पाण्यावरच्या रेघा

Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2011 - 02:39

शब्दातून सांगायाचे
आजवर कधी न जमले
वंचना साहू कुठवर
शब्द ही मजवर रुसले

ह्रदयाच्या माजी दडले
उलगडले ना उमटले
अश्रुंना सांगून झाले
कोरडेच निर्झर ठरले

लेखणी हाताशी धरता
उमटता मधेच थिजले
रेघांचा गुंता अवघा
गुंताव्यात ना गवसले

अव्यक्ता व्यक्त करावे
हे स्वप्न उराशी धरले
पाण्यावरी मारी रेघा
हे असे काहिसे घडले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अव्यक्ता व्यक्त करावे
हे स्वप्न उराशी धरले
पाण्यावरी मारी रेघा
हे असे काहिसे घडले

सुंदर!!