इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
सावली, बटाट्याचे रोप एक ते
सावली,
बटाट्याचे रोप एक ते दोन फूट वाढेल. त्याला पांढरी किंवा जांभळी पाच पाकळ्यांची फूले येतील. मध्यम आकाराच्या कुंडीत ते सहज वाढेल. मुळाशी फार पाणी साचायला नको. लावण्यापूर्वी बटाटा कापायला हवा होता. तसे केले नसले तरी झाड वाढेलच.
साधना,
पुर्वी मी अशा लोकांना हटकायचो, तर देवासाठी नेतोय, असे उत्तर मिळायचे !
धन्यवाद दिनेशदा. मी बटाटा
धन्यवाद दिनेशदा. मी बटाटा कापुनच लावला आहे.
खरतर बटाट्याला कशी मुळं फुटतात आणि कसे बटाटे येतात याच निरिक्षण करण्यासाठी हे मी एका पारदर्शक प्लॅस्टीकच्या डब्यात अगदी कडेला लावलय. अशारितीने की बटाटा आला तर दिसावा. पण डबा छोटा आहे. तसच ठेवलं तर एकदोन तरी बाळबटाटे येतील का? त्याचे रोज फोटो पण काढतेय.
सावली मज्जा. हे डीस्कवरी
सावली मज्जा. हे डीस्कवरी चॅनेल सारखे की. फोटो चीटकवायला विसरू नकोस.
तूझा ईमेल मिळाला बर.
समई आणि शांकली तुमचे ह्या
समई आणि शांकली तुमचे ह्या धाग्यावर मनःपुर्वक स्वागत.
मी लहान होते तेंव्हा माझ्या वडीलांकडे नेहमी हट्ट करायचे गुलाबाचे झाड आणण्यासाठी. तेंव्हा आमच्याकडे नव्हते गुलाब नव्हते.वडीलांनी एका संध्याकाळी तिन गुलाबाची झाड आणली. तो पिवळा रंग मला अजुन आठवतो गुलाबाचा. तिन्ही गुलाबांना फुल आली होती. वडीलांनी लगेच संध्याकाळीच ती लावली. सकाळी मी उठुन बघायला गेले तर त्यातील ते पिवळ्या रंगाच गुलाबाच झाड चोरुन नेल होत. मला व माझ्या वडीलांना खुप दु:ख झाल तेंव्हा.
माझ्या वडीलांनी एकदा अलिबागवरुन ५० हापुस आंब्याची कलम आणली होती आणि ती शेतात लावली होती. काही दिवसांनी ती झाडेही चोरुन नेली. तेंव्हा वडीलांची स्थिती काय झाली होती ते मला अजुन आठवत.
सावली माझ्या वडीलांनी एकदा
सावली माझ्या वडीलांनी एकदा शेतात बटाटे लावले होते. पण आमच्याइथे त्यांची चांगली वाढ नाही होत. पण मला खुप गम्मत वाटली होती. सगळ्या रोपांना पिल्लु बटाटे आले होते. मी ह्या पावसाळ्यात लावले होते पण जास्त पाण्याने झाड जगली नाहीत.
विजय नक्की. पण आले पाहिजेत
विजय नक्की. पण आले पाहिजेत बटाटे.
दिनेशदा म्हणतात तसे पाणि राहु नये म्हणुन मी डब्याला भोकं पाडुन खाली दगडही घातलेले आहेत.
जागू शांकली चे स्वागत
जागू शांकली चे स्वागत कर.
शांकली ते बारर्तॉडी नाही. बारतोन्डी च्या फळाला एका पेक्शा जास्त डोळे असतात. ते खोडावर येत नाही.
पानाची मूख्ञ शीर जास्त ऊठावदार असते.दिनेश्दा नी म्हन्ट्ल्या प्रमाणे ते अन्जीर जातीतील धेड उम्बराचे झाड आहे. हि झाडे विहिरी काठी तसेच नदि काठी सापड्ते.
सावली, जमिनीखाली बटाटे
सावली, जमिनीखाली बटाटे वाढायला अंधार पाहिजे. समजा सूर्यप्रकाश मिळाला तर त्यात हिरवट भाग तयार होईल. तसा बटाटा खाऊ नये.
छोटिला निरिक्षण करण्यासाठी शेंगदाणे लावले तर उत्तम. त्याला छोटे पिवळे फूल येते. ते फूल झडले कि त्याचेच मूळ होऊन ते जमिनीत जाते आणि मग त्याच्या टोकाला शेंग तयार होते.
माझ्या घरी बागेतला मातीस्वरुप
माझ्या घरी बागेतला मातीस्वरुप कचरा मी प्लेस्टिक पिशवीत भरुन ठेवलेला. पावसाळ्यात त्या पिशवीत पाणी पडत राहिले. मग त्याच्यातुन मेथीच्या पानासारखी गोल पाने असलेले एक रोप आले. पंकजच्या घरी भुईमुगाची शेती असल्याने त्याने ते लगेच भुईमुगाचे म्हणुन ओळखले. मी ते तसेच तिथेच वाढू दिले. काही महिन्यांनी भावाचा मुलगा घरी आलेला त्याने ते रोप उपटून काढले. त्याच्या मुळांना ७-८ भुईमुग लागले होते, पण आत नुकतेच दाणे तयार होत होते. मला रोप उपटल्याचे खुप वाईट वाटले, मी परत लावत होते, पण पंकज म्हणाला आता लावले तरी भुईमुग मोठे होणार नाहीत. एकदा उपटले की ते गेलेच
लोकसत्तामधील बातमी मुंबई
लोकसत्तामधील बातमी
मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यान विद्याविषयक कार्यशाळेचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात होणार आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत उद्यान विद्या या विषयाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवरील कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत. हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे
दिनेशदा आम्ही मागील वर्शी
दिनेशदा आम्ही मागील वर्शी शेतात शेंगदाणे लावले होते पण काढणिच्या वेळी काहीच हाती लागल नाही.सगळे शेंगदाणे ऊन्दिर मामानी खाऊन टाकले. वरून पत्ता देखील लागत नव्ह्ता.
साधना चवळी पेरा. छान वेल येईल
साधना चवळी पेरा. छान वेल येईल आणि कोवळ्या शेंगा पण मिळतील.
दिनेशदा अगदी बरोबर हे आम्ही
दिनेशदा अगदी बरोबर हे आम्ही पण लावले होते एक वर्ष भुईमुगाचे शेत. त्याच्या ताज्या ताज्या काढलेल्या शेंगा खायला खुप मजा येते. ते दाणे मला बदामासारखेच वाटायचे. आणि वर जितकी फुले येतात तितक्या खाली शेंगा लागतात
जागू, माझे वडील कोकणात
जागू, माझे वडील कोकणात असताना, पडवळ, काकडी, दोडके, भोपळा, वगैरे बरयाच भाज्या लावायचे. दिवसभर ते शाळेत असायचे. आणि इकडे घरी, आईला पत्ताहि लागू न देता माकडे येवून सगळ्यावर ताव मारून जायची. आणि वेलही ओरबाडून, तोडून टाकायाची. संध्याकाळी घरी आल्यावर वडील इतके संतापायाचे? आजही त्यांचा चेहरा आठवून वाइट वाटते. त्याना फार त्रास व्हायचा. त्यांची मुलेच होती ती.
कधी कधी सुट्टीच्या दिवशी आम्हाला राखण करायला सांगितलेले असायचे. पण बिलंदर माकडे आमच्या समोरून पडवळ पळवून न्यायची. आम्ही किती डबे वाजवले तरी त्याना फरक पडत नसे. वर आम्हालाच दात विचकून दाखवत आमच्या अंगावर यायची. आणि नंतर वडिलांची बोलणी खायला लागायची.
उंदरांना आता कुणाचाच धाक
उंदरांना आता कुणाचाच धाक राहिलेला नाही. मांजरीसुद्धा त्यांच्या मागे लागत नाहीत आता. आता तो बासरीवालाच आला पाहिजे, ज्याच्यामागे ते जातील आणि कड्यावरुन उड्या मारतील.
नारळाची झाडे पण त्यांच्या तावडीतून सुटत नाहीत. गोव्यात गणपतिच्या दिवसांत उंदरांना वेगळा नेवैद्य दाखवतात, आणि आमच्या माडाला लागू नकोस म्हणून गार्हाणे घालतात.
माकडांना नैसर्गिक खाद्य शोधण्यापेक्षा आयते खायची सवय लागलीय. माथेरान, महाबळेश्वरला तर नकोसे करुन सोडतात. आता अंबोली, कर्नाळा, लोणावळा सगळीकडेच आहेत ती. आधी आपण कौतूक म्हणून खायला देतो, मग ते खंडणी वसूल केल्यासारखे करतात.
भरत, इथे केनयात एक वेगळ्या प्रकारची चवळी खातात. त्याच्यावर थोडी नक्षी असते. आणि त्याचा वेल होत नाही. वीतभर झाड झाले कि भरपूर शेंगा यायला लागतात.
नायजेरियात आणखी वेगळे बीन्स असतात. त्याचे दाणे चौकोनी असतात. त्याची खासियत म्हणजे भिजत घालून ते हातात चोळले कि त्याची साले निघतात. त्याचे पिठ वापरुन तिथे कांद्याची भजी करतात. आणि त्या पदार्थाचे नाव, करकरा.
दिनेशदा, वा नवीन माहिती.
दिनेशदा, वा नवीन माहिती.
आमच्या नव्या मुंबईत्,प्रभाग
आमच्या नव्या मुंबईत्,प्रभाग समिती सभेत उंदरांविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिल्यावर पशुवैद्य् कीय अधिकारी माझ्याशेजारी बसल्यावर मला म्हणाले, '' की यदाकदाचित मानवाचा अंत झा ला,किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कारणीभूत ''उंदिर'' हाच प्राणी असेल....
आधी आपण कौतूक म्हणून खायला
आधी आपण कौतूक म्हणून खायला देतो, मग ते खंडणी वसूल केल्यासारखे करतात.
तुमच्या मक्याच्या कणसाचे काय झाले ते पाहिले की आंबोलीत..
उंदरांसाठी ग्लिरिसिडीया कामाला येत नाही काय?? त्याचे नावच उंदिरमारी आहे ना???
हो ना साधना. नॅशनल जिओग्राफिक
हो ना साधना.
नॅशनल जिओग्राफिक ने चेनै मधे माकडांच्या उच्छादाचे छान चित्रीकरण केले होते.
डॉक्टर, उंदीर आणि झुरळ जगू शकणार नाहीत, अशी जागाच या पृथ्वीवर नसेल !
मस्कतच्या समुद्रकिनार्यावर मी उंदीर सीगल्सच्या मागे लागलेले बघितले होते. एरवी सीगल, हा कुणाला घाबरणारा पक्षी नाही.
उरण तालुक्यातील चिरनेर
उरण तालुक्यातील चिरनेर मध्येही मोठे माणसांसारखी माकडे आहेत. ती पण तिथल्या शेतांची, फळांची नासधुस करतात.
साधना अॅडेनियम च्या शेंगा
साधना अॅडेनियम च्या शेंगा सुकल्या आणि त्यातुन म्हातार्या बाहेर आल्यात. काल मी त्या म्हातार्यांच्या खालचे बी लावले आणि श्रावणी बरोबर म्हातारीचा खेळ खेळले. ती मला म्हातार्या गोळा करुन द्यायची आणि उडवायला सांगत होती.
साधना तुला मी जी रोपे दिली आहेत त्यातील काही रोपांना ही फुले येतात. त्याला आम्ही जर्मनची फुल म्हणतो.
योगेश ही अबोली माझ्याकडे आहे.
हे दोन नो. चे रोप दिलेस का???
हे दोन नो. चे रोप दिलेस का??? मला बघायला पाहिजे घरी जाऊन...
त्या म्हाता-या मस्त दिसतात ना?? मी पिशवीत भरते आणि मग एकेक सोडत बसते.... लेक नाहीये या इथे
साधना अग आता कळ्या धरल्या
साधना अग आता कळ्या धरल्या असतील त्याला. ते दुसर दिल आहे त्याच फुल शेवंतीसारख येत.
तुझ्यकदॅ अत बियाच बिया झाल्या
तुझ्यकदॅ अत बियाच बिया झाल्या असतील.. सगळ्या लाव आणि मग वाटप कर एकेका रोपाचे... लोकांनाही बरे वाटते..झाडाला किड लागत नाही, मेंटेनन्स झिरो.. पाणीही जास्त आवडत नाही आणि फुले आली की एकदम भरुन येतात आणि महिनाभर झाडावर टिकतात.
अगं हल्ली मला मरायलाही वेळ
अगं हल्ली मला मरायलाही वेळ नाहीये... झाडाकडे कुठे बघतेय
जागू, तूमच्याकडे काळ्या
जागू, तूमच्याकडे काळ्या कुड्याचे पण झाड असणार. (एलिफंटा केव्हज जवळ आहे ) त्याला पांढरी फूले येतात आणि त्याला जोडीने २ शेंगा लागतात. या शेंगा चांगल्या लांब झाल्या कि परत त्यांची टोके जूळतात व त्यांचा आकार इंग्रजी डी सारखा होतो. त्या आठवायचे कारण म्हणजे त्यात पण अशाच केसाळ बिया असतात. त्या बिया औषधी असतात. त्यांना इंद्रयव (किंवा असेच ) नाव आहे. माझ्याकडे असेल फोटो त्याचा.
ता.क.
जागू, आज उद्या फटाके फोडावे लागणार बहुतेक !
जागू, म्हाताऱ्या काय छान
जागू, म्हाताऱ्या काय छान दिसतायत ग. आम्ही लहानपणी उडवायचो. तू नाशिबवान आहेस. तुझ बालपण अजून आहे.
शोभा प्रत्येकात बालपण असत ग.
शोभा प्रत्येकात बालपण असत ग. फक्त ते आत लपलेल असत. माझ्या मुलीमुळे हे बालपण अनुभवते मी.
जागू फटाके आणलेस का?
जागू फटाके आणलेस का?
दिनेशदा काळ्या कुड्याच झाड
दिनेशदा काळ्या कुड्याच झाड फूल आल्यावर खूप सूंदर दिसते अस म्हणतात्.मी हे झाड अद्ध्याप पाहीले नाही.
साधना उन्दीरमारी ची झाड आहेत पण त्यासाठी झाडाच्या मूळ्यांची पावडर करावी लागते.ती कोण करणार्. शीवाय आम्ही त्यांच्या आवडी आता ओळख्ल्या आहेत. त्यामूळे या वर्शी आम्हाला त्यांचा काही त्रास झाला नाही.
Pages