निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकिता Happy

निकिता चार टोमॅटो? खूपच झाले की! माझ्याकडे झाडाला एक मिरची जरी आली तरी मला आणि लेकीला कोण कौतुक असते! तेंव्हा अभिनंदन!

कुंडीत झाडे असणार्‍या लोकांसाठी - कुंडीत मातीऐवजी भुसा / नारळाच्या शेंडीचा भुगा आणि शेणखत यांचे मिश्रण वापरावे. हल्लीच पुण्यात एका मित्राकडे त्याचा वापर बघितला. झाडे मस्तच वाढली होती. तो कायम भुसभुशीत रहातो (शेवटी भुसाच तो! Happy ) त्यामुळे मुळांशी हवा कायम खेळती रहाते. त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मातीहून बरीच जास्त असते. मित्राच्या म्हणण्यानुसार ३-४ दिवस गावाला जायचे असले तरी झाडांना पाणी कोण घालणार हा प्रश्ण नसतो. पुण्यातल्या नर्सर्‍यांतून तर हल्ली भुशाची विटच विकत मिळते. ठाण्याला मला अजूनतरी मिळाली नाहिये.

माधव, उसवाल्याकडुन उसाचा चोथा आणुन तो बारिक कापुन घातला तरी सेम भुशासारखा इफेक्ट येतो. आणि वर मातीवरही उसाचा चोथा पसरायचा. आपल्या कुंडीत इतर कचरा वाढतो तो जरा कमी होतो यामुळे.

साधना उसाच्या गोडीने मुंग्या नाही येत का? मी मागे कोणीतरी सांगीतले म्हणून गुलाबाला चहाचा चोथा घालत होतो. कुंडीत वारूळच केले मुंग्यांनी. बाजूच्या कुंडीत पण शिरल्या होत्या Sad

मी सध्या भाजांचे देठ, साले वगैरे मिक्सरमधून बारीक करून ते मातीवर घातले आहे (लोकसत्तामधला लेख वाचून) त्याने तण बरेच कमी झाले आहे. पण परत मिक्सर त्या कामाकरता मिळण्याची शक्यता नाहिये Happy

माधव चहाचा चोथा थोडा पाण्यातुन काढून घालायचा म्हणजे त्याची साखर निघुन जाते. आणि पांढर्‍या गुलाबाला हा चोथा घातलात की गुलाबाला छान गुलाबी छटा येते. मी करायचे आधी. सध्या वेळ नसतो तेवढा. पण घरातला बाकीचा ओला कचरा म्हणजे भाजीची देठ, साल वगैरे मात्र मी न विसरता झाडांच्या बुंध्यात टाकते.

चोथ्याला आणुन ठेवल्यावर पहिल्या दिवशी काळ्या मुंग्या येतात. मी आणुन उन्हात टाकला दोन दिवस. वास आला थोडा पण मी दुर्लक्ष केले. Happy एकदा चोथा वाळला की मुंग्या येत नाहीत. कुंडीत घालुन त्यावर पाणी टाकले तरीही मुंग्या येत नाहीत. हा चोथा लवकर कुजत नाही. पण दीर्घकाळ ओलसर राहतो. वरुन चोथा टाकुन पाणी टाकल्यावर आतली माती लवकर वाळत नाही. दोन दिवस जरी पाणी दिले नाही तरी झाडांना फरक पडत नाही. माझे कधीकधी द्यायचे राहते.

आधी कुंड्या भरताना मी कुंडीत पाणी जाण्यासाठी छिद्र असते तिथे खापराचा तुकडा ठेऊन मग कुंडी भरायचे. आता कुंडीत खापर न घालता पाव कुंडी भरेल इतका उसाचा चोथा घालते मग त्यावर माती घालुन त्यावर झाडाची स्थापना आणि मग कुंडी हवी तेवढी भरुन वरुन पुन्हा चोथ्याने झाकते.

जागु तुझ्या रोपट्यांना कळ्या आल्या गं एकदाच्या. तु सांगितल्यापासुन मी रोज नजर ठेऊन होते.

ऊसाचा चोथा उत्तम खत म्हणून कार्य करतो. रसवंती गृहातला चोथा चांगला, कारण त्यातला साखरेचा बराचसा अंश काढून घेतलेला असतो. पण शंका असेल तर तो पाण्यातून धूवून वापरावा. (लोकसत्तात एक ल्ख होता)

आमच्या शाळेत मातीविना शेतीचे यशस्वी प्रयोग केले होते. त्यासाठी जाड वाळू (बांधकामात चाळून घेतात, त्यावर उरलेली) भाताचे तूस आणि शेणखत यांच्या मिश्रणात झाडे लावली होती. छान वाढली होती.

निकिता : त्या चार टोमॅटोचे चार प्रकार करायचे बरं का !

सावली, त्या क्लॅमचे जे रंगीत "ओठ" असतात त्यात शैवाल असते.

मी यावेळेस कुंडीत माती भरतांना खाली नारळाच्या शेंड्या घातल्या, त्यावर माती घातली, त्यात गुलाबाच रोप लावल. आणि खरच ते रोप जोमाने वाढतय.
माझी आणखीन एक सवय - निर्माल्यात किंवा तोरणात असणारी झेंडू शेवंती अशी फुल मी वाळवुन ठेवते आणि पुर्ण वाळली की कुस्करुन कुंडीत टाकते. झेंडू तर हमखास उगवतो पण यावेळेस गेंदेदार शेवंती सुध्दा आली आहे. आधी तण आहे अस वाटुन ते झाड मी उपटणार होते पण वाटल असु दे बघु तरी काय आहे. ते फुल पाहील्यावर मात्र मी माझ्यावरच खुष झाले.

दिनेशदा,
छान आणि भन्नाट माहिती मिळाली !
याला गोखरु म्हणतात ते "आज" (फक्त २५ वर्षानंतर) कळालं
Happy
शाळेत असताना हे रस्त्याकडेला खुप दिसायचं,याला लहान पिवळी फुले असायची (बहुतेक पावसाळ्यानंतर) याला सगळे 'चुरचुर बोंड' अस म्हणायचे, याचे लहान बोंड तोडुन आम्ही एकमेकाच्या हातापायाला लावायचो, मग भांडणे ठरलेली कारण यामुळे लावलेल्या जागी खुपच खाज सुटायची.
Happy

ही माझ्या कुंडीत फुललेली डेलिया आणि गुलाबाची फूले.
मी पण घरातील ओला कचरा (भाज्यांचे देठ,साल, र्निमाल्य इ.) कुंडीतच घालते नेहमी. वेगळी खत नाही घालावी लागत मग झाडांना.
17022011023.jpg15022011012.jpg24022011043.jpg

एडेनियमच्या झाडाला चांगली करंगळीभर उंचीची गुलाबीसर कळी आली आहे!!!!! Happy एकदोन दिवसात पूर्ण उमलणार. Happy

माझ्याकडे शेंगा लागल्या, त्याच्या बिया मी कालच काढल्या आणि रुजतही घातल्या. एक करंगळीभर उंचीचे एडेनियम आहे सध्या माझ्याकडे. निकिता तुझा पत्ता पाठव, तुला कुरिअर करते.

साधना आणि जागू, तुमच्यासाठी लाल सदाफुलीच्या बिया काढुन ठेवल्या आहेत. एक शेंग फुटुन कुंडितच बिया पसरल्या त्याचेहि एक छोटेसे रोप आले आहे. Happy

मग आता बिया-फुलांची देवाणघेवाण उर्फ मिनी गटग करावा काय??

दिनेश, या महिन्यात तुमच्या घरी भेट द्यावी लागेल बहुतेक. शेवटच्या आठवड्यात गावी जायची स्वप्ने रंगवतेय. घरी उगवलेल्या पॅशनफ्रुटला मुळ दोन आणि नंतर दोन अशी चारच पाने आली. त्यासोबतच उगवलेला कलिंगडाचा वेल अर्धा फुट वाढलाय.

मग आता बिया-फुलांची देवाणघेवाण उर्फ मिनी गटग करावा काय??>>>>>>चलेगा Happy पुढच्या महिन्यात राणीच्या बागेत????? पाचुंदा, मणीमोहरचा बहर पाहुया. Happy

हा धागा तांत्रिक कारणासाठी बंद करतोय. एकाच धाग्यावर खूप प्रतिक्रिया असतील असे धागे हळूहळू बंद करावे लागतील (सर्वरचा ताण कमी करायला). हवे असल्यास निसर्गाच्या गप्पा-२ असा धागा सुरु करा. आणि शक्य असेल तेंव्हा झाडांव्यतिरिक्त गप्पा नवीन धाग्यावर सुरु करा.

Pages