निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<तुमच्या शेजारच्यांच्या जास्वंदीला खूप फुले येतात - त्यामुळे माझ्या पोटात दुखायला लागले त्याचे <<<<>>>>>> शांकली आता त्यावर कुड्याचे पाळ उगाळून घ्या. Proud

सावली, फोटो मिळाला असता तर सगळ्यांनी ओळखली असते.
माझ्या घरातून (आभाळात ढग नसले तर ) सूर्योदय आणि सूर्यास्त छान दिसतो. रोजचा वेगळा असतो नजारा. असेच काहि दिवस..

१.

२.

३,

४.

५.

दिनेशदा फोटो सुंदर आहेत.

मी काल श्रावणीला ट्युशनवरुन आणायला गेले तिथे मला उंबराची झाड दिसली. त्यावर भरपुर गाठी होत्या. मी मनात म्हटल चला इथल्या पानांवर आहेत म्हणजे घरच्या उंबरावर पण असतीलच. पण घरी जाऊन बघते तर एकाही पानाला गाठ नाही. आता परत श्रावणीला आणायला गेले की त्या उंबराचे पान काढून फोटो काढुन तुम्हाला देते.

श्रावणी, आणखी एक निरिक्षण करायचे आहे (अर्थात झाडावर उंबरे असतील तर ) प्रत्येक उंबराला साईडने पण एक छिद्र असते का ? देठाच्या समोर असतेच पण साईडने पण असते. या दोन्ही छिद्रांचा फार मोठा अर्थ आहे.

दिनेशदा काय झाल ? माझ नाव विसरलात का ?
आता ह्या छिद्रांचा अर्थ आणि त्या गाठीत काय असत ते पण सांगा. उत्सुकता वाढते.
गाठीत किड वगैरे नसते ना ?

निरोप श्रावणीसाठीच आहे. जागू
हे निरिक्षण तिने करुन, मला सांगायचे आहे.
आणि अर्थ तर खूपच मोठा आहे. अगदी ज्या काळात सर्व खंड एकत्र होते, त्या काळापर्यंत आपल्याला मागे जावे लागेल. ते मी लिहिनच.

Happy
जागू तु दिलेल्या अळुच्या झाडाला चांगली ४ पाने आली आहेत Happy पण ती पाने जास्त मोठी नाहि आणि जास्त छोटीही नाहीत Happy मध्यम आकाराची आहेत. ती तेव्हढीच असतात कि अजुन वाढतील. कुंडित लावल्याने त्याचा आकार तसा आहे का?

बर दिनेशदा.

योगेश जसा अळकुडीचा आकार वाढेल तसा पानांचापण आकार वाढेल.

जागु, माज्याकडच्या अळूला पण पाने आलीयत. पण अजुन लहान आहेत. बासमती पान दोन होती. एकाचे जाड मुळ होते, ते कुसुन गेले. पण दुस-याने जीव धरलाय. फुलाच्या रोपावर कळे आले नाहित अजुन. हल्ली माझे खुप दुर्लक्ष होतेय झाडांकडे Sad

साधना, योगेश मच्छी, मटण साफ करतो ना ते धुण्यासाठी वापरलेल पाणी ह्या कुंड्यांमध्ये टाका. योगेश तु व्हेजी असशील तर कडधान्यासाठी भिजत घातलेल पाणी टाक.

साधना, अळुची कुंडी सावलीतच आहे. पहिल्यापेक्षा जरा मोठी झाली आहेत पानं .:-)

बासमती पान दोन होती. एकाचे जाड मुळ होते, ते कुसुन गेले. पण दुस-याने जीव धरलाय. >>>>>माझ्याकडंच सुकुन गेलंय Sad

योगेश तु व्हेजी असशील तर कडधान्यासाठी भिजत घातलेल पाणी टाक.>>>>>नक्कीच Happy

शांकली,
आता तुमच्या झाडाचा एखादा पुर्ण (जमीनसहित) फोटो इथे टाका, मग काही जाणकारांना कदाचित काही उपाय सांगता येईल
Happy

साधना, अळुची कुंडी सावलीतच आहे. पहिल्यापेक्षा जरा मोठी झाली आहेत पानं
अरे मग धीर धर जरा.... तुला एवढा मोठा व्हायला २५ वर्षे लागली, पानाला २५ दिवस तरी दे Happy

<<<अरे मग धीर धर जरा.... तुला एवढा मोठा व्हायला २५ वर्षे लागली, पानाला २५ दिवस तरी दे>>>साधना Lol

काय साधना, असं चारचौघात वय सांगतात का ? त्यापेक्षा सोपा उपाय, रोज दोन्ही हाताने धरून पाने स्ट्रेच करायची !!
विनोद सोडा, फार मोठी पाने असतील तर वड्या चरबट होतात.

माझं वय तेवढं असतं तर मी आनंदाने सांगितलं असतं... Happy गेले ते दिवस.. Sad

जिप्स्य्सा, पाने होतील मोठी, हळूहळू होतात. माझ्यालाही अजुन लहान आहेत पाने. पुर्ण सावलीत ठेव. माझी कुंडी एकदा ४-५ महिने उन्हात होती. पाने तळव्याएवढी होऊन सुकायची. शेवटी सावलीत ठेवल्यावर मोठी व्हायला लागली.

साधना, दिनेशदा Biggrin

शेवटी सावलीत ठेवल्यावर मोठी व्हायला लागली.>>>>हे अगदी खरंय. पहिल्यापेक्षा पान आता मोठी झालीय. :घरच्या पानांची अळुवडी खायला आतुर झालेला बाहुला:

अरे बाबा मी तुम्हाला ते पिल्लु दिल आहे अळूच ते मोठ होईल तेंव्हा त्याची पान मोठी होतील.

सह्हीच जागू. Happy (कधी येऊ सांग अळुवडी खायला. :-))

सावली, आता पटकन अळुवड्या करून पाठव Happy

:अळुवडी आवडणारा बाहुला:

दा, ह्या पिवळ्या रंगाच्या वेलीच नाव काय हो आम्ही लहान असताना ह्याचे चष्मे करायचो. असे...

<"https://picasaweb.google.com/lh/photo/UuMEFGTbXPeatrbx5R-U-Q?feat=embedwebsite">

<"https://picasaweb.google.com/lh/photo/KBpaaflrVP_2vFmaHZqFFg?feat=embedwebsite">

<"https://picasaweb.google.com/lh/photo/bkQFaXeiZ208830AFp2BEQ?feat=embedwebsite">

Pages