इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
विजय मी अगदी चार पाच
विजय मी अगदी चार पाच दिवसासाठी येऊन गेले. ते ही महाराष्ट्रात आलेच नव्हते. पुढच्या वेळी जास्त दिवसासाठी आले कि नक्की कळवेनच. तुम्हाला मी इमेल केल आहे पत्त्यासाठी
निकिता ज्या खिडकीत उन येईल
निकिता ज्या खिडकीत उन येईल त्या खिडक्या झाडांसाठी राखुन ठेवायच्या.
झाडांसाठी २ वर्ष ए सी ला बाहेर ठेवलाय. लावला नाही.
साधना, फोटो हवेतच. सावली, हळद
साधना, फोटो हवेतच.
सावली, हळद लवकरच लावली पाहिजे. मी कालच ओल्या हळदीचे लोणचे केलेय. हात अजून पिवळे आहेत.
अनिल, मला नको असुदे ला वेल हवाय.
असुदे, माझ्यावर राग नाही ना ?
विजय, मला झाडावर चढता येत
विजय, मला झाडावर चढता येत नाही, काटेसावरीच्या झाडावर चढणे शक्यच नाही. मग बोंडे मिळणार कशी? बोंडे सुकल्यावर फुटतात आणि कापुस इतस्ततः पसरतो. कापुस मस्त असतो चकचकीत पण वा-याने सगळीकडे पसरुन खराब होतो. पांढ-या सावरीला बोंडे लागलीत सगळीकडे. काटेसावर मात्र अजुन फुलेच मिरवतेय.
सावली, भारतात येऊन गेलीस म्हटल्यावर मनात आले ठाण्यात आलीस आणि कळवले नाहीस हे कसे काय??? मग वाचले महा. मध्ये आलीसच नाही ते. पुढच्या वेळी नक्की भेटू.
दिनेश फोटो आता टाकता येणार नाही. काल घरी पाहुणे आले त्यामुळे वाशीचे बोंबलले
साधना, पान्ढ्र्या सावरीची
साधना, पान्ढ्र्या सावरीची बोन्डे न फूट्ता पडतात. काटे सावरीचा कापूस फूकट जातो.तू ज्याला शेफ्लेअर म्हणतेस त्याचा कापूस मीळतो.
ठिक आहे. पाहते. म
ठिक आहे. पाहते. म
सावली, हळद लवकरच लावली
सावली, हळद लवकरच लावली पाहिजे. मी कालच ओल्या हळदीचे लोणचे केलेय. हात अजून पिवळे आहेत.
अरे वा !
दिनेशदा,
कालच घरी नविन हळद मिळाली,आता मलापण लोणचे खायला मिळतील !
पण हे लोणचे किती दिवस ठेवले तर चालतात ? (...हे वाचुन घरी मी सल्ला देऊ शकतो :हाहा:)
साधना,
तस झाडावर चढणं एवढं दुर्मिळ झालेलं दिसतं, कि काही वर्षानी आम्ही चक्क झाडावर चढत होतो हे मुलांना अभिमानाने सांगता येईल ..!
सावली,
तुमचा दौरा झाल्यानंतर आता बातमी कळाली ...!
अनिल हळदीच्या लोणच्याची नवी
अनिल हळदीच्या लोणच्याची नवी पद्धत मी माझ्या परीने शोधून काढलीय. (रात्री लिहिन) त्या पद्धतीने केले तर २/३ वर्षे पण टिकेल.
दिनेशदा, ठिक आहे..तुमच्या
दिनेशदा,
ठिक आहे..तुमच्या सवडीने लिहा !
धन्स !
हुश्श.. आत्ता कुठे जरा इथे
हुश्श.. आत्ता कुठे जरा इथे यायला सवड मिळाली.
सावली धन्स ग. लवकरच करेन अपडेट पान.
योगेश तुझी झाडे छान आहेत. मलाही लाल सदाफुलीच्या बिया हव्यात.
अनिल, ही द्राक्षाची वेल
अनिल, ही द्राक्षाची वेल घरच्याघरी एखाद्या मोठ्या बादलीत वगैरे लावले तर चालेल का? वाढेल का?
कुठे मिळतील रोपे?
ही झाडे फळे ओळखता ना ? आम्ही
ही झाडे फळे ओळखता ना ? आम्ही ह्याला डवचाणे बोलतो. ह्याची फळे पिकल्यावर खातात तसेच ही हिरवी फळे असताना देठ हातात धरून पुढचे टोक कपाळावर फोडायचा खेळ खेळायचो आम्ही म्हणजे त्याचा फुगा फुटल्यासारखा फटकन आवाज येतो.
जागू नाव आत्ताच कळले. आम्हीपण
जागू नाव आत्ताच कळले. आम्हीपण लहानपणी ही खूप खायचो. कच्चीच खायचो. याचा एक विकसित प्रकार मुबईला फळवाल्यांकडे मिळतो.
हो हो अगदी पेटीत सुद्धा
हो हो अगदी पेटीत सुद्धा मिळतात आणि महागही. पण आमच्याइथे तणाप्रमाणेच उगवतात आणि काढून टाकावे लागतात.
अजून आहेत ही
अजून आहेत ही डवचणे......
आमच्या आजोळी यांना आंबोठोल असं म्हणतात.
जागूला पळसाची फूले बघायची
जागूला पळसाची फूले बघायची होती, एका प्रदर्शनात सजावटीसाठी हि फूले ठेवली होती.
होळीच्या आधी हा बहर येतो. झाडाखाली पडलेल्या ता फूलांच्या पाकळ्या पाण्यात कुस्करल्या तर सुंदर नैसर्गिक रंग तयार होतो. आणि त्याने अजिबात अपाय होत नाही.
राणीच्या बागेतले काही जूने फोटो सापडले. जून्या कॅमेराने काढले असल्याने तेवढे स्पष्ट नाहीत. साधारण मार्च एप्रिल मधे हि फूले दिसू लागतील. तेव्हा चांगले फोटो, दोन्ही योगेश आणि साधना कडून कधी येतील त्याची वाट बघतोय.
(बहारे हम को ढूंढेगी, न जाने हम कहा होंगे... )
हा आहे नागचाफ्याच्या फूलाचा फोटो. यातले मधले पिवळे पुंकेसर दिसताहेत ते नागकेशर. बारीक पानांची याची झाडे ओळीने आहेत तिथे.
ब्राऊनीयाचे मराठीत नाव लाल झुंबर असे मी सांगितले होते. ते नाव सार्थ करणारा हा फोटो. या फोटोत दिसतोय त्यापेक्षा रंग जास्त गडद आणि तेजस्वी असतो. हे झाड म्हणजे ते नवी पालवी मिटलेले..
वॉटर कूलरच्या समोर, कोकोच्या झाडाच्या परिसरात एका झाडाला स्प्रिंगसारखी फूले येतात असे मी सांगितले होते. त्या फूलांचा हा फोटो.
हा दुसरा
एका ठिकाणी प्रचंड प्रमाणात कचरा टाकल्याने कलाबाशचे झाड नष्ट झाल्याचे मी दाखवले होते. त्या झाडाची ही फूले.
आणि हा बांबूचा फूलोरा. हा मला मुंबई विद्यापिठाच्या आवारात दिसला होता. हि फूले साठ वर्षांनी येतात आणि फूले आल्यानंतर बांबूचे ते बन मरुन जाते.
दिनेशदा, माझ्या शेतातला पळस
दिनेशदा,
माझ्या शेतातला पळस खूप फूलतो. मी योगेशला फोटो काढायला बोलवेन. मी एका ठिकाणी वाचले की कलाबाश ची पॅकिन्ग म्हणून वापरलेली काठी देखिल जगली.शक्य असेल तर पुढ्च्या वेळेस पॅकिन्ग साठी कलाबाश ची काठी वापरा.
दिनेशदा छान फोटो आणि
दिनेशदा छान फोटो आणि नेहमीप्रमाणेच मस्त माहिती
हि फूले साठ वर्षांनी येतात आणि फूले आल्यानंतर बांबूचे ते बन मरुन जाते. >>>>हो हे मी कुठेतरी वाचलेले.
जीवनाचा अंत पण असा फुलत फुलत करावा.
हळद आत्ता लावू म्हणताय? पण
हळद आत्ता लावू म्हणताय?
पण इथे थंडी आहे खुप. पाऊस पण नाहिये सध्या.
बहरतात कोणत्या वेळी लावतात हळद?
नागपुरात महिन्याभरापुर्वी
नागपुरात महिन्याभरापुर्वी अकाली फुलु लागलेला पळसः
मुन्नार मध्ये मागच्या आठवड्यात पुर्ण फुललेला पांगारा:
दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
मी पळस आणि पंगारा यात नेहमीच
मी पळस आणि पंगारा यात नेहमीच confuse होतो,
रच्याकने,
>>>>सध्या अबोलीच्या पानांना आणि गुलाबी जास्वंदच्या कळ्यांना सफेद रंगाच्या किडीने ग्रासले आहे यावर काहि उपाय? (अबोलीवर सफेद रंगाची बुरशी आली आहे ). मी पाण्याचा स्प्रे करतो पण कामाच्या दगदगीमुळे रोज जमत नाही पण आठवड्यातुन एक्-दोनदा तरी संपूर्ण झाडांना स्प्रे करतो. काहि उपाय आहे का? मला रासायनिक औषध नको पण घरगुती औषधाने या किडी जातील>>>>>>>>
यावर काहि उपाय????
मी मागे ऐकलेले की हळद आणि
मी मागे ऐकलेले की हळद आणि हिंग पाण्यात मिक्स करून स्प्रे करायचं.
माझ्याकडच्या जास्वंदीवर अशीच कीड (पांढरे बारिक किडे) पडल्यावर मी हे केले होते. तिन चार वेळा स्प्रे केल्यावर काही दिवसांनी किडे गेले. आता ते खरच स्प्रे ने गेले की कंटाळुन गेले देव जाणे
आता ते खरच स्प्रे ने गेले की
आता ते खरच स्प्रे ने गेले की कंटाळुन गेले देव जाणे>>>>>
धन्स सावली, मी करून बघतो हा उपाय (हिंग आणि हळद).
योगेश, जास्वंदीकरता न्रर्सरीत
योगेश,
जास्वंदीकरता न्रर्सरीत औषध विकत मिळते. त्याचा मला खूप चांगला अनुभव आहे.सुरवातीला ३-४ वेळा मारल्यावर तो पांढर्या किडीचा त्रास गेले अनेक महिने बंद आहे.
धन्स माधव, पण औषध जास्त
धन्स माधव,
पण औषध जास्त Harmful नसणार ना?
अवतीभोवती लहानमुले बागडत असतात म्हणुन मी घरगुती औषध विचारत होतो.
मी पळस आणि पंगारा यात नेहमीच
मी पळस आणि पंगारा यात नेहमीच confuse होतो,
मलाही सेम प्रॉब्लेम होता. पण फुलांचे फोटो मुद्दाम पाहिल्यावर फरक लक्षात आला. पांगारा लालभडक असतो, फुले मुळाशी काळसर आणि टोके वर असलेली असतात. पळस केशरी आणि फुले पोपटाच्या चोचीसारखी दिसतात.
अवतीभोवती लहानमुले बागडत
अवतीभोवती लहानमुले बागडत असतात म्हणुन मी घरगुती औषध विचारत होतो.>>> योगेश, कडुलिंबाच्या बियांची भुकटी करुन त्यात तेवढाच कापुर मिसळ थोडे पाणी घालुन पेस्ट करुन कीडी असलेल्या पनांवर प्रयोग कर.
नाही योगेश, माझाही तोच प्रश्ण
नाही योगेश, माझाही तोच प्रश्ण होता. पण त्याने खात्रीने नाही म्हणून सांगितले. रोगरसारखा वासपण नाहिये.
आस्चिग चा पहिला फोटो पळसाचा
आस्चिग चा पहिला फोटो पळसाचा तर दुसरा पांगार्याचा आहे. पांगार्यात या रंगाशिवाय केशरी आणि पांढरा रंगही असतात.
योगेश तंबाखूच्या पाण्याचा पण स्प्रे करतात. आता तंबाखू अपायकारक आहे का, ते मी कसं सांगू ?
चातक, माधव धन्स
चातक, माधव धन्स
Pages