ही बात काय झाली

Submitted by रामकुमार on 14 February, 2011 - 16:31

दु:खास कीव माझ्या इतक्यात हाय! आली
दिसलो सुखास मीही - ही बात काय झाली ...1

भयग्रस्त मी भुकेला डोळे तहानलेले
व्याकूळलो दुधास्तव दारात माय आली ...2

प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत केला
विझता थकून मी- ती रंगात काय आली ...3

काव्यात मांडिले मी मंथूनिया स्वतःला
अमृत प्राशिलेल्या कंठात साय आली ...4

"ईच्छा हवीच थोडी"- भ्रांतीत जीव गेला
मक्ता अनाम गाता सुरुवात काय झाली ...5

रामकुमार

गुलमोहर: 

प्रतिभेस जाग येण्या आक्रोश आत केला
विझता थकून मी- ती रंगात काय आली ...
हा शेर आणि...
भयग्रस्त मी भुकेला डोळे तहानलेले
ही ओळ आवडली.