गोष्ट एका Marriage certificate ची

Submitted by Shrik on 9 March, 2010 - 01:14

सरकारी कार्यालयातून चहापाणी न पाजता एखादं काम करुन घेण्यासाठी किती जोडे झिजवावे लागतात याचा अनुभव तुमच्यापैकी बर्‍याच जणांना आला असेलच. माझ्या मित्राचा असाच एक अनुभव मांडत आहे...

हि 'यशोगाथा' माझ्या मित्राच्या Marriage certificate ची...त्याने ज्या चिकाटीने ते मिळवलं त्यामुळे मी या गोष्टीला 'यशोगाथा' म्हटलं, केवढी सहनशक्ती लागते हो त्यासाठी!

त्याचं नाव सुजित .. एका आय.टी. कंपनी मध्ये नोकरी असूनही मी Marriage certificate बनवण्यासाठी agent पकडणार नाही किंवा पैसे चारणार नाही हा त्याचा हट्ट.

Office मध्ये दुपारची shift असल्यामुळे हा सकाळी ११.०० च्या नंतर महानगरपालिकेच्या कार्यालयात गेला. कागद्पत्रे सर्व होती, अडचण फक्त एकच... लग्न लावणारे भटजी याला विवाहबंधनात अडकवुन स्वतः मात्र या जगातून मुक्त झाले होते.
पहिल्या काही दिवसात form सकट सर्व कागदपत्रे पुरवल्यानंतरही तुमचे अमूक-तमूक कागदपत्र नाहीये तर ते आणून द्या असे सांगण्यात आले होते. महपालिकेत कागदपत्रे घेउन जाणे हा त्याचा "दीन"क्रम झाला होता. एखादं कागदपत्रं दिल्यानंतर हा स्वतःच विचारायचा, "उद्या काय घेउन येऊ ?"... असो..शेवटी त्या अधिकार्‍याने गरजेची असलेली-नसलेली सगळी कागदपत्रं सांगून झाल्यावर याला तंगवण्यासाठी form वर नजर टाकली आणि दिसलं की भटजींची सही आणि संबंधीत कागदपत्रं नाहीयेत.

अधिकारी (आसूरी आनंद झालेला)- भटजींची सही, फोटो, निवासस्थानाचा दाखला घेऊन या..

मित्र: लग्नं लावणारे गुरुजी ह्यात नाहीत आता.

अधिकारी (अधीकच आसूरी आनंद झालेला)- चालणार नाही, गुरुजींची सही आणि संबंधीत कागदपत्रं लागतीलच.

या जाचाला कंटाळलेल्या मित्राच्या मनात, यालाच गुरुजींची सही घ्यायला पाठवावं असा विचार नक्किच आला असणार, पण सुसंस्कृत आणि मुख्यत्वे मध्यमवर्गीय नुकताच लग्नं झालेला माणूस असल्याने त्याने तो मनातच दाबला असावा.
महापालिकेचे फेरे मारून आता ५-६ महिने उलटले होते. शेवटी हा वरिष्ठ अधिकार्‍याकडे गेला.

वरिष्ठ अधिकारी (निर्लज्जपणे): अहो आणा तुम्ही कुठल्याही गुरुजींची सही, काय बिघडतंय.

मित्र : सॉरी साहेब, पण मी बेइमानीचे धंदे करत नाही.

वरिष्ठ अधिकारी : मग त्याशिवाय certificate बनणार नाही.

मित्र : ठिक आहे, मग तुम्ही मला एका कगदावर लिहुन द्या, कि लग्न लावणारे गुरुजी expire झाले असतील तर Marriage certificate मिळणार नाही, मला वर्तमानपत्रात द्यायचं आहे.

वर्तमानपत्राचं नाव ऐकून अधिकारी जर बिचकला, हे प्रकरण काही साधं नाही हे समजुन त्याने फॉर्म वर काहीतरी खरडपट्टी केली आणि witness identification साठी तारिख दिली.

मित्र : ह्या तारखेला नाही जमणार साहेब, दुसरी तारीख द्याल का प्लीज?

अधिकारी : का बरं? काय प्रॉब्लेम आहे?

मित्र : ह्या तारखेला माझी पत्नी hospital मध्ये असेल, तिची due date आहे. शेवटी तुम्ही ही वेळ आणलीतच माझ्यावर! Birth certificate बनवायची वेळ येईल आता तरी माझ्या हातात Marriage certificate दिलं नाहीत तुम्ही..

गेंड्याची चामडी असलेल्या अधिकार्‍यामध्ये थोडी तरी शरम बाकी असावी म्हणून त्याने मित्राला दुसर्‍या दिवशी बोलवलं आणि पटापट सगळी कामं करून त्याचं Marriage certificate बनवून दिलं.

आपल्या चिकाटी मुळे चांगलाच प्रसिद्ध झालेल्या मित्राला थोड्या दिवसांनी हा अधिकारी बाजारात भेटला.

अधिकारी : काय साहेब आज इकडे? खरेदी करताय?

मित्र: हो साहेब, नवीन चप्पल घेतोय....आता Birth certificate बनवायचं आहे..वर्षभर तरी चालतील अशा घेतो.

अधिकारी खाली मान घालून निघून गेला.

गुलमोहर: 

अरुंधती Happy
>>नवीन चप्पल घेतोय....आता Birth certificate बनवायचं आहे..वर्षभर तरी चालतील अशा घेतो...
मस्त टोला हाणलायः)

मस्त Happy

हॅ हॅ हॅ.................

चांगला लेख.

एका आय.टी. कंपनी मध्ये नोकरी असूनही मी Marriage certificate बनवण्यासाठी agent पकडणार नाही किंवा पैसे चारणार नाही हा त्याचा हट्ट>>>>>>>>>>
तो नोकरीला कुठेही असु दे हो. त्याचा हट्ट कौतुकास्पद आहे. खरतर ह्याला हक्क म्हणाव.

माझे मॅरेज सर्टिफिकेट केवळ एका दिवसात ६ तासात विनासायास(सायास नवर्‍याने केले) मिळाले आहे. सासरे पण बरोबर होते. सर्टिफिकेट मिळाल्यावर त्यांनी अधिकार्‍याला पैसे देऊ केले. तो बिचारा लाजत नको म्हणाला(फक्त एकदाच). तरी त्यांनी दिलेच चहा पाण्याला म्हणून Sad

पनू ,

याला प्रमाणिक पणा बद्दल बक्षीस म्हणवं की काय? यांना सवयी लावणारे आपणंच आणि त्यांच्या नावाने ओरडणारेही आपणच..

सही

ह्या शीर्षकाची कथा नेमकी आजच इथे दिसल्यावर मला वाटलं आमच्या अहोंनी टाकलीय की काय!
याचं कारण म्हणजे आजच आमच्या लग्नाचं प्रमाणपत्र आमच्या (म्हणजे अहोंच्याच) हाती पडल्याची बातमी आमच्या अहोंनी मला कळवली. त्यासाठी इतक्या अडचणी आणि इतके अडथळे आम्हाला पार पाडायला लागले की ते सर्टिफिकेट नेमकं कसं दिसतं, हे केव्हा एकदा घरी जाऊन त्याला प्रत्यक्ष हात लावून बघतोय असं मला झालंय. Proud
(दरम्यान आम्हाला आमच्या अपत्याचा जन्मदाखला मिळवून वर्ष होऊन गेलं!)

"मित्र: हो साहेब, नवीन चप्पल घेतोय....आता Birth certificate बनवायचं आहे..वर्षभर तरी चालतील अशा घेतो.

अधिकारी खाली मान घालून निघून गेला"

चपराक..........................................

छान आहे...................लग्न करण्या पुर्वीच मॅरेज सर्टिफिकेट साठी प्रयन्त करायचा विचार करतोय.....?

नंतर कटकट नको... :))

Pages