छोट्यांसाठी कविता स्पर्धा
माझं नाव चिऊ, आडनाव चिमणे
आवडतात मला खायला दाणे||१||
माझं नाव काऊ, आडनाव कावळे
सगळे म्हणतात तुम्ही किती बावळे||२||
माझं नाव माऊ, आडनाव मांजरे
सगळ्यांपेक्षा आहेत डोळे माझे घारे||३||
ही आपल्या छोट्या अवनीला सुचलेली कविता.. पोस्टरसाठी हवी म्हटल्यावर एका आवडत्या कवितेवरुन प्रेरणा घेऊन तिने लिहून दिली. या छोट्यांमध्येही "बाल"कवी दडलेले आहेत. मग स्पर्धेसाठी अजून कोण कोण लिहिणार कविता?
स्पर्धेसाठी नियम व माहिती-
१. कविता छोट्यांना स्वतःला सुचलेली असावी.
२. कविता मराठी असावी.
३. स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
४. प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात), ऑडियो किंवा व्हिडियो स्वरुपात पाठवता येतील. लिखीत प्रवेशिका मुलांच्या हस्ताक्षरातच असावी. एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवता येतील.
५. प्रवेशिका marathibhasha@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी. सोबत पालकाने आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. पाल्याचे नाव व गट लिहावा तसेच पाल्याचे नाव जाहीर व्हायला नको असल्यास तसे नमूद करावे.
६. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : Baalakavi असे नमूद करावे.
७. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीखः २० फेब्रुवारी, २०११
संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क करावा किंवा ह्याच बातमीफलकावर आपला प्रश्न लिहावा.
मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.
धन्यवाद.
गोड आहे हं पोस्टर. शाब्बास
गोड आहे हं पोस्टर. शाब्बास अवनी.
हेय!! मस्त कविता आणि मस्त
हेय!! मस्त कविता आणि मस्त पोस्टर..
सगळे प्रोग्राम कवितेन्चेच
सगळे प्रोग्राम कवितेन्चेच आहेत का?
मस्तच आहे.. हा उपक्रम मला
मस्तच आहे..
हा उपक्रम मला सगळ्यात जास्त आवडला. या निमित्ताने आया मुलांच्या मागे लागतील, काहीतरी खरड म्हणुन.. ज्यांना मुलांना देवदत्त देणगी आहे त्यांना जाणिव होईल की आपणही दोन ओळी लिहु शकतो म्हणुन...
अवनी, शाब्बास!
अवनी, शाब्बास!
शाब्बास अवनी ! ( कुठल्या
शाब्बास अवनी ! ( कुठल्या आयडीची मुलगी ? प्रश्न भोचक वाटतोय का ? पण उत्सुकता. )
अवनीला कविता छान जमलीये.
अवनीला कविता छान जमलीये.
मस्त कविता आणि मस्त पोस्टर
मस्त कविता आणि मस्त पोस्टर
मस्त पोस्टर आणि लै गोड कविता.
मस्त पोस्टर आणि लै गोड कविता.
मस्तच कविता
मस्तच कविता
वेल डन अवनी एकदम क्युट कविता
वेल डन अवनी एकदम क्युट कविता
पोस्टर पण मस्तच आहे
अवनीची कविता आणि हे पोस्टर
अवनीची कविता आणि हे पोस्टर दोन्ही गोड
इमेल पाठवलय काल. मिळालं
इमेल पाठवलय काल. मिळालं असल्यास पोचपावती मिळू शकेल का प्लीज. नसेल मिळालं तर परत पाठवता येइल कळलं तर
कृपया सर्वांनी वरची सूचना
कृपया सर्वांनी वरची सूचना क्रमांक ६ लक्षात ठेवावी.
धन्यवाद.
बालाला सुचलेली कविता त्याच्या
बालाला सुचलेली कविता त्याच्या पालकाने (म्हणजे आईने :प) लिहून पाठवली तर चालेल का?
बालाच्या अक्षराची जरा पंचाईत आहे
पौर्णिमा , ऑडियो किंवा
पौर्णिमा , ऑडियो किंवा व्हिडियो पण चालेल त्यामुळे लिहायचे नसेल तर रेकॉर्डींग करुनही पाठवू शकतेस
ऑडियोचा प्रयत्न करते.
ऑडियोचा प्रयत्न करते. (अपलोडिंगला स्पीडचा प्रॉब्लेम येऊ शकतो.)
पण प्रश्नाचं उत्तर द्या की
पौर्णिमा, प्रवेशिका मुलांच्या
पौर्णिमा,
प्रवेशिका मुलांच्या हस्ताक्षरातच हवी आहे. त्यामुळे पालकांनी लिहिलेली चालणार नाही. तुम्हाला ऑडीयो किंवा व्हीडीयो प्रवेशिकाही पाठवता येतील.
धन्यवाद.
हां. आता कसं!
हां. आता कसं!
धन्यवाद.
वरच्या ४ नंबरच्या नियमांतही हे टाका कृपया.