गेले काही दिवस सुरु असलेल्या 'मराठी भाषा दिवस' उपक्रमांचा आनंद मायबोलीकरांनी घेतला. यात सहभागी झालेल्या आणि उपक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलेल्या सर्व मायबोलीकरांचे आभार. आज उपक्रमातील स्पर्धांचे निकाल जाहीर करत आहोत.
परीक्षकांचे मनोगत-
बोलगाणी, बालकवी अन निबंध या विभागातल्या सर्व प्रवेशिका ऐकल्या, पाहिल्या, वाचल्या. अगदी पुन्हा पुन्हा पाहिल्या, ऐकल्या. पाच वर्षाच्या आतल्या मुलांनी म्हटलेली गाणी पाहताना ऐकताना एकच विचार माझ्या मनात येत होता - त्यांच्या जिव्हाळ्याचे, ओळखीचे विषय अन नेहमीच्या वापरातली, कानावरुन जाणारी भाषा असल्याशिवाय मुलं ही गाणी इतकी समरसून म्हणणार नाहीत. कपात होता गर्रर्रम चहा ऐकताना मला घाबरायला झालं. छोट्या इराने 'नऊ लक्ष' म्हणताना नाक अन डोळे कसे विस्फारले असतील तेही डोळ्यासमोर उभं राहिलं.
गणपतीबाप्पाच्या पोटाची चिंता, घाईगडबडीत शाळेत पोचल्यावर सुट्टीचा दिवस आहे हे कळल्याचा आनंद, चित्याने फस्त केलेले प्राणी, या सगळ्याची मजा समजून उमजून ही गाणी म्हटली आहेत. शब्दांची जादू आत्तापासून या मुलांवर आहे हे ऐकून पाहून मराठी भाषेच्या परिस्थितीबद्द्ल, भविष्याबद्दल आशा वाटते.
पण निबंध विभागात पाचच प्रवेशिका आलेल्या पाहून थोडी खंत वाटली. स्वतःहून पुस्तक वाचण्याच्या वयातली मुलं. पुस्तकंच वाचत नसावीत का? दुसरा एखादा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय दिला असता तर जास्त प्रतिसाद मिळाला असता? की या वयातल्या मुलांकडून असं अवांतर काही लिहून घेणं किती कठीण असेल याची मला कल्पना नाही? यावर मायबोलीवर सक्रीय असणार्या पालकांचं मत जाणून घ्यायला आवडेल .
जागतिक मराठी दिनानिमित्त स्पर्धा घेण्याचं हे दुसरंच वर्ष. तरी या स्पर्धांना भरपूर प्रतिसाद मिळाला. पुढच्या वर्षी आणखीन स्पर्धक भाग घेतील, थोड्या मोठ्या वयाच्या मुलांचा, मोठ्यांचा प्रतिसाद जास्त प्रमाणात लाभेल अशी आशा. विजेत्यांबरोबर सर्व स्पर्धकांचे व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन.
*******
स्पर्धा निकाल :
बोलगाण्यासाठी सर्वोत्तम पाच तर "बाल"कवी आणि निबंध स्पर्धेसाठी प्रत्येक गटात एक विजेता निवडला आहे.
स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे-
बोलगाणी-
रुणुझुणू (सृजन) - इटुकला कप
तोषवी (सानिका) - उंदीरमामा
HH (HH यांची मुलगी) - एकदा आला एक चित्ता
स्वर (स्वरा) - वाघोबा लपला
पारिजात३०(श्रिया) - खेळण्यांची शाळा
निबंध
गट पहिली ते तिसरी
(मंजिरी) - अवनी
गट चौथी ते सहावी
(giri purohit) समृद्धी पुरोहित
गट सातवी ते दहावी.
(limbutimbu) धनश्री नित्सुरे
बालकवी
(कविता नवरे) - सानिका नवरे
या सर्व विजेत्यांना 'मायबोली खरेदी' विभागाचे $२५ चे गिफ्ट सर्टिफिकेट पारितोषिक म्हणून देत आहोत.
ही पारितोषिके डीसी जीटीजीमध्ये (वासंतिक कल्लोळ २०१०) सहभागी झालेल्या सर्व मायबोलीकरांनी मिळून पुरस्कृत केली आहेत.
सर्व स्पर्धकांचं आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन!
स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून मेधा आणि मितान यांनी काम केलं. त्यांचे विशेष आभार.
धन्यवाद.
-संयोजक
मी अजून सगळं वाचलं/ ऐकलं
मी अजून सगळं वाचलं/ ऐकलं नाहीये.
पण विजेत्यांबरोबरच भाग घेतलेल्यांचंही अभिनंदन.
आणि सर्व संयोजकांचंही.
सर्व सयोजक, सयुक्ता
सर्व सयोजक, सयुक्ता परिवार्,परिक्षक ,पुरस्कर्ते व सहभागी झालेल्या सर्वान्चेच मनःपूर्वक आभार आणि यशस्वी संयोजनाबद्दल सयुक्ता चे खूप खूप कौतुक.
हा उपक्रम खरोखरीच स्तुत्य आहे.बालचमून्चा या वर्षीचा उत्साह तर जोरदार होताच .खूप गोड गोड गाणी ऐकायला मिळाली.सुरेख अक्षरातील निबन्ध आणि कविता तर लाजवाब.परदेशातील मुलान्चा ही मराठी लेखनातील प्रभुत्व वा़खाणण्याजोग . त्याबद्दल त्यान्च आणि त्यान्च्या पालकान्च विशेष कौतुक.अनुवादकांचेही आभार. अनेक अपरीचीत भाषेतील लेखन त्याचा खूप सुरेख अनुवाद केल्याने वाचायला मिळाले.
धन्यवाद!!!
संयोजक छान झाला कार्यक्रम
संयोजक छान झाला कार्यक्रम एकदम. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांचेच अभिनंदन.
स्पर्धांमध्ये तसेच
स्पर्धांमध्ये तसेच उपक्रमांमध्ये सामिल झालेल्या स्पर्धकांचे तसेच विजेत्यांचे अभिनंदन. संयोजकांचे आभार !
केल्याने भाषांतरमध्ये काही खूप चांगल्या गोष्टी वाचायला मिळाल्या. रसग्रहणासारखा चांगला उपक्रम कायद्याचा अति कीस पाडल्यामुळे मारला गेला असं वाटलं. बोलगाणी किंवा लहान मुलांच्या गाण्यांच्या ऑडीयोचा उपक्रम बहूतेक तिसर्यांदा होतो आहे, कदाचित त्यामुळे फक्त ओळखीच्या आयडींच्या प्रवेशिका ऐकल्या गेल्या. लहान मुलांसाठी तीन आणि मायबोलीकरांसाठी दोनच अशी कार्यक्रमांची विभागणी ठेवण्यामागचं लॉजिकपण समजलं नाही. पहिली ते पाचवी/सहावीच्या मुलांनी 'माझं आवडतं पुस्तक' विषयावर मराठीत 'निबंध' लिहावा ही अपेक्षा फारच जास्त होती असं वाटलं. मी मध्यंतरी पुण्याला गेलेलो असताना मराठीच्या अभ्यासक्रमात ह्या इयत्तांना कुठले निबंध असतात ते साधारण पहात होतो, तर त्यात आमचं घर, माझी शाळा, आमची सहल वगैरे सारखे सरळसोट माहितीपर निबंधांचे विषय दिसले.
एकंदरीत मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे मराठी भाषा दिवस कार्यक्रम फिके होते असं वाटलं. (संयोजकांना दोष द्यायचा हेतू अजिबात नाही पण जे वाटलं ते सांगतो आहे.)
मराठी भाषा दिवसाच्या उपक्रमामध्ये मायबोलीकरांसाठीच्या कार्यक्रमांबरोबरच मान्यवर लेखकांचं खास ह्या दिवसाकरता केलेलं लिखाण, भाषणं इत्यादीचा समावेश करता आला तर छान वाटेल. तसच आयोजन आणि परिक्षण संयुक्ताच्या बाहेरही देता येईल का ह्याचा प्रशासनाने विचार करावा.
सृजन, सानिका, HH यांची मुलगी,
सृजन, सानिका, HH यांची मुलगी, स्वरा, श्रिया, अवनी, समृद्धी पुरोहित, धनश्री नित्सुरे, सानिका नवरे सगळ्यांचे खुप खुप अभिनंदन
आणि हो; रुणुझुणू, तोषवी , HH, स्वर, पारिजात३०, मंजिरी, giri purohit, limbutimbu, कविता नवरे
यांचे पण
सर्व बालचमूचं आणि पालकांचं
सर्व बालचमूचं आणि पालकांचं अभिनंदन!
रसग्रहण, केल्याने भाषांतर हे उपक्रमही फार सुरेख होते.
आयोजकांचंही अभिनंदन आणि धन्यवाद.
सर्वांचं अभिनंदन! उपक्रम
सर्वांचं अभिनंदन! उपक्रम यशस्वी करण्यात बालचमूचा मोठा वाटा आहे. त्यांना आणि पालकांना धन्यवाद.
सर्व सहभागी लोकांचे अभिनंदन!
>>मायबोलीकरांसाठी दोनच
दोन देऊन तरी सहभाग कितीसा झाला? लोकांनी मागणी केली म्हणून निबंधात मोठ्यांनाही घेतलं पण उजेडच पडला तिथे. मागच्या वर्षी खरं तर एकच उपक्रम होता मोठ्यांसाठी!
>>आमचं घर, माझी शाळा, आमची सहल
याबद्दल कल्पना नाही. लहानपणी यापेक्षा वेगळे विषय असल्याचे आठवते. पण इथल्या शाळांत पुस्तक वाचल्यावर रिपोर्ट, निबंध, का आवडले याबद्दल चर्चा हे अगदी पहिलीपासून असते.
दुसरी गोष्ट ही की ते केले जात नाही म्हणून आपण करु नये असं नाही. मुलांना या गोष्टी जमतात हे नक्की. मग त्यांना प्रोत्साहन द्यायला का करु नयेत? तोच तर मूळ उद्देश आहे.
>>फिके होते असं वाटलं
ते कशामुळे? नक्की कारण कळले तर पुढच्या संयोजकांना (संयुक्तातले किंवा बाहेरचे, ते प्रशासन ठरवेलच) उपयोग होईल.
कार्यक्रम खरतर सगळेच चांगले
कार्यक्रम खरतर सगळेच चांगले होते. रसग्रहणाची कल्पना खरतर खुप चांगली होती.पण बरेच्वेळा कागदावर कल्पना चांगली असुनही प्रत्यक्षात राबवताना हे अशाप्रकारचे प्रॉब्लेम येवुन ती वाया जाउ शकते अस पण वाटल.
मला यावेळी कार्यक्रमाची जाहिरात खुप कमी पडली अस वाटल.
कार्यक्रमाचं यश-अपयश ठरवताना
कार्यक्रमाचं यश-अपयश ठरवताना नक्की कुठले नियम / निकष लावायचे? आणि का लावायचे? मुळात कार्यक्रमाचं - तेही मायबोलीवरच्या मराठी भाषा दिन यासारख्या कार्यक्रमाचं - यश अपयश का मोजावं? कार्यक्रमात एवढ्या मुलांनी भाग घेतला, न घाबरता गाणी म्हटली हेच माझ्यासाठी कौतुकास्पद आहे. अडीच तीन वर्षांच्या मुलांचे आत्मविश्वासाने भरलेले अतिशय स्पष्ट उच्चार ऐकले आणि मनातल्या मनात त्यांना आणि त्यांच्या आईबाबांना सलाम केला. माझ्या मुलीनं (किंवा अजून कुणी) यापासून स्फूर्ती घेऊन मराठी शिकण्याचं मनावर घेतलं तर माझ्या दृष्टीनं हा उपक्रम यशस्वी झाला. एवढ्या लहान मुलांकडून गाणी आणि चित्रं यापलिकडे अजून कशाची अपेक्षा करणार?
सर्व विजेत्यांचे ,स्पर्धकांचे
सर्व विजेत्यांचे ,स्पर्धकांचे आणि आयोजकांचे अभिनंदन!
परिक्षकांचे आभार!
सर्व संयोजकांचे, विजेत्यांचे,
सर्व संयोजकांचे, विजेत्यांचे, आणि स्पर्धांमध्ये सामिल झालेल्या स्पर्धकांचे अभिनंदन.
सध्या आहे ते स्वरुप कसे
सध्या आहे ते स्वरुप कसे मायबोलीकरांनी, मायबोलीकरांसाठी आहे. ते जास्त आपलेसे वाटते.>>> सहमत.
तसंच अंजलीच्या म्हणण्याशी ही सहमत.
माझं अजुन सगळं वाचून व्हायाय,
माझं अजुन सगळं वाचून व्हायाय, पण मला एकुण एक उपक्रम आवडले.
सानिका तर्फे तिचं कौतुक करणार्या सगळ्या काका मावशांना धन्यवाद
तिला मुळात कविता, गोष्टी हा प्रकार आवडतो. त्यात तिच्या कवितेच इतकं कौतुक वाचून आणि आता बक्षिसाचं वाचून स्वारी एकदम खुष आहे आज दिवसभर. आता किमान एक आठवडाभर उठता बसता ती आम्हाला काहितरी ऐकवणारे. त्याची सुरुवात झालेय, सध्या मला ती काहिबाही जुळवून, लिहुन ठेव मग विसरशील मला काय सुचलेलं असा प्रेमळ दम देतेय
उपक्रम आपल्या सर्वांचे
उपक्रम आपल्या सर्वांचे आहेत>>> ह्म्म्म्म.
त्यात आवडलेल्या-न आवडलेल्या गोष्टी सांगायला कुणाचीच हरकत नसावी.>>> आवडलेल्या, न आवडलेल्या गोष्टी जरूर सांगाव्यात. त्यातूनच पुढच्या संयोजकांना नविन कल्पना मिळतात, सुधारणा करण्याचे प्रयत्न करता येतात. त्याला कोण आणि का हरकत घेईल?
सर्व सहभागी लोकांचे अभिनंदन
सर्व सहभागी लोकांचे अभिनंदन
HH यांच्या मुलीतर्फे तिचं कौतुक केल्याबद्दल, प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे आभार
सध्या आहे ते स्वरुप कसे मायबोलीकरांनी, मायबोलीकरांसाठी आहे. ते जास्त आपलेसे वाटते. >> सहमत.
सर्व बालविजेत्यांचे नि सहभागी
सर्व बालविजेत्यांचे नि सहभागी झालेल्या बच्चाकंपनीचे अभिनंदन !!
खूप छान उपक्रम आहे !! असेच चालु राहू द्या ह्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!
सर्व बालकलाकारांचे हार्दिक
सर्व बालकलाकारांचे हार्दिक अभिनंदन
मराठी भाषा दिवसाचे सगळेच उपक्रम अतिशय सुंदर झाले. लहान मुलांचा ह्यातला उत्साहपूर्ण सहभाग खुप भावला. आई वडिलांमधे ह्याच्या दुप्पट उत्साह असल्याशिवाय मुलांमध्ये तो इतका दिसणे शक्य नाही. तेंव्हा मुलांबरोबरच आई वडिलांचेही अभिनंदन!!!
मागच्या वर्षी मी ह्या कार्यक्रमाच्यावेळी मायबोलीवर नव्हते. पण जेंव्हा हा धागा पाहिला, तेंव्हा पत्रलेखनाचा उपक्रम अतिशय आवडला होता आणि ह्या वर्षीचा 'केल्याने भाषांतर' हा उपक्रम तसाच किंबहुना त्याहून जास्त अभिनव होता. त्यामुळे अर्थातच ह्यावेळी तोच सर्वांत जास्त आवडला...
रसग्रहणाला विशेष प्रतिसाद(प्रवेशिका) मिळाला नाही, पण जो काही मिळाला, तो खुप छान होता. वेगळाच विचार त्यातून मिळाला.
पुढच्या वर्षीसाठी माझ्या मनात
पुढच्या वर्षीसाठी माझ्या मनात काही कल्पना आहेत. जमल्यास विचार व्हावा.
१. एकातून अनेक:
- रसग्रहण करायचे असल्यास संयोजकांनी मोजक्या कविता दिल्या आणि त्यावर प्रवेशिका मागवल्या, तर एकाच कवितेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन मिळतील.
- हिच गोष्ट भाषांतराच्या बाबतीतही ठरवता येऊ शकते. एकाच काव्याचा वेगवेगळ्या व्यक्तींकडून भावानुवाद.
- एक विषय/ ओळ देऊन त्यावर काव्य रचणे. (जो उपक्रम गझलेच्या बाबतीत सध्या मायबोलीवर गाजतो आहे.)
२. गाणी आई-वडिलांची/ गोष्टी आज्जी-आजोबांच्या/ मायबोलीकरांच्या:
ह्यावेळी जशी मायबोलीकरांच्या लेकरांची बोलगाणी होती तशी पुढच्यावेळी मायबोलीकरांच्या आई-वडिलांची, आज्जी-आजोबांची गाणी/ गोष्टी ऐकायची/ ऐकवायची संधी मिळाली तर मज्जा येईल, असं वाटतं. त्यांनी स्वता: लिहिलेल्या असल्या तर छानच. पण त्यांना भावलेली दुसर्या कोणाची गाणी/ गोष्टी सादर केली, तरी हरकत नाही.
-मायबोलीकरांनी स्वतः सहभागी होऊन आपल्या गोष्टी/ बालकथा ऑडिओ स्वरुपात पाठवल्या तरी खुप धमाल येईल... लहान मुलांना ह्या बालकथा झोपतांना ऐकता येतील, त्याही नवीन आज्जी-आजोबांच्या, दादा/ ताईंच्या तोंडून!!! आई वडिलांनाही आपल्या मुलांना गोष्टी सांगण्यापासून काही काळापुरता आराम मिळेल. गोष्ट सांगा असा तगादा लावल्या की मायबोलीवरच्या कथा लावायच्या.
कशा वाटल्या माझ्या कल्पना?
मराठी भाषा दिनाच्या
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुद्दामहून कार्यक्रम आयोजित करणे हाच उपक्रम मुळात अभिनंदनासाठी पात्र आहे. या उपक्रमात उत्साहाने सहभागी होणार्या सर्व मायबोलीकर स्पर्धकांचे, विजेत्यांचे आणि अर्थातच संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
माझी अपेक्षा अशी की या
माझी अपेक्षा अशी की या कार्यक्रमांमधून मराठी बोलणे, लिहिणे, वाचणे याकडे जास्त लोक आकृष्ट व्हावेत.
इथे नित्य नेमाने कथा/ कविता लिहिणारे, गप्पांच्या धाग्यावर असणारे - अशा लोकांना मराठीचं कौतुक आहे, कमी अधिक प्रमाणात मराठीत प्राविण्य आहे. अशांकरता किंवा मायबोलीच्या सर्वसाधारण पॉप्युलेशनला उद्देशून कार्यक्रम आखण्यापेक्षा ९-१० ते २१-२२ या वयातील मुलांना लक्ष्य ठेवून काही कार्यक्रम आखता आले तर पहावे.
सर्व बोलगाणी खूप सुंदर आहे
सर्व बोलगाणी खूप सुंदर आहे .
बच्चेकंपनीचे अभिनंदन
सानी, दोन्ही सूचना चान्गल्या
सानी, दोन्ही सूचना चान्गल्या आहेत! अनुमोदन
>>>>अशांकरता किंवा मायबोलीच्या सर्वसाधारण पॉप्युलेशनला उद्देशून कार्यक्रम आखण्यापेक्षा <<<<
मेधा, अगदी बरोबर, अन त्यामुळेच मी माझ्या प्रतिक्रियेत भविष्यकाळात "आवर घालण्यास अवघड इतके प्रतिसाद येतिल" असे म्हणले आहे.
पण तसे होण्याकरता आवश्यक मनुष्यबळ आणि पाठबळ, आत्तासारख्या कार्यक्रमातूनच निर्माण होत जाणार आहे. व हे थोडे सन्थ गतिने होत जाईल. जे होईल ते टीकाऊ होण्याचे दृष्टीने, छोटी छोटी पण दृढ/पक्की पाऊले टाकली जाणे गरजेचे राहील. आत्ता पर्यन्तची मायबोलीच्या "कार्यकर्त्या" सभासदान्ची वाटचाल बघता तुम्हास अपेक्षित ते देखिल भविष्यात होईलच अशी आशा बाळगण्यास काहीच हरकत नाही!
किम्बहुना मी स्वप्न बघतोय की आगामी काळात "मायबोलीचा (मराठी साहित्य विषयक) पुरस्कार्/बक्षिस" हे मराठी जगतात आत्यन्तिक प्रतिष्ठेचे मानले जाईल!
अभिनंदन सहभागी झालेल्या
अभिनंदन सहभागी झालेल्या सर्वांचे, विजेत्यांचे आणि आयोजकांचे!
पुढच्या वर्षीही असेच भारी कार्यक्रम ठरवा!
सानीचे दोन्ही मुद्दे अतिशय
सानीचे दोन्ही मुद्दे अतिशय सुंदर आहेत आणि अमलात आणण्यासारखे आहेत.
सर्व लहानसान मुलांचे आणि त्यांच्या आईवडीलांचे, आजीआजोबांचे सर्वांचे आभार.
यावेळेसची संयुक्ता टीम फार शिष्ट वाटली. शेवटी मला माझा अनुवाद रंगीबेरंगी वर टाकायला लागला. निदान उत्तर तरी द्यायचे पण तेही त्या करु शकल्या नाहीत. फारचं लाजिरवाणी गोष्ट.
पुढल्या वेळी नवीन बाळे कविता म्हणतील अशी अपेक्षा.
सर्व विजेत्यांचे ( आनि
सर्व विजेत्यांचे ( आनि गाड्याबरोबर) त्यांच्या पालकांचेही अब्बिनंढण घ्या हो पालकलोक्ज
वा सर्व स्पर्धकांचं अभिनंदन,
वा सर्व स्पर्धकांचं अभिनंदन, भाग घेणं, काहितरी कृती करण महत्वाचं,
सर्व विजेत्यांचंही अभिनंदन.
संयोजक आणि परीक्षकांचंही यशस्वी उपक्रमाबद्दल अभिनंदन
>>>स्वतःहून पुस्तक वाचण्याच्या वयातली मुलं. पुस्तकंच वाचत नसावीत का?
हा खरच चिंतनाचा विषय आहे. ती आवड मनातच असावी लागते, ही गोष्ट लादून करून घेता येत नाही.
आणि आता सभोवतालचं वातावरण हेही परीणाम करत असतच. पण वाचनाशी ओळख मात्र आपण करून द्यायला हवी.
केल्याने भाषांतर हा उपक्रम
केल्याने भाषांतर हा उपक्रम खुप म्हणजे खुपच आवडला, साधनासारख्या आयडी ज्या इतरवेळेस कधी लिहित नाहीत त्यांनी केलेले अनुवाद वाचुन मस्तच वाटले.एकदम व्यावसायिक भाषांतरकारांचा दर्जा होता त्याला.
लहान मुलांची गाणी मुख्यत्वे परदेशी राहणार्या (भारतीय आणि परदेशी उच्चारांची सरमिसळ झाल्यामुळे एक वेगळाच गोडवा येतो त्यात)ऐकणे ही मेजवानीच असते, पण थोडासा कंटाळा आला एव्हडे नक्की.
लहान मुले पुस्तके वाचत असावीत पण निंबध लिहिण्याइतके कौशल्य वाचनामुळे विकसित झाले नसेल कदाचित.
सर्व सहभाग घेणार्यांचे अभिनंदन.
अशांकरता किंवा मायबोलीच्या
अशांकरता किंवा मायबोलीच्या सर्वसाधारण पॉप्युलेशनला उद्देशून कार्यक्रम आखण्यापेक्षा ९-१० ते २१-२२ या वयातील मुलांना लक्ष्य ठेवून काही कार्यक्रम आखता आले तर पहावे.
सहमत. यानिमित्ताने मुलांकडुन मराठी वाचुन /लिहुन घेतले जाईल. आपण तर रोजच वाचतोय, जे वाचत नाहीत त्यांना यानिमित्ताने यात ओढता येईल... १० आयांनी प्रयत्न केल्यानंतर त्यातल्या १ मुलाने तरी नंतर परत मराठी उघडुन वाचायचा प्रयत्न केला तरी मराठी दिन यशस्वी झाला असे म्हणता येईल.
खूप उशिरा हा धागा पाहतेय.
खूप उशिरा हा धागा पाहतेय.
मराठी भाषा दिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये हातभार लावलेल्या....आयोजक, स्पर्धक, विजेते, परीक्षक, वाचक सर्वांचे अभिनंदन.
मायबोलीसारखं सकस व्यासपीठ उशिरा का होईना सापडलं, ह्याचा खूप आनंद होतोय !
सृजनचं कौतुक करणार्या सर्वांना त्याच्या आणि आमच्यातर्फे धन्यवाद.:)
जमेल तितक्या लवकर सगळ्या प्रवेशिका वाचायच्या आहेत.:)
अरे आजच बघितला
अरे आजच बघितला निकाल.
श्रीयाचे कौतुक करणार्या सगळ्यांचे आभार. इतका छान उपक्रम आयोजित करुन तो उत्तम पार पाडल्याबद्द्ल संयोजकांचे पण आभार.
Pages