बा रा ए वे ए ठि - एक बर्फाळलेला दिवस....
बागराज्य एवेएठि हे आता रजनीकांतच्या लायनीवर जात असून, पुढच्या वर्षी त्यादिवशी बर्फ, हिवाळा, थंडी Cancel करण्यात येत आहे. यावर्षीचे एवेएठि या सगळ्याला न जुमानता पार पडलं. मँगो पाय नाही आला तर चिकनची तंगडी, आणि फिशकरी नसली तरी चिंगीकरी आणून बा. रा. करांनी आपल्या एवेएठित कोणतीही अडचण येऊ दिली नाही. बाराकरांच्या या करामतीने काही पुणेकर (आणि आता कोलकताकरही थक्क झाल्याचे वॄत्त हाती आले आहे).
अकराची वेळ दिली असता, वेगवेगळ्या चक्रधरांना जबाबदार ठरवून बहुतेक सगळे बाराकर बारा/सव्वा बारा पर्यंत हजर होते. उशीरा जाऊ तर भाईंनी आणलेले समोसे आणी V नी आणलेल्या तिखटपुर्या चुकणार याची खात्री होतीच. झक्की दरवर्षी तिळगुळाच्या वड्या (आणि फक्त वड्याच) आणतात, पण ते कुठल्यातरी गाडीत अडकल्यामुळे हे काम एबाबा यांनी पूर्ण केल्याचे समजते.
मी चिंगीकरी (म्हणजेच व्हेज मांचूरियन) घेऊन पोहोचलो तेव्हा बाराकर कुटूंब (एबाबा, प्राची , V) हजर होतेच. सचिन मला पार्किंग लॉटमधेच भेटला. आणि त्याने तिथेच मंचूरियन खाण्याची इच्छा व्यक्त केली, पण तसे न करता आपण आधी तिखट पुर्या खाऊ असे त्याला समजावून आत नेले.
जेवणाची वर्णने अनेक ठिकाणी आल्याने ती इथे देत नाही. मला मडकं दिसलं नाही तर मडक्यातले आलू कुठले दिसायला. मी कुणाला तरी विचारलं देखील हे 'मडक्यातले आलू' कुठे म्हणून तर त्याने बोट दाखवलं ते भोपळ्याचे भरीत असावे. (एकदा हनी वोडका घेतली ना की आलू/भोपळा/वड्या काही काही म्हणून फरक कळत नाही). आता एकदा शुध्दीत राहून हे आलू खायला जाईन म्हणतो. गुळाच्या पोळ्या (नात्याने सुमाफूड कडून आणलेल्या) मस्त होत्या. चिकनप्रेमी चिकनबद्दल सांगतीलच. मांचुरियन खाऊन 'झणझणीत' आहे असं कोणालातरी म्हणताना ऐकलं. नेहमी तेच काय नेणार (म्हणजे कोलंबी, पापलेट वगैरे) म्हणून योगिनीने यावेळी मांचुरियन करून दिले. 'फिश कसं नाही?' असं म्हणत ईबा इकडे तिकडे शोधत असल्याची बातमी कानी आली. पकोडा कढी, मसालेभात, कोथिंबीरवड्या अशी इतर बरीच पक्वान्ने असल्याने पोटाची मस्त सोय झाली. मग थोड्या गप्पा मारून मंडळी कार्यक्रमाकडे वळली.
'फू बाई फू' मधून एक स्कीट घेऊन (कारविक्रेता आणि लग्नाळू मुलगा) आम्ही थोडी तयारी केली होती. आपले माबोकर आणि यशस्वी लेखक 'कौतूक शिरोडकर' यांचं ते स्कीट असल्यामुळे त्यांची परवानगी आवश्यक होती. शनिवारी सकाळी फोन लागला व लगेच परवानगी मिळाली, त्यामूळे ते स्कीट होणार हे नक्की झालं. पुणेकर पाहूण्यांना उउवि बघायला एक संधि म्हणून 'उउवि' ची एक झलक झाली. (हाच कार्यक्रम आल्बनीला करायचा असल्याने माझी एक प्रॅक्टिस पण झाली)
उउवि बघण्यापूर्वी झक्कीनी सगळ्यांना 'हा कार्यक्रम लोक पैसे देऊन बघतात. तुम्हाला फुकट मिळतोय, तेव्हा जोराजोरात हसा' अशी तंबी दिल्याने सगळ्यांनी हसून घेतलं.
ईबा यांचे बिडी ते भिशी (म्हणजे भीमसेन जोशी) मस्तच. म्हणजे सुरुवात बिडीने करून त्यांनी Direct भीमसेन जोशींच्या गाण्यावर गाडी घेतली. 'राहत' प्रेम पण दाखवून दिलं. खरं तर ईबा 'शिला की जवानी' किंबा 'मुन्नी बदनाम' करतील अशी आशा होती पण 'झक्कींना कळणार नाही' म्हणून हा बेत दोन वर्षांसाठी तहकुब झालेला आहे. भाईनी हिमेश सोडून classical च्या मागे लागले आहेत म्हणे. बाकी सचिनने दोन गाणी म्हटली पण त्या गाण्यांचा त्याच्या Status शी संबंध जोडू नये असं तोच म्हणाला. सायोने कॅराओकी मशीन आणलं होतं पण एकही गाणं ती म्हणाली नाही.
मग उरली आवराआवर. ती पटकन झाली.. यावेळी रसमलाई, सुमंगल, लालू यांची अनुपस्थिती जाणवली.
सुरुवातीलाच पन्नाने टेनिसचे फटके मारूनही ती आली होती.
चमन आणि त्यांचे दोनाचे चार झालेले हात, आणि माणूस आणि बाईमाणूस हजर होते.
घरी गेलो तर मेलबॉक्सपर्यंत जायला २ तास बर्फ काढायला लागला. पण आत लेकीच्या Admission चे पेपर होते त्यामुळे श्रमपरिहार झाला.
बुवा गाडीत बसल्याबसल्या पुढच्या एवेएठिचे प्लॅनिंग सुरू करतीलच.
पुन्हा एकदा मैत्रेयी/निराकार यांना धन्यवाद. सालाबाद प्रमाणे हेही एवेएठि त्यांच्या हॉलमधे केल्याबद्दल. आतापासून Gentry वाले हा हॉल आणि हा weekend कायमचा आपल्या नावावर करतील अशी खात्री आहे.
V चे फोटो Picasa वर पाहिलेच असतील हजर असलेल्यांनी.
... समाप्त....
मी पहिली. छानच.
मी पहिली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच.
हो,हो, बुवांनी पुढच्या
हो,हो, बुवांनी पुढच्या एवेएठिचा विषय परत जाताना काढलाच.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छ्या! थोडक्यात हुकला पहिला
छ्या! थोडक्यात हुकला पहिला नंबर.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मज्जा केलेली दिसतेय सगळ्यांनी.
मला पण कोणीतरी फोटो पाठवा रे.
भाईंनी उचलाउचली केली कि नाहि
हो. नक्षी ला उचलल होत.
हो. नक्षी ला उचलल होत. (प्रिंस्टन जंक्षन वरुन)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उचलून गिरकी मारलीत का पण ?
उचलून गिरकी मारलीत का पण ? असेलच बहुदा, वर कुठेतरी हनी वोडकाचा संदर्भ आलायच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
-
-
भारी!! आता कुणीतरी मेनुचे
भारी!!
आता कुणीतरी मेनुचे फोटोही टाका (किंवा पाठवा).
ज्ञाती, माझ्याकडे आहेत फोटो.
ज्ञाती, माझ्याकडे आहेत फोटो. मी तुला पाठवले तर मला काय मिळेल ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुला काय मिळणार, फोटोतले
तुला काय मिळणार, फोटोतले पदार्थ संपले आता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता एकदा शुध्दीत राहून हे आलू
आता एकदा शुध्दीत राहून हे आलू खायला जाईन म्हणतो >>> नक्की या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो ची लिन्क कुठे आहे क?
फोटो ची लिन्क कुठे आहे क?
रसमलाई, तुम्ही चमी तर नाही
रसमलाई,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुम्ही चमी तर नाही ना?.
अनिभाई..रोहिणि, चमी, अजून कोण
अनिभाई..रोहिणि, चमी, अजून कोण कोण महिती आहे तुम्हला?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त. फोटो काढायची अॅक्शन
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फोटो काढायची अॅक्शन तर बरेच जण करत होते, पण वृंदाताईंव्यतिरिक्त कोणीच फोटो पाठवलेले नाहीत असं मी खेदपूर्वक नमूद करू इच्छिते.
माणसांचे फोटो नाही टाकलेत तरी
माणसांचे फोटो नाही टाकलेत तरी चालतील.. आजूबाजूच्या बर्फाचे आणि जेवणाच्या पदार्थांचे तेव्हढे फोटो टाकाच.. पब्लिकची जळाऊ लाकडाची वखार होईल त्यानी..
हे फोटो V यांनी पाठवलेले तेच
हे फोटो V यांनी पाठवलेले तेच अपलोड करतेय
.
![पà¥à¤°à¥ .JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u247/%20%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%20.JPG)
![माà¤à¤à¥à¤¯à¥à¤°à¥à¤¯à¤¨.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u247/%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A8.JPG)
![.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u247/%20%20.JPG)
![सà¥à¤ªà¥à¤¶à¤² à¤à¤¾à¤à¥ .JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u247/%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%20.JPG)
![मिठाà¤à¥à¤¯à¤¾ पà¥-या.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u247/%20%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A4%AF%E0%A4%BE.JPG)
![वडà¥à¤¯à¤¾ .JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u247/%20%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20.JPG)
![à¤à¤°à¥.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u247/%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80.JPG)
![.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u247/%20.JPG)
बर्फात बुडालेले बागराज्य
चमी-चमनची पाणीपुरी
देसाईंचं व्हेज मंचुरियन
भाईंनी आणलेले सामोसे
सुमंगल यांच्याकरता आणलेली भाजी
वृंदाताईंच्या तिखटमिठाच्या पुर्या आणि तिळाच्या वड्या
पन्नाने आणलेली चिकन करी
चमन-चमीने आणलेलं चिकन
सुमाकडच्या गूळपोळ्या
तुरिया पात्रा वाटाणा
माणुस-बामाच्या कोथिंबीर वड्या
मैत्रेयीचे कढी-पकोडे.
दिवेलागणीची वेळ
ह्या फोटोंमध्ये ईबांचा मसालेभात, सिंडीचा फालुदा आणि मडक्यातले आलू, तूप , झक्कींची करोना, बुवांची हनी वोडका आणि गोचिके, माणूस-बामाने आणलेले तिळाचे लाडू, पांढरा भात मिसिंग आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> ह्या फोटोंमध्ये ईबांचा
>> ह्या फोटोंमध्ये ईबांचा मसालेभात, सिंडीचा फालुदा आणि मडक्यातले आलू, तूप , पांढरा भात मिसिंग आहेत![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो. गोचिके (बुवांनी आणलेला) आणि तिळगुळाचे लाडूही (बहुतेक माणूस/बाईमाणूस यांनी आणले होते) मिसिंग आहेत. आणि काही विशेष गुणधर्म असलेले द्रवपदार्थही.
विशेष गुणधर्म असलेले
विशेष गुणधर्म असलेले द्रवपदार्थही >>>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
विशेष गुणधर्म असलेले
विशेष गुणधर्म असलेले द्रवपदार्थही >> म्हणजे त्यांचे फोटो काढेपर्यंत उरले असते तर किंवा फोटॉ काढण्यार्याला ते चाखण्यापासून वेळ मिळाला तर फोटो काढण्यात आले असते etc etc etc ...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अगदी अगदी असाम्या. मला तर
अगदी अगदी असाम्या. मला तर खुपच खेद झाला चाखण्याआधी फोटो काढला नाही याचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंडळी फोटो मेलने पाठवले आहेत.
मंडळी फोटो मेलने पाठवले आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरच्या मिसिंग गोष्टींचा फोटोच
वरच्या मिसिंग गोष्टींचा फोटोच न काढून अनुल्लेख का करण्यात आला असावा? ह्याचं उत्तर शोधतेय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला खरे तर एकेका पदार्थाचे
मला खरे तर एकेका पदार्थाचे फोटो काढायचे होते गोचिकेसकट. पण गप्पांच्या नादात राहुनच गेले.
केपीने फोटोंची लिंक पाठवली
केपीने फोटोंची लिंक पाठवली आहे पण अॅक्सेस दिलेला नाही. हे पुणेकर म्हणजे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भारी मेनु !!! वृंदाताई
भारी मेनु !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वृंदाताई पुर्यांची रेसिपी आता लवकर येउ देत
स्वाती
स्वाती![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता कसं मस्त वाटतय... बर्फ
आता कसं मस्त वाटतय... बर्फ वितळायला सुरु होईल उद्या सकाळ पासून सगळ्या वखारी पेटल्या की..
आवरा रे आवरा ......
आवरा रे आवरा ...... खाद्यपदार्थांचे फोटो म्हणतोय मी ...:)
झकास इतिवृत्त !
माझी ऊसगावाची वारी ठरल्यावर
माझी ऊसगावाची वारी ठरल्यावर लगेच सिंडीने पुढाकार घेऊन एक गटग करायचे आयोजले. खरे तर दरवर्षीच असे गटग बाराकर करतातम्हणे पण मी उगाच निमीत्त झालो.
तशातच माझे आगमन भयानक स्नोफॉल व नंतर ख्रिसमसमुळे लांबले. अखेर मी ३ जानेवारीला इथे पोचलोच. आरती कशी कोणास ठाऊक पण याच सुमारास चाँदनी चौक टु चायनासारखी एकदम पुण्यातुन निघुन हावडा ब्रिजवरुन लिंकन टनेलमधे घुसली. गटगच्या आधीच परत जाणार असल्याने एक फाटागटग पण ठरले पण आरतीने रिलीज डेट आयत्या वेळी पुढे ढकलण्यात यश मिळवले व निसर्गानेपण परत एकदा बर्फवृष्टी केल्याने त्या गटगलाच फाटा फुटला. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला उचलण्याकरता अमेरीकन आयडॉलसोबतच सिंडी, फचिन, नात्या, चमन व बुवा यांची ऑडीशन झाली व त्यात बुवांनी नंबर पटकावला.
बुवांच्या घरापासुन मैत्रेयीचा हॉल जास्ती जवळ असुनही त्यांनी येरवडयाला जाता जाता मला चिंचवडला (मुंबईकरांनी येरवड्याच्या जागी कल्याण व चिंचवडच्या जागी पार्ले वाचावे)नेण्याचे कष्ट घेतले. त्यांचे भयंकरच आभार. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अखेर २९ जानेवारीचा दिवस उजाडला व बुवा माझ्या हॉटेलवर हजर झाले. पुणेकरांना नावे ठेवतात म्हणुन मुद्दाम त्यांचे आदरतिथ्य करण्याकरता मी चहा करुन ठेवला होता पण त्यांनी मी चहा पित नाही असे नम्रपणे नमुद केले.
चहा घेणार का असे आधी विचारले असते तर पुणेकर असेच म्हणुन वाट लावली असती. सोबत आणलेल्या डिंकाच्या लाडवाला मात्र त्यांनी अर्धा खाऊन माझ्या विनंतीस मान दिला. वाटेत सायोचा पत्ता विचारण्याकरता त्यांनी २-३ वेळा ईबा, बाई, स्वाती_अंबोळे किंवा कोण ज्या निनावी आहेत त्यांना फोन केला
त्यांनी केलेला समस बुवांना मिळायला तयार नसल्याने व अरेच्चा आपण पत्ता तोंडी सांगु शकतो की याचा साक्षात्कार झाल्याने त्यांनी तो तोंडीच सांगीतला. सायोकडे जाताना वाटेल मी बुवांना बुधवार व्रत कसे करतात व त्याचा वसा 'उतशिल मातशिल घेतला वसा टाकशील' वगैरे म्हणत दिला. त्यामुळे बुवांची देशात व त्यातही पुण्यात परतायची इच्छा प्रबळ झाली.
सायोच्या आलिशान सोसायटीमधे त्यांच्या सिक्युरीटीला तिने आधीच सांगीतल्यामुळे आम्हाला प्रवेश मिळाला. बुवांच्या गाडीतुन उतरुन आम्ही सायोच्या गाडीत बसलो तेव्हा श्री. झक्की, स्वाती व पन्ना आधीच स्थानापन्न झालेले दिसले. बुवा किन्नर झाल्याने मी यक्ष झालो व अर्थात झक्कींशेजारी कुणीच बसायला धजावत नसल्याने मी त्यांच्या शेजारी बसलो. बसतानाच माझ्या यक्षप्रश्नाला बगल देत स्वाती व पन्ना यांनी थोड्याच वेळात कळेलच अशी धमकीवजा सुचना केली.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झक्कींनी नेहेमीचा शिरस्ता मोडुन मला लगेच ओळखले व आपण याआधी भेटलो आहोत याची आठवण करुन दिली. गाडीमधेच हास्यची कारंजी उडायला सुरुवात झाली होती. भारतीय नसले तरी अजुनही मराठी सासरा असल्याने आपला जावई जेव्हा बर्फवृष्टी झाल्यावर साचलेले बर्फ साफ करतो तेव्हा कसे बुजल्यासारखे होते हे झक्की यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सांगीतले. बहुतेक त्यांचे जावई घरात बसुन त्यांचे ऐकण्यापेक्षा बर्फ साफ करणे जास्ती पसंत करत असावा.
जाता जाताच त्यांनी आपला मुलगा तुम्हा सर्वांपेक्षा मोठा आहे हे सांगीतले व गाडीतील महीलावर्ग अय्या म्हणजे आम्ही अजुन कित्ती तरुण असा विचार करुन लालगुलाबी झाल्या. मला पण मनातल्या मनात गुदगुल्या झाल्या.
अखेर आम्ही मैत्रेयीच्या हॉलवर पोचलो. तिथे पोचल्यावर लगेच नात्या, भाई व आर्च हा डुआय घेऊन आलेली नक्षी भेटले. पार्ल्याक्कांनी मात्र चाणाक्षपणे भाईंचा तो बेत हाणुन पाडल्याने भाईच्या चेहेर्याची नक्षी उडाली.
बर्फाच्छादीत रस्त्यातुन वाट काढत आम्ही हॉलकडे वळलो. हॉलमधे शिरताच प्रसन्न व सुहास्य वदनाने मैत्रेयी, निराकार, फचिन, देसाई, एबाबा कुटुंब यांनी आमचे स्वागत केले. पदार्थांची यादी बघुनच कुणीही सकाळची न्याहारी केली नसल्याने आत शिरल्यावर लगेच वृंदाताईंनी आणलेल्या पुर्यांवर सर्वानी हात मारला.
फचिन सिंडीकडे रहायला न गेल्यामुळे तिला उशिर करण्याचे कारण मिळालेच नव्हते तरीही ती व आरती थोड्या उशिराने हॉलवर पोचल्या. त्याआधी माणुस व बाईमाणुस, चमन व चमी हजर झाले होतेच. सगळ्यांची साधी व सोप्पी ओळख परेड झाल्यावर लगेच हनीव्होडका व करोनाकडे लोक वळले. रंपापानला व हळदीकुंकवाला सुरुवात करण्याआधी मी सर्वांना सोबत नेलेला तिळगुळ वाटला व गोड बोला असे आवाहन करत होतो. काही जणांनी तु.क. टाकला तर काही जण नक्की बोलणार म्हणाले. स्वातीने मात्र तिळगुळ घेते पण गोड बोलेनच याची शाश्वती नाही असे सांगुन बाईपण दाखवले.
यानंतर मात्र सर्वांनी आपापले कंपु जमवले. गॉसीप चालु असतानाच पन्ना, सिंडी व स्वातीच्या पाशी पोचायच्या आतच त्यांनी चालाखीने विषय बदलला व मी सर्व बायकांचा संयुक्तापणे फोतोसेशन केला. चमी व बाईमाणसाने पण समदु:खी २ जणींची टोळी केली होती. थोडक्यात सर्व जण खाण्यापिण्याच्या व गप्पांमधे बुडुन गेले.
यानंतर विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. स्वातीने बिडी शिलगावत सुरुवात केली व त्यांच्या सुरांपुढे भाई व फचिनची तबला वाजवायची जिगर झाली नाही. सुरेख गाणी म्हणण्याचा त्यांचा सपाटा अधुन मधुन चालुच राहीला. एबाबांनी पण त्यांच्या जमान्यातील गाणे म्हणले. फचिनने गाणी म्हणत बडा नाम करेगा हे सांगायचा प्रयत्न चालुच ठेवला. मधे एका गाण्याला बाईंनी भाईंवर तुम्ही प्लिज तबला वाजवु नका अशी भाईगिरी केली. वाजले की बारा म्हणायला घेतल्यावर अचानक विनय व बुवा त्यांच्याशेजारी जाऊन बसले. सगळ्यांना वाटले की ह्या मावशा आता मागुन छान कोरस देतील पण कसले काय. खुप लाप्या वाजवल्यावर बुवांनी पण मोबाईलवर समस बघत बघत एक गाणे म्हणलेच. देसाई व भाईंनी केलेले स्किट तुफानच झाले. मला व आरतीला काहीतरी सादर कराच असा खास नागपुरी आग्रह पण झाला पण आम्ही दोघांनीही त्याला दाद ने देता इतरांच्या कलेला दाद देणे जास्ती पसंत केले. विनयच्या उभ्या उभ्या विनोदाला हा कार्यक्रम ते पैसे घेऊन करतात इथे फु़कट असल्याने हसायला हरकत नाही असे कुणीतरी म्हणाले.
अधुन मधुन खाण्याच्या फैरी व हास्याच्या लहरी चालुच राहील्या. माझ्याप्रमाणेच आरती, नात्या, नक्षी हेही अनेक लोकांना प्रथमच भेटत होते.
झक्कींनी नक्षीला तुम्ही फारच तक्रारखोर आहात असे परतीच्या प्रवासात सुनावले व तुमच्या तक्रारखोर स्वभावामुळे कुणीतरी 'नक्ष फरयादी है' असा बीबी पण उघडला आहे म्हणाले.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गटग झाल्यावर लगेच कुणीतरी 'नात्याचा बीबी' पण उघडला आहे त्याची स्फुर्ती झक्कींकडुन घेतली आहे अशी मला दाट शंका आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वरील वृत्तांतामधे कुणाला काही चुकुनमाकुन बोलले असलो तर क्षमा करतीलच पण
ही घ्यावा. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अबे, लालु, सुमंगल यांचीही भेट होईल असे वाटले होते पण योग नव्हता.
Pages