Submitted by नीलू on 11 January, 2009 - 14:19
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देसायगुर्
देसायगुर्जी, सकाळी ऊठान भाय्र पडतंय म्हणून अभ्यासाक वेळ मिळत नसा. कसा करावा?....(जमला का माका?)
अभ्यासाक
अभ्यासाक वेळ मिळत नसा. कसा करावा?.... <<<<
अभ्यासाक वेळ मिळणां नाय. कसां करुचां?....
विनय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सस्नेह
सस्नेह नमस्कार !
माका पण मालवणी शिकाक आवडात. तसा थोडा जमता पण कधी कधी शब्द मिळना नाय, मालवणी भाशा म्हणे थोड्या थोड्या अन्तरावर बदलता काका त्येच्याबद्दल थोडा सान्गश्याल काय?
काका, हयसर
काका, हयसर लिवाक सुरु केलसय कोकणी बोलींतले शब्द, ही लिंक http://www.maayboli.com/node/5284
सुफाटफाट.
सुफाटफाट. कशे आसात सगळे?
आजचा अभ्यास काय आहे?
सगळे खय
सगळे खय असत. शाळेक रजा असा की काय ?
अरे वा,
अरे वा, विशाल मालवणीत्सून बोलूक सुरुवात केलस तर! छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थोड्या
थोड्या थोड्या अन्तरावर बदलता <<<<
सगळ्याच भाषांच्या बाबतीत असां होता..
म्हणान तर मालवणी बदलत बदलत एकदम गोयंकारी होता....
आता उदाहरणा आठावणत नाय पण सांगान कदीतरी..
आजचो गॄहपाठः मी आडसार फोडून पाणी पितलंय... (व्याकरण चालवा)..
विनय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रे
रे विद्यार्थ्यानो आणिक गो विद्यार्थीनीनो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भायर पडतय म्हणपाचे ना (बाहेर पडणे म्हणजे जगाच्या बाहेर पडणे / मॄत्यु पावणे असा अर्थ होतो)
भायर सरतय
भायर सरतलय अशे म्हणपाचे
देसाई
देसाई मास्तरान्नु फोडान जास्ती करेक्ट वाटणां ना ?
माहित नाही...
वर्तमान काळ
मी आडसार फोडान पाणी पितंय
तू आडसार फोडान पाणी पितंस
ते आडसार फोडान पाणी पितत
भूतकाळ
मी आडसार फोडान पाणी पियालय
तू आडसार फोडान पाणी पियालस
त्यांनी आडसार फोडान पाणी प्यायल्यान **??
भविष्यकाळ
मी आडसार फोडान पाणी पिईन
तू आडसार फोडान पाणी पिश्याल **??
ते आडसार फोडान पाणी पितले
बरोबर ?
माजी म्यॉप
माजी म्यॉप दिवस शाळा बुडली....आता बघोक हवा मास्तरांनी काय काय शिकवलानी त्या???
बरा, थोडो काय तो अभ्यास केलंय तो बघा हो मास्तरांनु?
तु खयं जातंस???>> तु कुठे जातेस??
तुका काय हवा??>> तुला काय हवे??
काय झाला गो तुका??>> काय झालं ग तुला??
ये गो बाय, हिकडं ये तु..>> ए, बाळा, इकडे ये तु...
काय गो, बरा चालला ना तुझा??>> काय ग, बरं चालल्यं ना तुझं??
अजुन काही....:)
कोकणी बोलताना'भेटणे' ह्या क्रियापदाची रुपे जास्त वापरली असतात...;'तां भेटलां माकां' वगेरै,,, वस्तु सुध्दा भेटते इथे आपल्याला...:)
आणखीन म्हणजे वेलीला फळ (काकडी) लागली असे म्हणताना आम्ही कोकणी माणसं 'तोवसा पडला वाटंता' असे म्हणतो...अकोकणी माणसाला मात्र 'पडणे' यांचा अर्थ लागयला खुप वेळ लागतो...:डोमा:
हो दीपाली
हो दीपाली याच्यावरुन आठवले एक कोंकणी मुलगी आमच्या होस्टेलवर होती, ती म्हणायची तुम्हाला काल रात्री चांगली झोप पडली का मला नाही पडली. तेव्हा झोप पडली ऐकुन खूप हसायचो आम्ही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मास्तरांन
मास्तरांन्नु ह्या काय चल्ला काय हा? माका काय बी सुधरत नाय हा.. शिंचे अभ्यास सोडान गजालीच जस्त करतात, पोकळ बांबूचे मारुक व्हये ह्यांका...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाळा बंद
शाळा बंद पडली काय ?
आता माका मालवणी कोण शिकवतलो.
मीया तुमका माझ्या मालवणी भाषेतसुन एक जोक सांगतय. तो तुम्ही माका तुमच्या correct मालवणी भाषेतसुन सांगा.
एका सासुन आपल्या ३ जावयांची परिक्षा घेवची ठरवली. तिका बघुचा होता कुणाचे तिच्यार जास्त प्रेम आसा ते.. मोठ्या जावयाक घेउन ती नदीर गेली. थय तीने पाय घसरल्यान सारखे केल्यान. जावयान तीका पटकन भायर काढल्यान आणि तीचो जीव वाचवल्यान. दुसरे दिस त्याच्या दारान नविन फटफटी उभी रवली. तिच्यावर लिवलेला, "प्रेमळ सासु कडसुन भेट"
मधल्या जावयाबरोबर पण तिने ह्याच नाटक केल्यान, त्याने पण तीका वाचवीले.. दुसरे दिस त्याच्या दारान सुद्धा नविन फटफटी उभी रवली.
धाकल्या जावयासोबत त्याची परिक्षा घेउक ती नदीर गेली व परत त्याच नाटक केल्यान. जावयान मनात म्हटल्यान, "मरता तर मरुंदे " तो तिच्याकडे अजिबात लक्ष देवुक नाय आणि ती मेली.
पण दुसरे दिस त्याच्या दारान ८ लाखाची नवी कोरी करकरीत गाडी उभी.. तिच्यावर लिवलेला, "धन्यवाद प्रेमळ सासर्याकडसुन भेट"
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
सगळे चिप
सगळे चिप चाप बसान हय .. आब्यास करतंत.. अन तु काय ऑफ पिरियड असाल्यागत ह्या जोक सांगतंय ? मास्तर इल्यार तुका फटके पडतले ह्या मात्र नक्की...
सतिश
सतिश मालवणीत विनोद मारता... हरकत नाय....
आजून बर्याच लोकांनी अभ्यास सुरू करूक नाय हा... तेंका फटके..
कोकणी बोलताना'भेटणे' ह्या क्रियापदाची रुपे जास्त वापरली असतात <<<<<<
खरां तर मालवणीत 'भेटणे' ह्या क्रियापद 'भेटणे' असांच वापरलां जाता..
तेचो अति उपयोग हो चाकरमान्यानी केलेल्या अपभ्रंशामुळे होता...
(चाकरमानी: कोकणात्सुन मुंबैक गेलेले मालवणी.. हे लोक मराठी मालवणी मिश्र बोलतत)...
माका आंबे गावले - माका आंबे भेटले.
माका इजगो भेटलो - माका इजू भेटलेला..
परत तोच प्रश्न...मालवणी ही लिवलेली भाषा नाय. तेवां ह्यां बरोवर तां चुक असां म्हणाक येणां नाय.
पण मी गावात बरीच वर्षां होतंय. 'भेटले' म्हणणारे लोक फक्त चाकरमानी.
'पडले' ह्यां मात्र अगदी बरोबर. आम्ब्याक मोहोर पडता, वेलीक फळां पडतत, आणि काही पोरांक फटके पण पडतत..
गॄहपाठः तिकीट विकत घेणां (चालवा) ...
विनय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरे आसत ना
बरे आसत ना सगळे, शाळेक रजा असा काय २६ जानेवारीची?
मास्तर, थोडा अभ्यास केलंय तो बघा हो बरोबर असा का.
वर्तमान काळ
मी तिकीट विकत घेतंय
तू तिकीट विकत घेतंस
ते तिकीट विकत घेतत
भूतकाळ
मी तिकीट विकत घेतलय
तू तिकीट विकत घेतलस
त्यांनी तिकीट विकत घेतल्यान
भविष्यकाळ
मी तिकीट विकत घेईन
तू तिकीट विकत घेतल
ते तिकीट विकत घेतले
बहुतेक सगळेच चुकले.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वर्षाबाय
वर्षाबाय १०० पैकी १०० मार्क गो
बाकी सगळी मंडळी थंडावलीत.
बाकी जोक मस्त आसा.
सतीश तुमका मॉनिटर करुया??
आता पुढल्या वर्गात जावया.. विनयांनु विद्यार्थांका आता काळांचो अभ्यास बर्यापैकी जमता तर पुढलो अभ्यासक्रम काय तो ठरवा.
Pages