Submitted by पुरंदरे शशांक on 1 February, 2011 - 22:14
हे सकलमतिप्रकाशिनी......
तारकात तूचि दिप्ती कला शशिची दाविसी
प्रकाशू दे मति मदीय ठाव देई मानसी
धरेवरि नभातही विहरसी मनस्विनी
शब्दवस्त्र लेऊनि कधि होई हंसगामिनी
सहज सुलभ सलग सरळ आशयासी येऊ दे
जळ वाहे झुळुझुळु का अर्थवाही शब्द दे
नाद मधुर करित जासी तूचि निसर्गातुनि
पदरव तव येऊ दे काव्यातुनि मधु गुंजुनि
भ्रांति ती नसो कदा "कवि" उपाधी ही जळो
अवतरिता तूचि देवि मतिमंदीर मम उजळो
आवाहना प्रतिसाद देई दुर्बळ मी याचक
वर मागे हाचि पायी व्हावे न मी कधी निंदक
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आवाहना प्रतिसाद देई दुर्बळ मी
आवाहना प्रतिसाद देई दुर्बळ मी वाचक
माझ्या आकलनापलीकडिले काहितरी पण छान आहे एकन्द् र
मस्त... परवा ओझरती वाचली
मस्त...
परवा ओझरती वाचली होती... मस्त जमलीये.
तथास्तू!
तथास्तू!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसं सुचते हे सर्व..
कसं सुचते हे सर्व.. भन्नाटच... माझ्या निवड्क दहा मधे...
धरेवरि नभातही विहरसी मनस्विनी
शब्दवस्त्र लेऊनि कधि होई हंसगामिनी
सहज सुलभ सलग सरळ आशयास येऊ दे
जळ वाहे झुळुझुळु का अर्थवाही शब्द दे
नाद मधुर करित जासी तूचि निसर्गातुनि
पदरव तव येऊ दे काव्यातुनि मधु गुंजुनि
भ्रांति ती नसो कदा "कवि" उपाधी ही जळो
अवतरिता तूचि देवि मतिमंदीर मम उजळो
खूपच सुंदर...
नाद मधुर करित जासी तूचि
नाद मधुर करित जासी तूचि निसर्गातुनि
पदरव तव येऊ दे काव्यातुनि मधु गुंजुनि
सुरेख! अप्रतिम!
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद मनापासून..............
शुध्द, सुंदर, निर्मळ भाव आणि
शुध्द, सुंदर, निर्मळ भाव आणि सहज ओघ! फारच दर्जेदार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्रांति + १
क्रांति + १
निर्मळ झ-याप्रमाणे खळखळती
निर्मळ झ-याप्रमाणे खळखळती सुमधूर कविता.
माझीही आराधना अशीच.
वा ! छान !
वा ! छान !
मस्तच्........सुरेख.......
मस्तच्........सुरेख.......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे मनापासून आभार.......
सर्वांचे मनापासून आभार.......
अप्रतिम !
अप्रतिम !