मालवणी शिकायचंय? भाग-१

Submitted by नीलू on 11 January, 2009 - 14:19

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुजींन आणि बाईंनी अजून शिकवूक सुरुवात खय केल्यान. लिवलं Happy
.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||

हाव पण असा..

_____________________________________________

The human heart is like a ship on a stormy sea driven about by winds blowing from all four corners of heaven.
_____________________________________________

अरेच्च्या, वर्ग अगदी हाऊसफुल्ल Happy मंजू, रुनी, दिपाली, चिन्नू, वर्षा, नाना, आश्विनी, तान्या, अमर, लिंबू तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत Happy
विनयानू शाळेचे हेडमास्तर तुमीच आसा Happy
येवढे ईध्यार्थी बघून माकाच कापरा भरला Proud काका खय रवले?
शैलू गो लुडबूड कसली तुका पण शिकवूचा आसा.
आज काय शिकवूया मगे?

हावय शिकतालो Proud

मी रीटायर्ड मगो. शाळेचो व्यवस्थापक आता.मार्गदर्शक.

मी पण येतो पाटीपेन्सिल घेऊन.मलापण पहिलीच्या, नाही नाही नर्सरीच्या ,नाही नाही प्लेग्रुपच्या वर्गातच बसावे लागेल.

हयसर असले ग्रुप नाय. सगळे प्रौढ वर्गात एकदम. नापास वगैरे भानगड नाय. दोन म्हयन्यात "मालवणी विशारद".

काका Lol

केदार, अगोदरच शिकललो आसस. म्हण.. हावय शिकयतलो Happy
सगळे शिकुचा म्हणतत.. पण नक्की काय येणा नाय ता नाय सांगणत Happy

ह्या काकांनी बरोबर सांगल्यान प्रौढ साक्षर वर्ग Happy
केदारा, योगी तुमची आधीच भर्ती आसा.. शिकवूक Happy
पण बाकी विद्यार्थी खय गेले?? पाटीपेन्सिल कायेक नको नुस्ती हजेरी लावा तरी चलात. तुमी बोलूक चालू तरी करा खरा.

माका फाडफाड मालवणी शिकूक होया.

.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||

आश्विनी Lol
आयलाच गो तुका! मस्त फाडतसय तू! Happy

फाडफाड कोकाटेंक शोधुक होया... Happy

मीपण नवीन विद्यार्थी ! Happy

अग्गोबाई, फाटलो काय ! इतक्या जोरात हाणतलो काय मिया ? Proud

.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||

मी पण इलय... माकापण शिकवशाल काय? आयेन सांगल्यन हा.. फी किती हां ती आधी विचरुन ये.. कीती हा हो फी मास्तुर्‍यांन्नू...?

सत्या, हे फुक्कट आसा. पण पयलं नाक पुसून येऊच होया !
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||

हय कोणी 'मास्तुरे' नाय आसत रे सत्यजित! Proud Happy
आश्विनी, गुणाची बाय ती Happy
शिवम, कायतरीच हां तुझा!

कोनचा नाक पुसूचा गो... तुमका आधिच सांगतय अशी काम माझ्यांन व्हायची नाय हं... शिकवूचा ह तर चांगल्यांन शिकवा, ही तुमची नाक पुसूची थेरा नको माका... बाई हत शिकवुक की गुरुजी?

आपल्याआपणच नाक पुसुचो होया शर्टाचो बाहीक, फराकचो घेराक.
.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||

मला ओ का ठो कळत नाय.. Sad
बयजवार पहिल्यापासनं शिकवा रे कुणीतरी. शिकायचं आहे मला.

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

>>पुसुचो होया >>पुसूक व्हया..

>>फराकचो घेराक>>फराकच्या घेरक

>> अशी काम माझ्यांन व्हायची नाय हं..>>>> असली कामां माझयकडसून होवची नायत हां..

साजिर्‍या, मला पण येत नाही रे. पण दामटायचं तसंच.
.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||

आयटे, नेहमीचं मराठी टू मालवणी मराठी - विभक्ती प्रत्यय, क्रियापद, कर्म असं काही सांगू शकशील का?

.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||

अश्वे.. सगळा तसाच असता मराठी सारख्या...काही शब्द वेगळे असतत, आणि मालवणीपण गावांगावा प्रमाणे बदलते. बांद्याची वेगळी, देवगड कणकवलीची वेगळी, राजापुरची वेगळी, रत्नागीरीची वेगळी, चिपळुण तर काय फारच वेगळ आहे.. पण भाषेचा बाझ तोच... कळ्ळा? बोलान बोलानच शिकशिल.

काही शब्द वेगळे असत जसे
पँट = पाटलन,
आत = भुतूर
माकड = वांझर

मला ओ का ठो कळत नाय..
बयजवार पहिल्यापासनं शिकवा रे कुणीतरी. शिकायचं आहे मला. >>>>
.
माका कायेक कळणा नाय
पैली पातूर शिकायात रे कुनी. माका शिकपाचे हा
.
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!! >>>>

भितुल्लो उजो लागतलो असो
अंदाराची कुशी (निदपाक) लागतलीच
.
(गो निलू ताय/ भावना बाय माका मार्क देवा ) Proud

आयला, हा झाला की रे इंस्टंट मास्तर!
मस्त गृहपाठ दिलास रे भौ.. Happy

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

केदार, ह्येका मार्क तुका आमकाच देवचे लागतीत जर कळला तर. Happy
निदपाक - झोपाक, उजो - दियो, पणती
सत्यजित. माकड - वांझर, आंम्ही वांडरव म्हणतव. वांडरमारे ठावक आसतीत.

साजिरा, कळंतली गो तुका....
आपल्यो त्यो नीलुबाई हतं ना त्यो लई भारी शिकवतले....लय हुशार असतले मरे,तुक ठाव नाय का गो???
शाळेक रोज येउक मातर हवा....तरचं जमतला हो...

काय कलकलाट करताहात पोरांनू... अरे मास्तर नाय वर्गात म्हटल्यार नुस्ता कमरेचां सोडून कपाळाक गुठाळल्यानी दिसता..

चला आता शिस्तीत वर्ग चलवया...

आजचो धडो... चुकी शोधा...

>>>> मला पण येत नाही रे. पण दामटायचं तसंच. <<<<<

माका (मला) पण येणां (येत) नाय (नाही), पण दामटतंय (दामटायचं) तसांच (तसंच)..

विनय Happy

गुरु(जी)काका, नीलू, परदेसाई, इतर कोकणी-जाणकार मंडळी, वर्गात पोरं भरपूर जमल्येत तर बोलीभाषेचे बारकावे जरा संगतवार सांगा बघू. सुरुवात म्हणून एक मार्ग सुचवावासा वाटतो - एखादी क्रिया घेऊन तिच्यावरून मालवणीत वाक्य रचून दाखवायचं. सुरुवातीला कोणीतरी गुरुजींनी/बाईंनी प्रत्येक काळातल्या वाक्यांची उदाहरणं विशद करायची - जेणेकरून ढोबळपणे नियम काय हे सर्वांना स्पष्ट समजेल. मग वाक्यांच्या भेंड्यांसारखा खेळ खेळायचा. गाण्याच्या भेंड्या खेळतो तसं एका वाक्याच्या/क्रियेच्या अनुषंगाने दुसर्‍याने दुसरी क्रिया सांगणारं वाक्य सुचवायचं असं करता येईल. वाक्य सोपं असलं पाहिजे. गुरुजींनी/बाईंनी खेळाची सुरुवात म्हणून एक उदाहरणादाखल वाक्य स्वतः द्यायचं आणि शिट्टी फुंकायची. मग खेळ चालू. मध्येमध्ये कोणाच्या चुका झाल्या तर गुरुजींनी/बाईंनी त्या सांगून दुरुस्त्या सुचवायच्या. हा खेळ चालू असताना मालवणीतले अस्सल शब्द वापरले जाऊ शकतील.. ते कुणातरी सभासदाने नोंदवून ठेवायचे आणि ठराविक अंतराने ही नव्या शब्दांची जंत्री आणि त्याचे अर्थ पोस्टायचे. हेतू हा की नव्या शब्दांचा संग्रहही वाढत जाईल.

गुरुजी/बाई, श्रीगणेशा म्हणून नेहमीच्या बोलण्यात येणारे तीन सोपे काळ उदाहरणादाखल चालवून दाखवू शकता. मी मराठीत लिहितो.. तुम्ही तशाच फॉर्मॅटात कोकणीत वाक्यं लिहिलीत तर सर्वांना उदाहरणावरून नियम कळेल. मग आपण खेळ खेळू शकू.

बोलणे या क्रियेची वर्तमान, भूत आणि भविष्य अशा तीन काळांमधली सर्व पुरुषांमधील सर्व वचनांमधील वाक्ये प्रमाण मराठीत अशी होतील :

१. वर्तमानकाळ
क्रम : एकवचन; अनेकवचन
प्रथमपुरुष : मी बोलतो/बोलते; आम्ही बोलतो.
द्वितीयपुरुष : तू/तू बोलतोस/बोलतेस; तुम्ही बोलता.
तृतीयपुरुष : तो/ती/ते बोलतो/बोलते/बोलते; ते बोलतात.

२. भूतकाळ
क्रम : एकवचन; अनेकवचन
प्रथमपुरुष : मी बोललो/बोलले; आम्ही बोललो.
द्वितीयपुरुष : तू/तू बोललास/बोललीस; तुम्ही बोलला.
तृतीयपुरुष : तो/ती/ते बोलला/बोलली/बोलले; ते बोलले.

३. भविष्यकाळ
क्रम : एकवचन; अनेकवचन
प्रथमपुरुष : मी बोलेन; आम्ही बोलू.
द्वितीयपुरुष : तू बोलशील; तुम्ही बोलाल.
तृतीयपुरुष : तो/ती/ते बोलेल; ते बोलतील.

अर्थात ही कल्पना सुचली म्हणून मांडली. आवडली नाही किंवा शिकायची दुसरी चांगली पद्धत वापरावीशी वाटली तरी हरकत नसावी.

बाकी, मलादेखील हजेरीपटावर घ्या. Proud Happy

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

Pages