इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
मला वाटतं मी एक नविनच
मला वाटतं मी एक नविनच गुलाबवेल लावीन. मला वेलीचा गुलाबच हवाय. तोही गावठी असेल तर उत्तम न पेक्षा केशरी रंगाचा हवाय ....... :हातपाय पसरून मोठ्ठ्याने रडणारी बाहुली:
अश्श ललायचं नाय बाला,
अश्श ललायचं नाय बाला, जागुआज्जी देणार हं तुला मश्त मश्त हव्वे तश्शे गुलाब... उगी उगी
मामी, इकडे या. हवे तसे
मामी, इकडे या. हवे तसे (बिनवासाचे) गुलाब मिळवून देतो. इथे बोगनवेलीसारख्या कुपणावर गुलाबांच्या वेली असतात.
फुले फळे येत नसलेल्या झाडाला
फुले फळे येत नसलेल्या झाडाला पूर्वी ग्रहणकाळात झाडूने बडवायचे! खरे की अंधश्रध्दा ते प्रयोग करून ठरवू शकता मामी. रच्याकने माझ्याकडे आहे गावठी गुलाब.
जागुआज्जी देणार हं तुला मश्त
जागुआज्जी देणार हं तुला मश्त मश्त हव्वे तश्शे गुलाब... उगी उगी
साधना पणजी पण देईल ह तुला शोधुन.
माधव आमच्याकडे आधी ज्या झाडाला फळ फुल धरत नाही अश्या झाडांना चामड्याची चप्पल लावायचे दृष्ट काढण्यासाठी.
दृष्ट लागून नये म्हणून---
दृष्ट लागून नये म्हणून--- ओमेन. ६६६ वे पोष्ट !!
जागू, साधना ..... आज्जी काय
जागू, साधना ..... आज्जी काय पणजी काय????
दिनेशदा, येते मी ... जरा तेवढे तिकीट पाठवून द्या बरं.
फुले फळे येत नसलेल्या झाडाला पूर्वी ग्रहणकाळात झाडूने बडवायचे! खरे की अंधश्रध्दा ते प्रयोग करून ठरवू शकता मामी. रच्याकने माझ्याकडे आहे गावठी गुलाब. >>> वेलीचा आहे का?
वेलीचा आहे का? >> वे ली चा
वेलीचा आहे का? >> वे ली चा गुलाब चीन मध्ये असतो भारतात नाही.
दिनेशदा, घायपात काही ठिकाणी
दिनेशदा,
घायपात काही ठिकाणी पाहिला होता पण त्याच नाव आज कळालं, विषेश करुन दुष्काळी भागात रस्त्याच्या दुतर्फा याची झाडे खुप पाहिली, पण त्याचा कलर मात्र निलसर पांढरा दिसला.
अनिल तोच खरा घायपात. (हे
अनिल तोच खरा घायपात. (हे आफ्रिकन भूत.) सुतळी करतात त्याच्या पानापासून.
मी माउंट आबुच्या डोंगरात
मी माउंट आबुच्या डोंगरात भरपुर घायपात पाहीला आहे.
गावठी गुलाब मला पण खूप आवडतो.
गावठी गुलाब मला पण खूप आवडतो. पण आजपर्यंत कितिही वेळा छान झाडं आणून कुंडीत लावली. पण वेल नुसतीच वाढत जाते. शेवटी कटाळुन गुलाबाचा नाद सोडून दिला.:अरेरे:
साधना, काल शेतावर मजा आली.
साधना, काल शेतावर मजा आली. आमच्या कोकमाच्या झाडाला या वर्शी प्रथमच फुले लागली आहेत. ऊन्डीच्या फुलाना सुवास आहे. अध्याप पुर्ण फुलले नाही. ऊन्डीच्या झाडावर नागकेशराचे कलम केले तर ते लवकर बाजते. राजु ने मला सन्गीतले आणि मी त्याच्याकडे असलेले कलम लगेच उचलून आणले.आम्ब्याच्या झाडाला मोहर येताना तो चान्गला यावा व फळ धरावे म्हणून घान्गण माशी लागते.घान्गण माशीला आकर्शीत करण्यासाठी सोपी युक्ती- ड्ब्यात सूकट घेऊन त्यात शेण कालवावे व तो डबा झाडाला टान्गावा.घान्गण माशी नीळ्या पन्खाची छोटी माशी असते.
जागु सुकट खाणारे तुझ्या माझ्या खेरीज आण़खीही आहेत.
लीहायला खुप वेळ लागतो.
विजयदा, तुमचे शेजारी कांबळे
विजयदा, तुमचे शेजारी कांबळे माझे मित्र आहेत. आजच तुमची आठवण निघाली होती.
अरे, किती लिहिताय
अरे, किती लिहिताय ???
मामी....झाडूने बडवलं का मग वेलीला ?
साधना, जागू....आज्जी-पणजी ( तुम्ही वयाने नक्की केवढ्या आहात मला माहीत नाही हं, मी बिनधास्त अगं-तुगं करतेय. रागवू नका बायांनो.)
असुदे, काम्बळे आजकाल शेतावर
असुदे,
काम्बळे आजकाल शेतावर येत नाहीत त्यामूळे भेट नाही,
ऊन्दीरमारी फुलू लागली आहे. सुन्दर दिसते.पण चान्गला कॅमेरा नाही.मोबाईल चा फोटो जोडतॉ.
रुणुझुणु, साधना ने ७५ गाठली
रुणुझुणु, साधना ने ७५ गाठली गेल्या वर्षी, आणि जागूचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, पुढच्या महिन्यात आहे. तेव्हा यापुढे वयाचा मान ठेवायचा, काय ? आणि मी त्या दोघींना बराच सिनियर.
विजय, मला राजूदादांना भेटायलाच पाहिजे आता.
आणि कोकमात, नर मादी प्रकार असतो ना ?
दिनेशदा, म्हणजे तुम्ही बहुतेक
दिनेशदा, म्हणजे तुम्ही बहुतेक शंभरीचे(!)
रुणुझुणु, साधना ने ७५ गाठली
रुणुझुणु, साधना ने ७५ गाठली गेल्या वर्षी, आणि जागूचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, पुढच्या महिन्यात आहे. तेव्हा यापुढे वयाचा मान ठेवायचा, काय ? आणि मी त्या दोघींना बराच सिनियर.
>>>>
साधना घोस्ट ट्री ला मराठीत
साधना घोस्ट ट्री ला मराठीत कहान्डाळ्,कोन्डाळ, पान्ढरूख म्हणतात्.रोप गो ग्रीन मधे मीळतील.शनिवारी पाठारे नर्सरीत कमन्ड्लू च झाड पाहील्. चार फूटी झाड त्याला पपई पेक्शा मोठे फळ होते. झाड विकत देत नाहित.
शनिवारी पाठारे नर्सरीत
शनिवारी पाठारे नर्सरीत कमन्ड्लू च झाड पाहील्.
पाठारे नर्सरी कर्जत ला आहे ना??मी खुप ऐकलेय त्या नर्सरीबद्दल. एकदा भेट द्यायचीय..
दिनेश, सेंचुरी कधी मारलीत, मला का नाही बोलावले केक खायला?? आता कट्टी माझी.. आता तुम्हाला चॉकलेट नाही देणार....
विजय, हळुहळळू होईल सराव मराठीत लिहायचा.
दिनेश तुमच्या पुढच्या भेटीत निसर्ग उद्यान आणि बदलापुर भेट असा कार्यक्रम ठेऊया...
(तुमच्या कुटूंबाचा विचारही करत नाही आम्ही. त्यांनाही वेळ घालवायचा असेल ना तुमच्याबरोबर.... )
गो ग्रीनमध्ये बरीच चांगली
गो ग्रीनमध्ये बरीच चांगली रोपे आहेत, समुद्रफुल, निवर, अशोक, बुचाचे झाड्..सगळे आहे त्यांच्याकडे. माझ्याकडे हे सगळे लावण्याएवढी झाडे नाहीत
माझे शेत झाले की गोळा करणार या सगळ्या मित्रमैत्रिणींना माझ्या शेतावर... मग दिवसभर गप्पा मारायला बरे...
ही पाठारे नर्सरी कुठे आहे
ही पाठारे नर्सरी कुठे आहे ?
दिनेशदा म्हणजे तुम्ही खापर पणजोबा का ?
विजय मला मिर्याचे झाड आणलेत का ?
रुणुझुणू आमच्या थोरा मोठ्यांचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्याकडे चांगली मेथी, भाज्या पिको.
ते उन्दीरमारीचे झाड आहे का ? आमच्या रस्त्याच्या कडेला खुप बहर आलाय ह्या झाडांना.
दिनेशदा जागू, खरंच आशिर्वाद
दिनेशदा
जागू,
खरंच आशिर्वाद ठेवा रे थोरामोठ्यांनो !!
उन्दीरमारी हे झाडाचं नाव आहे ???
जागू ही पाठारे नर्सरी कुठे
जागू
ही पाठारे नर्सरी कुठे आहे ?
पाठारे नर्सरी कल्याण ला आहे. छान मोठी नर्सरी आहे.
२६ जानेवारीच्या सुट्टीच्या
२६ जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशी चिंगीला घेवून पारसिक हिल हुंदडलो. तिथे ही वेगळीच झाडे दिसली. दिनेशदा,जागू,साधना ह्या विषयी जास्त सांगू शकतील.
डॉ, हेच ते गिरिपुष्प उर्फ
डॉ, हेच ते गिरिपुष्प उर्फ उंदिरमारी. त्या डोंगरावर भरपूर आहे. पण इतक्यात कशी फूलायला लागली हि ?
आपल्याकडे ऋतूंचे नीट वेळापत्रक होते. साधारणपणे चैत्रात म्हणजे वसंतात सगळी फूले बहरत असत.
आणि हवामानचे तंत्र बिघडले कि झाडांचे बदलते मग त्यावर अवलंबून असलेल्या प्राण्यापक्ष्यांचे. त्यांचे घरटे बांधण्याचे, अंडी देण्याचे नेमके आडाखे असतात.
==
अरेच्च्या सेंचुरी झालीच कि. (रच्याकने मायबोलीवरती महिन्यांची सेंच्युरी नक्कीच झाली. )
===
विजय, माझ्या संग्रहात एक कांडोळ नावाच्या फूलाचे चित्र आहे. मस्त पांढरे फूल असते.
डॉ. कैलास ह्या उंदीरमारीच्या
डॉ. कैलास ह्या उंदीरमारीच्या झाडांना आमच्याकडेही बहर आला आहे. वरच्या चित्रात सगळी फुललेली दिसत आहेए फुले आमच्याकडे अजुन अर्ध्या कळ्या आणि अर्धी फुले आहेत.
कैलास, कधी हुंदडत होता? २६
कैलास, कधी हुंदडत होता? २६ तारखेला मी वरच्या फोटोतल्या झाडाखालची माती गोळा करुन आणली. झाडाचा फोटो इथे टाकणार होतेच, पुर्ण फुललेले झाड अगदी सुंदर दिसतेय.. याच रस्त्यावरुन थोडी पुढे गेले तर एवढ्याच उंचीच्या एका झाडावर कोकिळ दिसला. पुर्ण पांढरा आणि त्याच्यावर काळे आडवे लाटांसारखे पट्टे.. कि उलटे होते?? पुर्ण काळा आणि आडवी पांढरी नक्षी????
दिनेश, हल्ली कसलाच भरवसा उरला नाही. कोकीळ ओरडताहेत, गिरिपुष्प बहरलेत, सावरीला फुले आल्यावर पाने गळताहेत... ऋतुचक्र पार उलटेपालटे झालेय.. येत्या काळाच्या पाऊलखुणा उमटताहेत...
माझ्या संग्रहात एक कांडोळ
माझ्या संग्रहात एक कांडोळ नावाच्या फूलाचे चित्र आहे. मस्त पांढरे फूल असते>>>>>>>
कांडोळ नावानेच गुदगुल्या होतात...... या झाडावर चढताना पायाला सॉलिड गुदगुल्या होतात.आमच्या इथे गावदेवी मंदिराजवळ हे झाड आहे.....
धन्यवाद दिनेशदा.:)
Pages