बा रा ए वे ए ठि - एक बर्फाळलेला दिवस....
बागराज्य एवेएठि हे आता रजनीकांतच्या लायनीवर जात असून, पुढच्या वर्षी त्यादिवशी बर्फ, हिवाळा, थंडी Cancel करण्यात येत आहे. यावर्षीचे एवेएठि या सगळ्याला न जुमानता पार पडलं. मँगो पाय नाही आला तर चिकनची तंगडी, आणि फिशकरी नसली तरी चिंगीकरी आणून बा. रा. करांनी आपल्या एवेएठित कोणतीही अडचण येऊ दिली नाही. बाराकरांच्या या करामतीने काही पुणेकर (आणि आता कोलकताकरही थक्क झाल्याचे वॄत्त हाती आले आहे).
अकराची वेळ दिली असता, वेगवेगळ्या चक्रधरांना जबाबदार ठरवून बहुतेक सगळे बाराकर बारा/सव्वा बारा पर्यंत हजर होते. उशीरा जाऊ तर भाईंनी आणलेले समोसे आणी V नी आणलेल्या तिखटपुर्या चुकणार याची खात्री होतीच. झक्की दरवर्षी तिळगुळाच्या वड्या (आणि फक्त वड्याच) आणतात, पण ते कुठल्यातरी गाडीत अडकल्यामुळे हे काम एबाबा यांनी पूर्ण केल्याचे समजते.
मी चिंगीकरी (म्हणजेच व्हेज मांचूरियन) घेऊन पोहोचलो तेव्हा बाराकर कुटूंब (एबाबा, प्राची , V) हजर होतेच. सचिन मला पार्किंग लॉटमधेच भेटला. आणि त्याने तिथेच मंचूरियन खाण्याची इच्छा व्यक्त केली, पण तसे न करता आपण आधी तिखट पुर्या खाऊ असे त्याला समजावून आत नेले.
जेवणाची वर्णने अनेक ठिकाणी आल्याने ती इथे देत नाही. मला मडकं दिसलं नाही तर मडक्यातले आलू कुठले दिसायला. मी कुणाला तरी विचारलं देखील हे 'मडक्यातले आलू' कुठे म्हणून तर त्याने बोट दाखवलं ते भोपळ्याचे भरीत असावे. (एकदा हनी वोडका घेतली ना की आलू/भोपळा/वड्या काही काही म्हणून फरक कळत नाही). आता एकदा शुध्दीत राहून हे आलू खायला जाईन म्हणतो. गुळाच्या पोळ्या (नात्याने सुमाफूड कडून आणलेल्या) मस्त होत्या. चिकनप्रेमी चिकनबद्दल सांगतीलच. मांचुरियन खाऊन 'झणझणीत' आहे असं कोणालातरी म्हणताना ऐकलं. नेहमी तेच काय नेणार (म्हणजे कोलंबी, पापलेट वगैरे) म्हणून योगिनीने यावेळी मांचुरियन करून दिले. 'फिश कसं नाही?' असं म्हणत ईबा इकडे तिकडे शोधत असल्याची बातमी कानी आली. पकोडा कढी, मसालेभात, कोथिंबीरवड्या अशी इतर बरीच पक्वान्ने असल्याने पोटाची मस्त सोय झाली. मग थोड्या गप्पा मारून मंडळी कार्यक्रमाकडे वळली.
'फू बाई फू' मधून एक स्कीट घेऊन (कारविक्रेता आणि लग्नाळू मुलगा) आम्ही थोडी तयारी केली होती. आपले माबोकर आणि यशस्वी लेखक 'कौतूक शिरोडकर' यांचं ते स्कीट असल्यामुळे त्यांची परवानगी आवश्यक होती. शनिवारी सकाळी फोन लागला व लगेच परवानगी मिळाली, त्यामूळे ते स्कीट होणार हे नक्की झालं. पुणेकर पाहूण्यांना उउवि बघायला एक संधि म्हणून 'उउवि' ची एक झलक झाली. (हाच कार्यक्रम आल्बनीला करायचा असल्याने माझी एक प्रॅक्टिस पण झाली)
उउवि बघण्यापूर्वी झक्कीनी सगळ्यांना 'हा कार्यक्रम लोक पैसे देऊन बघतात. तुम्हाला फुकट मिळतोय, तेव्हा जोराजोरात हसा' अशी तंबी दिल्याने सगळ्यांनी हसून घेतलं.
ईबा यांचे बिडी ते भिशी (म्हणजे भीमसेन जोशी) मस्तच. म्हणजे सुरुवात बिडीने करून त्यांनी Direct भीमसेन जोशींच्या गाण्यावर गाडी घेतली. 'राहत' प्रेम पण दाखवून दिलं. खरं तर ईबा 'शिला की जवानी' किंबा 'मुन्नी बदनाम' करतील अशी आशा होती पण 'झक्कींना कळणार नाही' म्हणून हा बेत दोन वर्षांसाठी तहकुब झालेला आहे. भाईनी हिमेश सोडून classical च्या मागे लागले आहेत म्हणे. बाकी सचिनने दोन गाणी म्हटली पण त्या गाण्यांचा त्याच्या Status शी संबंध जोडू नये असं तोच म्हणाला. सायोने कॅराओकी मशीन आणलं होतं पण एकही गाणं ती म्हणाली नाही.
मग उरली आवराआवर. ती पटकन झाली.. यावेळी रसमलाई, सुमंगल, लालू यांची अनुपस्थिती जाणवली.
सुरुवातीलाच पन्नाने टेनिसचे फटके मारूनही ती आली होती.
चमन आणि त्यांचे दोनाचे चार झालेले हात, आणि माणूस आणि बाईमाणूस हजर होते.
घरी गेलो तर मेलबॉक्सपर्यंत जायला २ तास बर्फ काढायला लागला. पण आत लेकीच्या Admission चे पेपर होते त्यामुळे श्रमपरिहार झाला.
बुवा गाडीत बसल्याबसल्या पुढच्या एवेएठिचे प्लॅनिंग सुरू करतीलच.
पुन्हा एकदा मैत्रेयी/निराकार यांना धन्यवाद. सालाबाद प्रमाणे हेही एवेएठि त्यांच्या हॉलमधे केल्याबद्दल. आतापासून Gentry वाले हा हॉल आणि हा weekend कायमचा आपल्या नावावर करतील अशी खात्री आहे.
V चे फोटो Picasa वर पाहिलेच असतील हजर असलेल्यांनी.
... समाप्त....
मुद्दाम वर आणतो आहे.
मुद्दाम वर आणतो आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पु र्यांच्या फोटोत पु र्या
पु र्यांच्या फोटोत पु र्या असं लेबल का बाबा? वृ. सविस्तर वाचतोच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही वृत्तांत. >> विनयच्या
सही वृत्तांत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> विनयच्या उभ्या उभ्या विनोदाला हा कार्यक्रम ते पैसे घेऊन करतात इथे फु़कट असल्याने हसायला हरकत नाही असे कुणीतरी म्हणाले.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कुणीतरी नाही, झक्कीच म्हणाले.
हो, झक्कीच सआंगत होते
हो, झक्कीच सआंगत होते पुणेकरांना म्हणजे कांपो आणि आरतीला.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
केपी, वृत्तांत सही जमलाय.
विनय, केपी मस्त वृत्तांत!!
विनय, केपी मस्त वृत्तांत!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>म्हणून योगिनीने यावेळी
>>>म्हणून योगिनीने यावेळी मांचुरियन करून दिले.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणि देसायांनी ते गाडीत न सांडवता सुखरूप आणले.
दोन्ही वृत्तांत झकास.
झक्कींची ब्याटिंग नेहमीप्रमाणे तगडी.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
परतीच्या प्रवासात झक्कींसोबत
परतीच्या प्रवासात झक्कींसोबत केपीने पण फटकेबाजी चालू केली होती!!
बाकी गटग संपतेवेळी सिंडीने काही खास आयड्यांबद्दल गप्पा मारायच्याच राहिल्याचे लक्षात आणून दिले (नाहीतर पुढच्या ए वे ए ठी पर्यंत चैन पडणार नाही असं काहीसं म्हणाली)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कुणीतरी नाही, झक्कीच
कुणीतरी नाही, झक्कीच म्हणाले>>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला माहीत आहे पण सगळीकडे त्यांचे नाव लिहीले तर झक्की वृत्तांत होइल.
भारीये वृत्तांत. वैद्य, एक
केपी, चमन आणि चमी मी आले तेव्हाच आले. ते खरं तर मैत्रेयीच्या घरापासून १५ मिन.वर रहातात. आणि माणूस/बामा तर नक्कीच माझ्यानंतर आले.
आरती पुणेकर असल्याने तिला इथल्या (शिस्तबद्ध) रहदारीची आणि (खड्डे नसलेल्या) रस्त्यांची भिती वाटते. त्यामुळे मला गाडी कडंकडंनं दमादमानं हाकत आणावी लागली. मग झाला उशीर !!!
कांदापोहे, वृत्तांत छानच. एक
कांदापोहे, वृत्तांत छानच.
एक सूचना आहे. V यांनी काढलेले फोटो बघून, मायबोलीवर आता आयमॅक्स व ३-D ची सोय व्हावी अशी इच्छा आहे. व्हिडिओ, ऑडियो ची सोय आहेच. तर आता लवकरच आपण कीबोर्ड बडवत बसण्यापेक्षा, एकमेकांना बघू व बोलू!
अरे व्वा, मज्जा केलेली दिसतेय
अरे व्वा, मज्जा केलेली दिसतेय तुम्ही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे फोटो (पदार्थांचे) बघून तोंपासु
हे काय प्राची तुला "विश्वसनीय
हे काय प्राची तुला "विश्वसनीय सुत्रां"कडून सगळे फोटो मिळाले नाहीत अजून ? आम्हाला तर पुणे गटग झालं रे झालं फोटो इन्बॉक्सात![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बघ ना
बघ ना![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पुणे गटग झालं रे झालं फोटो
पुणे गटग झालं रे झालं फोटो इन्बॉक्सात >>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुमचा लै वट. तरी पुणेकरांना नावे ठेवता.
म्हणूनच ठेवतो. गोपनीयता काही
म्हणूनच ठेवतो. गोपनीयता काही असते की नाही ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तू दिलेल्या लिंकवर अजून फक्त फुलं दिसताएत![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
सिंडी, त्याला तुझ्या जीमेल
सिंडी, त्याला तुझ्या जीमेल अकाऊंटला टाकायला सांग फोटो.
पु र्यांच्या फोटोत पु र्या
पु र्यांच्या फोटोत पु र्या असं लेबल का बाबा? >> लेबल चिमट्याला आहे दोन चिमटे होते, वेगळे कळावे म्हणून लेबल. गरजूंनी तपासून पहावे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>लेबल चिमट्याला आहे दोन
>>>लेबल चिमट्याला आहे दोन चिमटे होते, वेगळे कळावे म्हणून लेबल. गरजूंनी तपासून पहावे.
लोकांच्या बोटांना लेबलं लावावी लागत नाहीत. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मुळात चिमटे का होते?
एबाबा, समजावून काऽऽही उपयोग
एबाबा, समजावून काऽऽही उपयोग व्हायचा नाही. चिमटा बसला तो बसला. लेबल लागलं म्हणजे लागलं!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तू दिलेल्या लिंकवर अजून फक्त
तू दिलेल्या लिंकवर अजून फक्त फुलं दिसताएत >> त्याने मुद्दाम केले असेल असे वाटंत नाही का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही वृत्तांत एकदम झकास जमलेत. गटगला खूप मजा आली. सगळे खाद्यपदार्थही अप्रतिम. सगळ्यांना प्रत्यक्ष भेटून खूप छान वाटले. आता पुढचे गटग कधी? लवकर ठरवा.
आता पुढचे गटग कधी? लवकर
आता पुढचे गटग कधी? लवकर ठरवा>>> नात्या, आता कसा खरा बाराकर शोभतोस.
नेहमी गटगहून परत येतानाच गाडीत बुवा पुढचं गटग ठरवतात,
नात्या. तुला दिसले ना फोटो?
नात्या. तुला दिसले ना फोटो?
पुढच्या गटगला शुभेच्छा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देसाई, केपी... धम्माल
देसाई, केपी... धम्माल वृत्तांत :d
विनय, केपी, वाचले वृत्तांत.
विनय, केपी, वाचले वृत्तांत. सही रे.:)
Pages