Submitted by नीलू on 11 January, 2009 - 14:19
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विनय,
विनय, धन्यवाद! एक शंका : मालवणीच्या शाळेत तुमी
१. वर्तमानकाळ : तृतीयपुरुष : तो/तां/ते बोलता/बोलता/बोलतत.
२. भूतकाळ : तृतीयपुरुष : तो/तां/ते बोललो/बोललां/बोलले.
३. भविष्यकाळ : तृतीयपुरुष : तो/तां/ते बोलात/बोलात/बोलतीत.
असां लिहिलांस. ही सगळी रूपां एकवचनातलीच आसत मा? मग अनेकवचनी रूपां कशी आसत?
अजून एक प्रश्न :
१. वर्तमानकाळ : प्रथमपुरुष : मी बोलतंय;
२. भूतकाळ : प्रथमपुरुष : मी बोललंय;
३. भविष्यकाळ : प्रथमपुरुष : मी बोलान;
ही सारी रूपां पुल्लिंग अन् स्त्रीलिंगात सामायिक आसत काय?
नीलू, व्याकरणही काई खरां तर मोठ्ठी गोष्ट नसां. नेहमी आपण नियम पाळत असतो, त्यांचे पॅटर्न ओळखायची खूणगाठ म्हणजे व्याकरण.
गुरुकाका, तुमका जमात तसां लिहा.
बरां, मी खेळातलां पहिला वाक्य लिहितंय : "तीळगूळ घेवा अन् गोड बोलां" (लालूकडून साभार.
)
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
>>नसां नाय
>>नसां
नाय आसां. नसां असो शब्द नाय आसा कोकणीत.
मला मालवणी
मला मालवणी भाषा आवडते / मला हापूसचा आंबा आवडतो....भाषांतर शिकूचा आसा.
मला मालवणी
मला मालवणी भाषा आवडते / मला हापूसचा आंबा आवडतो....<<< माका मालवणी भाषा आवाडता / माका हापूस आंबो आवाडता.
बापूस = बाबा
आव्स, आये = आई
भाव = भाऊ
भय्न = बहिण
सगळ्यांनी तिळगुळ घेवा आणि गोड मालवणी बोला.
शाळा सुटली पाटी फुटली, आये माका भुक लागली.
फ खरा
फ
खरा हा.
नाय नाय म्हणता तुका तर मस्तच जमता हा. 
अशेच ईन्सपेक्शनाक येयत रवा.
अनेकवचनी रूपां
१. वर्तमानकाळ : तृतीयपुरुष : ती लोका/माणसा बोलतत.
२. भूतकाळ : तृतीयपुरुष : ती लोका बोललेली / ते बोललले.
३. भविष्यकाळ : तृतीयपुरुष : ती लोका बोलतली.
विनयानू बरोबर लिवलय मा??
पुल्लिंग अन् स्त्रीलिंगात वाक्या सामायिकच असतत ह्या बरोबर
धुळ्यांनू
फ आणि नानांनी शिटी फुकली हा तेव्हा पटापट सगळ्यांनी वाक्या बनवूक लागा. नियम कळलो मा. वाक्य्/क्रियेच्या अनुषंगान फुडला वाक्य.
"तीळगूळ घेवा अन् गोड बोलां", "माका हापूस आंबो आवाडता".
नमस्कार
नमस्कार गजालीकरानु,
मी बोलतंय तीळगूळ घेवा अन गोड बोलां.
मालवणीत ळ आसता काय? माका वाटला फक्त ल असता ळ नाय.
मालवणी शिकाक माका वांगडा चल ना गे - माझ्या सोबत (सगळे) मालवणी शिकायला चला.
माका कोकण मोप आवडतां - मला कोकण खूप आवडते
गुर्जी बरोबर असतंत काय माझो होमवर्क?
मालवणी
मालवणी भाषेत 'ळ' आसा...
माका कोकण मोप आवडतां - आवाडता (अनुस्वार नाही)...
गुर्जी बरोबर असतंत काय माझो होमवर्क? - बरोबर आसा काय ....
तीळगूळ घेवा अन् गोड बोलां - बोला (अनुस्वार भरपूर वापरलेले असले तरी हंय चूक)...
भय्ण - भेणीस - बहीण... (थोडां आजून अशुध्द बोललात तर भय्न )
१ले वाक्यः तो सकाळी उठून बाहेर पडला (मालवणी रुपे लिहा)...
(काळ, लिंग, आणि बहुवचन वापरून).
उदा: (भूतकाळ. स्त्री: ती सकाळी ऊठान भाय्र पडली )..
(भायर ह्या शब्दात अर्धो 'य' अभिप्रेत होतो पण मायबोलीवर लिवाक येणां नाय).
विनय
शुभ फाटफट
शुभ फाटफट (सकाळ) मंडळीनू.
चला बेगीना (लवकर) येवक लागा. भरपूर वर्गपाठ आसा तेवा करुक लागा.
सुफाटफट
सुफाटफट मालवण्यांनू,
कशे आसा ? बाई, गुरुजी, पयलेच इले मा?
.
.
'ग्रीन फ्ल्युरोसंट प्रोटिन' च्या शोधाबद्दल्'नोबेल' (२००८) - जपानी संशोधक ओसामु शिमोमुरा
सुफाटपट
सुफाटपट गाववाल्यानू,
मी उद्यापासून येतय कोंकणी / मालवणी व्याकरणाचे थोडेशे धडे घेवक.
आवशिक
आवशिक खांव! अजुन कोणी गाळी कश्यो शिकवूक नाय?
मन्याभाऊ
मन्याभाऊ गाळ्ये शिकवूक तुमकाच येवचा लागात.


आणि काय ह्या आज एकव विद्यार्थी नाय??
फ, बघ रे बाबा, सगळ्यांका नुस्ते फकांडे मारुक होये. वर्गपाठ दिल्यार सगळे गायब??
संक्रातीची सुरुसुरी किंक्रातीक शाप सरली की काय?
"तीळगूळ
"तीळगूळ घेवा अन् गोड बोलां", "माका हापूस आंबो आवाडता", "माका काय बरा आवाडता !!! माका फणसाचो गरो आवडता. निलूबाय, उद्याक आणशिला काय ?"
.
.
'ग्रीन फ्ल्युरोसंट प्रोटिन' च्या शोधाबद्दल्'नोबेल' (२००८) - जपानी संशोधक ओसामु शिमोमुरा
गजाली करत
गजाली करत शिकूकच मजा येता गो नीलूताय
गो आश्विनी
गो आश्विनी अजून झाडावर कुवरेच (कच्चो फणस) आसत. साटा(फणसपोळी) चालतीत तर घेवन येतय.
शैलू ता खरा पण येवक तरी होया त्यांनी.
सुफाटफट,
सुफाटफट, कशे आसात?
माझो गृहपाठ बराबर आसत मा?
१ले वाक्यः तो सकाळी उठून बाहेर पडला (मालवणी रुपे लिहा)...
वर्तमान काळ
मी सकाळी ऊठान भाय्र् पडतंय
तू सकाळी ऊठान भाय्र् पडतस
ते सकाळी ऊठान भाय्र् पडतत
भूतकाळ
मी सकाळी ऊठान भाय्र् पडलंय
तू सकाळी ऊठान भाय्र् पडलस
ते सकाळी ऊठान भाय्र् पडले
भविष्यकाळ
मी सकाळी ऊठान भाय्र् पडान
तू सकाळी ऊठान भाय्र् पडतीत
ते सकाळी ऊठान भाय्र् पडतीत
हुश्श!! झालो एकदाचो :). माका एक प्रश्न आसा, हे सगळं लक्षात कस ठेवायचे?
सुफाटफट,
सुफाटफट, कशे आसात सगळी?
मास्तरानु आज माका गृहपाठ करुक वेळ नसा. नंतर येतलो. चालेल ना?
माका एक प्रश्न्न आसा - कोकणी आणि मालवणी सारखीच असते का?
ओ नीलूबाय,
ओ नीलूबाय, विनय गुरुजी, सगळं एकाच धाग्यावर लिहिण्यापेक्षा दर ३-४ दिवसांनी (किंवा दर आठवड्याला) नवीन धागा सुरु करा (मालवणी शिकायचंय्?-१ आठवडा, मालवणी शिकायचंय्?-२ आठवडा). म्हणजे मधूनच वर्गात येणार्याना जिथून राहिलं असेल तिथून सुरू करता येईल. आणि एखाद्या अभ्यास न करणार्या विद्यार्थ्याला "जा पहिले २ आठवडे परत वाचून ये अशी शिक्षा पण करता येईल".:)
दुसरा फायदा म्हणजे एखादी थीम घेऊन शिकवता येईल. या आठवड्यात सगळे आकडे, पुढच्या आठवड्यात फक्त प्रवासाशी संबंधित. इत्यादी.
माझे २ आणे
रुनी..
रुनी.. प्रयत्न चांगलो हा..
मी च्या बदली म्या लिवलस(लिहीलस) तर अजुन मजा येते..
भविष्यकाळ
मी सकाळी ऊठान भाय्र् पडान >> म्या सकाळीच उठान बाहेर पडतलय्(जातलय)
तू सकाळी ऊठान भाय्र् पडतीत >> तू सकाळीच उठान बाहेर पडतलस (जाशीत)
ते सकाळी ऊठान भाय्र् पडतीत>> ते सकाळीच उठान बाहेर पडतले(जातले)
असाच लिवत्(लिहीत), बोलत रवला(राहीले),वाचत रवला की लक्षात रवात्(राहील)
वर्षा.. ह्या (हे) असा व्हया(हवे)
नंतर येतलो. चालेल ना? >> नंतर येतलय.. चलात मा..
कोकणी आणि मालवणी सारखीच असते का? >> जेवणाची चव सारखी असता.. भाषेत वायच(थोडा) फरक पडतो..
यो शिकलसं
यो शिकलसं मा..

एडमिनने
एडमिनने बरोबर सांगला. नायतर सगळाच गवातगुळा होता. मी शब्दांच्या जातीसाठी [व्याकरणातले] स्वाध्याय तयार करतसय.कोंकणी आणि मालवणी. आठवड्यात एकदा.तरच नीट अभ्यास होयत. आणि ह्या धाग्याचो उपयोग होयत.नायतर सोमा गेलो पाटपरुळ्याक.........
>>सोमा गेलो
>>सोमा गेलो पाटपरुळ्याक.........
शैलजा ,
शैलजा , तुज्यावर एक जबाबदारी सोपवतय. तुका जो कोंकणी शब्दकोश दिलय त्येच्यातून तू रोज उपयोगात येणारे शब्द निवडून समान शब्दाचे तीन कॉलम करून म्हणजे मालवणी, गोय कोंकणी, कारवारी कोंकणी असो एका येगळ्या " कोंकणी भाषा शब्दकोश" धाग्यात लिव.
रे योग्या
रे योग्या शिकवणी एकदम जोरात रे
फक्त तिने भायेर बरोबर लिवल्यान आसा.
तू बोलत रवशील तर लक्षात ठेवची कायेक जरुर नाय, ता आपोआप येतालाच 
रुनी पहिलो आठावडो १०० मार्क
ऍडमिनानू ही एकदम बेस्ट कल्पना. तुमका धन्यवाद. आता १९ तारकेक नवीन धागो.
काकानू तुमी शिकवूक कधी सुरुवात करतास? पुढल्या आठ्वड्यात कोणती थीम घेवया मगे?
शब्दाच्या
शब्दाच्या जाती...कोकणी / मालवणी.
गाववाल्यानू, एक घरगुती अडचणीत आसय तेवा आठ दिस उशीर होता , त्याबद्दल दिलगिरी.
तोपर्यंत
तोपर्यंत शैलजाक तुमका शब्द तिनय प्रांतीय बोलीचे दीवक सांगलय.
फाल्याच्य
फाल्याच्यान करतय हो काका
माका एक
माका एक प्रश्न आसा, हे सगळं लक्षात कस ठेवायचे?>>>
म्या महत्वाचं मालवणी शब्दं 'शब्दा'मदं कोपी करत आसतंय.
माका
माका मालवणी/कोकणी शिकुचा...
नवा विद्यार्थी....
आज रुनी
आज रुनी एकटां अभ्यास करता दिसता... बाकीच्यांच काय फटकी इली काय रे?
विनय
Pages