निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे नाही येत गं.. Sad जमिनीत येतही असेल कदाचित.

मी खुप वर्षे कुंडीत लावतेय. या दिवसात झाडाची पानेही मोकळेपणी फुटत नाहीत. झुबक्याझुबक्यासारखा दिसणारा गुच्छ एका जागी चिकटुन राहतो. रोप तसेच ठेवुन दिले तर दोन-तिन महिन्यात परत सगळे नीट होते. फुले येतात आणि मिर्च्याही लागतात. माझ्या झाडांवर तसा रोग वगैरे नाहीय. माझे बारीक लक्ष असते ना सगळ्यांकडे. मी आठवड्यातुन दोनतिनदा सगळ्यांना आंघोळ घालते. Happy
झाडांना मुंग्या लागतात - विषेशतः जास्वंदीच्या झाडाला पांढरा मावा पडतो आणि मुंग्या चढतात तिथे ही आंघोळ लाभदाई ठरते. यावर्षी माझी जास्वंदे एकदम सुरक्षित राहिली. मावा पडत राहिला पण मी फांदी न कापता त्यावर पाण्याचा मारा करत राहिले.

मोसमात खायची भाज्या आणि फळे त्या त्या दिवसातच खाणे योग्य असते कारण निसर्गाने आपले शरीर तसे बनवलेले असते. पण आता बाजाराच्या दबावाने पिके घेतली जातात.
कलिंगड बाजारात यायला रमझान महिन्याचा मुहुर्त लागतो. मुसलमान लोक चांद्रवर्ष पाळत असल्याने रमझान नेहमी १० दिवसांनी मागे जातो (त्यांच्याकडे अधिक महिना नसतो) आणि त्याला अनुसरुन कलिंगड पण.
रोजे सोडण्यासाठी त्यांना लागणार्‍या खजूराच्या बाबतीत मात्र असे वेळापत्रक बदलता येत नाही. तो कडक उन्हाळ्यातच पिकतो. म्हणून तो साठवून ठेवतात.

त्या मुंग्या त्या किड्यांना पाळतात. त्यांच्यापासून त्यांना गोड पदार्थ मिळतो.
वारुळात त्या वेगळे किडे पाळतात. त्या त्यांच्या गायी असतात.
शिवाय त्या बुरशीची शेतीही करतात.

साधना Lol

<< त्या मुंग्या त्या किड्यांना पाळतात. त्यांच्यापासून त्यांना गोड पदार्थ मिळतो.
वारुळात त्या वेगळे किडे पाळतात. त्या त्यांच्या गायी असतात.
शिवाय त्या बुरशीची शेतीही करतात.>>

किती तो व्यासंग ! डोक्याला मुंग्या आल्या हे वाचून... Happy

अरे हे सगळे असतेच कि आजूबाजूला.
ते जे हिरवट काळे किडे असतात ना, त्यांना मुंग्या नेहमी सावलीत ठेवतात. त्यांना कोवळ्या पालवीजवळ आणून ठेवतात. ज्या नांग्यांनी त्या आपल्याला चावतात त्याच नांग्यानी हळूवारपणे, हे सगळे चाललेले असते. ते किडे इतकी हालचाल करु शकत नाहीत.
त्याबदल्यात झाडातून शोषलेल्या रसातील अतिरिक्त साखर ते मुंग्याना देतात.

आपण आपल्याला समाजप्रिय म्हणवून घेतो. पण मुंग्या आणि मधमाशा यांची जीवनशैली बघितली, कि आपल्याला किती मोठा टप्पा गाठायचा आहे ते जाणवते.

दिनेशदा,
तुम्हाला मागे मी म्हटले होते ती बशीच्या आकाराची फुले, त्याची प्रचि इथे देतेय. तुम्हाला शंभरीबद्दल प्रेझेंट. सांगा बघू नाव.
Image3190.jpgImage3191.jpg
आणि हे पावडर पफचे झाड ना?
Image3192.jpg
या झाडाची फुले निळ्या रंगाची व छोटि छोटि आहेत.
Image3195.jpg

शोभा, वेगळाच प्रकार आहे हा. मला नाही वाटत भारतीय झाड आहे हे. तरीपण शोधून बघतो.
कुठे दिसले हे ? आमच्याकडे (नैरोबीला) एक बोगनवेलीचा असा प्रकार बघितला होता.
ते गुलाबी आहे ते पावडर पफ चेच.
आणि तूम्हा सगळ्यांच्या प्रेमापुढे, कुठलेच बक्षीस मला मोठे वाटत नाही.

साधना / जागू तूम्ही कधी अळीव पेरुन बघितलेत का ? त्याची पाने तिखट असतात. मिरची आणि कोथिंबीर दोन्हीचे काम होते. अळीव सहज उगवतात.

<<मिरची आणि कोथिंबीर दोन्हीचे काम होते. >>
अरेव्वा....मग माझा कोथिंबिरीचा प्रश्न सुटेल ना !
दिनेशदा, सविस्तर सांगा ना कसे लावायचे ते.

दिनेशदा माझ्याकडे भरपुर अळीव आहे. मेथिच्या लाडवांसाठी आणलेले पण अजुन केलेच नाहीत. आता पेरुन बघते.

अगदी सोपे आहेत. मातीत शिवरुन त्यावर हलकासा थर द्यायचा मातीचा. त्याची पाने त्रिशूळासारखी असतात. पण अगदी छोटी.
अळिवाला लॅटिनमधे बहुतेक Lepidium sativum म्हणतात. ते कुठेही, अगदी कॉम्प्यूटरच्या किबोर्डवर पण उगवू शकते.

Happy

योगेश मी सांगते उपाय, जर आपोआप पळत नसतील उंदीर तर ह्या उंदीरमारीच्या झाडाची एक चांगली जाड्जुड काठी काढायची आणि उंदीर दिसला की त्याच्या मागे धावायच त्याला मारायला आणि ह्या काठीने त्याला बदडवुन काढायचे म्हणजे झाल ह्या झाडाच नाव सार्थक. Lol

दिनेशदा, नमस्कार.
हे झाड पुण्यात, पौड रोडला, माधवबाग सोसायटी आहे तेथे आहे. मलाही तो बोगानावेलीचाच प्रकार वाटतोय. शेवटचे झाड कसले? निळ्या फुलांचे.
जागू, हे उंदीरमारीचे झाड आहे का? मी रविवारी शिवनेरीवर गेले होते तेव्हा तिथे हे झाड व फुले पाहिली. तिथे रक्तपर्ण, काटेसावर, व खूप वेगवेगळी झाडे व फुले पाहून तुम्हा सर्वांची फार फार आठवण झाली. कारण बरयाच झाडांची नावे मला माहित नाहीत, तेव्हा तुमच्यापैकी कोणी बरोबर असते तर कित्ती मजा आली असती? असा स्वार्थी विचार खूप वेळा मनात आला.
तुमच्यामुळे इथे मिळणारी माहितीही बहुमोल आहे. त्याबद्दल शतश: धन्यवाद

शोभा अग स्वार्थी नाही हा विचार हा तर तु आपलेपणा दाखवलास.

मी काल संध्याकाळी घरी गेले आणि झाड निरखायला गेले माझी. आणि मला इतका आनंद झाला. माझे नेवाळीचे झाड फुलांनी पुर्ण बहरले आहे. जणू काय त्या झाडाने स्वत:ला गजरे घालुन सजवलय असच मला वाटत होत. एक मोह होत होता की ही सगळी फुल काढून घ्यावीत आणि त्याचे हार आणि गजरे बनवावेत पण ही वेल इतकी सुंदर दिसत होती की मला त्यावरुन फुल काढवली नाहीत. मी तशीच ठेवुन दिली झाडावर.

nevali1.JPGnevali2.JPGneva.JPG

ते कुठेही, अगदी कॉम्प्यूटरच्या किबोर्डवर पण उगवू शकते.>> Lol
लाल रंगाचं असतं तेच ना ? दिवाळीच्या किल्ल्यावर पेरायचो तेच ? इथे दुकानात मिळेल की नाही शंका आहे. पण देशात जाणारे तेव्हा घेऊन येईन.
जागू Lol

जागू, खरच काय सुंदर दिसतायत ग फुल? तुझी गजरयाची उपमा त्याला अगदी चपखल
बसलेय. अगदी त्या झाडाने गजरा घातलाय असच वाटतंय. जागू, तुझी फोटोग्राफी, व वर्णन दोन्ही मस्तच असत.

जागू,नेवाळी म्हणजेच जाई का ? माझ्या आजोळी दाराशीच होता हा वेल. जाम आवडायची ती फुले मला.

नेवाळी कागड्या सारखीच असते फक्त कागडा जाडा असतो तर नेवाळी लांबट असते.
शोभा धन्स.

या उंदिरमारीच उपयोग खरंच उंदिर मारण्यासाठी होतो का?
हो. याचे जे फॅमिलीनाव आहे त्याचा अर्थच उंदिरमार म्हणुन आहे. हा शेतात उंदरांना अटकाव करतो.

नेवाळीला वास असतो का गं? माझ्याकडे कुंदा आहे (आता गावी) ती अशीच दिसते, पण डबल असते आणि सुवास असतो.

Pages

Back to top