कुणीतरी आपलही असावं

Submitted by कल्पी on 18 February, 2011 - 11:21

कुणीतरी आपलही असावं
डोळ्यातुन आत शिरणारं असावं
काळजाला हात घालणारं असावं
प्रेमाची कवाड खोलणारं असावं

कुणीतरी आपलही असावं
पाऊलोपावली सोबत चालणारं असावं
सावली होउन घेरणारं असावं
प्रेमासाठी झुरणारं असावं

कुणीतरी आपलही असावं
सुखात सोबत नाचनारं असावं
दु:खात पाठीवर हात फ़िरवणारं असावं
प्रेमाची भाषा जाणनारं असावं

कुणीतरी आपलही असावं
स्वरात स्वर आलापणारं असावं
मारव्याचे सूर झेलणारं असावं
प्रेमाचे सप्तसुर गाणारं असावं

कुणीतरी आपलही असावं
वादळ वारे थोपवणारं असावं
विजेची चाहुल जाणनारं असावं
प्रेमाचा पाऊस देणारं असावं

कुणीतरी आपलही असावं
आडपडदा मनात ठेवणारं नसावं
पालवी शिशिरात रुजवणारं असावं
उगाच काळीज बडवणारं नसावं
प्रेमाची शिक्षा घेणारं नसावं
कल्पी जोशी
१४/०२/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कुणीतरी आपलही असावं
स्वरात स्वर आलापणारं असावं
मारव्याचे सूर झेलणारं असावं
प्रेमाचे सप्तसुर गाणारं असावं

वा! चांगली कविता.

Back to top