'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : संपूर्णम !

Submitted by Yo.Rocks on 10 February, 2011 - 15:55

'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग १ : शुभारंभ तोरणापासून !
'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग २ : ''तोरणा- राजगड' मार्ग !
'तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते : भाग ३ : लक्ष्यवेध !

अळू दरवाज्यातून प्रवेश केला आणि आम्ही राजगडावरील अत्यंत महत्त्वाच्या नि भल्या मोठ्या अश्या संजिवनी माचीवर आलो.. इथूनच एका कडेला राजगड आणि तोरणा या किल्ल्यांना जोडणारी डोंगररांग दिसत होती.. इथूनच आमची झाली होती वाटचाल !! हा.. फक्त अंतिम टप्प्यातील तो वेगळा मार्ग सोडून !

राजगडबाबत सांगायचे तर त्याचे फोटोच सारे काही बोलून जातात.. नि संजिवनी माचीची बांधणी ही एक सर्वोत्कृष्ट आहे.. शिवकालीन कलेचा एक सर्वोत्तम नमुनाच ! मग ती दुतर्फा तटबंदी असो वा चोरमार्ग असो वा टेहळणी वा चिलखती बुरुज असो ! सर्व काही थक्क करणारे ! इतका मोठा विस्तार म्हटला तर पाण्याच्या टाक्या आल्याच ! (या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असेलच असे नाही, राजगडवर पद्मावती मंदीराजवळच्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात..)


(सुंदर अशी चौकट)


(अस्मादीक एका पोझसकट :P)


(गडावर येणारे पर्यटक आणि ताक विकणार्‍या ताई-माई)

इथूनच आम्ही तोरणापासूनची केलेली वाटचाल नजरेस पडली..

(नविन आणि रोहीत)

उन वाढू लागताच आम्ही संजिवनी माची बघून बालेकिल्ल्याकडे वळालो ! अर्थात त्यासाठी या डोंगराला डावीकडून वळसा घालून जाणार होतो.. ही वाट बालेकिल्ल्याच्या अगदी खालून जाते.. एकीकडे अंगावर येणारा बालेकिल्ला तर डावीकडे दरी ! इथून जाताना शक्यतो शांतताच बाळगावी.. अन्यथा तिथे आढळणार्‍या या मधमाश्यांचा तुमच्यावर कधी डोळा पडेल सांगता येणार नाही.. इथे तुम्हाला दोन- तीन मधमाश्यांची भली मोठी पोळी दिसतीलच !

या पोळ्यातून मध कसे काढले जात असेल हा विचार करत आम्ही पुढे गेलो नि क्षणातच डावीकडे खालच्या बाजूस पाली दरवाज्याचे मोहक दर्शन झाले... हा राजगडचा मुख्य दरवाजा !

आम्ही ना इथून चढलो होतो.. ना इथून उतरणार होतो.. तेव्हा इथूनच डोळे भरुन बघून घेतले नि संजिवनी माचीच्या मुख्य दिंडीतून बाहेर पडलो.. तिथेच सावलीत समोर असणार्‍या मोठ्या दगडावर ठाण मांडले नि पेटपूजेचा कार्यक्रम सुरु केला.. समोर पद्मावती माचीचा विस्तार खुणावत होताच..

तिथूनच आम्ही पुढे बालेकिल्ल्याकडे वळालो.. बालेकिल्ला सर करेपर्यंत सूर्य डोक्यावर उभा ठाकला होता... रविवार असल्याने गर्दी होतीच.. आम्ही झटपट बालेकिल्ल्यावरी सदरेजवळ गेलो.. तिथूनच मग आजुबाजूचा परिसर बघून घेतला.. मी इथे मागे जून'१० मध्ये आलो होतो तेव्हा पावसाळ्यात मिळणारा स्वर्गीय अनुभव घेतला होता. इथे सविस्तर लिहीले आहे त्यामुळे आता फारसे लिहीत नाही.. आता मात्र वेगळ्या ऋतूत राजगडाचे एक वेगळे रुप बघत होतो..


(बालेकिल्ल्याच्या दरवाज्यातून दर्शन सुवेळा माचीचे..)
- - -- -


(बालेकिल्ल्यावरील निशाण आणि खाली दिसणारी पद्मावती माची)

- - - --


(इथूनच दिसणारा संजिवनी माचीचा विस्तार)

- - - - -

आमच्यासोबत गिरी आला नव्हता.. तो खालीच बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापाशी बसला होता.. इथूनच आता आम्ही चोर दरवाज्याने राजगड उतरायला घेणार होतो.. पण रोहीतची इच्छा होती सुवेळा माचीवर जाउन येण्याची.. अर्थातच त्याची राजगडला पहिलीच भेट होती.. सो म्हटले अगदी नीट नाही पण नेढ्यापर्यंत जाउन येवू.. इंद्रा नि गिरी यांना पदमावती मंदीराजवळ भेटा सांगून आम्ही सुवेळा माचीकडे सरसावलो.. इथे जाताना मात्र नविन, रोहीत आणि मी तिघेही अक्षरक्ष: सुटलो.. त्यातच मग झाडाझुडूपांतून घसरणीची वाट पकडत शॉर्टकट घेतला नि उन्हाने तापलेल्या सुवेळा माचीवर पोहोचलो..


(सुवेळा माचीचे टोक)
- - - - - - - -


(नेढे..)

नेढ्यापर्यंत जाईस्तोवर दमछाक झाली.. तिथेच मग क्षणभर विश्रांती घेवून माघारी फिरलो.. पद्मावती माचीवर पोहोचेपर्यंत कडाडून तहान लागली होती.. लगेच पाण्याच्या टाक्यापर्यंत पोहोचलो.. या टाक्यांवरची गंजलेली तुटकी अशी लोखंडी जाळी कधी बदलणार हे राजगडावर असणार्‍या पुरात्त्व खात्यालाच माहीत... !
पाण्याची पातळी थोडीशी खालावली असल्याने रोहीतने मस्तपैंकी लोळण घेत बाटलीत पाणी भरले.. ते थंडगार पाणी पिताच तहानलेला जीव शांत झाला.. एकीकडे गिरीने पिठले-भाकरची ऑर्डर दिली. मग आम्ही चौघांनी मनसोक्त आस्वाद घेतला तर दुसरीकडे इंद्रा पद्मावती तलावापाशी आमची वाट बघत बसला होता.. आमचा सहावा पार्टनर जसा आमच्यात न बोलवता सहभागी झाला होता तसाच तो न बोलता त्याच्या सहकार्‍याबरोबर पद्मावती माचीवरील गर्दीत गायब झाला.. Happy

बाकी पद्मावती माचीवरील गर्दी अस्वस्थ करणारी होती.. खासकरुन सर्वत्र पसरलेला कचरा, प्लॅस्टीकच्या बाटल्या.. Sad ज्यांच्याकडून हा कचरा केला जातो ते नक्कीच इथे पिकनिक करण्याच्या उद्दीष्टाने येत असावे.. ही मंडळी जवळ्च्याच गावातून इथून तिथून आलेली असतात.. खरे ट्रेकर्स नसतातच मुळी..

एकीकडे पद्मावती माचीत काही मुले पोहत होती ! रामकडून कळले की इतर कुठे पाण्याचा साठा नसल्याने नि मंदीराजवळील टाक्यांत पाण्याची पातळी अगदीच खाली उतरत असल्याने त्यांना मग उन्हाळ्यात ह्याच तलावातले पाणी नाईलाजस्तव प्यावे लागते ! तेव्हा हे पाणी दुषित न केले तर योग्य..

काही अवधीतच सुमारे तीनच्या सुमारास आम्ही चोर दरवाज्याने उतरायला घेतले..गुंजवणे गाव गाठले तर एसटी उभी होतीच.. म्हणजे आम्ही वेळेत हजर झालो होतो Proud पण आमची गाडी उभी असल्याने आम्ही लगेच गाडीत बसलो.. रामचे ताक आम्हीच संपवल्याने तोदेखील आमच्याबरोबरच होता.. आम्ही आता राजगडाला वळसा घालत त्या धनगर वाड्याकडे निघालो.. जाताना आम्हाला राजगड वेगवेगळ्या कोनाकोनातून दर्शन देत होता..
असेच एका ठिकाणी आम्हाला एक दुर्मिळ फोटो टिपता आला.. वैशिष्ट्य सांगायचे तर राजगड नामक गरुडाचे दोन्ही पंख दिसत होते.. ! एकीकडे सुवेळा माची तर दुसरीकडे संजीवनी माची !

पुढे वाटेतच गिरीने अचानक गाडी स्लो केली.. का तर.. त्याला नदी दिसली.. Proud झाले.. इथेच अंघोळ करण्याचा कार्यक्रम आटपण्यासाठी ठिकाण निवडले गेले.. पण त्या आधी आमच्या सॅक्स त्या वाड्यातून आणायच्या होत्या.. सो तो वाडा गाठला..

याच रस्त्यातून ती खिंड नजरेस पडते.. जिथे आम्ही अगदी योग्य निर्णय घेतला होता..

आमच्याकडे खाण्याचा भरपूर साठा होता तो आम्ही त्या राम-लक्ष्मण फॅमिलीकडे सुपुर्त केला.. अगदी डोकेदुखी, सर्दीवर लागणार्‍या औषधाच्या गोळ्यादेखील.. (या मोजक्याच दिला.. उगीच गोंधळ नको).. त्या राम-लक्ष्मणला आमची ओळख "मायबोलीकर" म्हणून सांगितली.. इंद्राने त्याचा जुना मायबोलीचा टि-शर्ट त्यांच्याकडे दिला.. 'अभ्यासात देखील लक्ष द्या.. घरच्यांची काळजी घ्या ' इति सल्ले देण्यात आले.. Happy 'आता पुन्हा जमले तर नक्कीच भेट देउ' म्हणत त्या घराचा निरोप घेतला.. तिथून निघाल्यावर मात्र आम्ही ठरवले 'पुढच्या वेळी जमेल तशी ह्या कष्टाळू लोकांना मदत करायची.. पैशाची नाही... तर जुन्या-नविन गोष्टींची पुस्तके,वही-पेन,बिस्कीटे, खेळणी वा जुने वापरात नसलेले कपडे इत्यादी..

धनगरचा वाडा सोडला.. नि मग थांबलो ते थेट त्या नदीवर.. ! आमची ट्रेकधमाल सुरुच होती.. Proud
नदीचे पाणी इतके थंड होते तेव्हा मी काठावरच राहीलो.. तसे पण आपल्याला पोहता येत नाही.. तर बाकीचे मायबोलीवीर पाण्यात उतरले.. पण नविन्,रोहीत नि इंद्रा हे तिघे पोहणारे पठ्ठे ! अनोळखी जागा असल्याने यांच्यात कोणीच पुढे सूर मारण्यास येत नव्हता..! तर गिरी आपला त्यांना सूर मारण्यास जबरदस्तीचे प्रोस्ताहन देत होता.. जल्ला ह्याला पण माझ्यासारखेच पोहता येत नव्हते तो भाग वेगळा.. Proud पण साहेबांना थोडे आत शिरुन उभे राहून स्नान करायचे होते.. Lol तिथेच जवळच कपडे धुणार्‍य ताईंना खोलीबाबत विचारले.. त्यांनी धोका नाही असे सांगूनही मात्र तिघे टरकत होते.. शेवटी तू तू मी मी करत नविनने झेप घेतलीच.. ! जल्ला इथे पंधरा वीस मिनीटे अशीच गेली.. मग एकेक करत पोहू लागले.. ह्या सर्वांची बदकाची अंघोळ चालू असताना गिरी म्हणतो तसा माझी काठावरच कावळ्याची अंघोळ चालू होती.. Lol

नदीत पोहण्याचा आनंद थंडगार पाण्यामुळे लवकरच आटपला.. पण सगळे खुष होते ! गाडी नसती तर असे मध्येच कुठेतरी थांबून मजा घेता आली नसती.. तिथेच रस्त्याच्या पलीकडच्या हॉटेलात चहा-वडा असा नाश्ता करून आम्ही मार्गी लागलो.. !! निघताना अनेक सुंदर आठवणी होत्याच सोबतीला.. पुणे-मुंबईच्या परतीच्या प्रवासात देखील गिरी आणि नविन मध्ये उद्भवलेला राजकीय वाद, टेप चालू न करता आम्हीच म्हटलेली गाणी, टोलनाक्यावर झालेला एक लफडा यांमुळे धमाल सुरूच राहिली.. तो लफडा सांगायचा तर टोलनाक्यावर रांगेत आमच्या पुढे असलेली गाडी वारंवार मागे सरकत होती.. गिरी हॉर्न वाजवतोय तरी परिणाम शून्य.. दोनदा तीनदा झाले.. नविन आपला म्हणत होता.. ''जाउदे तो नविन आहे.. त्याला माहित नसावे गाडी चालवण्याबाबत.. काहीसे अंतर ठेव..." पण नंतर तर ती गाडी इतक्या जवळ मागे आली की अगदी ठोकणारच होती.. झाले.. संयम सुटला.. तावातावाने गिरी पुढच्या दरवाज्यातून तर नविन मागच्या दरवाज्यातून एकाचवेळी खाडकन बाहेर पडले.. त्या गाडीजवळ जाउन गिरी एका खिडकीत तर नविन दुसर्‍या खिडकीत एकाचवेळी डोकावले.. अर्धामिनीटदेखील पण नाही.. काहीतरी पुटपुटून दोघे एकाचवेळी माघारी फिरले.. नि एकाचवेळी दोघांनी आमच्या गाडीत पुन्हा बसण्यासाठी दरवाजे उघडले.. फरक इतकाच की नविन महाशय रागाच्या भरात मागचा दरवाजा सोडून पुढच्याच दरवाज्याने जिकडे इंद्रा बसला होता तिकडेच घुसू लागले ! क्षणभर इंद्रालाही कळेना हा इथे कुठे घुसतोय.. Lol तो गाडी चालवणारा वयस्कर होता.. नाहीतर ह्या दोघांकडून त्या गृहस्थाला प्रसाद मिळालाच असता.. नविन साहेब तर भलतेच भडकले होते.. नि स्वत:लाच शांत करत म्हणत होते.. ''जाउदे रे.. तो नविन आहे.." Lol

असो.. एकंदर आमचा ट्रेक मस्तपैंकी झाला होता.. ट्रेकमध्ये निश्चीत असे काहीच नसते ! गृहीत धरुन चालायचे नसते.. कितीही ठरवले तरी कधी प्रॉब्लेम होईल या भरवसा नसतो.. नि अशा परिस्थितीत मिळालेला अनुभव अविस्मरणीयच.. फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ! इतर ट्रेकप्रमाणेच हा 'तोरणा-राजगड' ट्रेकदेखील बरेच काही अनुभव देउन गेला.. माझ्यासाठी तर २०१० या वर्षाचा शेवट 'सालोटा ते तुंगी' या मेगाट्रेकने तर २०११ ची सुरवात 'तोरणा ते राजगड' या सुंदर ट्रेकने व्हावी हेच खूप समाधानकारक होते ! उत्साहवर्धक होते.. !

आता इथे पुन्हा भेट दिली तर पावसाळ्यातच.. तोही अनुभव काही औरच असतो म्हणा.. नि शेवटी राजगडविषयी सांगायचे तर.. "मिल के भी हम ना मिले तुमसे ना जाने क्यू... " असे म्हणत राजगड प्रेम चालूच राहणार आहे.. "कैसे बताये.. क्यू तुझको चाहे.. यारा बता ना पाये.. " Happy

समाप्त नि धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिला Proud
फोटो आणि वृतांत नेहमीप्रमाणेच झ्याक Happy

''जाउदे रे.. तो नविन आहे.." >>>>:खोखो:

संजिवनी माचीची बांधणी ही एक सर्वोत्कृष्ट आहे.. शिवकालीन कलेचा एक सर्वोत्तम नमुनाच>>>>अगदी अगदी

मस्तच योग्या ...
जरा अस्मादिकांच्या पोझेस विचार करुन घेत जा... ते भलतच काहितरी वाटतय्...:फिदी:

''जाउदे रे.. तो नविन आहे.." >> :d

मस्तच... तुझे राजगड प्रेम असेच बहरत राहो हीच श्रीं चरणी प्रार्थना.

एकूणात झकास झाली तुमची यात्रा Happy
>>>>>बाकी पद्मावती माचीवरील गर्दी अस्वस्थ करणारी होती.. खासकरुन सर्वत्र पसरलेला कचरा, प्लॅस्टीकच्या बाटल्या.. ज्यांच्याकडून हा कचरा केला जातो ते नक्कीच इथे पिकनिक करण्याच्या उद्दीष्टाने येत असावे.. ही मंडळी जवळ्च्याच गावातून इथून तिथून आलेली असतात.. खरे ट्रेकर्स नसतातच मुळी..
<<<<
जवळची गावे म्हणजे पुणेमुम्बै ना रे भो? Wink
जवळची गावे असे उल्लेखिलेस म्हणुन सान्गतो, पन्चक्रोशीतील गावे ती जवळची, व तेथिल लोक असे कधीच करत नाहीत. हे प्रताप हल्ली नव्याने येऊ घातलेल्या "ब्रिगेडि दारुड्यान्चे व शहरी शौकिनान्चे" अस्तात!

लिंब्या... मी पद्मावती तलावा जवळ निवांत बसलो होतो तेव्हा त्या तलावात धुडगूस घालणारी मुलं ही पंचक्रोशीतीलच होती... गडा वरिल एका ताक विक्रेत्याने त्यांना पाण्यात उतरण्यास मनाई केली म्हणून त्यांनी पंचक्रोशीतील एका गावाचा संदर्भ देऊन त्या ताक विक्रेत्याची बोलती बंद केली Sad

इन्द्रा, अशी एखाददुसर्‍या गावातील नाठाळ पोरे बरेच ठिकाणी भेटतात, पण त्यामुळे आख्ख्या पन्चक्रोशीला नावे ठेवणे योग्य नव्हे, शिवाय तो परिच्छेच कचर्‍याबद्दल होता, मी त्याबद्दल लिहीले आहे, पोहोण्याबद्दल नाही! Happy
तरीही, तू म्हणतोस त्यातही भयानक तथ्य सामावले आहे!
गावाकडील गावगुन्डान्ची झुन्डशाही अन शहरात गल्लीदादानन्ची "प्रोटेक्शन राईट्सची" किम्मत यात समाज भरडून निघतो आहे. Happy
या लोकान्ना खरोखरच, इतिहास्/पुर्वज/धर्म कशाकशाचे काहीही घेणेदेणे नस्ते, बस्स माहित अस्ते फक्त तो क्षण दुसर्‍याकडून ओरबाडून घेऊन उपभोगणे!

धन्यवाद Happy

गावाकडील गावगुन्डान्ची झुन्डशाही अन शहरात गल्लीदादानन्ची "प्रोटेक्शन राईट्सची" किम्मत यात समाज भरडून निघतो आहे. या लोकान्ना खरोखरच, इतिहास्/पुर्वज/धर्म कशाकशाचे काहीही घेणेदेणे नस्ते, बस्स माहित अस्ते फक्त तो क्षण दुसर्‍याकडून ओरबाडून घेऊन उपभोगणे! >> अगदी खरेय लिंबुदा.. Happy बाकी मी फक्त राजगड हा संदर्भासाठी दिलाय.. इतरठिकाणी देखील बघितलेय.. आसपासच्या गावातून अतिउत्साहीत मंडळीची झुंड आपापल्या बाईक्स नि हातात काळ्या पिशव्या घेउन येतात.. यांना तुम्ही काय बोलणार ! अर्थात हे मोजकेच असतात. पण झुंडीने असतात.. शहरांमधून देखील फक्त स्टाईल मारायला येणार्‍यांना देखील कचरा करताना भान नसते.. फक्त ट्रेकींग ग्रुपच काय ते आपले सोबतीला एक मोठी पिशवी घेउन आपला कचरा त्यात भरत असतात..

अतिउत्साहीत मंडळी झुंड आपापल्या बाईक्स नि हातात काळ्या पिशव्या घेउन येतात.
तळपायाची आग मस्त्कात जाते अगदी, हे सर्व बद्लायला हवे
बाकी आपला ट्रेक मस्त झाला
''जाउदे रे.. मी नविन आहे.."
सरदार, पुढिल मोहिम लवकर आखा, घोडे, तलवारी सुसज्ज आहेत.

यो, पट्टीचा ट्रेकर बरोबर आवश्यक तेवढच पाणी वगैरे घेऊन फिरतो, कुठे काही टाकत नाही!
पण हे ट्रीप वाले ट्रेकिन्गला ट्रीपची कळा आणतात, त्यान्च्याकरता क्रेटच्या क्रेट बिसलेरी पोचवायचा धन्दा मात्र खालच्या गाववाल्या लोकान्ना मिळतो! या बाटल्या ते वरच सोडून येतात. चीड येते अगदी!

पण मुद्दा असा कि बेसिकलिच भारतीय समाजाला शिस्तीचे भान कधीच नव्हते, पुर्वीही अन आत्ताही! तशा अर्थाने अजुनही भारतीय समाज अश्मयुगिन "कळप" युगातच वावरतोय. श्रीकृष्णानन्तरची बेशिस्त "यादवी" अजुनही सम्पलेली नाही. असो.

बाकी फोटो वगैरे एकदम मस्त हां! अन किती झाले तरी हा राजगड म्हणजेच माझी सासुरवाडी! Proud
लिम्बीच्या आजोबा-पणजोबान्पर्यन्त त्यान्चा घरठाणा गडावर होता, भोरच्या पन्तसचिवान्चे ताब्यातुन गड सरकारने ताब्यात घेतल्यावर वरील सर्व घरठाणी हुसकावली गेली! शिवाय, पुढे पोटापाण्यासाठी नुसते गडावर राहुन काय भागणार होते? सबब, आधीची राबती वस्ती गडाखाली उतरली!

यो सुंदर व्रूत्तांत....
जाऊ दे तो 'नविन' आहे....:-)
पुढच्या ट्रेकचे काय???? आमचा रथ तयार आहे अजुन एका मोहिमेस.....

योदादा सुंदर वर्णन आणि फोटोपण झ्याक.
वर्णन वाचल्यापासुन ट्रेक मिस झाला म्हणुन हुरहुर लागली आहे.
पण मी टांगारु नाही.

एकदम भारी लेख नि फोटोज... संजिवनी अन् सुवेळाचा खिडकी फोटो फुल्ल गोनिदा श्टाईल. संजिवनीच्या सगल्या फोटोंवर फिदा!! व्व्वा.

यो... शेवटचा भाग पण मस्तच... छानच झाला तुमचा ट्रेक... अगदी तुमच्या बरोबर ट्रेक करुन आल्यासारखे वाटले.

राजगडबाबत सांगायचे तर त्याचे फोटोच सारे काही बोलून जातात.. नि संजिवनी माचीची बांधणी ही एक सर्वोत्कृष्ट आहे.. शिवकालीन कलेचा एक सर्वोत्तम नमुनाच >>>>>अगदी १०० % खरे...राजगड तो राजगडच त्याला उपमा नाही... म्हणूनच स्वित्झर्लंड मधिल ल्युसेर्नच्या जगातील उत्कृष्ट किल्ल्यांच्या संग्रहालयात भारतातील बहुदा फक्त एकट्या राजगडचाच समावेश आहे..

बाकी पद्मावती माचीवरील गर्दी अस्वस्थ करणारी होती.. खासकरुन सर्वत्र पसरलेला कचरा, प्लॅस्टीकच्या बाटल्या.. >>>>> हे मात्र खरे.. आजकाल बहुतेक किल्ल्यांवर हा प्रॉब्लेम आहेच. रायगड, प्रतापगड, सिंहगड, राजगड अश्या किल्ल्यांवर तर खूपच.... मी स्वता: राजगडच्या पद्मावती माची वरुन ४ पोती रिकाम्या फक्त प्लॅस्टीकच्या बाटल्या गोळा केल्या आहेत...

पुढील ट्रेकला शुभेच्छा...

हे सर्व वाचुन आम्ही २००० साली केलेल्या ट्रेकची आठवण झाली. तेव्हा आम्ही राजगड-तोरणा-रायगड असा ट्रेक केलेला....३ दिवसात. सह्हि मजा आलेली. हे सगळे वाचुन त्या आठवणी ताज्या केल्यात...