आपण आग्रही ग्राहक

Submitted by मामी on 20 January, 2011 - 10:27

बरेचदा घरातील महत्चाच्या वस्तु खरेदीच्या वेळी आपल्याला चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली जाते. कधीकधी मुळातच खराब असलेली वस्तु गळ्यात मारली जाते. अशा प्रसंगात एक ग्राहक म्हणून जर आपण नेट लावून आपल्यावर झालेला अन्याय दूर केला असेल तर असे अनुभव सगळया मायबोलीकरांकरता शेअर करूयात. यात घरातील व्हाईट गुड्स (टिव्ही, फ्रीज, मिक्सर, एसी, कॉम्प्युटर बगैरे), फर्निचर आणि इतर सेवासुविधा (फोन, गॅस, इंटरगेट, टिव्ही कनेक्शन वगैरे) इ.च्या खरेदीच्या वेळी आलेले अनुभव द्यावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन घरात आल्यावर गॅस सिलिंडर मिळवण्याकरता, जवळच्या HP गॅस एजन्सीत गेले. दोन सिलींडरे हवीत म्हणून सांगितले. तर ते म्हणायला लागले की त्याबरोबरच गॅस-शेगडी पण कंपलसरी घ्यावीच लागेल. घरात एक शेगडी आधीच असल्याने मला अर्थातच अजून एक नको होती. हे पण कळेना की सिलिंडरची एजन्सी गॅस-शेगडी गळ्यात का मारत आहे? सरळ घरी आले आणि HP गॅसची वेबसाईट उघडली. तर अहो आश्चर्यम! तिथे त्यांची ग्राहकांकरता 'जी हाँ' सेवा असलेली आढळली. मी लगेच माझा अकाउंट उघडला. त्यांची तक्रार नोंदवण्याकरता असलेल्या जागी माझी तक्रार डिटेलमधे घातली. तिथे त्यांनी सर्वसाधारण तक्रारींची लिस्टच करून ठेवलीये. ती तक्रार हेड्-ऑफिसला गेली. मला कन्फर्मेशन आणि तक्रार क्र. लगेच इमेल केला गेला.

दुसर्‍याच दिवशी एजन्सीवाल्यांनी स्वतःहून फोन केला आणि केवळ सिलिंडरे मिळतील, येऊन पैसे भरा वगैरे सांगितले. तेव्हापासून काही प्रॉब्लेम आला तर मी इमेल टाकते. फार तत्पर सेवा आहे. सिलिंडरही ऑनलाईन बुक करते.

नंतर बिल्डींगमधल्या इतर मैत्रिणींची बोलले तर कळलं त्या सगळ्यांनी एक एक गॅस-शेगडी नको असताना विकत घेतली होती. माझा अनुभव ऐकून हळहळल्या.

इथे www.consumerreports.org ह्या वेबसाईटला मेंबरशीप घेतली तर प्रॉडक्ट रिव्ह्युज बघता येतात. मिळालेल्या माहितीचा फायदा घेऊन कोणत्या ब्रँडची वस्तू घ्यावी हे ठरवणं सोपं जातं.

धन्स सायो. पण हे आपल्याकडून झालं आणि आपण तर पूर्ण खात्री करूनच कोणत्याही वस्तुत पैसे घालत असतो. पण गडबड होते जेव्हा आपली फसवणूक होते तेव्हा. अशावेळी कोणी काही उपाय, खबरदारी, योग्य ठिकाणी तक्रार करून वगैरे ती फसवणूक टाळली असेल तर असे अनुभव बाकीच्यांना उपयोगी ठरतील.

धन्स अरूंधती. वाचते.

चिंगी >>> आता इतर कोणी असे गॅस-चेंबर मधे जाणार असतील तर त्यांना वेळीच वाचवा.

केदार >> हो की काय? तुम्ही घेणार होतात? बरं झालं. या धाग्याचा हेतू साध्य झाला.

बाकीही अनुभव लिहा प्लीज.

सगळेच अनुभव असे सुखद नसतात.

बर्‍याच वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी एक मैत्रीण फिलिप्समध्ये होती. तिला employee कोट्यातून फिलिप्सच्या वस्तु घेता येत असत. मीही त्यावेळी नविन चांगला टिव्ही घेण्याच्या विचारात होते. म्हणून तिने मला सल्ला दिला की तिच्या नावाने मी फिलिप्सचा टिव्ही घ्यावा. घसघशीत किंमतीचा टिव्ही २०% डिसकाउंटवर मिळाला. पण आणल्यापासून त्याने आपले जे काही प्रताप दाखवायला सुरवात केलीये म्हणता ... साधारण ८-१० महिने व्यवस्थित चालला मग नंतर दर दोन महिन्यांनी महाशय बंद पडायचे. टेक्निशियनला बोलवा, तो नक्की वेळ सांगायचा नाहीच मग अख्खा दिवस त्याच्यासाठी तिष्ठत बसा, प्रत्येकवेळी त्यांची व्हिजीट फी द्या... असे सगळे प्रकार करून झाले. हेड ऑफीसला तक्रार करून झाली, मैत्रीणीला मधे घालून झाले. पण ते काही केल्या त्यांचा पीस खराब होता हे मान्य करायला तयार झाले नाहीत. शेवटी मातीमोल किंमतीला तीन वर्षांनी विकून टाकला.

अजुनही कळलं नाही की, तो पीस खराब होता की employee कोट्यातून बिन-employee ने घेतला म्हणून मध्येच कोणीतरी सबस्टँडर्ड माल गळ्यात मारला की स्वत्यातला माल माझ्या नशिबी नाही? असो. त्यानंतर फिलिप्सची एकही गोष्ट घेण्याची हिंमतच झाली नाही.

मामी, माझादेखील HP व्यवस्थापनाचा अनुभव अतिशय तत्पर आणि चांगला आहे.

आमच्या इथल्या HP ची गॅस सिलिंडरे पुरवणार्‍या एजन्सीचा कारभार ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय गचाळ आहे. माझ्याकडेही दोन सिलिंडरे आहेत. पण ग्राहक आणि उत्पादक यांच्या मधल्या थरांत चालणार्‍या काळ्याबाजाराने सिलिंडर संपल्यावर बुक केल्यावर यालला चक्क दीड महिना लागायचा. दोन्ही सिलिंडरे संपून महिना व्हायला आला, तरी यांचा पत्ता नाही. रोज फोन करून करून वैताग. नुसतीच 'हा हा', 'आज येईल सिलिंडर', 'उद्या पाठवतो' वगैरे उत्तरं. ही उत्तर ऐकून ऐकून त्यांना झापले तरी काही उपयोग नाही. अगदी बेजार केले. एके दिवशी तर 'जा नाही पाठवत सिलिंडर. कुणाकडे जायचे तिकडे जा.' असं ऐकवल्यावर इंटरनेटवर HP च्या संकेतस्थळावर आलो. तेथे जाऊन व्यवस्थापनाकडे चांगलीच खरमरीत तक्रार नोंदवली. आणि शेवटी असे लिहिले की, मी सगळे उपाय थकल्यावर इथे तक्रार नोंदवत आहे. इथंही तिची दखल घेतली गेली नाही तर मी यापूर्वीच्या सगळ्या रेकॉर्डींगज् सह तडक ग्राहक-न्यायालयात जाणार आहे.

ही ई-तक्रार मी शनिवारी रात्री-१०:४५ ला नोंदवली. आणि रविवारी सकाळी सातला (हो चक्क) आमच्या वसाहतीत मोठ्ठा ट्रक भरून सिलिंडरे आली. (त्यावरून सगळ्यांनाच रहिवाश्यांना त्या एजंसीने तंगवले होते हे उघड होते.)

हे इथेच संपले नाही. मला रविवारी दुपारी HP व्यवस्थापनाकडून दूरध्वनी आणि ई-पत्रही आले - की तुमच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली आहे आणि त्यानुसार आम्ही कारवाई सुरू केली आहे. तुम्हाला आज दिवसभरात सिलिंडर नाही मिळाले तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. दोन दिवसांनी पुन्हा त्या मॅनेजराने फोन करून चौकशी केली. सगळ्या ग्राहकांकडून तक्रारी येत असल्याने आम्ही तो एजंट बदलायचा विचार करत आहोत, तेव्हा तुमच्या तक्रारी आम्हाला दुसर्‍या एका वेगळ्या पत्राद्वारे आमच्याकडे पाठवा - आमच्या निर्णयाला दुजोरा म्हणून, असे सांगितले. असा निर्णय घेतल्यावर तो एजन्ट एजन्सी वाचवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊ शकतो, तुम्हाला तक्रार मागे घेण्यासाठी लाच देऊ करेल / धमक्या देईल, पण तुम्ही तक्रार मागे घेऊ नका असे सांगण्यात आले. ग्राहकांनीच तक्रार मागे घेतली म्हणजे आम्ही तोंडावर पडतो, वगैरे.

मग मी पुन्हा बसून व्यवस्थित दुसरे एक पत्र लिहून पाठवले.

त्यांनी म्हटल्याप्रमाणे नंतर तो एजन्ट माझ्या घरी आला. आणि आता तुम्हाला सिलिंडर मिळालेय, काही प्रॉब्लेम नाही असे लिहून द्या म्हणून गोंडा घोळायला लागला. मी म्हटले, गेल्या वर्षभरात मी सिलिंडरसाठी केव्हा बुक केले आणि मला सिलिंडर केव्हा मिळाले याच्या सगळ्या नोंदी माझ्याकडे आहेत, त्याही त्यात नमूद करणार. Proud त्यावर त्याने बरीच मखलाशी केली. तुम्हाला यापुढे बुक केल्याबरोबर सिलिंडर पाठवतो. मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालत जाईन, माझा मोबाईल नंबर लिहून घ्या, थेट मलाच फोन करा म्हणजे तुमचे सिलिंडर मी ताबडतोब पाठवत जाईन वगैरे वगैरे. बराच वेळ. पण त्याला आम्ही अजिबात भीक घातली नाही. (आमच्या मासाहेब म्हणाल्या, आज दसर्‍याच्या दिवशी आमच्या घरी आला आहेस तर जेवून का जाईनास. पण लिहायचे-बिहायचे काही सांगू नको. Lol )

इथे आणखी एक सत्य बाहेर आले. गेल्या महिन्यात एजन्सीने आम्हाला दोन सिलिंडरे पाठवली होती असे तो सांगू लागला. पण प्रत्यक्षात काळ्याबाजारत गेल्याने मला एकही मिळाले नव्हते. त्यावरूनही त्याला बरेच खडसावले. पुढचे वर्षभर जर वेळच्या वेळी सिलिंडर आले तर लिहून देईन असे सांगून त्याला हाकलून लावले.

तेव्हापासून आतापर्यंत सिलिंडर वेळच्या वेळी म्हणजे बुक केल्यावर तिसर्‍या दिवशी येते आहे.

तेव्हा लोकहो, तुम्ही HP ग्राहक असाल आणि असा त्रास असेल तर तक्रात नोंदवा. सिलिंडर ग्राहकापर्यंत पोचवण्यासाठी एजंसीला HP कडून (पर्यायाने आपल्याच खिशातून) सिलिंडरमागे २५ रुपये मिळतात.

हो की काय? तुम्ही घेणार होतात? बरं झालं. या धाग्याचा हेतू साध्य झाला. >>> हो म्हणजे भाऊ घेणार होता, आणि पाच सहा दिवसांपूर्वीच हे बोलणं झालं त्यात तो आणखी एक शेगडी घ्या म्हणत आहेत असे म्हणाला. आता त्याला हे सर्व सांगेन.

धागा चांगलाच आहे. Happy

आमच्या मासाहेब म्हणाल्या, आज दसर्‍याच्या दिवशी आमच्या घरी आला आहेस तर जेवून का जाईनास. पण लिहायचे-बिहायचे काही सांगू नको >> Lol

आमच्या मासाहेब म्हणाल्या, आज दसर्‍याच्या दिवशी आमच्या घरी आला आहेस तर जेवून का जाईनास. पण लिहायचे-बिहायचे काही सांगू नको>>> Lol

मामी, एक सांगावस वाटतं. कंपनी जेंव्हा डिसकाऊंट देते ते त्या एम्प्लॉयीसाठी किंवा त्यांच्या इमिजिएट फॅमिलीसाठी असतात. त्याचा फायदा मित्रमैत्रीणी, आजूबाजुचे, बिल्डींगमधले ह्यांनी घेणं बरोबर वाट्त नाही.

अर्थात ह्या बीबीचा तो विषय नाही.

चांगला धागा आहे.

आम्हाला Sears चा असाच वाईट अनुभव आला गेल्यावर्षी. आमचा जुना डिशवॉशर खराब झाला म्हणून तिथली मापे वगैरे घेऊन सिअर्स ला जाऊन एक डिशवॉशर पसंत केला. त्या विक्रेत्याला सांगितले की आमच्याकडे डिशवॉशर बसवायला कदाचीत त्रास होऊ शकतो कारण नंतर हार्डवूड फ्लोअर केलेले आहे. त्याने त्या इंस्टॉल सर्व्हीसला फोन करून विचारले की असे असे आहे तर करतील ना इंस्टॉल नीट? तिकडून हो असे उत्तर आले म्हणून आम्ही पैसे दिले आणि अपॉइंटमेंट घेतली. दिलेल्या वेळेत न येता हा माणूस २ तास उशीरा आला. आल्यावर किचनमधे पाहिले आणि हे मी करत नाही केले आणि काही पडझड झाली/केली तर आम्ही जबाबदार नाही वगैरे म्हणाल्यावर आम्ही काही करू नको तो डिशवॉशर परत घेऊन जा असे सांगितले. संध्याकाळी आम्ही दुकानात जाऊन ऑर्डर कॅन्सल करावी म्हणून गेलो तर तिथे कळले की अप्लायन्सेसची ऑर्डर दुकानात कॅन्सल करता येत नाही. मग घरी येऊन फोन केला ८०० नंबरला तर त्यावशीचे ऑफिस आवर्स संपलेले होते. मग दुसरे दिवशी भली मोठी तक्रार सांगून कॅन्सल केले तर ५-६ ठिकाणी फिरवले (फोन ट्रान्सफर). कसेबसे त्यांच्याकडून वदवून घेतले की २ दिवसात पैसे परत मिळतील. ४ दिवसानी क्रेडीट कार्डवर पैसे अजून आले नाहीत म्हणुन अजुन २ दिवस वाट पाहिली. तरी काही चिन्हे नाहीत. मग परत हेच दिव्य. परत दुकानात चक्कर, पुन्हा फोनाफोनी. तरी काहीही उपयोग नाही. दुकानातल्या विक्रेत्यांनी तर सरळ कानावर हात ठेवले. त्यानंतर फोन केरून कोर्टात केस करणार अशी तक्रार केल्यावर मग ३ दिवसांनी पैसे परत जमा झाले.

याविरुद्ध अगदी होमडेपोकडून सर्विस मिळाली. ते इंस्टॉल करणारे इतके चांगले होते की सगळे काम नीट करून गेले. नीट सगळे कडेने सील वगैए करून गेले. एकही तक्रार नाही की काहीही नाही.

आमच्या मासाहेब म्हणाल्या, आज दसर्‍याच्या दिवशी आमच्या घरी आला आहेस तर जेवून का जाईनास. पण लिहायचे-बिहायचे काही सांगू नको. >>>> Happy

मामी, एक सांगावस वाटतं. कंपनी जेंव्हा डिसकाऊंट देते ते त्या एम्प्लॉयीसाठी किंवा त्यांच्या इमिजिएट फॅमिलीसाठी असतात. त्याचा फायदा मित्रमैत्रीणी, आजूबाजुचे, बिल्डींगमधले ह्यांनी घेणं बरोबर वाट्त नाही.

अर्थात ह्या बीबीचा तो विषय नाही.

>>>> हो आर्च ती चुक झालीच माझ्याकडून. पण फिलिप्सवाल्या मैत्रीणीनीच सुचवलेलं आणि बराच डिस्काउंट मिळतोय म्हणून सारासार विचार ऑप्शनला टाकला गेला. त्याचीच फळं भोगली ना! Sad

यावरूनही बाकीच्यांनी बोध घ्यावा ही विनंती.

पूर्वी एम आर टि पी अ‍ॅक्ट, म्हणजेच मोनोपॉली अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टीसेस (कंट्रोल) अ‍ॅक्ट अस्तित्वात होता. (आता आहे का ?) एक वस्तू घेण्यासाठी दुसरी वस्तू घ्यायला भाग पाडणे, हे त्या कायद्याच्या कक्षेत येत असे,
पण दुसर्‍या बाजूचा अनुभव असलेली एक व्यक्ती म्हणून सांगतो, कि काही काही उद्योगधंदे केवळ ग्राहकांच्या फसवणुकीवरच चालतात. उदा. ऑटोमोबाईल सर्व्हीसिंग. (आणखी खोलात लिहित नाही, मला ओळखणारे, समजून जातील.)

केदार.. माझ्या एका मित्राला पण गॅस एजन्सीवाल्यानं शेगडी घ्यावी लागेल असे सांगितले. मित्र त्याला फक्त म्हणाला की मला असे तुझ्या लेटरहेडवर लिहून दे मग मी ठरवतो. लगेचच ती अट त्यानं काढून टाकली...

खुप वर्षापुर्वीचा पुण्यातील किस्सा.
माझ्या बॉसनी नुकतीच सॉफ्टवेअर कम्पनी चालु केली होती. सगळे मिळुन आम्ही ४-५ जणच होतो आणि घरातलाच भाग ऑफिस म्हणुनconvert करुन घेतला होता. नविन फोनच्या वेटींग लिस्ट मुळे घरातलाच फोन सर्व ऑफिस कामा साठी वापरण्यात येत होता. एकदा फोन बंद पडला. खुप वेळा तक्रारी नोंदवुन, प्रत्यक्ष संबम्धित लोकांना भेटुन पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तक्रार , सेवा कर्मचारी लक्ष देत नसल्याचे गार्‍हाणे आणि lost of business नावाखाली नुकसान भरपाई का मिळु नये ह्या मजकुरचा एक फॅक्स सर्वात वरीष्ठ अधिकार्‍याला पाठवला. (तो नंबर टेलिफोन डैरेक्टरी मधेच मिळाला). फॅक्स पाठवल्या नंतर अक्षरशः ४-५ तासात लाईनमन हजर. अगोदर काही बोलला नाही पण जाताना म्हणाला की पुन्हा काही प्रॉब्लेम आला तर मलाच भेटा साहेबांकडे जायची गरज नाही.

भारत गॅस कंपनीला आग लागो. वेबसाईट म्हणजे एक विनोद आहे. गॅस बुक करण्याची सोय आहे म्हणे. तिथुन काळजीपूर्वक बुक केला आणि चार दिवसांनी एजन्सिला फोन केला तर म्हणे बुकच झालेला नाही. ड्यँबिस लोक.

ह्याबद्दल एका मराठी ब्लॉगवर ही माहिती मिळाली : (स्रोत : http://chanefutane.com/articles.php?articlesid=196 )

ग्राहक न्यायमंच

" कोणत्याही उपक्रमाचा केंद्रबिंदू ग्राहक असतो" असे अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष केनेडी यांनी म्हटले आहे. ग्राहकांचे मूलभूत हक्क पुढीलप्रमाणे सांगितले आहेत.

१) मूलभूत गरजा भागवल्या जाण्याचा हक्क. २) माहितीचा हक्क. ३) निवड करण्याचा हक्क. ४) सुरक्षिततेचा हक्क. ५) मत मांडण्याचा हक्क. ६) तक्रार निवारण्याचा हक्क. ७) ग्राहक शिक्षणाचा हक्क.
८) स्वच्छ व आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क.

या आठ मूलभूत हक्कांखेरीज ग्राहक हित रक्षणासाठी केंद्र व राज्य पातळीवर अनेक कायदे केले गेले आहेत.

याशिवाय ग्राहक हित जपणारी 'ग्राहक पंचायत' नावाची सार्वजनिक संस्था आहे. ही संस्था ग्राहकांना तक्रार निवारण्यासाठी, हक्कांसाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी मदत करते. या संस्थेमार्फत तक्रारदाराला मार्गदर्शन केले जाते. मात्र आवश्यक तो पाठपुरावा त्यानेच करायचा असतो. या मार्गदर्शनासाठी कोणतेही शुल्क किंवा देणगी ग्राहकपंचायतीतर्फे घेतली जात नाही.

सन १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला.कमी खर्चात, विनाविलंब, सोप्या, पद्धतीने ग्राहकावरील अन्याय दूर करण्यासाठी अखिल भारतीय पंचायत समितीने यासाठी अथक प्रयत्न केले. या कायद्यानुसार ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक न्यायमंचाची स्थापना करण्यात आली.
एखादी सेवा वा वस्तू घेऊन झाल्यावर वस्तूचा व सेवेचा दर्जा, किंमत याबाबत फसवणूक झालेला कोणताही ग्राहक ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार नोंदवू शकतो. अर्थात अशा फसवणुकीचा अनुभव आल्यानंतर प्रथम परस्पर चर्चा करून सामंजस्याने प्रश्न सुटत नसतील तरच ग्राहक न्यायमंचाकडे धाव घ्यावी. ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केल्यावर तीन महिन्याच्या आत त्याचा निर्णय देण्याचे बंधन ग्राहक न्यायमंचावर असते. ग्राहक संरक्षण कायद्यातच तशी तरतूद केलेली आहे.

ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक न्यायमंचाची रचना पुढील प्रमाणे असते.

१) जिल्हा ग्राहक न्यायमंच - तीन सदस्य असलेल्या जिल्हा ग्राहक न्यायमंचात एक महिला सदस्य व दोन पुरुष सदस्य असतात. या जिल्हा न्यायमंचाचा अध्यक्ष न्यायदानाच्या क्षेत्रातील कायद्याचा अभ्यास केलेली व्यक्ती असते. उरलेले दोन सदस्य शिक्षण, न्याय, व्यापार, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात काम करणारे असतात.

२) राज्य ग्राहक तक्रार निराकरण आयोग - याची रचना जिल्हा ग्राहक न्यायमंचाप्रमाणेच असते.

३) राष्ट्रीय ग्राहक तक्रार निराकरण आयोग - यामध्ये पाच सदस्यांचा समावशे असतो. ग्राहक न्यायमंचाचा हा सर्वात श्रेष्ठ स्तर असून या आयोगाने दिलेल्या निर्णयावर एकदम सर्वोच्च न्यायालयातच अपील करता येते.

ज्या वस्तूबद्दल वा सेवेबद्दल तक्रार आहे. तिचे मूल्य किंवा नुकसानभरपाई रक्कम पाच लाखापर्यंत आहे. त्या तक्रारी जिल्हा ग्राहक न्यायमंचाकडे केल्या जातात. पाच लाख ते २० लाखापर्यंतच्या तक्रारी आणि जिल्हा ग्राहक न्यायमंचाच्या निकालविरुद्धची अपिले राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे करता येतात. तर वीस लाखावरील तक्रारी व राज्य ग्राहक न्यायमंचाच्या निकालविरुध्दची अपीले राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे करता येतात.आणि राष्ट्रीय ग्राहक न्यायमंचाच्या निकालाविरुद्धची अपीले सर्वोच्च न्यायलयाकडे केली जातात.
ग्राहकाला ज्याच्या विरुद्ध तक्रार करायची आहे त्याचे वास्तव्य अगर व्यवसाय ज्या जिल्ह्यात असेल किंवा ज्या जिल्ह्याच्या हद्दीत तक्रारीचे कारण उद्भवले असेल त्या जिल्ह्यात ग्राहकाने तक्रार नोंदवावी. ग्राहकाची तक्रार योग्य असेल तर विरुद्ध पक्षाला योग्य ती शिक्षा मिळते. उदा. खराब वस्तू बदलून देणे, वस्तूतील दोष दूर करून देणे, वस्तू परत घेऊन किंमत परत देणे, त्या वस्तूमुळे ग्राहकाचे आर्थिक नुकसान झाले असेल किंवा मानसिक त्रास झाला असेल तर त्याची भरपाईसुद्धा मिळते . पण जर ग्राहकाची तक्रार खोटी किंवा अयोग्य असल्याचे आढळल्यास तक्रार करणार्‍याला विरूद्ध पक्षाला १०,००० पर्यंत खर्च द्यावा लागतो.

ग्राहकाने वस्तू वा सेवा घेतल्यापासून किंवा तक्रारीचे कारण उद्भवल्यापासून दोन वर्षाच्या आत ग्राहकाला आपली तक्रार ग्राहक न्यायमंचाकडे नोंदवावी लागते. तक्रार नोंदवण्याची ही पद्धतीही सोपी असते. साध्या कागदावर त्याने आपल नाव, पत्ता, तक्रारीचा विषय, स्वरूप, तक्रारीच्या स्वरूपातील आपली मागणी याबाबतचा तपशील सुवाच्य अक्षरात किंवा टाईप करून न्यायमंचाकडे दाखल करायचा असतो. अर्थात ज्याबद्दल तक्रार करायची त्याचे नाव व पत्ताही त्या अर्जात अंतर्भूत करणे आवश्यक आहे. या अर्जाच्या पाच प्रती ग्राहक न्यायमंचाकडे पाठवणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकारने केलेल्या या योजनेचा लाभ सर्व ग्राहकंनी करून घेणे गरजेचे आहे. महत्मा गांधीजीनी म्हटले आहे , " शोषकाइतकाच शोषितही दोषी असतो. कारण निमुटपणे शोषण सहन करून तो अप्रत्यक्षपणे शोषकाला सहकार्यच करत असतो " तेव्हा फसवणूकी विरुद्ध दाद मागणे हे आपले कर्तव्यच आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून ग्राहकराजाने जागा होऊन कृतीशील होणे महत्त्वाचे आहे.

फिलिप्सवाले एप्लॉयी कोट्यातुन भंगार वस्तुच देतात. माझ्या भावाचे साबु त्या कंपनीत होते. भावाने त्यांच्या तर्फे डिस्काऊंटमध्ये म्युसिक सिस्टीम घेतली. ती सहा महिन्यातच कटकट करायला लागली. दोनतिनदा त्यांच्या सर्विससेंटर्च्या वा-या झाल्यावर भावाने नाद सोडुन दिला. आता शोपिस म्हणुन वापरतो. साधे एफेम पण लागत नाही. माझ्याकडे तेच मॉडेल आहे, गेल्या १० वर्षात काहीही झाले नाही. दररोज वापरली जाते.

बर्‍याचदा ग्राहक म्हणून आपणच पाठपुरावा करायचा कंटाळा करतो आणि या लोकांना मोकाट सोडतो

आपल्या ह्या स्वभावामुळेच कंपन्यांचे फावते. ब-याच उत्पादनांवर 'तक्रार असल्यास इथे नंबर करा' असे नमुद केलेले असते, आपण कंटाळा करतो.

वाशी एपिएम्सी मधुन मी अमुल घीचा एक किलोचा डबा आणला. उघडल्याबरोबर आत घी नसुन डालडा आहे हे लक्षात आले. एरवी मी कंटाळा केला असता आणि डबा बाईला दिला असता. पण एक मित्र अमुलमध्ये असल्याने त्याला फोन केला. त्याने तक्रार करायला एक नंबर दिला. त्या नंबरवर फोन केला असता दोन दिवसात त्याचा माणुस घरी आला आणि डालडा घेऊन घी देऊन गेला. अमुलच्या बाबतीत असे कधी होईल असे वाटले नव्हते असे त्याला म्हटल्यावर तो म्हणाला अमुल घी घेऊ नका, सागर घी घ्या, तेही अमुलचेच आहे पण त्यात भेसळ नसते .....

एकदा फळे घेत असताना दोन गुजराती बाया आल्या आणि त्यांनी दुकानदाराला तिन संत्री परत केली. संत्री गोड आहेत असे सांगुन त्याने ती विकली होती पण संत्री आंबट निघाली. मी मनात म्हटले मी नेहमीच गोड आहेत असे ऐकुन आंबट संत्री गळ्यात मारुन घेते पण कधी परत करायचा विचारही केला नाही.... ग्राहक म्हणुन कायम निद्रावस्थेत राहते मी.

साधनी, घी नही पर डालडा देखा ! Happy
अमुल सारख्या कंपनीच्या प्रॉड्क्ट मध्ये भेसळ???? साजूक तुपाच्या जागी डालडा म्हणजे कठीण आहे. ही कुठल्या स्टेजला होते कळत नाही.

त्यावरही आश्चर्य म्हणजे मी एपिएम्सीच्या ऑथराईज्ड दुकानदाराकडुन घेतला होता डबा... कोप-यावरचा वाणी विश्वासार्ह नाहीच पण तिथले दुकानदारही ......
अमुलच्या माणसाने दुकानाचे नाव पत्ता, बिल सगळे नीट लिहुन घेतले होते. पुढे काय केले देव जाणे...

वरच सगळ मला वाचायच आहे, पण मामींची पोस्ट वाचुन धीर आला. सध्या मी पण HP च्या "शेगडी घ्यावीच लागेल" त्रासातुन जात आहे. मी आत्ताच HP च्या साईट वर तक्रात नोंदवली आणी इथे आले तर इथे पण ह्या बाबत चर्चा आढळली.

परवा २०११ जानेवारी २५ बुध. मी तळेगाव दाभाडेत असलेल्या (एकमेव) HP Dealer कडे कनेक्शन घेण्यासाठी गेले, माझ्याकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांनि मला "१०० रु. च्या स्टँम्प पेपरवर अ‍ॅफीडेवीट करुन गुरुवारी या अस सांगीतल" (बदललेल्या नियमांनुसार तुमच्या कडे पत्ता पुरावा, ईंडेक्स २,... असल तरी हे अ‍ॅफीडेवीट कराव लागतच रेशन कार्ड नसेल तर अस तीथे कळाल)

तळेगावाची मला काही माहिती नाही पण डिलर ने सांगीतलेला नोटरी शोधुन मी अ‍ॅफीडेवीट करायला टाकल आणी परत डिलर कडे गेले कारण बाकी चार्जेस वै. ची माहिती पहिल्या खेपेत तीथल्या बाईंनी मला दिली नव्हती आणी मी हि विचारयचे विसरले होते. (हि माहिती शक्यतो त्या कोणाला देत नाहीत, पहिले फक्त रेशन कार्ड आणी अ‍ॅफीडेवीट बद्दलच त्या सगळ्यांना सांगतात, माझ्या समोर आलेल्या लोकांना तरी त्यांनी एवढच सांगीतल)

माझ्या तीथे असलेल्या बाईंशी आणी मॅनेजर शी झालेल्या संवादा(! ?) नुसार मी जरी शेगडी बुक केलेली असेल तरी मला डिलर कडुन शेगडी घ्याविच लागेल. कनेकशन चे ग्लास टॉप ३ बर्नर शेगडी, सीलेंडर आणी ईतर अ‍ॅसेसरीज मीळुन ११,०००.०० रुपये होतील.

माझी बुक केलेली ग्लास टॉप, ३ बर्नर शेगडी मला ३,२००.०० रुपयाला पडणार आहे आणी डिलर ला (एकुण किमतीत) त्या ग्लास टॉप,३ बर्नर शेगडीची किंमत विचारली तर त्याने ६,३००.०० रुपये!!!!! सांगीतली (बॉक्स प्राईज) त्या शीवाय कमी किमतीला तो शेगडी देणार नाही. डिलरची ग्लास टॉप ३ बर्नर शेगडी लाकुड रंगाची (क्रिम) आहे (काळी नाही ,मला हवी असल्या प्रमाणे)

मी डिलरला मला "सींगल बर्नर ची स्टील ची शेगडी द्या" विनंती केली तर "ती शेगडी आमेच्या कडे नाही, तुम्हाला ग्लास टॉप ची नको असेल तर २ बर्नर ची स्टील ची शेगडी घ्यावी लागेल दुसरा पर्याय नाही" अस तो म्हणाला

डिलरची २ बर्नरची स्टिल शेगडी २०००-२,५००.०० रुपयां पर्यंतची आहे.

"मला तुमच्या कडची शेगडी नकोच असेल तर त्या साठी काहीच मार्ग नाही का? कारण ग्राहकाने शेगडी घ्यायलाच हवी असा कायदा नाही तशी तुमची पॉलीसी आहे आणी तुमाची अशी पॉलीसी तुम्ही ग्राहकावर लादु शकत नाही" मी अस विचारल्यावर डिलर म्हणाला "तपासणी फॉर्म भरुन जा, आमचा माणुस तपासणीला येईल, तपासणी रीपोर्ट नुसार मग पुढच बघु"

"तपासणी करणारा माणुस १०-१५ दिवसात कधीपण येतो, कॉल वै. न करता, डिलर च्या कामकाजाची वेळ सकाळ ९ ते सायंकाळ ५ असली तरी तो माणुस ह्याच वेळेत येईल अस नाही तो त्याच्या सोयीनुसार आणी यादी नुसार कधीपण येईल" .... डिलर

मी: "मी शेगडी बुक केलेली आहे, ती ISO Mark आहे, ग्रीनशेफ ब्रांड ची आहे, त्याची डिलेवरी मी कनेकशन घेतल्यावर घेणार आहे, मग जर शेगडीच नाही तर तपासणी कशी आणी कश्याची? आणी मी शेगडी आणली आणी ती तुमच्या माणसाने पास केली नाही मग शीवाय मी अजुन तळेगावात शीफ्ट झालेले नाही (गॅस कनेकशन नसल्याने) आणी जॉब करते मग आता मी ही तपासणी कशी पार पाडणार? "

डिलरः "फॉर्म भरा, मला विचारुन तुम्ही शेगडी घेतली नाही, मी काहिच करु शकत नाही"

(म्हणजे ग्राहकाला आपल्या चॉईस नुसार शेगडी घेण्याचा पण हक्क नाही!!!!!, माझ्या नव्या घराला साजेल अशी शेगडी मी घेतली आहे, त्यात काय चुकल.)

मला तपासणी फॉर्म ची कॉपी देण्यास डिलर ने नकार दिला. शीवाय त्या फॉर्म वरचे प्रश्न मी वाचत असतांना घाईत तो फोर्म माझ्या काढुन घेऊन टाकला (मला प्रश्न वाचु दिले नाहीत)

तपासणी फॉर्म वर शेगडी बाबतही प्रश्न आहेत म्हणजे जर शेगडीच नाही तर तपासणी कशी आणी कश्याची माझा हा प्रश्न व्हॅलीड आहे?

मी काय करु? मला प्लीज गाईड करा.

मी डिलरला "तुम्ही मला, मी जी शेगडी बुक केली आहे ती शेगडी आणी त्याच किमतीला द्या मग मी माझी बुक केलेली शेगडी रद्द करण्याचा प्रयत्न करते" अस पण सांगुन पाहिल त्याला पण तो नाही म्हणाला.

"मी तुमच्या कडची शेगडी घेते पण किंमत ईतकी लावु नका ६,३००.०० खुप जास्त आहेत, ३,२००.०० किंमत लावा आणी मला काळ्या रंगाची शेगडी द्या" अस ही मी सांगीतल पण डिलर "नाही" च म्हणाला

माझ्या कडे मी बुक केलेल्या शेगडिच बिल आहे, मी तेही त्याला दाखवल पण त्याच्या कडुन काही सहकार्य मीळाल नाही.

परवा मी पुण्याच्या 'HP कस्टमर डेस्क' ला पण फोन केला, त्यांनी पुर्ण तक्रार न एकता घाईत माझा नाव , नंबर घेतला आणी २-३ दिवसात फोन येईल सांगीतल.

"डिलर कडची शेगडी कमी गॅस कनझ्युम करते" अस कस्टमर डेस्क वाला म्हणाला जे डिलर पण म्हणत होता. पण त्या साठी काय डबल किंमत द्यायची?????

कस्टमर डेस्क ने माझ बोलण पुर्ण न एकताच माझ्यावर "तुम्ही कनेकशन घेण्या आधी शेगडी का घेतली, ह्या आधी कुठल कनेकशन होत, कुठली शेगडी वापरत होता, कनेकशन शेगडी काहीच नव्हत मग काय करायच्या वै. प्रशांचा मारा केला" Sad

आम्हांला रिलायन्स ब्रॉडबॅन्ड चा फार वाईट अनुभव आला...
आमच ब्रॉडबॅन्ड कनेक्शन डाउनलोड आधी ४ जी.बी चा होता आणि नंतर तो आम्ही अन्-लिमिटेड करुन घेतला होता. पण ४ जी.बी. चा कोटा संपला कि नेट कनेक्शन बंद पडायच. खुप तक्रारी करुन झाल्या एकदा तर मी नेटाने ४५ मिनिट फोन होल्ड करुन ठेवला होता. दरवेळी कोणीतरी नवा एक्झिक्युटीव्ह मग तो आणि कुणाला फोन ट्रान्सफर करणार, पुन्हा त्याला सांगायच अस करत करत कुठ्ल्यातरी मॅनेजरशी बोललो तर म्हणे त्यांच्या बिलींग सिस्टीम मध्ये असलेल्या लिमिटेशन मुळे अपग्रेड नीट झाले नाही म्हणुन हे प्रोब्लेम येत आहेत. Angry
शेवटी कंटाळून आम्ही टाटा कडे वळालो.

Pages