Submitted by नीलू on 11 January, 2009 - 14:19
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोन सादं
कोन सादं शब्द सांगताल काय माका? (जमले काय काही?) एकदम बेसिक!
फ, तुजी
फ,
तुजी सुचना बरोबर आसा. तश्या प्रकारचा व्याकरण लेखन आसा माज्याजवळ. पण माका जमणा नाय हयसर जास्त वेळ येवक. तरी मी प्रयत्न करतलय. धन्यवाद ! माज्याजवळ श्री. सुंठणकर या लेखकांचा "कुठ्ठाली भाषा व्याकरण" [कुडाळ प्रांतीय भाषा--जुन्या सावंतवाडी संस्थानातील ] नावाचा एक पुस्तक होता पण ता हरवला. पण मी तशा प्रकारचो प्रयत्न चालू ठेवलय मालवणी भाषा या स्वरुपात.
ते फ नी
ते फ नी सांगीतलय त्याचे गजाली करुन बाफच्या सुरुवातीला ठेवायला हवे म्हणजे आत येणारा प्रत्येकजण वाचुन आत येईल आणि अडखळत का होईना बोलायला सुरुवात करेल.

नाना,
याचे पण आऊटसोर्सिंग केलय भारतात त्यामुळे आपल्या रात्रपाळीत वर्ग असतात यांचे आता कोणी नाही. देसायानु जरा इकडे येवुन शिकवा की, विद्यार्थी उत्साही आहेत पण मास्तरच गायब.
माझा गृहपाठ :
ही मायबोलीची मालवणी शाळा आहे : हे मायबोलीक मालवणी शाला असा.
ही
ही मायबोलीची मालवणी शाळा आसा.....
१. वर्तमानकाळ
क्रम : एकवचन; अनेकवचन
प्रथमपुरुष : मी बोलतंय; आमी बोलतों.
द्वितीयपुरुष : तू बोलतस; तुमि बोलतास.
तृतीयपुरुष : तो/तां/ते बोलता/बोलता/बोलतत.
२. भूतकाळ
क्रम : एकवचन; अनेकवचन
प्रथमपुरुष : मी बोललंय; आमी बोललों.
द्वितीयपुरुष : तू बोललस; तुमी बोललास.
तृतीयपुरुष : तो/तां/ते बोललो/बोललां/बोलले
३. भविष्यकाळ
क्रम : एकवचन; अनेकवचन
प्रथमपुरुष : मी बोलान; आमी बोलां.
द्वितीयपुरुष : तू बोलशीत; तुम्ही बोलश्यात.
तृतीयपुरुष : तो/तां/ते बोलात/बोलात/बोलतीत.
विनय
देसायानु,
देसायानु, पैला धडा तर झकास आसा. पण माका एक प्रश्न आसा... (खय म्हणजे काय?)
माका पण
माका पण शिकूक आसा....
समद्या
समद्या गजालीकरानू संक्रांतीचो शुभेच्छा!
मी
मी विचारतंय ते द्वितीयपुरुषी 'तू बोलतंस, बोललंस' हे स्त्रीलिंगी, पुल्लिन्गी सारखाच असतां काय? कोण सांगशीत?
नीलू माकाव
नीलू माकाव ऍडमिशन देतीस काय गो तुज्या क्लासात?
संक्रांती
संक्रांतीचे शुभेच्छा सगळ्यांका
माका पण
माका पण तुमच्या वांगडा मालवनी / कोंकणी भाषेत गजाली करुक शिकुचा असा. आज संकष्टी चतुर्थीच्या मुहुर्तार मीया admission घेतलय. इतके दिवस तुमचे गजाली फक्त वाचीत होतो. आता माका लिवुचा आसा. सगळ्यात पहिल्यांदा सांगा की माका कोकनी बोलुची लाज वाटता ति घालवणारी गोळी कुणाकडे असा काय ? माझो जन्म सावंतवाडिचो पण घरात आई, बाबा केवळ नातेवाईकांशी मालवणितुन बोलतत. त्यामुळे माझो कायमचो नन्नाचो पाढा. असो ..... मागे एकदा मायबोलीवर कोकणीतुन २ शब्द type केले, पण त्यातुन भयानक अर्थ निघाला. तेव्हा वेळिच मला अनिलभाईनी चुक दाखवुन दिली. त्यनंतर पुन्हा त्या फंदात पडलो नाही.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
कोकणी
कोकणी बोलूची लाज वाटता?
कशाक? स्वत:ची भाषा बोलूची लाज कसली??
माका कोकनी
माका कोकनी बोलुची लाज वाटता ति घालवणारी गोळी कुणाकडे असा काय >>>

सतीशा तुका गोळीयेची काय्येक गरज नाय. पथ्य-पाण्याची आसा
शिकपाचे पैली कोकणीचो अभिमान बाळग
आतापर्यंत
आतापर्यंत घरामध्ये किंवा गावात माझे इतरांशी होणारे communication हे mix असते. ते सर्वजण माझ्याशी मालवनित बोलतात आणि मी त्यांना मराठित उत्तर देतो. त्यामुळे मालवणि भाषेबद्द्ल मनात एक न्युनगंड (म्हणजे कार रे भाउ ) निर्माण झाला आहे.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
सुफाटफट,
सुफाटफट, कसे असता सगळे? (बहुदा चुकलेच असावे)
नीलग्या
नीलग्या माकाव ऍडमिशन गावणा नाय काय?
वर्षा, कशी
वर्षा, कशी आसात / आसत सगळी, किंवा कशे आसत /आसात सगळे असा म्हणूचा गो
सतीश, आपली भाषा शिकूक, बोलूक लाज नको. लाज धरल्यार काय्येक येवचा नाय.. बिंधास्त बोलूक सुरुवात कर, म्हणजे हळू हळू जमात व्यवस्थित.
सगळ्यांका
सगळ्यांका शु. फा..

कशे (कसे) आसात्(आहात) तुम्ही ??
सुशेगात (मजेत) मा (ना) ?? ..
इतके मॉप्(भरपुर) संख्या बघान्(बघुन) बरा (बरे) वाटला(वाटले)..
येवत(येत) रवा(रहा) म्हणजे आपुसकच शिकात(शिकायला) व्हतला(होईल)..
हुश्श्य आत
हुश्श्य
आत्ताच जुन्या मायबोलीवरील मालवणी भाषेबद्दलचं हितगुज वाचले. तिथे आढळलेले शब्द भांडार माझ्या परिने एकत्र केले. त्यासाठी जुन्या मायबोलीकरांना अनेक धन्यवाद.
सगळ्या
सगळ्या विद्यार्थांका संक्रातीचे हार्दिक शुभेच्छा!!

तुका काय नाय जमला तर त्यांका ईचार.
तरीपण तुका सांगूचो प्रयत्न करत्य पण दोन दिवस वायच बिजलय, तोपर्यंत काका आणि ईतर तुका मार्गदर्शन करतीतच.
सगळे अगदी आवडीन शिकतत बगूनच खूपखूप बरा वाटला.
केदारा मेल्या तू कसले मार्क मागतस तू तर हयलो प्रोफेसर
वायच बिजलय. उद्यापासून येतय सगळ्यांची हजेरी घेवक.
गो दिपाली माझ्यापेक्षा हुशार नी जाणते गुरु(जी), विनय मास्तर, भावना आणि शैलूबाई आसत. सोबतीक केदार, मिलिंद, योगी आसततच.
फ, तुझो मेसेज वाचलय पण ईतक्या व्याकरणासह मालवणी नाय शिकलय जसा जमात तसा बोलतय. आणि खरा सांगाचा तर हय मायबोलीवर ईल्यावरच या सगळ्यांशी बोलून बोलून्च माका ईतक्या बरा मालवणी बोलूक येव लागला.
दक्षिणा तुका सर्टीफिकेट देवच्या ईचारात होतय आणि तू ऍडमिशन कसला मागतस?
शैलूबाई
शैलूबाई

टाय! बिजलसय तां कळला गो
फ, मिव थोडो
फ, मिव थोडो प्रयत्न करीन तु सांगलस तसा सांगुचो उद्या परवापर्यत. आज थोडा बिझी
त्येका गो नाय म्हणाचा रे म्हणाचा.
दिपाली.. साजिरा ह्यो झिल आसा तु त्येचा चेडु करुन टाकलस.
मी इथे
मी इथे नवीनच आहे. माझं आजोळ कुडाळ असल्यामुळे मालवणी ऐकलेय. पण बोलता येत नाही.
आता प्रयत्न करेन.
मी लहानपणी खूप रडकी होते, त्यामुळे सगळे आईला 'काय गो? तुझा चेडु/झिलाक किती रडता गो?' असे विचारायचे, असे ती सांगते. इतकच मालवणी येतं
~साक्षी
अगे
अगे बाय्...माका महित नव्हता हो.....आता सॉरी कि काय ता , ता म्हणतयं...:)....
खरं आमचे
खरं आमचे गाव(माहेर) सांगली जिल्हातले..पण वडिलांची नोकरी(शिक्षक) कोकणात(देवगड तालुक्यात) असल्याने लहानपण लाल मातीत च गेले....शाळा संपली तसे कोकणी बोलणे कमी होत गेले....आज हया बीबी(का बाफ) ,त्यांच्यामुळे पुन्हा आठवणी जाग्या झाल्या....खुप बरं, समाधान वाटतं आहे..खुप थँक्स, निलु व बाकी ची जाणकार मंडळी ना !!!
तुमका सगळ्यांका मकरसर्क्रांतीच्यो हार्दिक शुभेच्छो!!!!
तिळगुळ घेवा नि गोड गोड बोला...आमचा तिळगुळ सांडु नका, आमच्यासंगे भांडू नका....
अरे वा
अरे वा दिपाली तू देवगडाक होतस छानच मगो
गाव खयचो तुमचो?
येत रव. 


जुन्या हितगुजवर मालवणी भाषेची आधीच भरपूर माहिती आसा. वायच थयसरव नजर टाका.
सत्यजित, तुमी तर शिकवूचा काम अगदीच सोप्या केलास
नाना, खय, खयसर म्हणजे कुठे.
रुनी, जमता हा
सतीश बिनधास्त बोला. काय चुकला माकला तर आमी आसवच. थोड्या दिवसान तुमीव आईबाबावांगडा मालवणीतून बोलूक शकशाल.
साक्षी, काय गो तुझा चेडू किती रडता ता ? असा
वर्षा, कशे आसास सगळे?
भाग्या, माका पण शिकूचा आसा
योग्या, काम चांगला चालू हा.
लालू, होय सारख्याच
जोरात आसा
जोरात आसा शिकवणी नीलूताय
खय म्हणजे
खय म्हणजे काय? <<<
खय (मालवणी) = कुठे' (मराठी )
मी विचारतंय ते द्वितीयपुरुषी 'तू बोलतंस, बोललंस' हे स्त्रीलिंगी, पुल्लिन्गी सारखाच असतां काय? कोण सांगशीत? <<<< (कोण सांगात? )
होय.... स्त्रीलिंगी, पुल्लिन्गी सारख्यांच....
तू बोलतस रे, तू बोलतस गे (गो)...
तू बोललस रे, तू बोललस गे (गो)...
मी लहानपणी खूप रडकी होते, त्यामुळे सगळे आईला 'काय गो? तुझा चेडु/झिलाक किती रडता गो?' असे विचारायचे, असे ती सांगते. इतकच मालवणी येतं <<<
मी ल्हानपणी खूप रडक्यां होतंय... म्हणात सगळे आईक 'काय गो? तुझां चेडू किती रडता गो?' असां विचारीत, असां ती सांगता... इतक्याच मालवणी येता...
विनय
आयटे,
आयटे, विद्यार्थीच जोरात मगे शिकवणी नको जोरात
दोन वर्षापूर्वी प्रभाकर ओगले यांची कथा माझ्या वाचनात ईली ती मी जुन्या हितगुजवर टाकलेलय त्याची हय लिंक देतय.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/110079.html?1149841425
.
अरे विनयानू तुमी ईलास, ता फ ने सांगल्याप्रमाणे एखादा वाक्य देवन शिट्टी फुंका बघू.
व्हयी तर!
व्हयी तर! नको कशाक? बरां वाटला इतके जणांका शिकूचा आसा मालवणी तां! भाषाच गोड गो
हापूसच्या चवीची 
Pages