निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! इतकी सगळी पाने, फुले, झाडे पाहून एक निर्भेळ निरागस आनंद झाला. जागू काय छान लिहितेस!!!! सर्व माहिती छान आहे. खरे तर अजून ५ पाने राहिलीत वाचायची/बघायची.

आपल्या हातांनी लावलेल्या झाडांची नासधुस पाहाताना किती यातना होतात ना>>> हे अगदी खरे आहे. माझी भाचेकंपनी गुलाबाची फुले तोडायची तेंव्हा मला त्यांचाही राग यायचा पण नंतर ती कबूल पण करायची तेंव्हा त्यांचा निरागसपण भावायचा.

लेकीने कुंडीत कलौजी पेरली होती. ते बी आता अंकुरलय. आता पुढे काय? कुंडीत त्याला कांदे येतील का? कशी काळजी घ्यायची?

हो ही अमरवेल.. मी हिला काँग्रेसगवत समजायचे. कोणीतरी कॉ.ग. चा फोटोही टाका.
माझ्या लहानपणी ही भरपुर दिसायची. ह्या नळ्या चुरडल्या की पाणचट व्हायचा हात. हल्ली दिसत नाही फारशी.

एक पाकळी - अळूचा फोटो कुठला? माहिमच्या निसर्ग उद्यानात अगदी असेच पाहिले होते अळू.

माधव - कांदे लागतील का माहित नाही. बदलापुरला राजुदादाना विचारलेले कांद्याबद्दल, ते म्हणालेले की इथल्या हवेत कांदे होत नाहीत. पण कांदे लागले नाहीत तरी पात मात्र मिळेल तुम्हाला. लेकीला चायनीज खायला करुन द्या ती पात वापरुन. माझ्या ऑफिसात माळ्याने रताळी लावलेली. जमिनीत लावली असुनही अगदीच अंगठ्याएवढ्या जाडीची आणि बोटभर लांबीची झालेली. तोही म्हणालेला की कंदभाज्यांसाठी मुंबईची हवा चालत नाही.

माधव त्यांच्या दोन तिन इंचाच्या पात्या झाल्या की कुंडीतुन काढा आणि एक एक रोप वेगळ करुन एक वितेच्या अंतरावर लावा. जर जाग नसेल तर त्याच्या तिन चार कुंड्या करा.

एक पाकळी मी हा फोटो टाकणारच होते. बर झाल टाकलात तुम्ही. मी असे ऐकले आहे की ही अमरवेल तोडून दुसर्‍या झाडावर टाकली की तिथे ती जगते. ह्या वेलीला एखाद क्वचीत कुठेतरी पान सापडत. ह्या वेलीत बकुळीच्या फुलांचा गजरा ओवतात.

ह्या वेलीत बकुळीच्या फुलांचा गजरा ओवतात.

हे पहिल्यांदा ऐकले. आणि असा अमरवेलीत ओवलेला गजरा कधी पाहिला नाही.

रच्याकने, अमरवेल हे बागेतले नको असलेले प्रकरण आहे ना?? अमरवेल मुळ झाडाला गुदमरवुन टाकते. अमरवेल तोडुन दुस-या झाडावर टाकुन त्या झाडाला मारण्यापेक्षा अमरवेलीला नष्ट करावी. त्या नालायक वेलीला तोडुन टाकले तरी ती वाढत राहते म्हणुनच अमरवेल म्हणतात बहुतेक.

साधना / जागू, करून बघतो. मला पण 'कलौजी म्हणजे कांद्याचे बी' ही माहिती हल्लीच मिळाली. मोड आलेले कांदे बर्‍याचदा खोचून त्याची पात केली आहे पण ह्या वेळेस बी पासून सुरुवात करायची आहे म्हणून मी पण चाचपडतोय पण तितकाच नवीन काही पहायचा उत्साह पण आहे. कांदे नाही तरी नुसती पात मिळाली तरी आनंदच आहे Happy

माधव धरेल कलौजीच्या रोपाला कांदा. मी पण लावली आहेत रोपे. उद्या फोटो टाकते. पण घरातल्या मोड आलेल्या कांद्याला परत कांदा नाही धरत त्याची पातच मिळते.

अमरवेल हि अत्यंत बदमाश वेल आहे. खरे तर ती बांडगूळच. पण बाकीची बांडगूळे निदान हिरव्या पानांनी आपले अन्न स्वतःचे स्वतः तयार करतात, हि बया तर तितकेही कष्ट घेत नाही. आपल्या नजरेतही येत नाही, पण हिने यजमान झाडाला, एक घट्ट विळखा घातलेला असतो, आणि त्यातून हवे ते सर्व ती मिळवते.
मूळ, पाने वगैरे तिला अनावश्यक वाटतात. मी हिला बारीक पांढरी फूले आलेली बघितली आहेत.

माधव, त्याला छान गोलाकार फूल येईल. पण त्या फूलाचा वास मात्र घाणेरडा असतो

कोणालातरी कण्हेर बघायची होती ना ? कण्हेर मी गुलाबी आणि पांढरी पाहीली आहे आणि त्यात सिंगलची कण्हेर आणि डबलची कण्हेर असे दोन प्रकार असतात. ही गुलाबी सिंगलची कण्हेर आहे.
phul6_0.JPG

साधना मी एडेनियम कुंडीतुन काढून बाहेर लावला आहे. त्याची मुळे खोलवर जातात का ग ? भिंतीत वगैरे जाऊ शकतील का ?

दिनेशदा,
घटपर्णी बद्दल शाळेत असताना नुसती माहिती वाचली होती, आणि इतक्या जवळुन (इतक्या वर्षानी) तूमच्यामुळे पहायला मिळाली !
Happy

अनिल, आपल्याकडे पण याचे काहि प्रकार असतील. शोध घ्यायला हवा.
या वरच्या कण्हेरीत गडद गुलाबी (यापेक्षा) ते पांढरा, असे सर्व रंग दिसतात. मला वाटतं मध्यपूर्वेतून ते झाड आलय आपल्याकडे.

नाही गं.. भिंतीत वगैरे अजिबात जाणार नाहीत. जमीनीत लावताना त्याचे खोड वर राहिल असे बघ म्हणजे ते फुगत राहते आणि मस्त बोन्सायसारखे दिसते.

आज मनिषाचा फोन होता. तीही सांगत होती की एडेनियम कळ्यांनी भरलेय म्हणुन.. तिच्या घरीही सगळे बोन्साय का? म्हणुन विचारतात..

तुझ्या बियांची आता रोपे बनव आणि वाट लोकांना. कायम आठवण राहिल तुझी त्यांना Happy

एडेनियम कुठे आहे? इथे फोटो असेल तर सांग कुठल्या पानावर ते.

कांद्याच्या फुलाला म्हणे इतका घाणेरडा वास येतो कि घरात ते फुल थोडावेळ ठेवलं तरी घरात बसवत नाही आणि नंतरही तो वास जात नाही - ऐकीव माहीती Happy
अमरवेली बद्दल अगदी दिनेशदा म्हणतात ते. मोठ्या मोठ्या आंब्याच्या झाडाला सुद्धा खाऊन अगदी सुकवून टाकते.

शाकली -- कुड्याचे पाळ हे एक आयुर्वेदिक औषध आहे. मला वाटते कुट्जारिष्ट त्यापासुनच बनवतात. (ह्याबद्द्ल सविस्तर माहितिसाठी दिनेशदा.कॉम :))

कुडा म्हणजे पांढरा कुडा. साधारण एप्रिल मे महिन्यात सह्याद्रीत भरभरुन फूलतो. त्याच्या फूलाची भाजी पण करतात आणि सांडगेही करतात.

---
मी नेहमी उल्लेख करतो तो वांगीवृक्ष मला दिसला (नाही हे वांग्याचे झाड नाही ) याला अर्थातच वांगी लागत नाहीत. पण याला वांग्याच्या फूलासारखी फूले येतात म्हणून हे नाव. हि फूले आधी गर्द निळी, मग आकाशी आणि मग पांढरी होतात. फूले साधारण ५ सेमी व्यासाची असतात आणि भरपूर लागतात. नव्याने लागवड करण्यासाठी छान वृक्ष आहे हा. याचा विस्तार फारसा नसतो, आणि फूले मात्र भरपूर लागतात.

मी एका बँकेत गेलो होतो, तिथे होता हा. ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो म्हणून कॅमेरा नव्हता. म्हणून मोबाईलने टिपलाय. उजेडपण नव्हता. आता परत कॅमेरा घेऊन कधीतरी जावे लागेल.
भारतात, कोल्हापूरला मी हे झाड बघितले आहे. तुरळक का होईना, पण आहेत हि झाडे आपल्याकडे.

vangivRux.jpg

दिनेशदा,उंबराच्या फळाला अजुन एक छिद्र असते त्याचे कारण ब्लॅस्टोफॅगा कीटक त्यात अंडी घालतो हे आहे का? कारण त्यात खूप आळ्या असतात.पण मला अजून एक गोष्ट जाणवली ती अशी की उंबराच्या झाडावर उंबरं खायला खूप वेगवेगळे पक्षी येतात.तुम्ही उंबराच्या छिद्राबद्दल लिहिणार आहात त्याची उत्सुकता आहे.अशी नवीन माहिती मिळाली की खूप आनंद वाटतो.तुम्ही लिहिलेली सर्वच माहिती खूप अभ्यासपूर्ण असते.आणि आपसूकच त्यावर विचार केला जातो.प्रज्ञा,कुटजारिष्टा बद्दल तू सांगितलेस ते बरोबर आहे.पण माझ्या पोटदुखीवर वेगळेच औषध आहे, आणि ते म्हणजे माझ्या रोपांना चांगले खत मिळून त्यांना खूप फुले येणे.

योगेश, कांद्याच्या कळ्या पण सुंदर (आकाराने) सुंदर असतात. त्यांना पोवाडे असा शब्द आहे, त्याची पण भाजी करतात.
तूला आणि जागूला, गुलाबी (गुलबक्षी) रंगाची कण्हेर दिसली का कुठे. ज्यावेळी या वनस्पती आजूबाजूला होत्या, त्यावेळी विशेष जाणवले नव्हते, पण आता दिसली नाही, कि हळहळ वाटते.

शांकली, मला जागूकडून फोटो मिळाला कि लगेच लिहितो उंबराबद्दल !

Pages