच्या खिचडी सारखी लागते कि.....माझ ऐकू नका..करूनच बघा. फोटो आहेत पण jpeg images कश्या टाकायच्या हे महिती नाहित.
भन्नाट पाककृती वाटतेय ! योग्य
भन्नाट पाककृती वाटतेय ! योग्य वेळी वाचली. कॉस्टकोत जायला निघाल्यामुळे लागलीच आणून करता येईल. खूप धन्यवाद!
मस्त! किन्वा कसा संपवायचा
मस्त! किन्वा कसा संपवायचा प्रश्न पडला होता. उद्या करुन बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वेगळी पाककृती, हे करुन
वेगळी पाककृती,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे करुन बघण्यासाठी किन्वा घेऊन येईन.
फोटो टाकण्याचा प्रयत्न करता आला तर बघ.
पाकृ मस्त आहे. रैनाचा थंरु
पाकृ मस्त आहे.
रैनाचा थंरु क्र. ३![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी...किन्वा हा अमेरिकेत
भारी...किन्वा हा अमेरिकेत कॉस्टको सोडुन दुसरीकडे कुठे मिळेल काही कल्पना आहे का कुणाला? कॉस्ट्कोमध्ये सर्वात स्वस्त मिळतो, पण ऑनलाईन बराच महाग आहे
रेग्युलर ग्रोसरी स्टोअरमध्ये
रेग्युलर ग्रोसरी स्टोअरमध्ये जेथे ऑर्गॅनीक किंवा हेल्थ सिरिअल्स/प्रॉडक्ट्स मिळतात त्या सेक्शनमध्ये असतो.
कल्पु, छन रेसिपी आहे. नक्की करून बघणार.
़किन्वाची साबुदाण्याची खिचडी
़किन्वाची साबुदाण्याची खिचडी वाचून एकदम उत्सुकता चाळवली म्हणून बघायला आले तर एकदम वेगळाच प्रकार वाट्तोय.
कल्पु, फोटो टाकणं शक्य आहे का? तसंच साबुदाणा फॅटी असतो त्यामानाने किन्वा बरा का तब्येतीला?
आणलाय किन्वा. उद्या करुन
आणलाय किन्वा. उद्या करुन बघणेत येईल.
भारी कृती. फोटो कसे टाकावेत
भारी कृती.
फोटो कसे टाकावेत यासाठी मदतपुस्तिका बघा.
झक्कास आयडिया!!
झक्कास आयडिया!!
सायो, किन्वाच्या एका कपात २२०
सायो,
किन्वाच्या एका कपात २२० calories आणि ८ ग्रॅम प्रोटीन, ५ ग्रॅम फायबर असत. साबुदाणा हा pure starch असल्याने खूप हेल्दी नाही. डायबिटीस असलेल्या लोकांना ही खिचडी एक छान पर्याय आहे.
सगळ्या काकवांनी अंगारकीचा
सगळ्या काकवांनी अंगारकीचा मुहूर्त साधून या मंगळवारीच करून बघा खिचडी.
कल्पू, अमेरिकेच्या बाहेर (कॉस्को) मिळत असेल कां किन्वा? मिळत असेल तर इथल्या कॉस्कोत बघता येईल म्हणून विचारलं.
आडो, किन्वा कुठल्याही हेल्थ
आडो, किन्वा कुठल्याही हेल्थ फुड शॉप मधे मिळेल (इथे सुपरमार्केटात पण हेल्थ्फुड सेक्शन मधे मिळते).
लाजो, इथे मिळालं तर
लाजो, इथे मिळालं तर कॉस्कोमध्येच मिळण्याची शक्यता ग, बाकी कुठे मिळत असेल याची गॅरंटी नाही. असलं तरी नाव कदाचित वेगळं असू शकेल.
ओह... तु कोरियात आहेस व्हय...
ओह... तु कोरियात आहेस व्हय... हम्म.. मग माहित नाही....
हे असे दिसते किन-वा...
आडो, Quinoa ह्या नावाने सर्च
आडो, Quinoa ह्या नावाने सर्च कर.
हम्म सायो, एका मैत्रिणीच्या
हम्म सायो, एका मैत्रिणीच्या घराजवळ आहे कॉस्को. तिलाच सांगेन बघायला.
कल्पू, फोटो टाकलास तर रेसिपीला चार चाँद लागतील. इथे लोड नसेल करता येत तर पिकासावर लोड करून त्याची लिंक देता येईल.
आडो, jpeg images आहेत. कशी
आडो,
jpeg images आहेत. कशी लोड कशी करायची ते जरा समजून घेते.
मस्त वाटतेय पाककृती. एकदम
मस्त वाटतेय पाककृती. एकदम हटके ! ब्रंच मेनुसाठी पण चालेल.
कल्पू, माबोवर अपलोड करायची
कल्पू, माबोवर अपलोड करायची असतील तर १५३ केबीचं लिमिटेशन आहे. तुझ्या फोटोंचा साईझ त्यापेक्षा मोठा असेल तर तो कमी करावा लागेल (पेन्टब्रशमध्ये होऊ शकेल). ते काम अंमळ कटकटीचं आहे, त्यापेक्षा पिकासाची लिंक देणं केव्हा ही सोईस्कर.
कल्पू, छान आहे आयडिया. अशी
कल्पू, छान आहे आयडिया.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशी एक डिश 'मॅकॅरोनी ग्रिल' मध्ये खाल्ली होती. तो गोल इटालियन पास्ता होता की quinoa ते लक्षात नाही.
मस्त डिश. मी आजच ट्रेडर जोज
मस्त डिश.
मी आजच ट्रेडर जोज मधून आणला किन्वा. कुठल्याही होल फूड्स मधे मिळेल असं मला वाटतं.
छान पाकृ !! लाजोने
छान पाकृ !!
लाजोने सांगितल्याप्रमाणे ईथे सुमा मध्ये शोधते!
अवांतर : किन्वा असा काही पदार्थ असतो हे मला माहित नव्हते. त्यामुळे 'किन्वाची सा खि' हे वाचुन मला वाटले कोणीतरी 'किन्वा' नावाचा आयडी आहे आणि तिने/त्याने बनवलेली साखि कल्पुला आवडली असेल म्हणुन तिने ईथे पाकृ टाकली आहे!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
करून पहायलाच हवी ही खिचडी.
करून पहायलाच हवी ही खिचडी.
मस्त पाकृ. करुन बघायला हवी.
मस्त पाकृ.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करुन बघायला हवी.
किन्वा, दक्षिण अमेरिकले धान्य
किन्वा, दक्षिण अमेरिकले धान्य आहे. बाकि कुठे बघितल्याचे आठवत नाही.
कोण ते फोटो फोटो करत कावकाव
कोण ते फोटो फोटो करत कावकाव करतंय? त्यांच्याकरता.
आजच केली. चवीला आवडली. वासावरुन वरीचे तांदूळ आणि दाण्याच्या आमटीची आठवण झाली (साखिपेक्षा)
सोप्प्या रेसिपीबद्दल थॅन्क्स.
quinoa sprouts मध्ये पण मिळेल
quinoa sprouts मध्ये पण मिळेल का? कॉस्टको मध्ये एक्दम खूप घ्यावं लागतं
शूम्पी, whole foods ट्राय कर.
शूम्पी,
whole foods ट्राय कर. कदाचित कमी वजनाची पाकिट मिळतील.
whole foods मध्ये २००
whole foods मध्ये २०० ग्रॅमचे पॅक्स आहेत, मी कालच आणले. आज खिचडी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages