Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
>>> कारण गांगुलीला हाताळणे
>>> कारण गांगुलीला हाताळणे फार अवघड आहे
सहमत आहे.
गांगुली हे विकतचं दुखणं आहे
गांगुली हे विकतचं दुखणं आहे हे खरं आहे.
गांगुली हा भारतीय पॉन्टिंग आहे
गांगुलीवर एक चांगला
गांगुलीवर एक चांगला लेख
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/500099.html
वरची चर्चा वाचली आणि गांगुली
वरची चर्चा वाचली आणि गांगुली वरचा लेखही..
माझ्या मते गांगुली हा फक्त एक लकी कर्णधार आणि ऑफ साइडचा एक चांगला फलंदाज होता.... यापेक्षा अधिक काही नाही!
सुरुवातीच्या दिवसात तो खेळाडू म्हणून नक्कीच गुणवान होता.... पण दालमियांच्या कृपेने (जडेजाला डावलून.... नंतर तो फिक्सिंगमध्ये अडकला.... पुढे त्यातुन सुटला हा भाग वेगळा.... पण त्या घडीला एक खेळाडू म्हणून आणि कर्णधारपदासाठीही तो गांगुलीपेक्षा नक्कीच उजवा होता) कर्णधारपदाची माळ गांगुलीच्या गळ्यात पडली आणि त्याच्यातल्या महाराजाने (आठवा त्याने ९२ च्या वेस्ट इंडीज दौर्यात मैदानावर ड्रिंक्स घेउन जाण्यास दिलेला नकार) परत एकदा डोके वर काढले.... मॅच फिक्सिंगने लागलेला डाग पुसुन काढण्यासाठी भारतीय संघाने कंबर कसलेली.... सचिन तर होताच पण त्या काळात द्रवीड, लक्ष्मण, कुंबळे, श्रीनाथ असे एकसे एक मॅचविनर्स भारताकडून खेळत होते... जोडीला सहवाग, युवराज, कैफ, भज्जी, झहीर, आगरकर अशी गुणवान तरुण फौज दिमतीला आली.... आणि भारताचा एक बलवान संघ म्हणून बोलबाला झाला!
त्या सगळ्या विजयात गांगुलीचा एक कर्णधार म्हणून रोल काय होता?... त्याच्या अफलातून स्ट्रॅटेजीमुळे जिंकलेल्या मॅचेसची उदाहरणे अशी किती आहेत?... मैदानावर आरडाओरडा केला आणि जिंकल्यावर शर्ट काढून फ्लिंटॉफला जश्यास तसे उत्तर दिले म्हणून तो आक्रमक कर्णधार?
असे असेल तर पाकिस्तानच्या दौर्यात द्रवीडच्या खांद्यावर बंदूक ठेवुन सचिनला द्विशतकापासुन रोखणार्या नॉन प्लेयिंग कर्णधाराला काय म्हणणार? २००४ च्या नागपुर कसोटीत "ग्रीन पीच" बघुन मॅच मधून पळ काढणार्या कर्णधाराला काय म्हणणार?
आहे ना तो लै भारी कॅप्टन मग त्याच्या कॅप्टन्सीखाली खेळलेले केकेआर गुणतक्त्यात तळाशी का होते?
जॉन राईटसारखा "डाउन टू अर्थ" कोच होता... सचिन, द्र्वीड, कुंबळे सारखे लिजंड होते.... भारत जिंकत होता म्हणून गांगुलीचा माज, "आक्रमकता" म्हणून गौरवला गेला.... पण जेंव्हा गांगुलीच्याच जातकुळीचा चॅपेल कोच म्हणून आला तेंव्हा वर्चस्वावरुन वाद होणे अपरिहार्य होते.... गांगुलीची कॅप्टन्सी गेली आणि पुअर परफॉर्मन्स असुनही केवळ कर्णधार म्हणून संघाला चिकटून बसलेला गांगुली हळूहळू संघाबाहेरही फेकला गेला.
देशांतर्गत स्पर्धातुन चांगला परफॉर्मन्स दाखवल्यानंतर त्याला संघात परत एकदा संधी दिली गेली आणि सन्मानाने निवृत्त होईपर्यंत संघात खेळवलेही.... पण गांगुलीने नेहमीच स्वतावर अन्याय झाल्याचे विविध मुलाखतींतुन बोलून दाखवले... भरीस भर म्हणून त्याच्यावर रकानेच्या रकाने लिहुन त्याला चढवणारेही होतेच.
भज्जीसारख्या खेळाडूने गांगुलीने त्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल अनेक ठिकाणी त्याचे जाहीर कौतुक केले... आणि गांगुलीनेही आजच्या यशस्वी टीमची पायाभरणी आपल्या कारकिर्दीत झाल्याची टिमकी वाजवुन घेतली पण मग या न्यायाने गांगुलीसकट सचिन, द्रवीड, कुंबळे, श्रीनाथ वगैरे मंडळीच्या यशाचे श्रेय अझर अणि त्या आधीच्या कर्णधारांना द्यायला पाहिजेल!
धोनीचा घणाघाती फलंदाज म्हणून झालेला उदय, इरफानमध्ये भारताला गवसलेला पिंच हिटर, फॉर्म हरवलेल्या सहवागवर (२००७ चा वल्डकप) दाखवलेला विश्वास, झहीर, नेहरा, आगरकरच्या पडत्या काळात भारतीय जलदगती गोलंदाजीला मिळालेला नवीन चेहरा अर्थात आरपी, श्रीसंथ.... वगैरेचे क्रेडीट द्रवीडकडे जायला पाहिजेल!
असो.... गेले काही दिवस टीव्हीवर चाललेली गांगुली विषयक दळणं, पुरवण्यातुन आलेले दादा-दादा करणारे लेख आणि पदोपदी होणारी त्याची सचिन आणि द्रवीडबरोबर तुलना हे सगळे वाचून अगदीच रहावले नाही म्हणून हे सगळ लिहुन रविवारची सकाळ सत्कारणी लावण्याचा हा प्रयत्न!
स्वरूप, आपल्या मताचा आदर
स्वरूप, आपल्या मताचा आदर आहेच, पण बर्याच बाबतीत असहमत.
१. सचिन शी कोणाचीच तुलना होउ शकत नाही. पण भारतीय क्रिकेटमधल्या एकून योगदानात द्रविड आणि गांगुली समान आहेत. एक खेळाडू अधिक कप्तान अशी एकत्रित तुलना केली तरीही समानच आहेत. द्रविड किती चांगला कप्तान होउ शकला असता हे आपल्याला कळणार नाही, तसेच कप्तान नसता तर गांगुली किती चांगला फलंदाज झाला असता हे ही.
२. खुद्द धोनी गांगुलीच्या काळातच आलेला आहे. अजूनही बराचसा मुख्य संघ त्याच काळातील आहे.
३. त्याच्याच कप्तानपदाच्या काळात द्रविड आणि कुंबळे हे "फक्त हेच चांगले खेळले" कॅटेगरीतून मॅचविनर्स झाले.
४. युवराज, सेहवाग वगैरेंना (तसेच विनोद कांबळीला) प्रचंड सपोर्ट देण्याचे श्रेय दादालाच आहे. त्याच्या चॉईस च्या मागे तो ठाम उभा राहायचा.
५. सचिन १९४ वर असताना डिक्लेर करण्याचा अचाटपणा नक्कीच द्रविड चा होता. सचिन चा आणि त्याचा वादही झाला होता. गांगुलीने नक्कीच तसे केले नसते. (सोर्सः इंडियन समर्स, ले: जॉन राईट, तेव्हाच्या मुलाखती, माझे फॅन्स जजमेंट )
अजून बरेच पॉईंट्स आहेत, जमेल तसे लिहीतो. त्याच्या स्ट्रॅटेजीबद्द्लही. तोपर्यंत ही रिक्षा:
http://fromthefarend.com/cricket/?p=196
http://fromthefarend.com/cricket/?p=184
फारएन्ड तुझा ब्लॉग वाचला....
फारएन्ड तुझा ब्लॉग वाचला.... तु दिलेल्या दोन लिंक्स आणि इतरही... छान आहे
आता तुझ्या पोस्टविषयी :
नुसत्या आकडेवारीवर न जाता एक खेळाडू म्हणून विचार केला तर, ज्यात खेळाबरोबरच अॅटिट्युड, स्पोर्टिंग स्पिरिट, संघभावना हे सगळे येते, द्रवीड नक्कीच गांगुलीच्या फार पुढे आहे.
तुझ्या तिसर्या मुद्द्याचे लॉजिक (जे की मला चुकीचे वाटतेय) दुसर्या मुद्द्याला लावायचे झाले तर धोनी जरी गांगुलीच्या काळात संघात आला असला तरी द्रवीडच्या काळात 'एक नवा विकेटकीपर' या कॅटेगरीतुन 'एक चांगला मॅचविनिंग विकेटकीपिंग बॅट्समन' झाला
सांगायचा मुद्दा हा की गांगुली कप्तान असण्याचा द्रवीड आणि कुंबळे मॅचविनर होण्याशी जसा संबंध नाही तसा द्रवीड कॅप्टन असण्याचा धोनीच्या यशस्वी घौडदौडीशीही नाही!
वरच्या पोस्टमध्ये दिलेली उदाहरणे याच साठी दिली होती की गांगुलीने चांगला संघ तयार करुन तो धोनीला आयता दिला अश्या बढाया जे गांगुली समर्थक नेहमी मारत असतात त्यांनी हे पण समजुन घेतले पाहिजे की त्यातले काही खेळाडू द्रवीडच्या आणि काही खुद्द धोनीच्या कारकीर्दीतच आलेले आहेत आणि गांगुलीला मिळालेले अनेक गुणी खेळाडू त्याच्या आधीच्या कर्णधारांच्या काळात आलेले आहेत.
अनेक तरुण खेळाडूंच्या पाठीमागे दादा दादासारखा उभा राहीला हे खरय पण त्यात संघबांधणी किती आणि संघांतर्गत वर्चस्वासाठीचे डावपेच किती ... हे तो केवळ दादाच जाणे!
कॅप्टन म्हणून कार्यरत असताना त्याने नवोदीत खेळाडूंना (जे त्याच्या कर्णधार म्हणून असणार्या वर्चस्वाला आव्हान देउ शकणार नाहीत) अश्यांनाच पाठीशी घातल पण त्याचबरोबर बर्याच जणांना दुखवलेही.
त्या काळात सचिन, द्रवीड, लक्ष्मण, कुंबळे वगैरे एका बाजुला आणि गांगुली आणि त्याची तरुण गँग दुसर्या बाजुला अशी एक सुप्त दुफळी कायम जाणवत रहायची.... हे झाले एक क्रिकेटरसिक म्हणुन माझे ऑब्झर्वेशन!
खरे-खोटे (तेही एका मर्यादेपर्यंत) तेंव्हाच बाहेर येईल जेंव्हा हे महान खेळाडू आपापले "आत्मचरीत्र" लिहतील
आता तू दिलेल्या लिंकविषयी :
मला नाही वाटत की केवळ खुन्नस फॅक्टर वर कोणताही संघ फार काळ यशस्वी होउ शकतो... असे असते तर आज ऑसीजच्या जागी पाकिस्तान असते... ठराविक परिस्थितीत एक टॅक्ट म्हणून खुन्नस ठीक आहे पण उगा आक्रमक न होताही जिंकता येत हे द्रवीड आणि धोनीने दाख्वुन दिलेले आहे... २००७ च्या वल्डकपच्या अपवाद वगळता द्रवीडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सात्यत्याने जिंकत होता आणि धोनीच्या नेतृत्वाखाली तर भारत आज अव्वल स्थानवर आहे.... आणि खुन्नस नाही म्हणुन खेळातली मजा वगैरे हरवल्यासारखे मला तरी वाटत नाही.
मुळात खुन्नस हा काही आख्ख्या संघाचा गुणधर्म असू शकत नाही... तो त्या त्या खेळाडूचा स्वभावविषेश असतो.... आणि ज्याची त्याची ती दाखवण्याची एक खास स्टाइल असते.
आता तुझा दुसरा मुद्दा... सारख्याच परिस्थितीतुन जाणार्या दोघांमध्ये केला जाणार्या दुजाभावाविषयी....
तुझ म्हणण मान्य आणि तू त्या दोघांच्या इमेजबद्दल मांडलेला मुद्दाही मान्य... पण मला वाटत हे साहाजिक आहे...
आपल्या रोजच्या जीवनातले उदाहरण घेउया... समजा तुझ्या टीम मध्ये दोन एम्प्लॉयी आहेत.... दोघेही चांगले प्रुव्हन ट्रॅक रेकॉर्ड असलेले.... आता एक्-दोन प्रोजेक्ट फेल जातात.... त्याला कारणे अनेक असतात.... अपयशाबद्दल दोघानाही मेमो मिळतो... आता अश्या परिस्थितीत आहे ते स्वीकारुन पुढच्या प्रोजेक्टच्या कामाला लागणार्या आणि स्वतात सुधारणा करणार्या टीममेंबरला सपोर्ट करशील का तुझी तक्रार घेउन वरपर्यंत जाणार्या आणि कॅफेटेरियात बसुन मी कसा भारी म्हणुन गमजा करणार्याला सपोर्ट करशील?
लोकांची सहानभूती पण साहाजिकच अश्या शांत, संयमी माणसाला मिळते.
खेळाडूचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वर्तनही त्याची इमेज बनवण्यात त्यांच्या कामगिरी इतकेच महत्वाचे असते.... आणि जंटलमन्स गेम मध्ये जंटलमन इमेज असणार्या खेळाडूला त्याचा थोडाफार फायदा झाला तर त्यात काही विशेष नाही
गांगुलीच्या आधी भारतीय संघात
गांगुलीच्या आधी भारतीय संघात कर्णधार म्हणून महत्त्व मिळवणारा कर्णधार झाला का? आधीच्या भारतीय संघांची कामगिरी म्हणजे प्रतिभावान वा अन्य खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचा एकत्र परिणाम.(वाडेकरच्या वेळी काय होते माहित नाही).
तोपर्यंतचे भारतीय संघ आपण जिंकू शकू, आपण जिंकायला हवे यासाठी खेळताना दिसायचे का?
कर्णधाराने नवीन खेळाडूंना भक्कम पाठबळ दिले (कोणत्याही कारणाने) तर त्यांचा आत्मविश्वास वाढून कामगिरी चांगली होते. नाहीतर भारतीय संघातून खेळले एवढा शिक्का लागतो, मग आठवावे लागतात असे कुणी होते. गांगुलीच्या पाठिंब्यावर आलेले खेळाडू - हरभजन, झहीर, युवराज, सेहवाग (यांचा दर्जा आज वादातीत आहे, पण ते नवीन असताना नव्हता).
गांगुलीची आक्रमकता टीव्हीवर दिसली. पण संघाच्या मनोवृत्तीत त्याने काही बदल घडवला तर तो तसा सहज दिसणार नाही. आधीच्या कप्तानांच्या कारकीर्दीत गरीब गाय असणारे भारतीय क्रिकेटपटू गांगुलीच्या कारकीर्दीपासून अंगावर आला तर त्याला शिंगावर घेणारे सांड झाले, याचे श्रेय गांगुलीला द्यायला हवे. नंतरच्या द्रविड , धोनी या कप्तानांनी आक्रमकता देहबोलीतून दाखवली नसेल(?) (मला द्रविड आणि शोएब अख्तरची पाकिस्तानातल्या धावांचा प्रचंड डोंगर रचलेल्या सामन्यातली धक्काबुक्की आणि द्रविडचे अख्तरकडे रोखून बघणे आठवतेय), पण आज काही खेळाडूंकडे याची विशेष कामगिरी सोपवली जातेय(झहीर, कदाचित भज्जी). कुंबळेच्या कप्तानीतल्या मंकीगेटने हे ट्रान्स्फॉर्मेशन पूर्ण झाले.
गांगुली जिगरबाज होता हे त्याने आपल्या पुनरागमनाने सिद्ध केले तीच जिगर त्याच्या कप्तानीत होती. अर्थात कोणताही कप्तान हा त्याच्या संघाच्या वकूबापेक्षा जास्त कर्तृत्ववान होऊ शकत नाही.
गांगुलीचा अहम् त्याच्यापेक्षा मोठा कधी झाला हे त्याला कळले नसावे किंवा कळून वळत नसावे. नागपूर कसोटीतली खेळपट्टी बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणामुळे हिरवीगार केली गेली होती(असेही म्हटले जाते) आणि त्या राजकारणाला गांगुलीने बॅटने उत्तर दिले नाही, हेही खरे.
द्रविड कप्तान असताना(ही) आपल्या संघापासून अलिप्त वाटायचा, त्याने चॅपेलला डोईजड होऊ दिले. भारतीय संघातली तरुण खेळाडू वि ज्येष्ठ अशी दुफळी (यात ज्येष्ठ पुन्हा एकेकटे) भारताने टी-२० चषक जिंकल्यापासून काही काळ माध्यमांतून सतत कुजबुजली जात होती. आता सचिनसकट ज्येष्ठांची गरज नाही, असा सूर उमटत होता.(कुंबळे ते धोनी या स्थित्यंतराच्या काळात)
आयपीएल मध्ये सचिनने खेळण्याचे हेही एक कारण नसेलच असे नाही.
आयपील आणि bcci चा तसा काही
आयपील आणि bcci चा तसा काही सुतराम व्यावसायिक संबंध नाही, विशेषतः खेळाडू खरेदी आणि निवडीमध्ये.> .. तूझ्या मुखातून srinivasan, shashaMk manohar etc तर बोलत नाहीत ना ? अशी शंका चाटून गेली मनाला. तेही असेच काहितरी म्हणताहेत ना कि Eden Gardens ची जबाबदारी Bengal Associations ची etc etc. IPL SA मधे हलवण्याबद्दल जे निर्णय झाले त्यावर शेवटी सह्या कोणाच्या होत्या ह्यावर कोर्टामधे आलेले निकाल पाहिलेस का ?
असो माझा मुद्दा एव्हढाच होता कि गंग्याने भारतीय क्रिकेटला नक्कीच काहितरी उल्लेखनीय (अरे ला का रे बोलण्याची सवय - साहेबांचा मुद्दा सोडा ते bat ने बोलू शकतात, सर्वच जण नाहि तसे करू शकत. वरचा ego चा मुद्दाही ह्यातूनच येतो ना,कुठे थांबायचे ते नक्की कळले नाही पण ते समर्थन होऊ शकते का ? BCCI if they wanted could have handled this in more dignified way but of course they chose not to) दिले आहे आणि त्याची जाणीव ठेवायला हवी होती. (हिच गोष्ट कपिलबाबतही तेव्हढीच लागू होते )
गांगुली विषयक चर्चा वाचली..
गांगुली विषयक चर्चा वाचली.. मी जेव्हा पासून क्रिकेट पहातोय त्यात माझ्यमते सगळ्यांत चांगला (आक्रमक, खडूस आणि संघाच्या पाठिशी उभा रहाणारा) कॅप्टन हा गांगुलीच... त्यामुळे त्याच्या निवृत्तीमुळे वाईट वाटलं नक्कीच.. सचिन आणि गांगुली ही सलामीची जोडी भारी होती.. लेफ्टी राईटी काँबिनेशन आणि वेगळा अॅटिट्यूड ह्यामुळे मॅचेस पहायला मजा यायची ! गांगुली-जॉन राईट ही जोडी पण भारी होती..
बाकी, स्वरुपचे पहिले पोस्ट आणि योगचे
<<आयपील आणि bcci चा तसा काही सुतराम व्यावसायिक संबंध नाही, विशेषतः खेळाडू खरेदी आणि निवडीमध्ये.>> हे मत वाचून करमणूक झाली..
असाम्या.. किती वेळा ???
गांगुलीला एक शैलीदार, आक्रमक
गांगुलीला एक शैलीदार, आक्रमक व जिगरी फलंदाज म्हणून मी मनापासून मानतो. पण आदर्श कप्तानाच्या माझ्या व्याख्येत मात्र तो बसत नाही; माझं मुख्य कारण - गांगुली हा खूपच आत्मकेंद्रीत आहे याची वारंवार जाणीव व्हायची ; कुणी क्षेत्ररक्षणात चुकला तर त्याच्या चेहर्यावरचा तुसडेपणा व हावभाव त्या क्षेत्ररक्षकासाठीच नव्हे तर सर्वांसाठीच नाउमेद करणारे असत; [ त्याउलट, बॉर्डरसारखा कप्तान खेळावर लक्ष केंद्रीत करत असे व कधीही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत नसे].
<<आधीच्या कप्तानांच्या कारकीर्दीत गरीब गाय असणारे भारतीय क्रिकेटपटू गांगुलीच्या कारकीर्दीपासून अंगावर आला तर त्याला शिंगावर घेणारे सांड झाले, याचे श्रेय गांगुलीला द्यायला हवे>> दिसतं तितकं हें खरं नसावं. गांगुलीने आक्रमतेत कांहीसा दिखाऊपणा आणला पण स्वातंत्र्योत्तर सर्वच संघात ताठपणे वागणारे व चोख उत्तर देणारे खेळाडू होतेच होते; आणि, गांगुलीपेक्षाही त्यांच्याबद्दल व त्यांच्यामुळे भारतीय संघाबद्दलच आदराची भावना होती, हे सर्वमान्य आहे.
गांगुलीच्या निवृत्तीने एका
गांगुलीच्या निवृत्तीने एका यशस्वी कारकिर्दीचा शेवट झाला. शेवट थोडा चांगला करता आला असता...
उदय, गांगुली निवृत्त झाला असं
उदय, गांगुली निवृत्त झाला असं तो स्वतः सोडून बाकी सगळ्यांना वाटतंय. तेव्हा त्याच्यामते पिक्चर अभी बाकी है (दोस्त तो कोई नही पर)
>>असो माझा मुद्दा एव्हढाच
>>असो माझा मुद्दा एव्हढाच होता कि गंग्याने भारतीय क्रिकेटला नक्कीच काहितरी उल्लेखनीय (अरे ला का रे बोलण्याची सवय - साहेबांचा मुद्दा सोडा ते bat ने बोलू शकतात, सर्वच जण नाहि तसे करू शकत. वरचा ego चा मुद्दाही ह्यातूनच येतो ना,कुठे थांबायचे ते नक्की कळले नाही पण ते समर्थन होऊ शकते का ? BCCI if they wanted could have handled this in more dignified way but of course they chose not to) दिले आहे आणि त्याची जाणीव ठेवायला हवी होती. (हिच गोष्ट कपिलबाबतही तेव्हढीच लागू होते )
असाम्या,
नेमकी ईथेच गोची आहे रे.. गांगुली ने भारतीय क्रिकेट ला काय दिले आहे यावर त्याची आयपील मधिल निवड्/भाव अवलंबून नाहीये रे. आणि पुन्हा एकदा, kkr ने गांगुलीला कसे हाताळायला हवे होते यात bcci फार काही लक्ष घालेल अशी अपेक्षाच मुळात चूकीची आहे. माझे विधान विनोदी वाटले तरी व्यावहारीक सत्त्य हेच आहे की आयपील च्या घोडाबाजारात bcci चे फारसे काही चालत नसते. (ललित) मोदी ला आयपिल बाजाराचा एकेकाळी हिरो बनवणारी हीच bcci जीने नंतर मोदीचा बकरा केला- नफा मिळून मिसळून घ्यायचा ईतपतच यांचे आयपिल शी साटेलोटे आहे. असो. हे माझे मत.
गांगुली ने स्वताचे हसू करून घेतले याला पूर्णपणे तो स्वतः जबाब्दार आहे. त्याचे खापर आयपिल वा bcci च्या माथी फोडता येणार नाही. आणि त्याचा गांगुली किती महान कर्णधार होता याच्याशी सुतराम संबंध नाही. nobody is denying him his credit and his dues, which he sure got mroe than expected, but end of the day he has to adjust with the reality that in business such as IPL no one is indispensible.
काल एन्डीटीव्ही ऑफ द यीअर
काल एन्डीटीव्ही ऑफ द यीअर सचिन तेंडुलकरची प्रणव रॉय यांनी घेतलेली मुलाखत पाहिली. प्रणाव रॉयनी १९ वर्षांपूर्वी(त्याच्या वाढदिवशी) घेतलेल्या सचिनच्या मुलाखतीतली दृश्ये दाखवली होती.
http://www.ndtv.com/video/player/indian-of-the-year/sachin-tendulkar-is-...
विषय बदलूनः आज क्रिकिन्फो वर
विषय बदलूनः
आज क्रिकिन्फो वर वाचले. १५ जणांचा संघ. कोणतेहि ११ फलंदाजीला, कोणतेहि ११ गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाला. फार छान कल्पना! पुष्कळ तरुणांना संधि मिळेल.
झक्की, ते फक्त सराव
झक्की, ते फक्त सराव सामन्यांसाठीच आहे उद्यापासून कोणते ११ निवडायचे ही हवी हवीशी वाटणारी डोकेदुखी होणार धोनीला..
<< उद्यापासून कोणते ११
<< उद्यापासून कोणते ११ निवडायचे ही हवी हवीशी वाटणारी डोकेदुखी होणार धोनीला..>> आणि उद्यापासून नको नको वाटणारा रक्तदाब आमच्यासारख्या येडपटाना !!
भाऊ तुमीपण ओपनींग सेरेमनी
भाऊ तुमीपण ओपनींग सेरेमनी करा...हुन जाऊदेल व्य.चि.
रच्याकने शरद पवारांनी बंगालीमधुन सुरुवात केली म्हणे भाषणाची (चांगला सेन्स ऑफ ह्युमर व पब्लेसिटी स्टंट) कुणाकडे या विडिओची लिंक आहे का?
झक्की, ते फक्त सराव
झक्की, ते फक्त सराव सामन्यांसाठीच आहे
सध्या. मी तर म्हणतो नेहेमीसाठीच, सगळे सामने असेच खेळायचे. म्हणजे उत्कृष्ठ गोलंदाजीसमोर उत्कृष्ठ फलंदाज. अमेरिकन लीग बेसबॉलसारखे.
रच्याकने शरद पवारांनी बंगालीमधुन सुरुवात केली म्हणे भाषणाची
बरोबर आहे. ज्या गावी जायचे तेथील भाषा बोलावी. महाराष्ट्रात हिंदी किंवा इंग्रजीतून भाषण दिले असते. कारण फक्त महाराष्ट्रीयच विशाल दृष्टिकोन असलेले, सगळ्यांना समजायला पाहिजे.
शिवाय महाराष्ट्रीय अत्यंत हुषार, कोणत्याहि भाषा त्यांना येतात.
शिवाय महाराष्ट्रीय अत्यंत
शिवाय महाराष्ट्रीय अत्यंत हुषार, कोणत्याहि भाषा त्यांना येतात. >>ओ झक्की हिब्रु भाषा फार कमी जणांना येते....
चला अजुन ६ तासानी पहिली मॅच चालु होईल...मजा येणार हा वर्ल्डकप पहायला
<<म्हणजे उत्कृष्ठ
<<म्हणजे उत्कृष्ठ गोलंदाजीसमोर उत्कृष्ठ फलंदाज. अमेरिकन लीग बेसबॉलसारखे.>> झक्कीसाहेब, दुसरा दृष्टीकोन असाही असूं शकतो कीं हातात असलेल्या बर्या-वाईट फक्त अकराच पत्त्यातील कोणता पत्ता केंव्हा व कोणत्या पत्त्यावर टाकायचा यातच एकदिवसीय क्रिकेट सामन्याचं कौशल्य व गंमत आहे; म्हणूनच तर नियमांत प्रत्येक गोलंदाजाने टाकायच्या षटकांवर कमाल मर्यादा आहे, "पॉवर प्ले"ची तरतूद आहे इ. उत्कृष्ठ वि. उत्कृष्ठ खेळाडू यापेक्षा डावपेचानी साधलेलं सांघिक कौशल्य हे या सामन्यांचं व एकंदरीतच क्रिकेटच्या लोकप्रियतेचं इंगीत असावं.
<<रच्याकने शरद पवारांनी बंगालीमधुन सुरुवात केली म्हणे भाषणाची>> शेख हसीना हादरल्या आहेत म्हणे; "तिकडे जमलं नाही म्हणून आता इथं प्राईम मिनीस्टर होण्याचा तर डाव नाही ना पवारांचा", या
भितीने !
>>शेख हसीना हादरल्या आहेत
>>शेख हसीना हादरल्या आहेत म्हणे; "तिकडे जमलं नाही म्हणून आता इथं प्राईम मिनीस्टर होण्याचा तर डाव नाही ना पवारांचा", या
भितीने !
जबरा
Standing my ground - Matthew
Standing my ground - Matthew Hayden पुस्तक परिचय
http://www.business-standard.com/india/news/cricket%5Cs-gentle-giant/425...
For instance, the infamous 2008 “Monkeygate” controversy – when colleague Andrew Symonds complained of racial abuse during a tour of India and Harbhajan Singh called him a monkey during a match at Sydney – barely finds a mention in the book. Indeed, Hayden is tight-lipped and non-committal on the issue.This even though his rivalry with Harbhajan Singh has been well-documented and Singh even criticised Hayden for looking for cheap publicity through his book. Hayden admits to not liking him much but puts him as “one of the toughest spinners” he has faced. He lavishes praise on Rahul Dravid and Sachin Tendulkar.On the other hand, he is brutally honest about Indian cricket. “Here is an inescapable fact about world cricket: Australia cannot thrive without India, but India doesn’t need us to the same degree.” Now that’s an open secret but not many players would actually admit to this fact.
the first chapter of the book is about sledging. Hayden was a notorious sledger and admits that “he covered his tracks well” to have never been reprimanded
He says that he refused to face fast bowler Shaun Tait in the nets because he was way too fast. “I was loath to face Brett Lee as well. Okay, I was scared. There, I’ve said it,” he writes.
आजच्या 'खुपते तिथे गुप्ते'
आजच्या 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात क्रिडा समिक्षक द्वारकानाथ संझगिरी आणि माजी कसोटीपटु किरण मोरे हे आले होते.
हा कार्यक्रम युट्युब वर आहे :
भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४
भाग-५
धन्यवाद महागुरु
धन्यवाद महागुरु
धन्यवाद महागुरु... संझगिरी
धन्यवाद महागुरु... संझगिरी आणि किरण मोरे दोघांनीही जोरदार फटकेबाजी केली आहे की..
हो खास करून तो एपिसोड
हो खास करून तो एपिसोड पाहिला... संझगिरींनी नेहमीप्रमाणेच टोलेबाजी केली.
भारतात १५३ किमी/तास या वेगाने
भारतात १५३ किमी/तास या वेगाने गोलंदाजी टाकणारा गोलंदाज तयार होतोय.
http://blogs.cricket.yahoo.com/posts/2011/04/will-delhi-unleash-the-worl...
शेन वॉटसनने आज बांगला
शेन वॉटसनने आज बांगला विरूध्दच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात केवळ ९६ चेंडूत नाबाद १८५ धावा करताना १५ चौकार व १५ षटकार मारले व बांगलाच्या गोलंदाजीच्या चिंधड्या केल्या. वॉटसन सचिनच्या २०० धावांचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आला होता. आजे त्याने त्रिशतक सुध्दा केले असते.
एका डावात १५ षटकार हा एक नवीन जागतिक विक्रम आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजच्या झेव्हियर मार्शलने एका डावात १२ षटकार मारले होते. बांगलाच्या २२९ धावांचा पाठलाग करताना ऑसीजने फक्त २६ षटकांत १ बाद २३२ धावा केल्या (त्यात वॉटसनच्या नाबाद १८५)!
वॉटसनने आपल्या डावातल्या एकूण १५० धावा चौकार व षटकारांच्या सहाय्याने केल्या. हा पण एक नवीन विक्रम. पूर्वीचा विक्रम हर्शेल गिब्जच्या नावावर होता (१७५ मधल्या १२६ धावा चौकार व षटकारांच्या सहाय्याने).
काल मलिंगाने केवळ २२ चेंडूत ५ बळी मिळविले (त्यातले ४ त्रिफळाबाद). एकच आश्चर्य वाटले. हे दोघे विश्वचषक स्पर्धेत असे खेळले असते तर!
त्या दोघांचे स्टार्टर थोडे
त्या दोघांचे स्टार्टर थोडे वीक असल्याने असं झालं बघा मास्तुरे... रच्याकने मलिंगाने विश्वचषकात पण एकाच सामन्यात ६ बळी मिळवळे होते... त्यामुळे तो भारता विरुद्ध असा खेळला असता तर असे विचार करण्यास वाव नक्कीच आहे..
Pages