Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2011 - 01:03
मन हिंदोळा
मन हिंदोळा मन हिंदोळा
कधी आकाशी कधी धरणीवर
मन कवडसा मन कवडसा
कधी अंधारी कधी प्रकाशमय
मन विहरते मन विहरते
कधी गृधासम कधी भृंगासम
मन लाटांवर मन लाटांवर
कधी नभात तर कधी रेतीवर
मन नर्तन हे मन नर्तन हे
तांडव कधी, कधी नयनमनोहर
मन कंपन हे मन कंपन हे
अणुगर्भातले की विश्वबीजातले
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मन लाटांवर मन लाटांवर कधी
मन लाटांवर मन लाटांवर
कधी नभात तर कधी रेतीवर
छान!
मस्त, ही कविताही आवडलीच
मस्त, ही कविताही आवडलीच !
धन्यवाद!
छान.
छान.
सर्व मान्यवर, दिग्गजांचे
सर्व मान्यवर, दिग्गजांचे आभार. कृपया सुधारणाही सांगा - मनमोकळेपणाने.
शशांक दा, मस्तच..
शशांक दा, मस्तच..
छानच. अभी तो बहोत बाकी है
छानच. अभी तो बहोत बाकी है तुझमे!
मन विहरते मन विहरते
मन विहरते मन विहरते
कधी गृधासम कधी भृंगासम>>>अगदी खरय!
सुरेख कविता.
सुंदर
सुंदर
सुंदर!
सुंदर!